बरेच दिवस हा धागा काढायचा मनात होता.
कारण मी एखादी पोस्ट लिहावी आणि ती खोटी आहे सिद्ध करायला काहींनी धडपड करावी हे आता फार वाढू लागले आहे. मग तो धागा क्रिकेटचा असो, चित्रपटांचा असो, खाऊगल्लीचा असो वा एखादा कल्चरल शॉकच असो..
पण मग वाटायचे, जाऊ द्या. तिथले तिथे क्लीअर करूया. एक वेगळा धागा कश्याला स्वत:वरचे आरोप क्लीअर करायला...
पण आज एका धाग्यावर मी माझ्या लेकीचा किस्सा टाकला. त्यावरही काही वा त्याच काही लोकांनी अविश्वास दाखवताच म्हटले चला. फायनली हा धागा काढायची वेळ झाली. कारण माझ्यावर होणारे आरोप एकीकडे. पण ज्यात माझी मुले इन्वॉल्व्ह आहेत तिथे मला लागलीच दूध का दूध पाणी का पाणी करणे गरजेचे आहे.
तर दरवेळी धागे केवळ माझ्यावर दाखवण्यात आलेल्या अविश्वासामुळे भरकटू नयेत यासाठी हा वेगळा धागा. यापुढे ईथे असले मॅटर सॉल्व्ह करून त्याची नोंद करण्यात येईल.
तर आजची केस -
मी मुलं लाजवतात तेव्हा या धाग्यावर खालील किस्सा लिहिला होता
https://www.maayboli.com/node/24545?page=36
-------
मागे एकदा पोरांसोबत रिक्षाने कुठेतरी जात होतो.
रिक्षाच्या पुढच्या काचेवर बाहेरच्या बाजूने "आईचा आशीर्वाद", "साईबाबांची कृपा" लिहीतात तश्या टाईपचा एक सुविचार लिहिलेला - माय डॅड माय गॉड.
लेकीची त्यावर नजर पडताच तिने तो आतल्या बाजूने वाचला, आणि किंचाळली... हायला पप्पा ते बघ काय लिहिलेय.. माय डॅड माय डॉग Lol
-------
त्यावर असा आक्षेप आला.
My Dad My God ची मिरर इमेज ‘boӘ γM bɒႧ γM‘ अशी होते. ह्यातून ‘My Dad My Dog’ कसं तयार होतं सर? व्हॉट्सअॅपचे विनोद मुलांच्या नावावर तुम्ही ढकलताय असा आमचा नम्र वहीम आहे. Happy
>>>>>
तर आधी लॉजिकमध्ये घुसूया,
१) वर जे My Dad My God आणि त्याचे उलटे लिहिण्यात आले आहे ते स्मॉलमध्ये आहे. त्या रिक्षावर जे लिहिलेले ती ईंग्रजी कॅपिटल आद्याक्षरे होती. MY DAD MY GOD याने बराच फरक पडतो. संबंधितांनी करून बघावे
२) जेव्हा आपण एखादे पुर्ण वाक्य उलटे वाचतो तेव्हा आधीच आपल्या मेंदूने नोंद घेतली असते की ते उलटे वाचायचे आहे. त्यामुळे MY चे उलटे YM वाचूनही आपल्या मेंदूत त्याची नोंद माय अशीच होते. ते तसेच वाचले जाते. डॅड तर पुढून मागून डॅडच राहतात. पण गॉड आणि डॉग बाबत दोन्ही अर्थपुर्ण शब्द असल्याने गॉड ऐवजी डॉग क्लिक होणे स्वाभाविक आहे. वा त्याची पुरेपूर शक्यता आहे.
आता थेट पुराव्यांकडे वळूया
जेव्हा हा किस्सा घडलेला तेव्हा मी त्याची फेसबूकवर नोंद सुद्धा केली होती. तर असे नाही की आज तो मुलांचा धागा वर आला आणि मी काही किस्सा बनवून लिहीला.
...
आणि आता शेवटचा आय विटनेस पुरावा - अर्थात माझी लेक
जी त्यानंतर कित्येक दिवस मला चिडवत होती, माय डॅड माय डॉग... तिला तुम्ही हे नक्की विचारू शकता.
पण त्यासाठी तुम्हाला माझ्या घरी यावे लागेल. माझ्या घरी तुमचे नेहमी स्वागतच राहील. फक्त येताना रिकाम्या हाताने येऊ नका. पोरांसाठी भरपूर चॉकलेटस तेवढी आणा. बदल्यात हा आणि असे कैक किस्से ऐकूनच परत जा
हा धागाही अटेंशन सीकींगमुळे काढला आहे असे तुम्ही म्हणू शकता.
तर येस येस येस, हा आरोप मला मान्य आहे
धन्यवाद,
आपलाच ऋन्मेष
चराति चरतो भग: चर एव, चर एव.
चराति चरतो भग:


चर एव, चर एव.
भग म्हणजे,
१) सूर्य, २)चंद्र, ३) सुदैव, ४)उत्कर्ष, भरभराट, ५) कीर्ती, यश, ६)सौंदर्य, ७) मोक्ष ८) अणुएवढे बारीक रूप घेण्याची सिध्दी.
बर झाल. आपण ह्याचा अर्थ
बर झाल. आपण ह्याचा अर्थ सांगितलात. आधी माझा असा गैरसमज झाला होता कि तुम्ही सरांना दिवसभर नुसता चरत रहा असा उपरोधिक 'सल्ला" देत आहात.
इतकी अहोरात्र मायबोलीच्या
इतकी अहोरात्र मायबोलीच्या सेवेला वाहून घेऊनही एक पैसा ही मिळत नाही हे कळल्यावर मला जो मानसिक धक्का बसलाय त्याला तुलना नाही
हे त्या कल्चरल धक्क्याच्या धाग्यात अॅडवता येईल का. एवढी घासुन (करवतीवर) नो कमीशन, कुपन्स, विडीकाडी, मीठ मिरची, देशी-मीठाचा खडा काहीच नाही (अय्यो रामा पाप) ????? का केला उष्टाहात............अर्र एस ओ आर आर ई सर...का केला अट्टाहास अस लिहायच होतं मला.
चराति चरतो भग:
चराति चरतो भग:
याचा अर्थ आपण सांगीतला होतात हीरा. जो चालतो त्याचे सौभाग्यही त्याच्यासवे चालत असते.
बरोबर?
चराति चरतो भगः.
चराति चरतो भगः.
आस्ते भग आसीनस्य ऊर्ध्वस्तिष्ठति तिष्ठतः।
शेते निपद्यमानस्य चराति चरतो भगः॥ चरैवेति चरैवेति...
ऐतरेय ब्राह्मण ७.१५.
बसलेल्याचे नशीब बसून असते, उभा राहिलेल्याचे उभे असते, झोपलेल्याचे झोपते आणि चालणार्याचे चालत राहते. म्हणून तू चालत रहा, चालत रहा...
आणि थट्टा करणाऱ्याचे नशीब
आणि थट्टा करणाऱ्याचे नशीब थट्टा करते?
(संदर्भ: कशी नशीबानं थट्टा...)
आणि थट्टा करणाऱ्याचे नशीब
आणि थट्टा करणाऱ्याचे नशीब थट्टा करते? >.>>हे माझ्यासाठी का? मी आपल फ्रेंडली बॅंटर करत होतो. सरांची काय कुणाचीही थट्टा ? मी कसा करेन? नसेल पटल तर अळी मुळी गप चिळी. हाताची घडी तोंडावर बोट.
BTW नशिबाने मपली खूप चेष्टा केली आहे. अजून जास्त काय करणार ? हा, एक शेवटची चेष्टा राहिली आहे.....
धडकन सिनेमात हेच तत्व घेतलं
धडकन सिनेमात हेच तत्व घेतलं आहे
आज आणि योगायोगाने शेट्टी अण्णा चा वाढदिवस
त्यात अण्णा प्रचंड गरीब असतात आणि फक्त चालून चालून करोडो मिळवतात
https://youtu.be/2hC0K2NMEMA
1.35 पासून पुढे
<<हे माझ्यासाठी का?>>
<<हे माझ्यासाठी का?>>
कुणाही साठी नाही. नशीब आपण जे करतो ते करतं यावरून ते गाणं आठवलं.
चालणाऱ्याचे नशीब त्याला
चालणाऱ्याचे नशीब त्याला (अधिकच पुढे) चालवते, नेते. झोपणाऱ्याचे ( आड पडलेल्याचे) नशीब झोपते. वगैरे.
" जो धागे काढतो त्याला नशीब अधिक धागे काढण्यास प्रवृत्त करते. चालणाऱ्या धाग्याचे नशीब त्या धाग्याला अधिक पुढे नेते. म्हणून धागे काढत राहा, धागे काढत राहा!"
एक प्रश्न पडलाय,
एक प्रश्न पडलाय,
बिचुकले हा आयडी ऋन्मेषचाच आहे का ?
या पानावर फारच उद्बोधक चर्चा
या पानावर फारच उद्बोधक चर्चा चालू आहे.
बिचुकले हा आयडी ऋन्मेषचाच आहे
बिचुकले हा आयडी ऋन्मेषचाच आहे का ?
>>>
हो
कसे ओळखले?
अजून अंदाज लागला नाही का? तो
अजून अंदाज लागला नाही का? तो नाईट शिफ्ट ला कामाला आहे...
>>>
हे भारी आहे
ऋन्मेष हा आयडी दोन व्यक्ती मिळून चालवतात. एक भारतातून एक अमेरीकेतून. भारतातून तुमचा अभिषेक म्हणजे मी.. अमेरीकेतून कोण चालवते ते ओळखा...
हिंट - बाहुबली को किसने मारा
आज आणि योगायोगाने शेट्टी
आज आणि योगायोगाने शेट्टी अण्णा चा वाढदिवस
>>>>
हो आशू चॅंप
आणि एक वाढदिवस आम्ही एकत्र सेलिब्रेटही केला आहे योगायोगाने त्याच दिवशी एकत्र आलेलो तेव्हा..
तो किस्स्सा पुढच्या वाढदिवसाला शेअर करेन
ते डोंगर पेटवला तो किस्सा का?
ते डोंगर पेटवला तो किस्सा का?
काय सांगता येत नाही मेणबत्त्या कोणीही लावेल
डोंगर पेटवून तो फुंकरीने विझवणे हे स्किल
मेणबत्त्या कोणीही लावेल >>>
मेणबत्त्या कोणीही लावेल >>> कुठल्या मेणबत्त्या ?
मेणाच्या बनलेल्या असतात त्या
मेणाच्या बनलेल्या असतात त्या
एका बाजूने वात असते आणि दुसऱ्या बाजूला सपाट बुड
वातीची बाजू वर ठेऊन वात पेटवायची
आणि सपाट बुड कशावर तरी टेकवून ठेवायचं असतं त्या मेणबत्या
हो
हो
कसे ओळखले?
तुम्हीच बोलले होते मागे कुठंतरी.
अर्थात तुम्ही इतके बोलता की तुमचे तुम्हाला आठवले नसेल, ते असोच, पण बिचुकले तुमचा आयडी आहे हे कोणीही सांगेल, एसर्षन असणारी वाक्य, आपापले स्फियर अन् घेतलेले रूप मेन्टेन करण्याचे प्रयत्न वगैरे समजते.
अर्थात ऋन्मेष ह्या आयडीत USP त्याचे कुटुंबवत्सल असणे इत्यादी आहे, तसेच बिचुकले आयडीमध्ये आपण आपली माफक उद्धट किंवा शेलकं बोलण्याची हौस पुरवून घेत असावात असे मात्र मला वाटते.
अचूक निरीक्षण जेम्स वांड
अचूक निरीक्षण जेम्स वांड
माझे अजून आयडी ओळखा. आणि कसे ओळखलेत ते द्या. वाचायला मजा येतेय.
मेणाच्या बनलेल्या असतात त्या.
मेणाच्या बनलेल्या असतात त्या... >> आशूचॅंप ओके. मला वाटले माझ्या वाढदिवसाच्या धाग्यातील मेणबत्त्यांवरून टोमणा मारत आहात
अचूक निरीक्षण जेम्स वांड
अचूक निरीक्षण जेम्स वांड
माझे अजून आयडी ओळखा. आणि कसे ओळखलेत ते द्या. वाचायला मजा येतेय.
जे सहज जाणवले तितके सांगितले, स्पेशली तुमचे आयडी खोदत बसण्याचे दिव्य कार्य करत बसण्याचे काही खास कारण, आवड अन् त्याहून जास्त सवड पण नाही बुआ मला. त्यामुळे अजून खोदा वगैरे लाडात न आलेले बरे आपण
रिकामटेकडे तुम्ही असाल सर आम्ही नाही.
तुम्ही सहज शोधला म्हणूनच तर
तुम्ही सहज शोधला म्हणूनच तर कौतुक आहे.
त्यात तुम्हाला रिकामटेकडा म्हटलेय हा अर्थ का काढत आहात. अश्यानेच गैरसमज वाढत जातो.
अवांतर - हो, मी तरी नक्कीच रिकामटेकडा आहे. आता ईथे मुंबईत सकाळचे साडेसहा वाजलेत आणि मी बाल्कनीत तंगड्या पसरून बसलोय आणि नुकतेच उजाडलेल्या वातावरणाचा आनंद घेत मायबोलीवर पोस्ट करतोय. रात्रभर पडलेल्या पावसाने नुकतीच ऊसंत घेतली आहे. पण त्याने वातावरणात जो सुखद आणि आल्हाददायी गारवा भरलाय त्याला शब्दात सांगू शकत नाही. तो अनुभवावाच असा. आपल्या रिकामटेकडे असण्याचा मलाच हेवा वाटतो कधी कधी. देवा मला पुढच्या सात जन्मातही रिकामटेकडे म्हणूनच जन्माला घाल
अरेरे ! किती ती कसरत ईगो
अरेरे ! किती ती कसरत ईगो कुरवळण्याची.
मस्त.
मस्त.
माझ्या वाढदिवसाच्या धाग्यातील
माझ्या वाढदिवसाच्या धाग्यातील मेणबत्त्यांवरून टोमणा मारत आहात>>
नाही मी असा काही धागा वाचल्याचे आठवत नाही
कॉमेडी आहे का या धाग्यासारखा?
हा खालील धागा आशूचॅंप..
हा खालील धागा आशूचॅंप.. कॉमेडी ड्रामा ॲक्शन ईमोशन.. माझ्या परीने जे करता येईल ते मी नेहमी करतोच. मला वाटले मेणबत्त्या या किश्यातून उचलल्या
https://www.maayboli.com/node/82058
आठवणीतला वाढदिवस - दहीहंडीच्या दिवशी शिर्डीवाले साईबाबांच्या दरबारात!
ह्या, हा धागा होय
ह्या, हा धागा होय
मी नाही वाचला आणि वाचेन याची शक्यताही नाही
मला ते डोंगर कसा पेटवला याबद्दल उत्सुकता आहे
ते सांगा ना सर, वाढदिवसाच्या सेलिब्रेशन मध्ये
कॉमेडी ड्रामा ॲक्शन ईमोशन..
कॉमेडी ड्रामा ॲक्शन ईमोशन.. माझ्या परीने जे करता येईल ते मी नेहमी करतोच. >> कशासाठी ही फुकट फौजदारी करता तुम्ही.
मी नाही वाचला आणि वाचेन याची
मी नाही वाचला आणि वाचेन याची शक्यताही नाही
>>>
का नाही वाचला?
आणि शक्यताही का नाही?
आणि नाही वाचला तर तुमच्या पोस्टमध्ये मला उद्देशून मेणबत्त्या कश्या आल्या?
Pages