वर्षासोहळा

Submitted by अदिती ९५ on 6 July, 2022 - 09:04

न्हाऊ घालती वर्षाधारा
तृप्त जाहली तप्त धरा
सांगाती हा अल्लड वारा
पानोपानी सुखद शहारा
डोंगरदऱ्या सजून निघती
रांगोळ्या घालीत शुभ्र धारा
ओला गंध भारून टाकी
कुंद आसमंत सारा
हिरवाकंच शालू लेवूनी
धरती पाही मृगसोहळा

श्रावणात तव सुरेल नखरा
भाद्रपदी मग अनंतधारा
दिवसाढवळ्या ढगांआडूनी
लपंडाव तो खेळी तारा
रानी घुमतो निळा पिसारा
नभातूनी जणू बरसे पारा
आभाळभरल्या सांजेला
इंद्रधनुचा मोहक नजारा
विजाही पाहती मेघांआडूनी
अवघा अपूर्व वर्षासोहळा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users