एक (मालिकेतील) परंपरा जपणारी मुलगी, यशस्वी आणि परंपरांचा सन्मान करणारी उद्योजिका आणि तिचा यशस्वी पण खडूस मुलगा यांची ही कहाणी आहे असं वाटते.
नायिका कोकणातली आहे. तिची आई स्वर्गवासी झालेली आहे. वडीलांची आर्थिक स्थिती कमजोर आहे. त्यांच्या घरावर कर्ज असल्याने ती मुंबईत नोकरी करायला आलेली आहे व उद्योजिकेचा जो काही उद्योग आहे त्यात ती काम करते. सिरिअल अधून मधून बघत असल्याने नक्की कसला उद्योग आहे ते कळले नाही. नायकही त्याच उद्योगात असतो आणि त्याची आई प्रॅक्टिकल निर्णय घेत नसल्यामुळे त्याचे आईशी अधुन मधुन खटके उडत असतात. साधी रहाणी असल्यामुळे आपल्या नायिकेवर उच्च विचारसरणीची जबाबदारी आलेली आहे. शिवाय तिची आर्थिक स्थिती सामान्य असल्याने मालिकावाल्यांच्या नियमाप्रमाणे ती स्वभावाने चांगली असणार. नायक खडुस असल्यामुळे त्याला माणसात आणण्यासाठी तिला पुढे खूप स्कोप मिळेलच.
बाकी एकत्र कुटुंब, कुटील कारस्थाने करणारी नातेवाईक मंडळी, मॉडर्न दिसणारी आणि त्यामुळे खलप्रवृत्तीची ठरेल अशी सून, तिचे कान भरणारी आई, बायकोपुढे काही न बोलणारा नवरा वगैरे स्टिरिओ टाईप्स ठासून भरलेले आहेत.
निवेदिता जोशी (उद्योजिका) सोडल्यास इतर कलाकारांना मी ओळखत नाही. 'अजुनही बरसात आहे' मधील मनू इथे एका साईड रोल मधे आहे.
तर चला घेऊ रसास्वाद 'भाग्य दिले तू मला' या मालिकेचा...
व्हिलन मंडळी (घारोटीची सासू व
व्हिलन मंडळी (घारोटीची सासू व कावेबाज काका) असे काही दुःख करत होते जणूकाही मोठ्या काकूने यांचीच कंपनी चालवायला घेतली आहे आणि आणि आता परत करत नाही। तिचा मेकअप गंडलेला आहे मोर्डेन दाखवायच्या नादात आय मेकअप इतका खराब आहे , बहुदा वॉटर प्रूफ नसावा नेहमी रडल्यावर पूर्ण डोळे काळे होतात।
राज ला नऊवारी नेसवायचा एकंदर
राज ला नऊवारी नेसवायचा एकंदर ड्रामा चांगला वाटला
वैदेही साडी घालून म्हणते तर काकू तिला करेक्ट करते,नेसणे म्हण वगैरे
आणि तेच ऑफिस मध्ये बॉसमावशी साडी घालून राज कसा दिसतोय तर काकू सोईस्करपणे दुर्लक्ष करतात...
हे बरंय
बॉसमावशी घालून म्हणतात का,
बॉसमावशी घालून म्हणतात का, धन्य आहे. तिथे काकु गप्प बसल्या, छान.
तिची तत्व व्यक्तिसापेक्ष आहेत
तिची तत्व व्यक्तिसापेक्ष आहेत आणि स्वत:च्या मतलबानुसा बद्लतात वाटत!
राजवर दादागिरी करण्यात आणि
राजवर दादागिरी करण्यात आणि घालून पाडून बोलण्यात काकुबाई एक्स्पर्ट आहेत.
बाकी त्याला ऑफिसमधून काढण्यात, त्या सानीयाला नकळत का होईना टेस्टिंग कधी आहे ऑफिसमध्ये सांगण्यात ह्या पुढे.
तरीही मला राज काकु पेअर आवडते.
ह्या मालिकेतही एक प्रेझेंटेशन
ह्या मालिकेतही एक प्रेझेंटेशन दिले की लगेच इन्वेस्टर्स इंप्रेस होतात. ह्यांना बरे असे एका मीटिंगमध्ये आणि एका महिन्यापूर्वी जॉईन झालेल्या एम्प्लॉयीमुळे इन्वेस्टर्स मिळतात !
आणि काकूला काहीही माहिती नसते म्हणे. तरी पण फोनवर राज तिला पाच मिनिटात शिकवतो सगळं. लगेच काकू यशस्वीरीत्या प्रेझेंटेशन करते. इन्वेस्टर्सना (एकच माणूस आहे) ते आवडतेच. लगेच त्याच दिवशी होकारार्थी निर्णयही देतात !
एक महिन्यात पगार दुप्पटही झाला तिचा !
Pages