कानी येता ज्याच्या बासुरीचे सूर
कालिंदीला येता आनंदाचा पूर
गोपिकांच्या घरी प्रीतिचा पाहुणा
सखी गं, मुरली मोहन मोही मना...
प्रचि ०१
प्रचि ०२
देवकी वसुदेव बंदीमोचन त्वां केलें
नंदाघरीं जाउनी निजसुख गोकुळा दिधलें
गोरसचोरी करितां नवलक्ष गोपाळ मिळविले
गोपिकांचें प्रेम देखुनि श्रीकृष्ण भुलले
हले हा नंदाघरी पाळणा, त्यात देखणा गोजिरवाणा
हसतो गोकुळ-राणा...
प्रचि ०३
असा कसा देवाचा देव बाई ठकडा
देव एका पायाने लंगडा
प्रचि ०४
आज अंतर्यामी भेटे कान्हो वनमाळी
अमृताचा चंद्रमा भाळी, उगवला हो
प्रचि ०५
देवकिनंदन श्याम सुलोचन, गोपगड्यांसह खेळे हासुन
लेवुनि पानफुलांच्या साजा, गोकुळिचा राजा, माझा गोकुळिचा राजा
प्रचि ०६
कलेकलेने चंद्र वाढतो चिमणा नंदाघरी
पाजळ्या या अमृतज्योती देवकीच्या अंतरी
प्रचि ०७
गोविंदा रे गोपाळा रे
छंद तुझा जडला, घननीळा
प्रचि ०८
मुरलीधर चित्तचकोरा रे, जाशि कुठे नवनित-चोरा रे
आज तुझी ना होईल सुटका, फोडुनि बघ तू गोरस-मटका
किती करशिल शिरजोरी असता तुझ्या भोवती घेरा रे
प्रचि ०९
असा कसा खट्याळ तुझा कान्हा, यशोदे तुझा कान्हा
काही केल्या मला आवरेना ग बाई आवरेना!
प्रचि १०
रंगुनि जाता दिसे आगळी, श्रीरंगाची मूर्ती सावळी
लावूनिया छंद उभ्या गोकुळाला, विसरला भान देव चक्रधारी
रंगला रे हरी यमुनाकिनारी...
प्रचि ११
तुला शोधिते मी दिनराती, तुजसी बोलते हरि एकांती,
फिरते मानस तुझ्याच भोवति, छंद नसे हा साधा,
प्रेमवेडी राधा, साद घाली मुकुंदा...
प्रचि १२
झुलतो बाई रास-झुला
नभ निळे, रात निळी, कान्हाही निळा
वार्याची वेणु, फांद्यांच्या टिपर्या
गुंफतात गोफ चांदण्यात छाया
आभाळाच्या भाळावरी चंदेरी टिळा...
प्रचि १३
हरिनाम मुखी रंगते, एकतारी करी वाजते
विनविते, मी तुला, भाववेडी मीरा
गोड नामी तुझ्या दंगते
प्रचि १४
नको वाजवू श्रीहरी मुरली
तुझ्या मुरलीने तहान-भूक हरली रे
प्रचि १५
कृष्ण गाथा एक गाणे जाणते ही वैखरी
एकतारी सूर जाणी श्री हरी जय श्री हरी
प्रचि १६
जिवाचा जिवलगा नंदलाला रे
यमुनेत तुझ्या माझ्या बिंब मुखाचे
बांसरीत तुझ्या माझ्या गीत सुखाचे
स्मरणाने जीव माझा धुंद झाला रे
प्रचि १७
तुझ्या मुरलीत माझी प्रतिमा दिसे
माझ्या डोळ्यांत मूर्ति तुझी विलसे
प्रचि १८
देव माझा निळानिळा, डोळे माझे निळे
माझा समुद्रही निळा, आभाळही निळे
कशी बाई सावळ्याची जादू अशी निळी?
श्रीरंगही निळे आणि अंतरंग निळे
प्रचि १९
पानापानात दिसतो कान्हा, फुले तोडू कशी मी सांगा ना
बासुरीच्या या सूरात न्हाली, चिंब राधिका भिजुनी ओली
कृष्णरूप ही छाया झाली, आता सरला परकेपणा
प्रचि २०
समचरण सुंदर, कांसे ल्याला पीतांबर
अनाभी या माळा रुळती, मुख्य त्यात वैजयंती
प्रचि २१
बोले स्वर बासरिचा, राधेला छंद तुझा
तरु-वेली-फुलांतुनी, गोकुळ हसर्या नयनी
यमुनातटि कुंजवनी, उधळी गंध मनीचा
प्रचि २२
मनी माझिया नटले गोकुळ, मी राधा तू कान्हा प्रेमळ
वाजविता तू मधुर बासरी, नंदन माझ्या फुले अंतरी
फुटते घागर, भिजते साडी, खट्याळ हसते कालिंदीजळ
प्रचि २३
मुरलीधर घनश्याम सुलोचन, मी मीरा तू माझे जीवन
तुझ्या मूर्तिविन या डोळ्यांना, कृष्ण सख्या रे काहि दिसेना
एकतारिच्या सुरात माझ्या, तुझेच अवघे भरले चिंतन
प्रचि २४
दावा नयनी यशोदेचा सुकुमार
मस्तकी मुकुट, कानी कुंडल शोभे
गळा वैजयंती हार
प्रचि २५
सखे ग कृष्णमूर्त गोजिरी, ही ठसली मम अंतरी
धरी वदनी मधु बासरी, मधुर काढी सूर श्रीहरी
बावरे सृष्टि सुंदरी
प्रचि २६
सांवरे श्याम श्रीहरी, मी झाले तुजविण बावरी
मंतरलेले सूर ऐकुनी भान मला नुरले
बंध जगाचे तोडुनि सारे धावत मी आले
ही छळते वैरिण बासरी
प्रचि २७
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे
प्रचि २८
चांदण्यांची लुकलुक झुले गगनी
बासरीने भारावून गेली रजनी
रासरंग उधळला कोनाकोनांत
त्याची धून झंकारली रोमारोमांत
प्रचि २९
प्रचि ३०
तटी:
१. प्रचि १ वरील सुलेख मायबोलीकर निलू हिने केले आहे.
२. प्रचि २९ डिजिटल आर्ट संदेश करलकर.
३. काही प्रचि पूर्वप्रकाशित.
अप्रतिम थीम
अप्रतिम थीम
________/\_________
________/\_________
अहाहा... अप्रतिम थीम! सगळ्याच
अहाहा... अप्रतिम थीम!
सगळ्याच मुर्त्या गोड आहेत.
प्रचि २९...रात्रीच्या चन्द्राच्या पार्श्वभुमीवरील कलात्मक बोट आणि बासरी खुपच सुन्दर!
अप्रतिम थीम !
अप्रतिम थीम !
छान आहेत चित्र.
छान आहेत चित्र.
मस्त थीम . मस्त ओळी. मस्त
मस्त थीम . मस्त ओळी. मस्त फोटो.
जिप्सी, खूप सुन्दर फोटो आणि
जिप्सी, खूप सुन्दर फोटो आणि थिम.
जन्माष्टमीच्या हार्दिक
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!
जन्माष्टमीनिमित्त पुन्हा एकदा
झब्बु,
झब्बु,
मस्त झब्बु
मस्त झब्बु
वा... मन एकदम मोहुन
वा... मन एकदम मोहुन गेलं...मस्त...
आहा...अप्रतिम. कृष्णाच्या
आहा...अप्रतिम.
कृष्णाच्या सगळ्याच मनमोहक प्रतिमा आणि बाळकृष्णाला झुलावणारे मेंदीने सजलेले लोभस हात....सुरेख.
अप्रतिम. ____/\____.
अप्रतिम. ____/\____.
थॅन्क्स जिप्सी! माझा झब्बु
थॅन्क्स जिप्सी! माझा झब्बु प्र्चि म्हणून अगदिच साधारण आहे पण आर्टवर्क म्हणुन ज्याने बनवलय ते डीटेलिन्ग फार खास आहे, माझ्या लिव्हिन्गरुम नविन येणारा प्रत्येक जण अगदी आवर्जुन तारिफ करतो.
सुंदर थीम आणि फोटोज तर
सुंदर थीम आणि फोटोज तर अप्रतिमच!
जिप्सी....मनमोहक....कान्हा...
जिप्सी....मनमोहक....कान्हा...
सुरेख..
सुरेख..
केवळ अप्रतिम!
केवळ अप्रतिम!
जन्माष्टमीच्या सर्वांना
जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!
किती सुंदर फोटो आहेत..खूप
किती सुंदर फोटो आहेत..खूप प्रसन्न वाटलं..आजचा दिवस छान जाणार!
जन्माष्ट्मीच्या हार्दिक शुभेच्छा _/\_
अप्रतिम
अप्रतिम
प्रचि २९ अप्रतिम !
प्रचि २९ अप्रतिम !
फ़ारच सुंदर फ़ोटो आणि
फ़ारच सुंदर फ़ोटो आणि काव्यपंक्ती!
जिप्स्या तुला ________________________/\________________________.
(ह्याच्या डोक्यात, देवाने काहीतरी वेगळं मशिन बसवलय. )
खूप सुंदर.
खूप सुंदर.
माझं चुकलं कसं हें अजून
माझं चुकलं कसं हें अजून पहायचं ! फारच छान !!
प्रत्येक प्रचिला साजेसं कॅप्शन ! जिप्सी, मानलं !!
प्राजक्ता, झब्बूही 'थीम'ला साजेसा !
सुंदर!!
सुंदर!!
अप्रतिम ! काव्य व फोटो.
अप्रतिम ! काव्य व फोटो.
माझा झब्बू राधामाधव धाम Austin. फोटो रोटेट होत नाही .
उद्यापासून श्रीकृष्णजन्मोत्सव
उद्यापासून श्रीकृष्णजन्मोत्सव सुरु होतोय. आठ दिवसांचा सोहोळा आणि गोपाळकाल्याने सांगता.
यानिमित्ताने हा अप्रतिम धागा वर काढतोय. आणि मकरसंक्रातीला काढलेला मुरलीधराचा फोटो शेअर करतोय.
सुंदर फोटो
सुंदर फोटो
खूप सुंदर.
खूप सुंदर.
Pages