माझ्यावर होणारे आरोप प्रत्यारोप आणि माझे सत्याचे प्रयोग!

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 August, 2022 - 05:01

बरेच दिवस हा धागा काढायचा मनात होता.
कारण मी एखादी पोस्ट लिहावी आणि ती खोटी आहे सिद्ध करायला काहींनी धडपड करावी हे आता फार वाढू लागले आहे. मग तो धागा क्रिकेटचा असो, चित्रपटांचा असो, खाऊगल्लीचा असो वा एखादा कल्चरल शॉकच असो..

पण मग वाटायचे, जाऊ द्या. तिथले तिथे क्लीअर करूया. एक वेगळा धागा कश्याला स्वत:वरचे आरोप क्लीअर करायला...

पण आज एका धाग्यावर मी माझ्या लेकीचा किस्सा टाकला. त्यावरही काही वा त्याच काही लोकांनी अविश्वास दाखवताच म्हटले चला. फायनली हा धागा काढायची वेळ झाली. कारण माझ्यावर होणारे आरोप एकीकडे. पण ज्यात माझी मुले इन्वॉल्व्ह आहेत तिथे मला लागलीच दूध का दूध पाणी का पाणी करणे गरजेचे आहे.

तर दरवेळी धागे केवळ माझ्यावर दाखवण्यात आलेल्या अविश्वासामुळे भरकटू नयेत यासाठी हा वेगळा धागा. यापुढे ईथे असले मॅटर सॉल्व्ह करून त्याची नोंद करण्यात येईल.

तर आजची केस -

मी मुलं लाजवतात तेव्हा या धाग्यावर खालील किस्सा लिहिला होता
https://www.maayboli.com/node/24545?page=36

-------
मागे एकदा पोरांसोबत रिक्षाने कुठेतरी जात होतो.
रिक्षाच्या पुढच्या काचेवर बाहेरच्या बाजूने "आईचा आशीर्वाद", "साईबाबांची कृपा" लिहीतात तश्या टाईपचा एक सुविचार लिहिलेला - माय डॅड माय गॉड.
लेकीची त्यावर नजर पडताच तिने तो आतल्या बाजूने वाचला, आणि किंचाळली... हायला पप्पा ते बघ काय लिहिलेय.. माय डॅड माय डॉग Lol
-------

त्यावर असा आक्षेप आला.

My Dad My God ची मिरर इमेज ‘boӘ γM bɒႧ γM‘ अशी होते. ह्यातून ‘My Dad My Dog’ कसं तयार होतं सर? व्हॉट्सअ‍ॅपचे विनोद मुलांच्या नावावर तुम्ही ढकलताय असा आमचा नम्र वहीम आहे. Happy
>>>>>

तर आधी लॉजिकमध्ये घुसूया,

१) वर जे My Dad My God आणि त्याचे उलटे लिहिण्यात आले आहे ते स्मॉलमध्ये आहे. त्या रिक्षावर जे लिहिलेले ती ईंग्रजी कॅपिटल आद्याक्षरे होती. MY DAD MY GOD याने बराच फरक पडतो. संबंधितांनी करून बघावे Happy

२) जेव्हा आपण एखादे पुर्ण वाक्य उलटे वाचतो तेव्हा आधीच आपल्या मेंदूने नोंद घेतली असते की ते उलटे वाचायचे आहे. त्यामुळे MY चे उलटे YM वाचूनही आपल्या मेंदूत त्याची नोंद माय अशीच होते. ते तसेच वाचले जाते. डॅड तर पुढून मागून डॅडच राहतात. पण गॉड आणि डॉग बाबत दोन्ही अर्थपुर्ण शब्द असल्याने गॉड ऐवजी डॉग क्लिक होणे स्वाभाविक आहे. वा त्याची पुरेपूर शक्यता आहे.

आता थेट पुराव्यांकडे वळूया

जेव्हा हा किस्सा घडलेला तेव्हा मी त्याची फेसबूकवर नोंद सुद्धा केली होती. तर असे नाही की आज तो मुलांचा धागा वर आला आणि मी काही किस्सा बनवून लिहीला.

my dad my god - 2.png

...

आणि आता शेवटचा आय विटनेस पुरावा - अर्थात माझी लेक Happy
जी त्यानंतर कित्येक दिवस मला चिडवत होती, माय डॅड माय डॉग... तिला तुम्ही हे नक्की विचारू शकता.

पण त्यासाठी तुम्हाला माझ्या घरी यावे लागेल. माझ्या घरी तुमचे नेहमी स्वागतच राहील. फक्त येताना रिकाम्या हाताने येऊ नका. पोरांसाठी भरपूर चॉकलेटस तेवढी आणा. बदल्यात हा आणि असे कैक किस्से ऐकूनच परत जा Happy

हा धागाही अटेंशन सीकींगमुळे काढला आहे असे तुम्ही म्हणू शकता.
तर येस येस येस, हा आरोप मला मान्य आहे Wink

धन्यवाद,
आपलाच ऋन्मेष Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शंभरेक प्रतिसाद करूया आणि ब्रेक घेऊया तुर्तास.
हि केस डिसमिस झाली आहे. ते काय म्हणतात ना, आई रेस्ट माई केस वगैरे...
आता पुन्हा नवीन संशय / आरोपाच्या दिवशी भेटूया..
कारण सत्य-असत्य, धर्म-अधर्म, नैतिकता-अनैतिकतेची लढाई आयुष्यभर चालूच राहणार.. त्यामुळे धाग्याला मरण नाही!

धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे-युगे॥ Happy

शंभरेक प्रतिसाद करूया आणि ब्रेक घेऊया तुर्तास.>>>

सरांचा उद्देश सफल झाला आशा रीतीने
सर तुम्ही मायबोली पुरते अडकून राहू नका
जगाला तुमची गरज आहे, तुम्ही देशोदेशी दौरे करून सगळीकडे तुमच्याबद्दल चर्चा होईल असं केलं पाहिजे
करत ही असाल म्हणा, आम्हा पामराना काय कळणार तुमचं विश्वरूप दर्शन

ते तिकडचे पापी संकेतस्थळ वाले एक दिवस नाक घासत येतीलच बघा

ऋन्मेष ,बास करा हो. कित्ती लिहाल. दुर्लक्ष तरी किती करायच. बरं वाचायला पण जात नाही तुमचे बाफ पण तुमच्या बाफ मुळ चांगल्या चर्चा वर राहत नाहीत.
बाकीचे लोक ,
इग्नोअर करता येत नाही का ? कितीही वाटल प्रतिसाद द्यावा तर मनात द्या आणि गप्प बसा कि एखादा दिवस. चांगल काही वाचायला याव आणि बघाव तेव्हा >> +१०१

सरांच्या अशा "महत्वाच्या" धाग्यांसाठी एक वेगळा क्लोज्ड ग्रूप का करण्यात येउ नये याठिकाणी ?
माबो प्रशासन सरांच्या या लढ्यासाठी आणि इतर सामान्य सदस्यांच्या हितासाठी असे काही करु शकेल का ?

कशाला सरांचे १०० होण्यात मोडता घालताय.
जावु द्या हो सर. होतील शंभर. दुर्लक्ष करा जळक्यांवर आणी पलिकडचे संस्थळवाले तर घनघोर पापीच.
(असे पण सर मायबोलीचे निलाक्ष बाब्या आहेत)

सरांचे धागे फक्त सरांनाच दिसतील इतका पेटीपॅक क्लोज गृप बनवावा अशी विनंती आहे अध्यक्ष महोदय.

एक सिम्पल लाईक आणि डीस लाईक बटन प्रत्येक धाग्याला द्यावे... एक विशिष्ट नंबर डीस लाईक आले तर धागा मागे फेकला जावा- असे करता येऊ शकते... करायचे का?

अशाने आमच्या सारखे सिंगल आयडी वाले पालक तर कुठच्या कुठं वाहून जातील सरांच्या विक्राळ आयडींच्या लोंढयात

माहीत असलेलेच इतके आहेत, माहिती नसलेले किती असतील हे त्यांना आणि कदाचित देवाला ठाऊक Happy

१०० झाले !
ईथून पुढे धागा तुमच्या माझ्यावरच्या प्रेमावरच चालणार...
शुभरात्री Happy

सरांवर वैयक्तिक लिहाल तर आयडी उडेल Happy

सरांचे काय एक गेला तर अजून कितीतरी येतील

आपल्याला कर्णासारखे टाइम प्लिज पण म्हणता येणार नाही Happy

(सरांसाठी - सर हा कर्ण म्हणजे मूळ महाभारतातला, करणं अर्जुन मधल्या राखीचा नव्हे Happy ) सर बॉलिवूड आणि क्रिकेट या पलीकडे काही वाचत नसल्याने खुलासा बाकी काही नाही

अरे देवा. असं आहे का? मरतो की काय माझा आयडी आता?
तुमच दैव थोर दिसतय वाचलात तुम्ही. नाहीतर कुंतल मधे थोडा फेरफार करुन कुटलं अस नाव करायला सर मागे पुढे पहात नाहीत. (आली हुक्की दे बुक्की असला मामला असतोय)

अर्रे तुझा डोळा लाल झाला होता ना? तरी आहेच का ब्याद?
काय कटकट आहे शिंची Sad
आता दया कर ना त्या डोळ्यांवर आणि पक्षी आमच्या वर Wink

तुमचा अभिषेक, ऋन्मेष, अंड्या, भन्नाट भास्कर, अर्चना सरकार याव्यतिरीक्त माझा कुठला आयडी माहीत आहे का तुम्हाला? >>> किती निर्लज्जपणा..

आशूचँप आणि फेरफटका,
आपले चित्रपट कसा वाटला या धाग्यावरील माझ्यावर आलेल्या वैयक्तिक प्रतिसादांना / आरोपांना ईथे उत्तर देतोय. जेणेकरून तो धागा भरकटू नये.
आपण हा ऋन्मेष ऋन्मेष खेळ ईथे खेळूया Happy

-------

सरांच्या धाग्याची आणि प्रतिसादाची सोय झाली
आता हा सिनेमा यदाकदाचित फ्लॉप गेलाच तर एकवेळ अमीर खान ते मान्य करेल पण सर नाही करणार
तो कसा एकमेवाद्वितीय आहे हे ते सिद्ध करतील
आणि अजून एक धागा काढतील
Submitted by आशुचँप on 10 August, 2022 - 07:02

--------

“सरांच्या धाग्याची आणि प्रतिसादाची सोय झाली” - नुसतं तसं नाही रे. वर परत ‘मोरोबांनी सांगितल्यावरून धागा काढला‘ अशी मखलाशी करून ‘अगं अगं म्हशी‘ आहेच. Happy
Submitted by फेरफटका on 10 August, 2022 - 08:45

-----------

तर आशुचँप आणि फेरफटका,
मला नवीन धागा काढण्याबद्दल मायबोलीकडून शून्य रुपये मानधन मिळते. शंभर प्रतिसादांचा धागा झाला तरीही काहीही बोनस पॉईंट कूपन्स वगैरे मिळत नाही. फॉरेस्ट गंप चित्रपटावर चर्चेचे पोटेंशिअल दिसले. ते ही विविध पैलूंवर चर्चा होण्याची शक्यता होती. त्यावरच्या पोस्टच चिकवा धाग्यावर जास्त होऊ नयेत म्हणून स्वतंत्र धाग्याचा मान दिला.

काही दिवसांपुर्वी चिकवा धाग्यावरच स्त्रीभ्रूणहत्येबाबत शंभरेक पोस्ट आल्या पण कोणी नवीन धागा काढत नव्हते. तिथेच त्या पोस्ट अवांतर म्हणून जमा होत होत्या. त्यामुळे वेळीच एखादा विषय मोठा होणार असे वाटत असेल तर त्याचा वेळीच स्वतंत्र धागा काढणे योग्य नाही का? की पुन्हा पहले आप पहले आप म्हणत थांबून राहायचे. तुम्हीही पुढाकार घेऊन असे धागे काढले तर माझी काही हरकत नाही. कारण तेच. मला नवीन धागा काढायचे शून्य रुपये मानधन मिळते.

आणि हो, जर मोरोबा यांनी मला नवीन धागा काढायचे सुचवले, तर त्यांना सूचना केल्याचे श्रेय दिले. त्यात काय चुकले?

मला नवीन धागा काढायचे शून्य रुपये मानधन मिळते.>> हे वाचुन खरोखर वाईट वाटले. अशामुळेच मराठी माणुस मागे पडला. कमीतकमी चार आकडी मानधन मिळत असेल असा अंदाज होता.
पलिकडच्या संस्थळावर चौकशी करुन पहा. कदाचित फायदा होईल.
असो.. तुमचा धागे काढण्याचा‌ उत्साह तरुणांना लाजवणारा आहे.

कमीतकमी चार आकडी मानधन मिळत असेल असा अंदाज होता.>>>

मलाही,
इतकी अहोरात्र मायबोलीच्या सेवेला वाहून घेऊनही एक पैसा ही मिळत नाही हे कळल्यावर मला जो मानसिक धक्का बसलाय त्याला तुलना नाही
टचकन पाण्यात डोळेच आले
पार अगदी शि:नब्द झालो मी

सर तुमच्यासारखं निस्वार्थी, निर्मोही, समाजासाठी दिवस रात्र एक करत अखंड सेवा करणारे व्यक्तिमत्त्व भुत्रिवनात शोधूनही सापडणार नाही

तुमची परवानगी असेल तर बोबेल पुरस्कासाठी शिफारस करूया का?

त्यांच्या विरुद्ध लिहणाऱ्या आयडिंना ज्या प्रकाशगतीने यमसदनी पाठवले जाते ते पाहता तेच वेमांना महिन्याच्या महिन्या काही विडीकाडी साठी देत असतील असे वाटते.

माझ्यावर होणार्‍या खालील दोन आरोपात विरोधाभास विरोधाभास विरोधाभास सापडतो का बघा Happy

आरोप १) मला माझ्याबद्दल बोललेले आवडते. मग ते मला विरोधात बोललेले का असेना, मला शिव्या घातलेले का असेना..

आरोप २) मी प्रशासनाकडे सेटींग लाऊन माझ्याविरोधात बोलणार्‍या आयडींचा काटा काढतो.

शुभरात्री Happy

सरांची रात्र लवकर होते आणि उजाडते पण लवकर दोन अडीच ला वगैरे
सर मुंबईत सांगून तुम्ही नॉर्वे ला तर राहत नाही ना?
पण तसे असते तर हा मध्यरात्री चा सूर्य म्हणून धागा काढला असतात Happy

सर तुमची कारकीर्द च इथली विरोधाभासाने भरली आहे
Happy

मी प्रशासनाकडे सेटींग लाऊन माझ्याविरोधात बोलणार्‍या आयडींचा काटा काढतो.>>>
हे माझ्या बाबतीत तरी खरे ठरले नाहीये नैतर मी लै मागेच उडालो असतो
एकतर सरांची माझ्यावर कृपादृष्टी आहे किंवा मग खरोखरच ते म्हणतात तसे त्यांना यांच्यात फार रोल नसेल

सर तरीही विनंती, माझा ट्रेक चा धागा अपूर्ण आहे, तो पूर्ण होईपर्यंत तरी मला उडवू नका Happy

तेच वेमांना महिन्याच्या महिन्या काही विडीकाडी साठी देत असतील असे वाटते. >> Lol

सर मुंबईत सांगून तुम्ही नॉर्वे ला तर राहत नाही ना?>> Lol
अरे किती हसवाल..

सरांचे डूआय डी दूरवर पसरले आहेत. आमचा मास्कोचा वार्ताहर कळवतो कि पुतीन हे पुतीन नसून सरांचे डूआय डी आहेत. जगातील सर्व मान्यवर हे सरांचे डूआय डी आहेत. सर नवी मुंबईत बसून जगाच्या राजकारणाची सूत्रे हलवतात.
या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी। यस्यां जाग्रति भूतानी सा निशा पश्यतो मुनेः।।
जेव्हा माबोची भुते झोपली असतात तेव्हा सरांना जगातल्या भूतांचा समाचार घ्यायला स्वस्थता मिळते.
असो.
या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी। यस्यां जाग्रति भूतानी सा निशा पश्यतो मुनेः।।
डिस्क्लेमर --- मी मात्र सरांचा डूआय डी नाहीये.

Pages