माझ्यावर होणारे आरोप प्रत्यारोप आणि माझे सत्याचे प्रयोग!

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 August, 2022 - 05:01

बरेच दिवस हा धागा काढायचा मनात होता.
कारण मी एखादी पोस्ट लिहावी आणि ती खोटी आहे सिद्ध करायला काहींनी धडपड करावी हे आता फार वाढू लागले आहे. मग तो धागा क्रिकेटचा असो, चित्रपटांचा असो, खाऊगल्लीचा असो वा एखादा कल्चरल शॉकच असो..

पण मग वाटायचे, जाऊ द्या. तिथले तिथे क्लीअर करूया. एक वेगळा धागा कश्याला स्वत:वरचे आरोप क्लीअर करायला...

पण आज एका धाग्यावर मी माझ्या लेकीचा किस्सा टाकला. त्यावरही काही वा त्याच काही लोकांनी अविश्वास दाखवताच म्हटले चला. फायनली हा धागा काढायची वेळ झाली. कारण माझ्यावर होणारे आरोप एकीकडे. पण ज्यात माझी मुले इन्वॉल्व्ह आहेत तिथे मला लागलीच दूध का दूध पाणी का पाणी करणे गरजेचे आहे.

तर दरवेळी धागे केवळ माझ्यावर दाखवण्यात आलेल्या अविश्वासामुळे भरकटू नयेत यासाठी हा वेगळा धागा. यापुढे ईथे असले मॅटर सॉल्व्ह करून त्याची नोंद करण्यात येईल.

तर आजची केस -

मी मुलं लाजवतात तेव्हा या धाग्यावर खालील किस्सा लिहिला होता
https://www.maayboli.com/node/24545?page=36

-------
मागे एकदा पोरांसोबत रिक्षाने कुठेतरी जात होतो.
रिक्षाच्या पुढच्या काचेवर बाहेरच्या बाजूने "आईचा आशीर्वाद", "साईबाबांची कृपा" लिहीतात तश्या टाईपचा एक सुविचार लिहिलेला - माय डॅड माय गॉड.
लेकीची त्यावर नजर पडताच तिने तो आतल्या बाजूने वाचला, आणि किंचाळली... हायला पप्पा ते बघ काय लिहिलेय.. माय डॅड माय डॉग Lol
-------

त्यावर असा आक्षेप आला.

My Dad My God ची मिरर इमेज ‘boӘ γM bɒႧ γM‘ अशी होते. ह्यातून ‘My Dad My Dog’ कसं तयार होतं सर? व्हॉट्सअ‍ॅपचे विनोद मुलांच्या नावावर तुम्ही ढकलताय असा आमचा नम्र वहीम आहे. Happy
>>>>>

तर आधी लॉजिकमध्ये घुसूया,

१) वर जे My Dad My God आणि त्याचे उलटे लिहिण्यात आले आहे ते स्मॉलमध्ये आहे. त्या रिक्षावर जे लिहिलेले ती ईंग्रजी कॅपिटल आद्याक्षरे होती. MY DAD MY GOD याने बराच फरक पडतो. संबंधितांनी करून बघावे Happy

२) जेव्हा आपण एखादे पुर्ण वाक्य उलटे वाचतो तेव्हा आधीच आपल्या मेंदूने नोंद घेतली असते की ते उलटे वाचायचे आहे. त्यामुळे MY चे उलटे YM वाचूनही आपल्या मेंदूत त्याची नोंद माय अशीच होते. ते तसेच वाचले जाते. डॅड तर पुढून मागून डॅडच राहतात. पण गॉड आणि डॉग बाबत दोन्ही अर्थपुर्ण शब्द असल्याने गॉड ऐवजी डॉग क्लिक होणे स्वाभाविक आहे. वा त्याची पुरेपूर शक्यता आहे.

आता थेट पुराव्यांकडे वळूया

जेव्हा हा किस्सा घडलेला तेव्हा मी त्याची फेसबूकवर नोंद सुद्धा केली होती. तर असे नाही की आज तो मुलांचा धागा वर आला आणि मी काही किस्सा बनवून लिहीला.

my dad my god - 2.png

...

आणि आता शेवटचा आय विटनेस पुरावा - अर्थात माझी लेक Happy
जी त्यानंतर कित्येक दिवस मला चिडवत होती, माय डॅड माय डॉग... तिला तुम्ही हे नक्की विचारू शकता.

पण त्यासाठी तुम्हाला माझ्या घरी यावे लागेल. माझ्या घरी तुमचे नेहमी स्वागतच राहील. फक्त येताना रिकाम्या हाताने येऊ नका. पोरांसाठी भरपूर चॉकलेटस तेवढी आणा. बदल्यात हा आणि असे कैक किस्से ऐकूनच परत जा Happy

हा धागाही अटेंशन सीकींगमुळे काढला आहे असे तुम्ही म्हणू शकता.
तर येस येस येस, हा आरोप मला मान्य आहे Wink

धन्यवाद,
आपलाच ऋन्मेष Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यांनी समाजमेवेचे व्रत घेतले आहे
डोळ्यांची वाट लागली तरी चालेल पण मागे हटणार नाही अशा निधड्या छातीचे वीर आहेत सर म्हणजे

सरांचे मायबोली वरचे योगदान अमूल्य आहे

जरा सांभाळून,

ऋन्मेष अन् बिचुकले एकमेकांच्या विकृतीत हे आपलं स्वभावात मिसळतो आहेस तू, करू नकोस असे.

“ सरांचे मायबोली वरचे योगदान अमूल्य आहे” - अनैतिक अधर्माविरुद्ध पुकारलेलं युद्ध आहे रे ते. एका यज्ञाला नुसतं योगदान म्हणून त्याच्या ज्वाळांची धग कमी नको करूस Happy

Pages