सर्व मायबोलीकर मित्रमैत्रीणींना ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
यंदा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारकडून 'हर घर तिरंगा' अभियान राबवण्यात आले आहे. त्यानुसार १३ ऑगस्टच्या सुर्योदयापासून १५ ऑगस्टच्या सुर्यास्तापर्यंत प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं होते. यात कुठलीही सक्ती नव्हती पण ज्यांची यात सहभाग नोंदवायची ईच्छा होती त्यांना झेंडे सरकारतर्फे मोफत मिळत होते. आमच्याईथे पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन घ्यायचे होते. पण आमच्या सोसायटीने एक काम छान केले. सर्वांसाठी म्हणून एकत्रच घेतले आणि घराघरात वाटप केले.
पण मी ठरलो आळशी. लावतो लावतो म्हणून वैयक्तिक कामात बिजी राहिलो आणि १३ तारखेला झेंडा लावायचे राहिले. संध्याकाळी फिरायला बाहेर गेलो असताना बिल्डींगकडे एक नजर टाकली तर ऊर अभिमानाने भरून आला. खरेच बिल्डींगच्या प्रत्येक घराघरावर तिरंगा फडकत होता. छान वाटले बघायला. एक आपल्याच घरावर तिरंगा फडकत नाहीये हे बघून चुकचुकल्यासारखे वाटले.
घरी आल्यावर सुर्यास्तानंतर झेंडा फडकवायचा नाही म्हणून मग १४ तारखेला लवकर ऊठून आंघोळ करून पहिले काम तेच करायचे ठरवले. पण त्याआधीच माझी वाट बघून बायकोचे झेंडा लाऊन झाले होते. अर्थात पहाटे वॉचमन सुद्धा आठवण करून द्यायला आला होता. सक्ती म्हणून नाही. त्याला कदाचित पुढाकार घेतलेल्या सोसायटी मेंबरनीच असे करायला सांगितले असावे. सोसायटी एकजूट दाखवून काही करत असेल तर ते चांगलेच आहे.
पण त्या खिडकीवरील झेंडा फडकताना कबूतर जाळीवर अडकत होता. एकदा लावलेला झेंडा आता तिथून काढून पुन्हा दुसर्या जागी लावणे योग्य का अयोग्य वा कसे हे माहीत नव्हते. पण तरी झेंडा फाटणे हे नक्कीच अयोग्य होईल म्हणून मग मी झेंड्याची जागा बदलली. आता तो आणखी दिमाखात फडकू लागला.
त्याआधी जी मुले नाचो नाचो गाणे गात नाचत होती ती अचानक वंदे मातरम गाणे गाऊ लागली. झेंडा नवीन जागी लावतानाही मदत करायला पुढे होती. अचानक घराचे वातावरण बदलून गेले. जसे धार्मिक सणांना घरात एक मांगल्याचे वातावरण असते तसेच काहीसे वातावरण या राष्ट्रीय सणाला दिसू लागले. मुले कपडे बदलून झेंड्यासोबत फोटो काढायच्याही तयारीत होते. पण मीच त्यांना आवरले. उद्या सोसायटीचे ध्वजारोहण होईल तेव्हाच हा सण साजरा करूया म्हटले.
तरी कौतुकाने फडकणार्या झेंड्यांचे दोन चार फोटो आणि विडिओ काढले. त्या विडिओत "८३" चित्रपटातील देशभक्तीपर गीत जोडून व्हॉटसप स्टेटसला लावले आणि सोसायटीच्या ग्रूपवरही टाकले. तसे तासाभरात आणखी सहा सात जणांच्या स्टेटसला तो विडिओ दिसू लागला. लोकांनी आपल्या सोसायटीतीलच झेंडा आहे म्हणत कौतुकाने तो आपल्या स्टेटसला ठेवला होता. तर मलाही आपण फडकवलेल्या झेंड्याचा विडिओ सोसायटी मेंबर आवडीने शेअर करत आहेत याचा एक आनंद झाला. ही जी आपलेपणाची भावना आहे, एकात्मतेचा विचार आहे, एकजुटीने सहज घडणारी कृती आहे, हेच तर सारे आजचा दिवस घेऊन येते
पुन्हा एकदा सर्वांना ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
.
आमच्या झेंड्याचा विडिओ ईथे बघू शकता - लहरा दो
https://youtube.com/shorts/65XprJ_IeMM?feature=share
ज्या मायबोलीकरांनी या अभियानात सहभाग नोंदवला त्यांनी आपल्या घरी फडकवलेल्या झेंड्यांचे फोटो, विडिओ बघायला आणि त्यांचे याबद्दलचे अनुभव वाचायला आवडतील. तसेच १५ ऑगस्टच्या दिवशी तुमच्या सोसायटीमध्ये जे ध्वजारोहण होईल ते ही बघायला आवडेल
धन्यवाद,
ऋन्मेष
झेंडा प्रकरणावर बरीच टिका
झेंडा प्रकरणावर बरीच टिका झाली, झेंड्याच्या कापडाची प्रत, डिझाईन यावरही बरीच टिका झाली. मी नेमकी सध्या नव्या मुम्बैत असल्यामुळे मलाही घरी झेंडा मिळाल्यावर त्याची प्रत पाहुन थोडी नाराज झाले.
पण काल बेलापुर ते बोरिवली व्हाया वडाळा ट्रेनने प्रवास करताना झोपड्या, चाळी, बिल्डिन्गी, टॉवर्स सगळीकडे झेन्डे फडकताना पाहुन छान वाटले. मन्दीर, मशीदींवरही झेन्डे पाहिले..
घर घर तिरंगा उपक्रम खुप चांगला वाटला. दरवर्षी हे करायला हवे व उत्तरोत्तर यात सुधारणा होत जावी ही शुभेच्छा!!
घर घर तिरंगा उपक्रम खुप
घर घर तिरंगा उपक्रम खुप चांगला वाटला. दरवर्षी हे करायला हवे व उत्तरोत्तर यात सुधारणा होत जावी ही शुभेच्छा!! +१११११११११
@साधना ताई, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
वि मु, आठवण ठेवल्याबद्दल
वि मु, आठवण ठेवल्याबद्दल मनापासुन आभार!! तुमच्या शुभेच्छा वाचुन छान वाटले.
साधना ,वाढदिवसाच्या हार्दिक
साधना ,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमचा वाढदिवस साऱ्या देशाने साजरा केला.
सुंदर आनंदोत्सव. साधनाताई
सुंदर आनंदोत्सव. साधनाताई वाढदिवस शुभेच्छा.
स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृत
स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृत महोत्सव आणि तुमचा वाढदिवस दोन्हींच्या साठी शुभेच्छा.
साधना ,वाढदिवसाच्या हार्दिक
साधना ,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
७६ वा स्वातंत्र्यदिन आहे हो आज. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी पहिला होता.
अमृत महोत्सव (platinum jubily
अमृत महोत्सव (platinum jubilee) 75 वर्षे पूर्ण झाल्यावर होतो.
साधना वाढदिवसाच्या अनेक
साधना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा _/\_
धन्यवाद मित्रांनो!!!! खरेच
धन्यवाद मित्रांनो!!!! खरेच इथल्या शुभेच्छा वाचुन छान वाटतेय.
सगळीकडे ७५ व्या
सगळीकडे ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या जातायत. बहुदा अमृतमहोत्सवी वर्ष म्हटल्यामुळे तसा गोंधळ उडत असावा. स्वातंत्र्य मिळून जरी ७५ वर्षं झाली असतील तरी हा ७६ वा स्वातंत्र्यदिन आहे. भारताच्या ७६ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!!
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव म्हणजे ७५ वा वाढदिवस हे बरोबर आहे. पण स्वातंत्र्यदिन ७६ वा आहे. पहिला स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट १९४७ होता. त्यामुळे ते गणित (२०२२-१९४७)+१ असं आहे.
पण कोणी एक वर्षाचा झाला की
पण कोणी एक वर्षाचा झाला की पहिला वाढदिवस म्हणतात , दुसरा नाही, त्यामुळे हा 75 वा वाढदिवस आहे
घर घर तिरंगा उपक्रम खुप
घर घर तिरंगा उपक्रम खुप चांगला वाटला. दरवर्षी हे करायला हवे व उत्तरोत्तर यात सुधारणा होत जावी ही शुभेच्छा!!
+१११
घर घर तिरंगा हा प्रकार मला
घर घर तिरंगा हा प्रकार मला तरी बिलकुल आवडला नाही
राष्ट्र ध्वज चा योग्य मानसन्मान राखला गेला नाही
स्वातंत्र्यदिन ,आणि ध्वज वंदन ह्याचे गांभीर्य नष्ट होवुन एक छप्री पना आला स्वतंत्र दीन लं.
लहरी आणि बेजबाबदार नेता असला की काय घडते त्याचे ज्वलंत उदाहरण
पंतप्रधान ह्यांचे आज चे भाषण
पंतप्रधान ह्यांचे आज चे भाषण खूप महत्वाचे असते.
देशाची आता पर्यंत ची वाटचाल,आपल्या हातून घडलेल्या चुका,आलेले यश ,आपली उपलब्धता. आणि पुढे देशाच्या भविष्य विषयी प्लॅनिंग .
हे सर्व भाषणात आले पाहिजे
पण मोदींचे आज च्या भाषण मध्ये है काही नव्हते
लाल कील्या वरील भाषणाचा उपयोग राजकीय व्यासपीठ म्हणून. केले असे भारताच्या कोणत्याच पंतप्रधान नी कधीच केले नव्हते
प्रादेशिक पक्ष आणि काँग्रेस हेच सर्वात मोठे आव्हान bjp समोर उभे करणार आहेत .
आणि त्यांच्या मध्ये घराणे शाही आहे
मानसन्मानाचा बागुलबुवा बास
मानसन्मानाचा बागुलबुवा बास झाला. गांभिर्याची काय गरज आहे? आनंदाचा दिवस आनंदातच साजरा व्हावा.
आपल्याच देशाचा झेंडा लावायला कसली आल्येय आचारसंहीता.
अमित , अगदी !
अमित , अगदी !
मला आवडला हा उपक्रम.
“ स्वतंत्र दीन” - ह्यापेक्षा
“ स्वतंत्र दीन” - ह्यापेक्षा मोठं दैन्य काय आलं स्वातंत्र्यदिनाला?
यातुन राष्ट्रप्रेम वगैरे काही
यातुन राष्ट्रप्रेम वगैरे काही होईल असं वाटत नाही. होऊ ही नये. आपण डोळस राष्ट्रप्रेम जागवू असं कधी वाटत नाही. आपलं आंधळं पाकिस्तान मुर्दाबाद वालं प्रेम आहे. वर आर्मीला, राज्यकत्र्यांना काही बोललं की दुखावणारं राष्ट्रप्रेम आहे. ते बदलणार असेल तर ठीक नाही तर नको तो उच्छाद व्हायचा.
हे शुद्ध व्यापारीकरण आहे, आणि मला व्यापारीकरण आवडते.
हिंदू सणांना पण त्या बडेजावातून, सोवळ्यातून बाहेर काढून त्यातील गांभिर्य पार घालवून मजा, व्यापारीकरणात आणलं पाहिजे. (हे मनापासून लिहितोय. सारकॅस्टिक नाही)
आनंद पाहिजे बस्स. बडेजाव
आनंद पाहिजे बस्स. बडेजाव सोवळे नकोच. अगदी पहाटे उठून मंगल स्नानेसुद्धा नकोतच. बाकी " आपण डोळस राष्ट्रप्रेम जागवू असं कधी वाटत नाही " ++११११
आपल्याकडे मास हिस्टेरिया आहे. राष्ट्रप्रेम नाही. उन्माद म्हणजे देशभक्ती नव्हे.
आपण खूप भावनिक लोक आहोत.
>>>>>>आपल्याकडे मास हिस्टेरिया आहे. राष्ट्रप्रेम नाही. उन्माद म्हणजे देशभक्ती नव्हे.
आपण खूप भावनिक लोक आहोत. शुष्क, रुक्ष, ड्राय, हिशोबी नाही. हिंदू धर्माचा स्थायी भाव हा 'पूजन, भक्ती' आहे. मग त्यात व्यक्तीपूजाही आली. मुसलमान या धर्माबद्दलही मला तेच वाटते. भावनाप्रधान धर्म आहे. उत्कटता हा स्थायीभाव आहे.
भावनिक वगैरे काही नाही. अक्कल
भावनिक वगैरे काही नाही. अक्कल गुडघ्यात आहे त्यामुळे मेंदूने स्वतःचा विचार करताच येत नाही. ज्याचं तसं नाही त्यांना विचार करायचा, काही वाचायचा अत्यंत आळस आहे, दुसरा जे म्हणेल ते पुढे ढकलायचं.
घरोघरी राष्ट्र ध्वज आणि देश
घरोघरी राष्ट्र ध्वज आणि देश प्रेमाची भावना ह्याचा काही संबंध नाही.
जसे गल्लोगल्ली गणपती आणि भक्तिभाव ह्याचा काही संबंध नाही.
फक्त ustav म्हणून त्याच्या कडे लोक बघतात.
हेमंत अमृत
हेमंत अमृत महोत्सवानमित्तच्या धाग्यांवरचे बहुतेक प्रतिसाद आवडले.
आनंदोत्सव पाहिजेच, पण हल्लागुल्ला, धुडगूस आणि किरकोळीकरण (trivialisation) नको.
मला कधी कधी वाटते की आपण आदिम tribal अवस्थेतून नागरी व्यवस्थेपर्यंत पोहोचलेलोच नाही. प्रत्येक ठिकाणी मोठा आवाज आपल्याला आवडतो. ढोल, ताशे, मिरवणुका आवाज, गोंगाट, ह्याशिवाय आपल्या सणांना मजा येत नाही. नको तेथे खोट्या तलवारी, पट्टे घेऊन नाचत शौर्य प्रदर्शन करायचे, महिलांनी लुटुपुटीची झाशीची राणी व्हायचे, दर मिरवणुकीत सतत ट्रॅडिशनल कपडे आणि जामानिमा करून बुगडी, नथ फेटे घालून मिरवायचे, शिवकालाचा आभास निर्माण करून देशभक्तीसुद्धा मिरवायची, ( एका वाहिनीवरच्या एका संगीत स्पर्धेत तर विजेत्याला कट्यार भेट दिली जात असे!)आरोळ्या ( घोषणा)द्यायच्या.., आवाज, आवाज, आवाज...आणि देखावा...
मौनाचा, शांततेचा अर्थ, त्यातली परिपक्वता आणि सभ्यता आपल्याला समजलेलीच नाही.
साधना, तुम्हाला वाढदिवसाच्या
साधना, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मला वाटलेले एकाने तरी ईथे आपल्या घरच्या झेंड्याचा फोटो टाकला असेल... असो, मायबोलीकर चर्चाप्रेमी आहेत. तरी भविष्यात पुन्हा हे हर घर तिरंगा कायम राहणार असेल तर माझ्या घरचा बाप्पा असा जो गणपतीत धागा निघतो त्याप्रमाणे माझ्या घरचा तिरंगा असा धागा काढता येईल.
यावर्षी तरी हा उपक्रम आवडला. पण हे उत्सव म्हणून आनंदात साजरे होतेय तोपर्यंत ठिक आहे. उद्या याला उन्मादाचे स्वरुप आले वा दिले गेले तर अवघड होईल. काही धार्मिक सणांना आपण बघतो हे.
बाकी झेंड्याचे प्रोटोकॉल सामान्य लोकांकडून गडबडणारच. ते सांभाळणे अवघड आहे. अगदी आजही आमच्याकडे झेंडे आता काढायचे की राहिले तरी काय प्रॉब्लेम आहे यावरून चर्चा होताहेत सोसायटी ग्रूपवर..
७५ की ७६ हा वाद दरवर्षीचा आहे. ती देखील एक परंपरा झाली आहे. पुढच्या वर्षी ७६ की ७७ चालू असेल.
तरी स्वातंत्र्याला ७५ वर्षे पुर्ण झाली हे मात्र नक्की.
आमच्या सोसायटीत एक मेंबर बाई
आमच्या सोसायटीत एक मेंबर बाई फार आग्रहाने सांगत होत्या की झेंडे उतरवायची गरज नाही, उतरवू नका, मोदी म्हणाले ( त्यांचे संबोधन : मोदी म्हणालाय ) रात्रभर तिरंगा फडकू दे.
पण कोणी एक वर्षाचा झाला की
पण कोणी एक वर्षाचा झाला की पहिला वाढदिवस म्हणतात , दुसरा नाही, त्यामुळे हा 75 वा वाढदिवस आहे
नवीन Submitted by Sadha manus on 15 August, 2022 - 10:33 >>>>> स हं म त
खराब झालेले तिरंगे येथे
खराब झालेले तिरंगे येथे द्यावे. प्रत्येकाने आपापल्या शहरातील अशा कलेक्शन सेंटर्स ची माहिती पण येथे द्यावी
स्वस्तात ल देशप्रेम लोकांना
स्वस्तात ल देशप्रेम लोकांना खूप आवडते.
एका बेघर व्यक्ती ला जेवण ध्या असे मोदी बोलले असते तर मला नाही वाटत कोणी मोदी च पण ऐकले असते.
मोदी नी सांगितले म्हणून झेंडा घरात फडकवला हे अर्धं सत्य आहे.
स्वस्तात देशप्रेमी म्हणून ओळख होते आहे बाकी विशेष काही करायचे नाही म्हणून घरावर झेंडा.
हे पूर्ण सत्य आहे.
देश प्रेम म्हणजे साधी सुधी
देश प्रेम म्हणजे साधी सुधी गोष्ट नाही.
खूप अवघड असते ते..जपानी लोकांच्या कथा येतात कधी नेट वर..ते कसे देशावर च प्रेम व्यक्त करतात त्या विषयी.
Pages