"हर घर तिरंगा" - स्वातंत्र्याची ७५ वर्षे

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 August, 2022 - 17:22

सर्व मायबोलीकर मित्रमैत्रीणींना ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! Happy

यंदा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारकडून 'हर घर तिरंगा' अभियान राबवण्यात आले आहे. त्यानुसार १३ ऑगस्टच्या सुर्योदयापासून १५ ऑगस्टच्या सुर्यास्तापर्यंत प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं होते. यात कुठलीही सक्ती नव्हती पण ज्यांची यात सहभाग नोंदवायची ईच्छा होती त्यांना झेंडे सरकारतर्फे मोफत मिळत होते. आमच्याईथे पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन घ्यायचे होते. पण आमच्या सोसायटीने एक काम छान केले. सर्वांसाठी म्हणून एकत्रच घेतले आणि घराघरात वाटप केले.

पण मी ठरलो आळशी. लावतो लावतो म्हणून वैयक्तिक कामात बिजी राहिलो आणि १३ तारखेला झेंडा लावायचे राहिले. संध्याकाळी फिरायला बाहेर गेलो असताना बिल्डींगकडे एक नजर टाकली तर ऊर अभिमानाने भरून आला. खरेच बिल्डींगच्या प्रत्येक घराघरावर तिरंगा फडकत होता. छान वाटले बघायला. एक आपल्याच घरावर तिरंगा फडकत नाहीये हे बघून चुकचुकल्यासारखे वाटले.

घरी आल्यावर सुर्यास्तानंतर झेंडा फडकवायचा नाही म्हणून मग १४ तारखेला लवकर ऊठून आंघोळ करून पहिले काम तेच करायचे ठरवले. पण त्याआधीच माझी वाट बघून बायकोचे झेंडा लाऊन झाले होते. अर्थात पहाटे वॉचमन सुद्धा आठवण करून द्यायला आला होता. सक्ती म्हणून नाही. त्याला कदाचित पुढाकार घेतलेल्या सोसायटी मेंबरनीच असे करायला सांगितले असावे. सोसायटी एकजूट दाखवून काही करत असेल तर ते चांगलेच आहे.

पण त्या खिडकीवरील झेंडा फडकताना कबूतर जाळीवर अडकत होता. एकदा लावलेला झेंडा आता तिथून काढून पुन्हा दुसर्‍या जागी लावणे योग्य का अयोग्य वा कसे हे माहीत नव्हते. पण तरी झेंडा फाटणे हे नक्कीच अयोग्य होईल म्हणून मग मी झेंड्याची जागा बदलली. आता तो आणखी दिमाखात फडकू लागला.

त्याआधी जी मुले नाचो नाचो गाणे गात नाचत होती ती अचानक वंदे मातरम गाणे गाऊ लागली. झेंडा नवीन जागी लावतानाही मदत करायला पुढे होती. अचानक घराचे वातावरण बदलून गेले. जसे धार्मिक सणांना घरात एक मांगल्याचे वातावरण असते तसेच काहीसे वातावरण या राष्ट्रीय सणाला दिसू लागले. मुले कपडे बदलून झेंड्यासोबत फोटो काढायच्याही तयारीत होते. पण मीच त्यांना आवरले. उद्या सोसायटीचे ध्वजारोहण होईल तेव्हाच हा सण साजरा करूया म्हटले.

तरी कौतुकाने फडकणार्‍या झेंड्यांचे दोन चार फोटो आणि विडिओ काढले. त्या विडिओत "८३" चित्रपटातील देशभक्तीपर गीत जोडून व्हॉटसप स्टेटसला लावले आणि सोसायटीच्या ग्रूपवरही टाकले. तसे तासाभरात आणखी सहा सात जणांच्या स्टेटसला तो विडिओ दिसू लागला. लोकांनी आपल्या सोसायटीतीलच झेंडा आहे म्हणत कौतुकाने तो आपल्या स्टेटसला ठेवला होता. तर मलाही आपण फडकवलेल्या झेंड्याचा विडिओ सोसायटी मेंबर आवडीने शेअर करत आहेत याचा एक आनंद झाला. ही जी आपलेपणाची भावना आहे, एकात्मतेचा विचार आहे, एकजुटीने सहज घडणारी कृती आहे, हेच तर सारे आजचा दिवस घेऊन येते Happy

पुन्हा एकदा सर्वांना ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

IMG_20220815_022956.jpg

.

आमच्या झेंड्याचा विडिओ ईथे बघू शकता - लहरा दो Happy
https://youtube.com/shorts/65XprJ_IeMM?feature=share

ज्या मायबोलीकरांनी या अभियानात सहभाग नोंदवला त्यांनी आपल्या घरी फडकवलेल्या झेंड्यांचे फोटो, विडिओ बघायला आणि त्यांचे याबद्दलचे अनुभव वाचायला आवडतील. तसेच १५ ऑगस्टच्या दिवशी तुमच्या सोसायटीमध्ये जे ध्वजारोहण होईल ते ही बघायला आवडेल Happy

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग नेहरूंचे ते सुप्रसिद्ध Tryst with destiny हे भाषण १४ ऑगस्टच्या रात्री आणि १५ ऑगस्टच्या भल्या पहाटे constituent assembly मध्ये मध्यरात्रीच्या एका विशेष अधिवेशनात केले गेले होते ना?

Tryst with destiny हे भाषण मध्यरात्रीच्या एका विशेष अधिवेशनात ...

होय !

शशी थरूर यांचा एक छान लेख वाचला 'हिंदू'मध्ये. (लिंक देता येणार नाही कारण तो लेख फ्री उपलब्ध नाही)
१५ ऑगस्ट १९४७ ला भारतात उपस्थित असलेल्या एका अमेरिकन पत्रकाराच्या पत्नीने तेव्हाचं केलेलं वर्णन आहे. ती नवऱ्याबरोबर पाकिस्तानातल्या आणि भारतातल्या, दोन्ही समारंभांना उपस्थित होती. मध्यरात्रीचा कार्यक्रम, तेव्हा अनपेक्षितपणे एका सन्माननीय सदस्यांनी फुंकलेला शंख (मंगल प्रसंग म्हणून), दुसऱ्या दिवशी सकाळचा कार्यक्रम, तिरंगा वर जायला लागल्यावर जमलेल्या माणसांनी केलेला जल्लोष, पण त्याचवेळी overwhelming भावना अनुभवत असल्यामुळे काहीजण एकदम शांत होते, हे दृश्य.. फार छान वर्णन आहे.
खरं तर ती अमेरिकन स्त्री. भारताच्या स्वातंत्र्याशी तिचा तसा काही संबंध नाही. पण तिच्या दृष्टीनेही तो एक भावनिक प्रसंग ठरला!

>>युनियन जॅक उतरवण्याचे काम शाहरुख खानच्या आजोबांनी केले म्हणे<<
गई भैस पानीमे... Proud

बाय्दवे, झेंड्यावर, तो कसा हाताळावा, उभारावा, जतन करावा इ. बराच उहापोह झाला आहे. परंतु, खर्‍या अर्थाने भारताचा झेंडा जगभरात फडकंत रहाण्याकरता काय करण्यासारखं आहे, आता यावरहि बोला...

भारताचा झेंडा जग भरात फडकवण्याचा मार्ग खूप कठीण आहे.
तळागाळातील प्रतेक व्यक्ती पर्यंत विकास पोचला पाहिजे.
ग्रामीण भाग सहित दुर्गम खेड्या पर्यंत.
वीज,पाणी,रस्ते,आरोग्य ,शिक्षण ,पोचले पाहिजे
रोजगार च्या संध्या सर्वांना मिळाल्या पाहिजेत
आणि स्वच्छ आणि वेगवान प्रशासन.
तांत्रिक आणि यांत्रिक क्षेत्रात मोठी झेप.
हे सर्व घडले पाहिजे.
पण ते सोप नक्कीच नाही
त्या साठी तळमळ असणारे सरकार हवं.
समजूतदार जनता हवी
कर्तव्य निष्ठ सरकारी कर्मचारी हवेत.
न्याय निष्ठुर न्यायाधीश हवेत.

लाल किल्ल्यावरून युनियन जॅक काढायचे काम शहारुखचे आजोबा उर्फ शहा नवाज खान यांनी केले म्हणे

https://www.amarujala.com/uttar-pradesh/meerut/special-story-related-to-...

नक्की काय केले होते हे समजेल का ?

भारताचा झेंडा जग भरात फडकवण्याचा मार्ग खूप कठीण आहे. >> आठ वर्षात काय फडकवलं म्हणे?

माझा १००वा प्रतिसाद! Happy

त्या साठी तळमळ असणारे सरकार हवं.
समजूतदार जनता हवी
कर्तव्य निष्ठ सरकारी कर्मचारी हवेत.
न्याय निष्ठुर न्यायाधीश हवेत. > +११

माझा १००वा प्रतिसाद! Happy
>>>>
१०० वा प्रतिसाद पण १०१ वी पोस्ट (पहिली माझी हेडर पोस्ट) Happy

जगात भारताचा झेंडा फडकवला जावा.
हा मोहवरा आहे.
ह्याचा अर्थ प्रतेक देशाच्या भूमीत झेंडा उभारणे नाही.
त्याला युद्धाची खुमखुमी म्हणता येईल.
भारताने इतकी प्रगती करावी सर्व क्षेत्रात की (अर्थात चांगल्या क्षेत्रात गुन्हेगारी ,हिंसाचार मध्ये नाही)
जगात भारताचे नाव अभिमानाने सर्व देशातील लोकांनी घ्यावे.
भारतीय लोकांचा तर उर भरून आलं पाहिजे ह्या देशात जन्म घेतला त्या विषयी.

जगात भारताचे नाव अभिमानाने सर्व देशातील लोकांनी घ्यावे.

कशाबद्दल घेतील ? सगळ्यांना मांडीवर घेऊन दूध पाजणार आहात का ?

जे काही इम्पोर्ट एक्स्पोर्ट होतील ते आर्थिक व्यवहारच असतील

तुम्हाला पाकिस्तान साखार देते , गल्फ तेल देते , तुम्ही अभिमान बाळगता का

कॅन्सर झाला आहे .
अमेरिकेत गेले पाहिजे.
उत्तम फळं हवीत.
थायलंड , इंडोनेशिया,न्यूझीलंड.
उत्तम यंत्र हवीत जपान made किंवा कोरिया made हवं.
उच्च शिक्षण
ब्रिटन,सिंगापूर.
असे प्रतेक क्षेत्रात काही देश top आहेत.
जगातील प्रतेक व्यक्ती ला त्या देशांची आठवण येते वेळ आली की.
तसे भारताची आठवण प्रतेक देशाला आली पाहिजे.
मग म्हणता येईल भारताने जगात झेंडे रोवले.
जगात सर्वात सुखी लोक.
भारतात.
जगातील भ्रष्टाचार मुक्त देश
भारत.
उत्तम आरोग्य सुविधा असणारा देश
भारत.
उत्तम शेती आणि सुखी शेतकरी असणारा देश .
भारत.
कामगार ना उच्च वेतन देणारा देश
भारत.
असा डंका भारताचा झाला पाहिजे जगात.
विनाश करणारी शस्त्र अस्त्र असणे म्हणजे powerful देश म्हणता येणार नाही.
नाही तर आहे ना.
उत्तर कोरिया,पाकिस्तान.
विनाशकारी शस्त्र आहेत पण जनता नरक यातना bhogat आहे.

विनाशकारी शस्त्र

शस्त्र विनाशकारीच असणार ना हो !!

शस्त्राने विनाश करू नये मग शत्रूच्या गावात आदळून नांगरणी करून यावे की काय.

शस्त्रे सगळीकडेच आहेत , अगदी नेपाळात राफेल नसेल तरी चाकूवाले हातगोळेवाले 4 पोलीस तरी असतीलच की,

df_0001.jpgdf_0002.jpg
बर्‍याच दिवसांनी पत्रपेटी उघडली तर हे मिळालं. पाकिटात घालून टाकलेलं होतं.

पत्रे सरकारी खर्चाने वाटलीत की पक्षाच्या त्याची कल्पना नाही.

स्वातंत्र्यदिनासारख्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुद्धा पक्षाचा प्रचार. अर्थात जिथे पंप्र लाल किल्ल्यावरून पक्षप्रचाराचं भाषण ठोकतात, तिथे हे चालायलाच हवं.
प्रिय मुंबईकर ,असं म्हटलंय म्हणजे पक्ष कार्यकर्त्यांसाठी असलेलं पत्र आमच्याकडे आलंअसं सुद्धा नाही.

फडणवीस आणि bjp ह्यांच्या कडे देश किंवा राज्य ह्यांच्या प्रगती विषयी काही च कार्यक्रम नाही .त्यांना गंभीर घेण्याची गरज नाही

प्रगतीविषयी नाही. पण देशाचं वाटोळं करायचा कार्यक्रम आहे आणि ते तो राबवताहेत.

एकनाथ शिंदे गटातल्या लोकांना हे पत्र वाचून जे काही वाटलं असेल ते , ते उरावर दगड ठेवून सहन करतील.

यात कुठलीही सक्ती नव्हती पण ज्यांची यात सहभाग नोंदवायची ईच्छा होती त्यांना झेंडे सरकारतर्फे मोफत मिळत होते.
>>>>

मूळ लेखातील या वाक्याबद्दल क्षमस्व. नुकतेच मला समजले की माझ्या सासरच्यांनी जो पोस्टातून झेंडा घेतला त्याचे २५ रुपये शुल्क भरावे लागले.
आम्हाला सोसायटीकडून घरपोच झाल्याने त्यांनी काही पैसे भरले का याची कल्पना नाही.

म्हणजे मोदी हे फक्त भाजप राज्यांचे पंतप्रधान आहेत

जर इतर सरकार राज्यात असेल तर खीळ बसते

Proud

आणि हे म्हणे विश्वगुरु होणार

कित्येक घराच्या खिडकीत आज पण तिरंगा चित्र विचित्र अवस्थेत आहे >>>> अगदी अगदी.
कोणाला काही देणेघेणे नाही >>>> सहमत

भारतीय इतके दुसऱ्याच्या बुद्धी नी चालतात.
हे आता दिसायला लागले आहे...
Bjp च it' cell samaj माध्यमावर फालतू विचार पसरवत असतो आणि त्याला बळी पडणारे खूप आहेत ..स्वा बुद्धी असणारे भारतात खरेच खूप कमी लोक आहेत

बाय द वे, काल संध्याकाळी न्यु यॉर्कच्या आभाळावरती हेलिकॉप्टरने तिरंगा बॅनर फडकावला. का माहीत नाही.

१५ ऑगस्ट च्या दिवशी गेल्या वर्षी तरी एम्पायर स्टेट बिल्डिंग भारतमातेच्या ध्वजाच्या रंगात अगदी त्याच सिक्वेन्स्मध्ये रंगलेली होती. यावर्षी काही नदी तीरावर जाउन पाहीले नाही. पण नक्की असणार.

यावेळी ही आमच्या मुंबई घरी हा उपक्रम आहे.
इथे नवी मुंबई घरी मात्र अजून कोणी उत्साह दाखवला नाही.
उद्या तरी घरी लावायचा का झेंडा हा विचार करतोय.
सोसायटीत फडकवला जाईलच

Pages