बरेच दिवस हा धागा काढायचा मनात होता.
कारण मी एखादी पोस्ट लिहावी आणि ती खोटी आहे सिद्ध करायला काहींनी धडपड करावी हे आता फार वाढू लागले आहे. मग तो धागा क्रिकेटचा असो, चित्रपटांचा असो, खाऊगल्लीचा असो वा एखादा कल्चरल शॉकच असो..
पण मग वाटायचे, जाऊ द्या. तिथले तिथे क्लीअर करूया. एक वेगळा धागा कश्याला स्वत:वरचे आरोप क्लीअर करायला...
पण आज एका धाग्यावर मी माझ्या लेकीचा किस्सा टाकला. त्यावरही काही वा त्याच काही लोकांनी अविश्वास दाखवताच म्हटले चला. फायनली हा धागा काढायची वेळ झाली. कारण माझ्यावर होणारे आरोप एकीकडे. पण ज्यात माझी मुले इन्वॉल्व्ह आहेत तिथे मला लागलीच दूध का दूध पाणी का पाणी करणे गरजेचे आहे.
तर दरवेळी धागे केवळ माझ्यावर दाखवण्यात आलेल्या अविश्वासामुळे भरकटू नयेत यासाठी हा वेगळा धागा. यापुढे ईथे असले मॅटर सॉल्व्ह करून त्याची नोंद करण्यात येईल.
तर आजची केस -
मी मुलं लाजवतात तेव्हा या धाग्यावर खालील किस्सा लिहिला होता
https://www.maayboli.com/node/24545?page=36
-------
मागे एकदा पोरांसोबत रिक्षाने कुठेतरी जात होतो.
रिक्षाच्या पुढच्या काचेवर बाहेरच्या बाजूने "आईचा आशीर्वाद", "साईबाबांची कृपा" लिहीतात तश्या टाईपचा एक सुविचार लिहिलेला - माय डॅड माय गॉड.
लेकीची त्यावर नजर पडताच तिने तो आतल्या बाजूने वाचला, आणि किंचाळली... हायला पप्पा ते बघ काय लिहिलेय.. माय डॅड माय डॉग Lol
-------
त्यावर असा आक्षेप आला.
My Dad My God ची मिरर इमेज ‘boӘ γM bɒႧ γM‘ अशी होते. ह्यातून ‘My Dad My Dog’ कसं तयार होतं सर? व्हॉट्सअॅपचे विनोद मुलांच्या नावावर तुम्ही ढकलताय असा आमचा नम्र वहीम आहे. Happy
>>>>>
तर आधी लॉजिकमध्ये घुसूया,
१) वर जे My Dad My God आणि त्याचे उलटे लिहिण्यात आले आहे ते स्मॉलमध्ये आहे. त्या रिक्षावर जे लिहिलेले ती ईंग्रजी कॅपिटल आद्याक्षरे होती. MY DAD MY GOD याने बराच फरक पडतो. संबंधितांनी करून बघावे
२) जेव्हा आपण एखादे पुर्ण वाक्य उलटे वाचतो तेव्हा आधीच आपल्या मेंदूने नोंद घेतली असते की ते उलटे वाचायचे आहे. त्यामुळे MY चे उलटे YM वाचूनही आपल्या मेंदूत त्याची नोंद माय अशीच होते. ते तसेच वाचले जाते. डॅड तर पुढून मागून डॅडच राहतात. पण गॉड आणि डॉग बाबत दोन्ही अर्थपुर्ण शब्द असल्याने गॉड ऐवजी डॉग क्लिक होणे स्वाभाविक आहे. वा त्याची पुरेपूर शक्यता आहे.
आता थेट पुराव्यांकडे वळूया
जेव्हा हा किस्सा घडलेला तेव्हा मी त्याची फेसबूकवर नोंद सुद्धा केली होती. तर असे नाही की आज तो मुलांचा धागा वर आला आणि मी काही किस्सा बनवून लिहीला.
...
आणि आता शेवटचा आय विटनेस पुरावा - अर्थात माझी लेक
जी त्यानंतर कित्येक दिवस मला चिडवत होती, माय डॅड माय डॉग... तिला तुम्ही हे नक्की विचारू शकता.
पण त्यासाठी तुम्हाला माझ्या घरी यावे लागेल. माझ्या घरी तुमचे नेहमी स्वागतच राहील. फक्त येताना रिकाम्या हाताने येऊ नका. पोरांसाठी भरपूर चॉकलेटस तेवढी आणा. बदल्यात हा आणि असे कैक किस्से ऐकूनच परत जा
हा धागाही अटेंशन सीकींगमुळे काढला आहे असे तुम्ही म्हणू शकता.
तर येस येस येस, हा आरोप मला मान्य आहे
धन्यवाद,
आपलाच ऋन्मेष
अर्रर्रर्रर्र .. असले कसले हे
अर्रर्रर्रर्र .. असले कसले हे संपादक.... निषेध आहे...
संपादक आपल्यासाठी फुकट संस्थळ चालवत असून करतायत तितके पुरे इतके बोलून खाली बसतो lol
मी ही डोकावलो होतो तिकडे पण काही खूप डेंजर आय डी आहेत तिकडे त्यामुळे सदस्यनाम नाही घेतलं आणि फक्त वाचनमात्र राहिलो
तसे सगळीकडे सापडतील हो आबा, पण ठीकच आहे, आपापले वैयक्तिक विचार अन् आवडीनिवडी आहेतच कायम.
तर तो भन्नाट भास्कर उडाला.
तर तो भन्नाट भास्कर उडाला.
भन्नाट भास्कर तिकडे कसा उडाला यावर एक स्वतंत्र धागा काढण्यात यावा याठिकाणी.
रामा शिवा गोविंदा,
रामा शिवा गोविंदा,
झक मारली अन् मुंबई बघितली म्हणतो मी आता अन् गप पडतो कोपऱ्यात चुना तंबाखू मळत
च्रप्स, आबा, हिरा... धन्यवाद
च्रप्स, आबा, हिरा... धन्यवाद
आणि हो, मला त्याचे काही सुख दुख नसले तरी ते वागणे चुकीचे वाटले. रुचले नाही. हे वैयक्तिक मत.
जेम्स वांड, प्लीज ईतके बोल्ड
जेम्स वांड, प्लीज ईतके बोल्ड करू नका ना वाक्ये. लोकं वाचतात बरोबर. पण या बोल्डने त्रास होतो डोळ्यांना.
त्यात माझ्या डोळ्यांना आधीच त्रास आहे.
ईथे हवे तर चेक करू शकता.
https://www.maayboli.com/node/81151
वाचू नका, त्रास अजून वाढेल,
वाचू नका, त्रास अजून वाढेल, पुढे सरकवून टाका लगेच माझे प्रतिसाद.
- (बोल्ड नसलेला) वांड
आता नवीन मंडळी मैदानात
आता नवीन मंडळी मैदानात उतरलेली दिसते.
“ पण आता मी माझ्या किस्श्यावर
“ पण आता मी माझ्या किस्श्यावर संशय घेणे म्हणजेच माझ्या ईंटीग्रीटीवर संशय घेणे झाले हे दाखवतातच मात्र तुम्ही भीड न बाळगता थेट माझ्यावर बेछूट आरोप केलेतच” - नाही बा! तू either नीट वाचत नाहीस किंवा सिलेक्टीव्ह वाचतोस किंवा सोयिस्कर अर्थ काढतोस.
तुझ्याविषयी (इतरांनी/अनेकांनी) घेतल्या गेलेल्या आक्षेपात तुझ्या इंटेग्रिटीवर शंका घेतली असं तुला वाटण्याची पाळंमुळं असू शकतील असं मी लिहिलंय. त्यापुढे जे तू लिहिलंयस ते का लिहिलंयस ते तुलाच ठाऊक
फेरफटका, ओके
फेरफटका, ओके
जेम्स वांडो, माझा तो दुसऱ्या
जेम्स वांडो, माझा तो दुसऱ्या संस्थळाविषयीचा प्रतिसाद खास एकाला कुणाला असा उद्देशून नव्हता. तुम्हांला तर मुळीच नाही. त्यामुळे ' बाण मारतो' इत्यादी स्पष्टीकरण व्यर्थ आहे. तुमचे तिथलेही लिखाण वाचले आहे आणि ते आवडले आहे. त्यामुळे आदरही आहे.
मला आठवते त्यानुसार ' तुमचा अभिषेक ' ह्या नावाने परीच्या जन्माच्या निमित्ताने लिहिलेला लेख तिथेही खूप वाखाणला गेला होता. ( तिथे टाकला होता की नाही हे आता अगदी अंधुकच आठवतेय. टाकलेला नसेल तर वाचकांनी क्षमा करावी)
पण नंतर एक आय डी मात्र एका लेखातच उडाला होता
त्यामुळे ' बाण मारतो' इत्यादी
त्यामुळे ' बाण मारतो' इत्यादी स्पष्टीकरण व्यर्थ आहे. तुमचे तिथलेही लिखाण वाचले आहे आणि ते आवडले आहे. त्यामुळे आदरही आहे.
तो तुमचा स्वभावविशेष झाला साहेब, प्रत्येक माणूस इतके सामंजस्य असणारा असेलच असे नाही, इथे माबोवरच तसला अनुभव ओझरता आलाय, ते पण जाऊ दे.
समजून घेतल्याबद्दल आभार .
दोन्ही मंच आपापल्या परीने
दोन्ही मंच आपापल्या परीने लव्हेबल वाटले >> +१
संपादक आपल्यासाठी फुकट संस्थळ
संपादक आपल्यासाठी फुकट संस्थळ चालवत असून करतायत तितके पुरे इतके बोलून खाली बसतो
>>> आपल्यासाठी फुकट संस्थळ वगैरे असे काही नसते...... त्यांना पैसे मिळतात ऍड्स मधून... आपण विझिट करतो म्हणून ट्रॅफिक येतो.. पेज हिट्स वाढतात...
फुकट संस्थळ वगैरे असे काही
फुकट संस्थळ वगैरे असे काही नसते >> +१
काही फुकट असेल तर समजा 'यू आर प्रॉडक्ट!' ब्ला ब्ला ब्ला... ब्ला ब्ला ब्ला..
तुमच्याकडून डायरेक्ट पैसा
तुमच्याकडून डायरेक्ट पैसा घेतात का ? माझ्याकडुन तरी सभासद होण्यासाठी एक रुपया घेतलेला नाही. पटलं तर बघा नाहीतर वांड्या मूर्ख आहे म्हणा अन् सोडून द्या.
मला आठवते त्यानुसार ' तुमचा
मला आठवते त्यानुसार ' तुमचा अभिषेक ' ह्या नावाने परीच्या जन्माच्या निमित्ताने लिहिलेला लेख तिथेही खूप वाखाणला गेला होता. ( तिथे टाकला होता की नाही हे आता अगदी अंधुकच आठवतेय. टाकलेला नसेल तर वाचकांनी क्षमा करावी)
>>>>
नको वाचकांची क्षमा. होता तो लेख तिथे. आणि हो, आज पुन्हा ते प्रतिसाद वाचायला छान वाटले
सुखाची चाहूल... आगमन ... अवर्णनीय !
http://misalpav.com/node/27398
ऋन्मेष ,बास करा हो. कित्ती
ऋन्मेष ,बास करा हो. कित्ती लिहाल. दुर्लक्ष तरी किती करायच. बरं वाचायला पण जात नाही तुमचे बाफ पण तुमच्या बाफ मुळ चांगल्या चर्चा वर राहत नाहीत.
बाकीचे लोक ,
इग्नोअर करता येत नाही का ? कितीही वाटल प्रतिसाद द्यावा तर मनात द्या आणि गप्प बसा कि एखादा दिवस. चांगल काही वाचायला याव आणि बघाव तेव्हा हेच.
सीमा, प्रतिसादाबद्दल मनापासून
सीमा, प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद
विचार करा जिथे तिथे हेच बघून तुम्हाला ईरीटेट होत असेल तर ज्याला हे भोगावे लागते त्या माझे काय होत असेल.
कुठे मी काही पोस्ट लिहिली की त्यात खुसपट काढणारे काही प्रतिसाद येणार हे ठरलेलेच आहे. मग ते उकसवणारे असतील, वा माझ्या ईंटिग्रिटीवर शंका घेणारे असतील, माझ्याबद्दल खोट्या अफवा पसरवणारे असतील, मला चिडवणारे असतील वा निव्वळ मला त्रास देण्याच्या हेतूने लिहिले असतील. त्यांना मी काहीच उत्तर दिले नाही तरी ते येणार हे ठरलेलेच आहे. तुमच्याही लक्षात आले असेल की काही आयडींना तर मी टोटल इग्नोर केले तरी ते माझ्या पोस्टला कोट करून हमखास काही ना काही लिहितातच. त्यांचा विजय यातच आहे की मी मायबोलीवर लिहीणे पुर्णतः थांबवावे.
पण मी ते नाही थांबवणार. कारण ही लढाई त्यांची आणि माझी नाही तर ही नैतिकता आणि अनैतिकता, धर्म आणि अधर्मची लढाई आहे. आणि ईथे मी अधर्माला विजय मिळवू देणार नाही.
पटलं तर बघा. मनापासून लिहीलेय. नाहीतर अफवा आहेतच माझ्याबद्दल हजार मार्केटमध्ये. त्याच खर्या मानून सोयीने निष्कर्श काढून पुढे जाऊ शकता. काही लोकं हेच सोयीचे पडते म्हणून हेच करतात.... तुम्हीही केलेत तरी काही मला काही वाईट वाटणार नाही याचा विश्वास ठेवा.
कारण ही लढाई त्यांची आणि माझी
कारण ही लढाई त्यांची आणि माझी नाही तर ही नैतिकता आणि अनैतिकता, धर्म आणि अधर्मची लढाई आहे. आणि ईथे मी अधर्माला विजय मिळवू देणार नाही.>>>>
सर तुम्ही खरेच अवतार आहात
मर्त्य मानवांच्या उद्धारासाठी तुमचा जन्म झाला आहे
मायबोली चे आभार त्यांनी तुमच्यासारखे रत्न दिले
त्या दुसऱ्या संकेतस्थळावर करंटे लोक आहेत
त्यांना तुमची योग्यता कळूच शकली नाही
तुम्ही एक दिवस विश्वगुरु म्हणून प्रसिध्द होणार
शुभरात्री आशुचॅंप
शुभरात्री आशुचॅंप
“ कारण ही लढाई त्यांची आणि
“ कारण ही लढाई त्यांची आणि माझी नाही तर ही नैतिकता आणि अनैतिकता, धर्म आणि अधर्मची लढाई आहे. आणि ईथे मी अधर्माला विजय मिळवू देणार नाही” इति श्री कृष्णार्जुनसंवादे, सांख्ययोगोध्यायः! पण सर ते ‘मा फलेषु कदाचन‘ कडे ही लक्ष असू द्या बरं.
“ ज्याला हे भोगावे लागते त्या माझे काय होत असेल.” अरेरे! “करुणामय चेहेर्याची स्मायली“ - असे भोग कुणाच्याही वाट्याला न येवो.
इतक्या यातना सोसून, केवळ धर्माची लढाई लढण्यासाठी मायबोलीवर अवतार घेणार्या सरांचा खरं तर जाहीर सत्कार व्हायला हवा. त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणार्यांचा जाहीर णिषेध!!
<<<ऋन्मेष ,बास करा हो. कित्ती
<<<ऋन्मेष ,बास करा हो. कित्ती लिहाल. दुर्लक्ष तरी किती करायच. बरं वाचायला पण जात नाही तुमचे बाफ पण तुमच्या बाफ मुळ चांगल्या चर्चा वर राहत नाहीत.
बाकीचे लोक ,
इग्नोअर करता येत नाही का ? कितीही वाटल प्रतिसाद द्यावा तर मनात द्या आणि गप्प बसा कि एखादा दिवस. चांगल काही वाचायला याव आणि बघाव तेव्हा हेच.>>>+786
तुमचा थापा मारायचा धागा
तुमचा थापा मारायचा धागा सापडला की अजून शोधताय?
मिसळपाव हे खरोखरी फुकटच आहे.
मिसळपाव हे खरोखरी फुकटच आहे. तिथे ऍड तरी कुठे असतात ?
घोर पापी लोकं आहेत. सरांवर
घोर पापी लोकं आहेत. सरांवर सौंशय म्हणजे काय???????????
त्यांनी एकदा म्हटलं म्हणजे म्हटलं....सफेद गारगोटीवरची काळी रेघच
पण मी ते नाही थांबवणार. कारण
पण मी ते नाही थांबवणार. कारण ही लढाई त्यांची आणि माझी नाही तर ही नैतिकता आणि अनैतिकता, धर्म आणि अधर्मची लढाई आहे. आणि ईथे मी अधर्माला विजय मिळवू देणार नाही.>> आमचे एक मित्र महिनाअखेरीस पगार संपत आला की ग्रामोद्योगांना चालना द्यायला सुरुवात करायचे. ते गावातल्या कुटीरोद्योगाला चालना देऊन आले की असेच काहीबाही सुविचार सांगायचे त्यांची आठवण झाली.
शीर्षकात ते 'माझे व सत्याचे
शीर्षकात ते 'माझे व सत्याचे प्रयोग ' असे हवे ना?
आणि सत्या असतो कुठे हल्ली?
सत्याला मारला की पोलिसांनी
सत्याला मारला की पोलिसांनी गोळी घालून
भिकू म्हात्रे गेला आणि पाठोपाठ सत्या पण गेला
खूप छान लिहिले आहे ऋन्मेऽऽष,
खूप छान लिहिले आहे ऋन्मेऽऽष, सर सर गॅंग ला उत्तर द्यायलच हवे होते आणि तुम्ही खुप छान प्रकारे ते दिले.
सत्याला खांडीलकरनी मारला.
सत्याला खांडीलकरनी मारला. खांडीलकरला भाऊ ठाकुरदास जावळेनी टीप दिली होती.
Pages