सर्व मायबोलीकर मित्रमैत्रीणींना ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
यंदा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारकडून 'हर घर तिरंगा' अभियान राबवण्यात आले आहे. त्यानुसार १३ ऑगस्टच्या सुर्योदयापासून १५ ऑगस्टच्या सुर्यास्तापर्यंत प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं होते. यात कुठलीही सक्ती नव्हती पण ज्यांची यात सहभाग नोंदवायची ईच्छा होती त्यांना झेंडे सरकारतर्फे मोफत मिळत होते. आमच्याईथे पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन घ्यायचे होते. पण आमच्या सोसायटीने एक काम छान केले. सर्वांसाठी म्हणून एकत्रच घेतले आणि घराघरात वाटप केले.
पण मी ठरलो आळशी. लावतो लावतो म्हणून वैयक्तिक कामात बिजी राहिलो आणि १३ तारखेला झेंडा लावायचे राहिले. संध्याकाळी फिरायला बाहेर गेलो असताना बिल्डींगकडे एक नजर टाकली तर ऊर अभिमानाने भरून आला. खरेच बिल्डींगच्या प्रत्येक घराघरावर तिरंगा फडकत होता. छान वाटले बघायला. एक आपल्याच घरावर तिरंगा फडकत नाहीये हे बघून चुकचुकल्यासारखे वाटले.
घरी आल्यावर सुर्यास्तानंतर झेंडा फडकवायचा नाही म्हणून मग १४ तारखेला लवकर ऊठून आंघोळ करून पहिले काम तेच करायचे ठरवले. पण त्याआधीच माझी वाट बघून बायकोचे झेंडा लाऊन झाले होते. अर्थात पहाटे वॉचमन सुद्धा आठवण करून द्यायला आला होता. सक्ती म्हणून नाही. त्याला कदाचित पुढाकार घेतलेल्या सोसायटी मेंबरनीच असे करायला सांगितले असावे. सोसायटी एकजूट दाखवून काही करत असेल तर ते चांगलेच आहे.
पण त्या खिडकीवरील झेंडा फडकताना कबूतर जाळीवर अडकत होता. एकदा लावलेला झेंडा आता तिथून काढून पुन्हा दुसर्या जागी लावणे योग्य का अयोग्य वा कसे हे माहीत नव्हते. पण तरी झेंडा फाटणे हे नक्कीच अयोग्य होईल म्हणून मग मी झेंड्याची जागा बदलली. आता तो आणखी दिमाखात फडकू लागला.
त्याआधी जी मुले नाचो नाचो गाणे गात नाचत होती ती अचानक वंदे मातरम गाणे गाऊ लागली. झेंडा नवीन जागी लावतानाही मदत करायला पुढे होती. अचानक घराचे वातावरण बदलून गेले. जसे धार्मिक सणांना घरात एक मांगल्याचे वातावरण असते तसेच काहीसे वातावरण या राष्ट्रीय सणाला दिसू लागले. मुले कपडे बदलून झेंड्यासोबत फोटो काढायच्याही तयारीत होते. पण मीच त्यांना आवरले. उद्या सोसायटीचे ध्वजारोहण होईल तेव्हाच हा सण साजरा करूया म्हटले.
तरी कौतुकाने फडकणार्या झेंड्यांचे दोन चार फोटो आणि विडिओ काढले. त्या विडिओत "८३" चित्रपटातील देशभक्तीपर गीत जोडून व्हॉटसप स्टेटसला लावले आणि सोसायटीच्या ग्रूपवरही टाकले. तसे तासाभरात आणखी सहा सात जणांच्या स्टेटसला तो विडिओ दिसू लागला. लोकांनी आपल्या सोसायटीतीलच झेंडा आहे म्हणत कौतुकाने तो आपल्या स्टेटसला ठेवला होता. तर मलाही आपण फडकवलेल्या झेंड्याचा विडिओ सोसायटी मेंबर आवडीने शेअर करत आहेत याचा एक आनंद झाला. ही जी आपलेपणाची भावना आहे, एकात्मतेचा विचार आहे, एकजुटीने सहज घडणारी कृती आहे, हेच तर सारे आजचा दिवस घेऊन येते
पुन्हा एकदा सर्वांना ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
.
आमच्या झेंड्याचा विडिओ ईथे बघू शकता - लहरा दो
https://youtube.com/shorts/65XprJ_IeMM?feature=share
ज्या मायबोलीकरांनी या अभियानात सहभाग नोंदवला त्यांनी आपल्या घरी फडकवलेल्या झेंड्यांचे फोटो, विडिओ बघायला आणि त्यांचे याबद्दलचे अनुभव वाचायला आवडतील. तसेच १५ ऑगस्टच्या दिवशी तुमच्या सोसायटीमध्ये जे ध्वजारोहण होईल ते ही बघायला आवडेल
धन्यवाद,
ऋन्मेष
मोरोबा
मोरोबा
ह्यांचे १०० टक्के बरोबर आहे
स्वतंत्र दिवस एकच असतो जसा जन्म दिवस एक च असतो .
बाकी वर्धपान दीन किंवा वाढ दिवस.
https://twitter.com/PTI_News
https://twitter.com/PTI_News/status/1559554477153460226
Maharashtra govt appeals to people in state to sing national anthem at 11 am tomorrow as part of celebrations of 75 years of Independence
आम्हाला वेळ नाही.
आम्हाला वेळ नाही.
देश प्रगती पथ वर नेण्यासाठी आमची कर्तव्य आम्ही करणार.
नाटक करायला वेळ नाही.
उद्या कशाला? म्हणजे म्हणायचं
उद्या कशाला? म्हणजे म्हणायचं तर रोज म्हणा. पण उद्या काय आहे?
का आपलं थाळ्या बडवा, घंटी वाजवा, दिवे लावा सारखं एक काही तरी टास्क दिला की दोन तीन दिवस बातम्यांना एक विषय मिळाला.
महा राष्ट्रात शासकीय कर्मचार्
महा राष्ट्रात शासकीय कर्मचार्यांनी फोन उचलला की हॅलो न म्हणता वंदे मातरम म्हणायचं असाही आदेश आला आहे.
(लतासारखं की रेहमान सारखं ते माहीत नाही)
मूर्ख पना आहे. लोकांनीच आता
मूर्ख पना आहे. लोकांनीच आता ह्या नेत्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.
खूप झाले ह्यांचे
अमेरिकन मोरोबा यांनी
अमेरिकन मोरोबा यांनी लिहिल्याप्रमाणे स्वातंत्र्याचा वर्धापन दिन साजरा करतात. यंदा २४६ वा होता
https://in.usembassy.gov/celebrating-the-246th-american-independence-day/
डिक्शनरीतही हाच अर्थ दिसला.
भारतात मात्र ज्या तारखेला स्वातंत्र्य मिळालं तो दिवस साजरा करतात. शासकीय संकेतस्थळानुसार ७६ वा.
<<यात ओपिनिअन कसा काय असू
<<यात ओपिनिअन कसा काय असू शकतो?>>
बरेच लोक वय सांगण्यात गडबडतात.
अमुक वर्ष सांगितले तर अमुक पूर्ण झाली की अमुकावं लागलं? असा प्रश्न विचारतात. वय सांगताना पूर्ण झालेली वर्षे सांगावी की कितवं सुरू झालं यात ओपिनियन असू शकतं तर कितवा स्वातंत्र्यदिन यात का नाही?
पुढचे ओपिनियन: मराठीत स्वातंत्र्य असेच म्हणावे की स्वतंत्रता हा शब्द पण बरोबर आहे?
वाद तो नाही.
वाद तो नाही.
७६ वं स्वतंत्र दिवस असेल तर vardhpan वर्ष पण ७६ च.
७५ असेल तर vardhpan वर्ष पण ७५ च.
पण काही अती शहन्या लोकांनी .
स्वतंत्र दिवस ७५ व आणि vardhpan वर्ष ७६ असे पिल्लू सोडून दिले.
आणि भारतीय गडबडले.
नाही. वर्धापनदिन ७५ वा.
नाही. वर्धापनदिन ७५ वा. स्वातंत्र्यदिन ७६ वा.
आज सकाळी बाहेर गेलेलो तर
आज सकाळी बाहेर गेलेलो तर बाहेरून बघितले असता लक्षात आले की बिल्डींगमधील ९० टक्के लोकांनी झेंडे उतरवलेच नाहीयेत. सोसायटीच्या सेक्रेटरीने तीनतीन वेळा ग्रूपवर मेसेज टाकूनही लोकांना झेंडा काढायला जीवावर आलेय.
@ स्वातंत्र्य दिन, जर १५ ऑगस्ट १९४७ हा पहिला स्वातंत्र्यदिन पकडला तर १६ ऑगस्ट १९४७ हा दुसरा स्वातंत्र्यदिन हवा. असो, हे जरा कन्फ्यूजिंग आहेच. कारण लोकं जन्मदिवस वाढदिवसाशी हे रिलेट करून बघतात..
1९४८
1९४८
कोणताही दिवस.
कोणताही दिवस.
जन्म दिवस .
मृत्यू दिवस .
शाळा सोडल्याचा दिवस.
शाळा जॉईन केल्याचा दिवस.
नोकरी वर जॉईन झाल्याचा दिवस.
आपणाला दरवर्षी साजरा करायचा असेल .
तर एक वर्ष नंतर जेव्हा ती तारीख येते त्याला पहिला जन्म दिवस च म्हणतात.
सर्व बाबतीत असेच नियम आहेत.
मग स्वतंत्र दिवसाला वेगळे नियम का लावायचे.
आपण पहिला स्वातंत्र्यदिन
आपण पहिला स्वातंत्र्यदिन केव्हा साजरा केला त्यावर अवलंबून आहे परवा कितवा होता.
जन्म झाला तो जन्मदिन. पुढल्या
जन्म झाला तो जन्मदिन. पुढल्या वर्षी त्याच तारखेला साजरा करतो तो वाढदिवस. एक वर्ष पूर्ण झाल्यावर पहिला वाढदिवस.
पण इंग्रजीत बर्थडे म्हणतात. तिथे एक वर्ष पूर्ण झाल्यावर दुसरा बर्थडे.
ज्या दिवशी स्वतंत्र झालो तो स्वातंत्र्यदिन. पहिला. त्याच तारखेला दर वर्षी करतो, तो त्यापुढला.
यावर्षी अमृतमहोत्सवामुळे घोळ झालाय. दरवर्षी कितावा स्वातंत्र्यदिन हे आपण बघत नाही.
यावर्षी अमृतमहोत्सवामुळे घोळ
यावर्षी अमृतमहोत्सवामुळे घोळ झालाय. दरवर्षी कितावा स्वातंत्र्यदिन हे आपण बघत नाही.
>>>
एके वर्षी आमच्या ऑफिसमध्ये प्रश्न मंजूषा होती. त्यात यावरून वाद पेटलेला. जिंकलेल्याला चॉकलेट असल्याने कोणी कोणाचे ऐकायला तयार नव्हते.
मुळात पहिला स्वातंत्र्यदिन १९४७ चा धरावा की १९४८ चा हे कुठे नमूद केले आहे का?
महापुरुषांची शंभरावी जयंती
महापुरुषांची शंभरावी जयंती साजरी करतो त्याला काय नियम आहेत?
आनंदोत्सव पाहिजेच, पण
आनंदोत्सव पाहिजेच, पण हल्लागुल्ला, धुडगूस आणि किरकोळीकरण (trivialisation) नको.
मौनाचा, शांततेचा अर्थ, त्यातली परिपक्वता आणि सभ्यता आपल्याला समजलेलीच नाही.
@हीरा : पूर्ण पोस्टच आवडली.
बाकी झेंडा फडकवून कोणी देशभक्त होत नाही किंवा फडकवला नाही म्हणून कोणाला देशाविषयी प्रेम वाटत नाही
असेही नाही. फक्त आतापर्यंत नेतेमंडळींच्या हस्ते झेंडावंदन करत असताना पाहिल्याने आणि ध्वजसंहितेचा मान राखण्याच्या भितीने सामान्य नागरीक फारसे तिरंगा फडकावित नव्हते. कित्येक लोक शाळेतून बाहेर पडल्यावर ही भावना मिस करत होते. तसे नसते तर स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनाला कारमधे, लेपल पिन म्हणून, टेबलटॉपवर, ऑफिसेसमधे कागदी/प्लास्टिक तिरंगा/तिरंग्याच्या माळा लावून लोकांनी सेलिब्रेट केलेच नसते. मोदींनी ही नस बरोबर पकडली आणि आवाहन केले. लोकांनाही अरेच्च्या ही किती साधी गोष्ट आहे आणि आपण का करत नाही असे झाले. त्यामुळे चांगल्या अर्थाने मास हिस्टेरिया निर्माण झाला.
झेंड्याच्या कापडाची क्वालिटी चांगली नव्हतीच. फारसा वेळ न मिळाल्याने दुकान ठावूक असून उत्तम प्रतीचा झेंडा आणता आला नाही.
बीएमसीने आमच्या बिल्डींगमध्ये झेंडे वाटले. पण वॉचमनकाका हातावर रुमाल टाकून विकावेत तसे झेंडे वाटत होते. ऑफिसची मिटींग सुरू असल्याने काहीच करता आले नाही पुढच्या वेळी असे काही झाले तर सन्माननिय पद्धतीने झेंडा हाताळण्यासाठी पुढाकार घेईन.
मागच्या पानावर भारत सरकारच्या
मागच्या पानावर भारत सरकारच्या संकेतस्थळाचा स्क्रीनशॉट टाकला आहे. त्यावर ७६वा स्वातंत्र्यदिन असं म्हटलं आहे.
.
सरळ आहे 15 aug 1947 ल
सरळ आहे 15 aug 1947 ल स्वतंत्र दिवस साजरा केला होता.
पण ही तारीख साल परत कधीच येत नाही.
आपण साजरे करतो तो दिवस एक वर्ष नंतर त्याला च पाहिले वर्ष म्हणता येईल.
दुसरे कसे म्हणणार.
स्वतंत्र मिळून किती वर्ष झाली .
तेच मोजले जाणार आणि हेच लॉजिक योग्य आहे
"पहिल्या स्वातंत्र्यदिनाचे
"पहिल्या स्वातंत्र्यदिनाचे नेहरूंचे भाषण"
"पहिल्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याचा व्हिडिओ"
असे म्हटल्यास १९४७ चे बघायचे की १९४८ चे?
आपल्या शासनातर्फे अधिकृत नोंद असलेले पहावे की ऑक्सफर्ड वेबस्टर डिक्षनरीतील "Independence Day" ची व्याख्या काय हे पाहून ठरवावे.
(यावर मसाला टाकता येइल: आपण पाश्चात्यांचे अंधानुकरण करायचे का?).
झेंड्याच्या क्वालिटीबद्दल
झेंड्याच्या क्वालिटीबद्दल दोघातिघांनी लिहिले आहे. मला वाटते देशभरात एकसमान क्वालिटी नसावी. लोकल कॉन्ट्रेक्ट असतील त्यानुसार क्वालिटी असावी.
आमच्याकडचे झेंडे मला चांगलेच वाटले. (जे फोटो/विडिओत आहे तेच) सोबत काठी आणि अडकवायला हूक वगैरेही दिलेले. चांगली सोय होती.
15/8/1947 हे पहिले नाही.
15/8/1947 हे पहिले नाही.
0 पकड्डू या .
Starting point.
सर्व मोजमाप असेच असतात.
अगदी अंतर मोजताना पण सरळ 1 पासून. सुरुवात नसते.
झीरो पासून असते.
Starting point हा झीरो नीच सुरू होतो.
तो एक नी सुरू केला तर .
काय होईल फक्त विचार करा.
सर्व संगणक बंद पडतील.
सर्व विमान अवकाशात च राहतील.
अवकाश यान चंद्रावर पाठवायचे असेल तर शुक्र वर पोचेल.
घड्याळ वेळ दाखवू शकणार नाहीत
जमिनी चे वाद निर्माण होतील
हाहाकार माजेल जगात.
एक च्या अगोदर झीरो असतोच असतो
एक च्या अगोदर झीरो असतोच असतो
म्हणून 15/8/1947 च स्वतंत्र दिवस हा starting point म्हणजे झीरो.
आणि नंतर येणारा पहिला.
हेच योग्य आहे असे मला वाटत
१९४७ च्या सोहळ्याला शून्यावा
१९४७ च्या सोहळ्याला शून्यावा स्वातंत्र्यदिन सोहळा असा बदल केला पाहिजे शासनाने आणि बाकी पुढले सगळे एकने कमी करावेत.
(यात ऐच्छिक मसाला: अरे एका भारतीयानेच शून्याचा शोध लावला आणि तुम्ही शून्य विसरलात काय!)
अजून खोल विचार केला तर 15/8
अजून खोल विचार केला तर 15/8/47 चा स्वतंत्र दिवसाचा कार्यक्रम जेव्हा सुरू होता तेव्हा भारत स्वतंत्र नव्हता .ब्रिटिश सत्तेचा भाग होता .
कार्यक्रम संपल्या नंतर भारत स्वतंत्र झाला असे समजले जावू लागलें
१४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री
१४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री ब्रिटिश ध्वज खाली उतरला आणि तिरंगा फडकू लागला ना?
ही
हो
पण कार्य क्रमाचे नियोजन, हजर असणारी सुरक्षा व्यवस्था,हे सर्व भारत सरकार च्या आदेशाने नाही तर ब्रिटिश सरकार च्या आदेशाने झाले असावे.
ब्रिटिश अधिकारी,ब्रिटिश सैन्य अधिकारी, ब्रिटिश सरकार चे प्रतिनिधी हे 15/ 8 /47 ला अधिकारात होते किंवा असावेत.
त्या नंतर हळू हळू सत्ता सोपवली गेली आणि ब्रिटीश अधिकाऱ्यांनी अधिकार सोडले.
15/8/47 लं ब्रिटिश अधिकारी च अधिकार गाजवत होते
1950 लं खऱ्या अर्थाने भारत देश अस्तित्वात आला.
आता झेंडा आणि झेंडावंदन वगैरे
आता झेंडा आणि झेंडावंदन वगैरे एवढी चर्चा झालीच आहे तर हे लिहिण्याचा मोह होत आहे :-
'लाल किल्ल्यावरून' उर्फ 'लाल किले की प्राचीर से' पंतप्रधानांच्या हस्ते ध्वज फडकवण्याचा पहिला कार्यक्रम १५ ऑगस्ट १९४७ रोजी झाला असावा असे आपण समजतो, पण तो पहिलावहिला कार्यक्रम पंडित नेहरूंच्या हस्ते १५ ला न होता १६ ऑगस्ट रोजी सकाळी झाला आहे !!!!
ह्याच कार्यक्रमात पंडित नेहरूंच्या आग्रहावरून विख्यात सनईवादक बिस्मिल्ला खान यांनी लाल किल्ल्यावर मंगल सनईवादन केले होते.
(संदर्भ - सर्व प्रत्यक्षदर्शी - तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन यांचे Mountbatten Papers, त्यांची मुलगी Pamela Mountbatten हिचे पत्रवर्णन, सत्ता हस्तांतरणाच्या विविध कार्यक्रमांची प्रत्यक्ष जबाबदारी असलेले उच्चस्तरीय अधिकारी श्री एम एस रंधावा आणि श्री बद्रुद्दीन तैयबजी यांचे आत्मकथन)
छान माहिती दिलीत.
छान माहिती दिलीत.
१५ चे १६ झाले ८ चे १० झाले असते तरी .
१५/८/१९४८ हे पहिलेच वर्ष म्हणून ओळखले गेले असते
Pages