मन

Submitted by sarangi on 24 March, 2008 - 06:19

आता मी सहसा दु:खी होत नसावी
अमुर्ताच्या पाठलागाचं त्राणंच उरलेलं नसणार.....
मात्र रानात पाचोळा साठत जावा
झाडाच्या बुंध्याशी
आणि सरसरत रहावं काही
पाचोळ्यातुन
तसंच काहिसं वाजत असतं
मनाच्या तळाशी अधुनमधून .....

गुलमोहर: 

अल्पाक्षरी कविता म्हणजे माझा आवडता प्रकार,
थोडक्यात काय ते बोलुन घ्यायचा जास्ती फापट पसा-याची गरजच नाही. (म्हणजे मोठ्या कविता वाईट असतात अस म्हणत नाहिये मी)

छान आहे कविता, आवडली.

आपण जे लिहितो ते कुणालातरी कळतं यातंच सारं आलं . धन्यवाद .

धन्यवाद. तसं पाहीलं तर मालाही ओढुन ताणुन लांबवलेल्या कविता आवडत नाहीत.

धन्यवाद. प्रतिसाद दिलास म्हणुन आणि माझी कविता तुला कळली म्हणुनसुद्धा.

सारंगी, छान लिहीलं आहेस. थोडक्यात पण नेमकं!

भारी.
निखिल

कविता आवडली सारंगी

मस्त.

झाडाचा बुंधा...............................मनाचं तळ
.......................................फार बरं वाटलं.

अतिशय सुंदर कविता!!!

कविता कशी असावी? तर अशी असावी.
नेमक्या शब्दात नेमक्या भावना व्यक्त करणारी.

धन्यवाद सर्वांना . चला म्हणजे आपण लिहीलेलंसुद्धा कळतं लोकांना .

कविता आवडली. अमुर्त नव्हे अमूर्त असावे. CBDG!

चुक सुधारल्याबद्दल धन्यवाद पण हे CBDG! काय आहे ?