भीड ही भिकेची बहिण आहे. तरीसुध्दा आर्थिक व्यवहारात सुध्दा आपण काहीवेळा भिडस्त राहून फसवणूक करून घेतो.
त्यातून शिकून पुढच्यावेळी जास्त दक्ष रहातो. अशा दक्षपणाचे, पक्केपणाचे किस्से येऊद्यात.
आम्ही २००६ च्या सुमारास एका राष्ट्रीयकृत बॅंकेतून कार लोन घेतले होते. आमचा No prepayment/pre closure charges हा बॅंकनिवडीतील एक मुख्य निकष होता. तसं या बॅंकेने कबूल केले होते. मी हा clause agreement मध्ये टाकावा म्हणून आग्रही होते. त्यांनी एक पानाचे आतिशय गचाळ agreement मला दिले. त्यात तो clause नव्हता. मी त्यांना “आम्हाला तुमचे लोन नको” म्हणून स्पष्टपणे सांगितले आणि त्या agreement वर सही करायला नकार दिला. शेवटी त्यांनी No prepayment/pre closure charges असं त्या कागदावर पेनाने लिहून दिले. मी त्यांना बॅकेचा आधिकृत स्टॅंप , त्यांची सही, नाव आणि तारीख त्या खाली लिहायला लावली. त्यानंतरच त्यावर माझी सही केली.
यामुळे आम्ही वेळोवेळी कोणत्याही charges शिवाय pre-payment करू शकलो. आणि अंतिमतः सुकरतेने loan pre-closure करू शकलो.
छापील करार म्हणजे एकतर्फी
छापील करार म्हणजे एकतर्फी करार. लोन लवकर फेडणारे कमीच असतात. पण मग त्यांच्यासाठी हा मुद्दा हवाच.
असाच खंबीरपणा आणि चिवटपणा
असाच खंबीरपणा आणि चिवटपणा दाखवायला हवा. समोरच्याकडून दोनतीनदा नकार आला की आम्ही गळपटतो. तिथेच लढाई संपते. खेटे मारण्याचा कंटाळाही असतो आणि वेळही नसतो.
बहुतेक सर्व बैका होम लोन
बहुतेक सर्व बैका होम लोन साठी prepayment/pre closure charges घेतात. कोणी असे निगोशिएट केले आहे का ? करता येते का ?
<< मी त्यांना “आम्हाला तुमचे
<< मी त्यांना “आम्हाला तुमचे लोन नको” म्हणून स्पष्टपणे सांगितले >>
तुम्ही फार गरजू न्हवता किंवा तुम्हाला इतर पर्याय उपलब्ध होते, हा कळीचा मुद्दा आहे. यात भीड असणे/नसणे, हे तितकेसे महत्त्वाचे नाही.
कार लोन होते म्हणून शक्य झाले. समजा तुम्ही रहाते घर विकून नवीन घर घेणार असाल आणि अश्या वेळी बँकेने, सुरुवातीला तोंडी होकार देऊन तो क्लॉज टाकायला आयत्या वेळी नकार दिला असता, तर तुम्ही काय केले असते?
छान
छान
कार लोन दहा लाखांचे आसेल.
कार लोन दहा लाखांचे आसेल. कुठून तरी काही महिन्यांत पैसे येऊन ते फेडणार असतील म्हणून तो मुद्दा टाकून घेतला.
घराचे लोन मोठे असते ते कोण फेडायला जातात? नोकरीत काहींना चार वर्षं झाल्यावर दोन टक्क्यांनी लोन मिळते. पण अगोदर कुठून नऊ टक्क्यांनी घेतलेले परत करतात. अशांनी ही तजवीज करावी.
घराचे लोन असो किंवा इतर
घराचे लोन असो किंवा इतर कुठलेही लोन असो, तुम्हाला ते लवकर फेडायचे असो वा नसो, त्याच्यावर प्रीपेमेंट पेनल्टी नसणे ही महत्त्वाची बाब आहे आणि ग्राहकाच्या फायद्याची आहे.
तुम्ही फार गरजू न्हवता किंवा
तुम्ही फार गरजू न्हवता किंवा तुम्हाला इतर पर्याय उपलब्ध होते, हा कळीचा मुद्दा आहे. >> उबो, भीड हा फार बेसिक इन्स्टिंक्ट अहे आपल्याकडे पूर्ण निगोशिएशन पॉवर असलेली सिच्युएशन असली, तरी भिडस्तपणामुळे लोक ती पूर्ण वापरत नाहीत. मी ही अनेकदा हे केले आहे. अशा वेळी मग आधीच "प्रेप" करून जावे लागते - या चार गोष्टींवर मी तडजोड करीन, या ३-४ गोष्टींवर अजिबात करणार नाही - मग डील झाले नाही तरी चालेल वगैरे.
मात्र प्रि-पेमेण्ट बद्दल - केंद्र किंवा राज्य सरकारचे ओव्हरराइडिंग नियम नाहीत का? ते असले तर वैयक्तिक करारात बँका ते डावलू शकणार नाहीत, जरी करारात काहीही असले तरी.
प्रिपेमेंटवर पेनल्टी नाही,
प्रिपेमेंटवर पेनल्टी नाही, अशा जाहिराती पाहिल्या आहेत. घरासाठीचं पूर्ण कर्ज जरी लवकर परत केलं नाही, तरी काही रक्कम तर परत करण्याची संधी असू शकते.
कर्जासंबंधीचे नियम रिझर्व बँक बनवत असावी. संघ किंवा राज्य सरकारे नाही.
हो रिझर्व बँकच असेल. कोणतीतरी
हो रिझर्व बँकच असेल. कोणतीतरी गव्हर्निंग बॉडी अशा अर्थाने म्हंटलो.
प्रत्येकजण अशो कोणतीतरी फी
प्रत्येकजण अशी कोणतीतरी फी माफ व्हायला बघतो म्हणूनच सेव्हिंगचे व्याजदर 10 % चे 4 % झाले
बहुतेक सर्व बैका होम लोन साठी
बहुतेक सर्व बैका होम लोन साठी prepayment/pre closure charges घेतात. कोणी असे निगोशिएट केले आहे का ? करता येते का ?
>> आम्ही SBI and idbi दोन्हीचे लोन परत केले आहे. होम लोन. चार्जेस बसले नाहीत.
मला तर घर घेतानाच्या एजंटनेच
मला तर घर घेतानाच्या एजंटनेच सांगितले की अमुकतमुक बँकेकडून लोन घे, मी एक माझ्या ओळखीचा माणूस पाठवतो
तो आला. आम्ही त्याने मागितलेली कागदपत्रे दिली. तो अमुकतमुक करा तुमच्या फायद्याचे आहे असे म्हणाला. आम्ही ते ते केले आणि त्याच्या बँकेकडूनच लोन घेतले. ना कसली चौकशी, ना कसली बार्गेनिंग, ना कसले निगोशिएशन, नि कसले आणखी काही.. मला तसेही यातले काही जमत नाही. झाली चार पैश्यांची फसवणूक तर झाली. जोपर्यंत कोणाला विचारायला जात नाही, कोणाशी तुलना करत नाही, तोपर्यंत वाईट वाटत नाही
खूप उपयुक्त धागा.
खूप उपयुक्त धागा.
मला तसेही यातले काही जमत नाही. झाली चार पैश्यांची फसवणूक तर झाली. जोपर्यंत कोणाला विचारायला जात नाही, कोणाशी तुलना करत नाही, तोपर्यंत वाईट वाटत नाही>>>> थोर च विचार आहेत तुमचे. किती इग्नोरंट आहात. स्वतः अनुभवातून शिकून आई वडिल्/मुलं यांना मार्गदर्शन करण्या इतपत तरी नॉलेज असायला हवं! असो.. असे मला वाटते , आपकी तो बात ही और है
१ दक्षपणाचा किस्सा, मुद्दाम हून जागेच्या नावा सकट सांगत आहे म्हणजे तुम्ही सावध व्हाल.
ठाण्याच्या विवियाना मॉल च्या लीवाईस दुकानात जीन्स घ्यायला गेलो होतो. तिकडे २३-२६ वयोगटतला मुला मुलींचा स्टाफ होता.
जिन्स पसंत केल्या वर बील बनवताना जिन्स वर छापिल किम्मत १९९९/- होती. अजून १ जिन्स मिळुन त्यांनी एकूण बिलाची किम्मत ६०० रुपये ने ज्यादा सांगितली. नवरा घाईत होता, तो कार्ड द्यायला लागला, मी हिशोब करून म्हटले ६०० जास्त कसे काय लागले? तर उत्तर दिले की ह्या वर किम्मत कमी छापलिये, अॅक्चुअल किम्मत १९९९+६०० अशी आहे.
मी आवाज चढऊन म्हंटले, हो का? करू का प्रॉडक्ट कस्ट. केयर ला फोन? मी १९९९ च देणार नाहि तर नको मला जिन्स.
तेंव्हा पडेल चेहेर्याने योग्य बिल बनवले..तरी मी निघताना झाडले त्यांना की कुणी घाईत असेल, लक्ष नसेल तर असंच लुटणार का?
बहुधा बिलात ते वाढिव पैसे न लावता नुसता आकडा अॅडिशनल सांगून एक्स्ट्रा पैसे खिशात घालायचा बेत असावा..कसा ते नक्की माहित नाही.
आम्ही दोन वर्षांपूर्वी एसी
आम्ही दोन वर्षांपूर्वी एसी घेतला. त्याचा गॅस दोन महिन्यातच गेला. मी कारण विचारलं तर इंजिनिअर माहीत नाही, कळत नाहीये म्हणला. त्याने रिसीट वर फक्त गॅस भरला एवढंच लिहिलं. मी कारण कळत नाहीये लिही हे insist केलं. त्यावरून वादा वादी ही झाली. म्हटलं तू लिहिणार नसल्यास मी लिहिते , नवीन एसी चा गॅस जातो आणि कारण कळत नाही हे सिरीयस आहे. गॅस जाणं वादा वादी अस आणखी एकदा झालं .मग कंपनी कडे complaint केली. पहिल्यांदा त्यांनी ही हात वर केले पण मी कारण तुमच्या माणसाला ही कळत नाहीये तुम्ही फुकट दुरुस्त केलंच पाहिजे ह्यावर ठाम राहिले. त्यांनी रडत खडत राजी होऊन पार्ट बदलला. आता एसी बेस्ट चालतोय. मी रिसीट वर रेकॉर्ड ठेवलं होतं म्हणून त्यांनी charge न घेता पार्ट बदलला . पण अर्थात ह्यात भरपूर मनस्ताप होतो आपली ताकद वेळ खर्ची पडतो आणि आपण जाऊ दे म्हणतो. तिथेच त्यांचं फावत.
कोणावर कधीच विश्वास ठेऊ नका
कोणावर कधीच विश्वास ठेऊ नका प्रतेक व्यक्ती कडे संशयित ह्याच नजरेने bagha.
He तत्व माझ्या chultyani त्यांच्या अंतिम वेळी सांगितले.
व्यक्ती मग मित्र असू किंवा कुटुंबातील सर्व संशयित.
बाहेरचे तर जास्त .
आणि मला हे विचार पटले.
किती इग्नोरंट आहात. स्वतः
किती इग्नोरंट आहात. स्वतः अनुभवातून शिकून आई वडिल्/मुलं यांना मार्गदर्शन करण्या इतपत तरी नॉलेज असायला हवं!
>>>>>>
ईतकाही इग्नोरंट नाहीये ओ. म्हणजे त्या मदन चोपडासारखे माझे घरच कोणी हडपून आपल्या नावावर करेल ईतका गाफील नाही राहत. पण आधीच आपण आयुष्यातला अमुकतमुक वेळ खर्च करून अमुकतमुक पैसा कमावत असतो. त्यात अजून दहा टक्के डोक्याचा त्रास वाढवत आपल्या उत्पन्नाचा पाच टक्के पैसा वाचवण्यापेक्षा सरळ ते पाच टक्के आपले उत्पन्नच कमी आहे समजून राहायचे. सोप्या भाषेत उत्पन्नाचा पाच टक्के पैसा खर्च करून डोक्याचा त्रास नक्कीच दहा टक्यांनी कमी होतो असा माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि मला हे परवडते
तरी आकड्यात उदाहरण द्यायचे झाल्यास,
आपण ऑफिसला एक दिवस ओवरटाईम करून / सॅटरडे वर्किंग करून चार-पाच हजार कमावत असू. त्याचवेळी वैयक्तिक कामासाठी तेवढाच एक दिवस खर्च करून आपण पाचशे-हजार रुपये वाचवत असू तर त्या ऐवजी ते खर्च करून दुसर्यावर सोपवून तो दिवस सुट्टी ऊपभोगणे फायद्याचे नाही का...
सर्वांचे किस्से आणि
सर्वांचे किस्से आणि प्रतिक्रिया छान.
वेगवेगळ्या बाजू कळतात.
आजच एक फोन आला होता.
आजच एक फोन आला होता. एचडीएफ्सी एर्गो च्या तुमच्या पोलिसीवर ४ लाखचा डिव्हिडंट आहे . पंधरा मिनिटे टाइम पास केला मग त्यानेच फोन ठेउन दिला.
माझी एका कंपनीत joining
माझी एका कंपनीत joining proceedings चालू होत्या. त्यावेळचा किस्सा.
आधीच्या कंपनीपर्यंत salary account ICICI होतं आणि या कंपनीत HDFC. Account Opening Form मध्ये क्रेडिट कार्ड सेक्शन दिसला आणि तो त्या representative ने चेक केला होता. आणि मला त्याने credit card दिले. मग माझी सटकली. मला क्रेडिट कार्ड नको शंभरदा सांगून त्याचं एकच म्हणणं; कंपल्सरी आहे म्हणे , 0% interest ………
मी शेवटी म्हणाले की मी माझं ICICI चं account continue करते. आणि बोलते मी कंपनीच्या relevant लोकांशी त्याबद्दल. परत त्याचं तेच; तुम्हाला असं करता येणार नाही वगैरे वगैरे…
शेवटी म्हणाला, ठीक आहे क्रेडिट कार्ड नका घेऊ. मी माझ्यासमोर तो फॅार्म आणि क्रेडिट कार्ड फाडून घेतलं आणि नवीन फॅार्म क्रेडिट कार्ड सेक्शन कॅन्सल करून भरला.
मला MTNL मधून फोन आला होता .
..
उत्पन्नाचा पाच टक्के पैसा
उत्पन्नाचा पाच टक्के पैसा खर्च करून डोक्याचा त्रास नक्कीच दहा टक्यांनी कमी होतो >>> हे तुमचे ओपिनियन झाले. माझ्या उत्पन्नाचा ५ % पैसा लाटला जात असेल तर माझ्या डोक्याचा त्रास वाढतो. कारण ती चिटींग असते आणि ती सहन करणे चुकीचेच आहे. तुमचे उदाहरण पण पुर्ण वेगळ्याच मिती तले आहे.
राहु द्या ना. तुमचे मत सगळ्यांशी जुळावेच हा अट्टहास का? पक्केपणाचं काही उदाहरण असेल तर द्या नाहितर गप बसा.
हे तुमचे ओपिनियन झाले. >>> हो
हे तुमचे ओपिनियन झाले. >>> हो अर्थात, मी ते माझे ओपोनिअन माझा फंडाच सांगितला आहे
तुमचे मत सगळ्यांशी जुळावेच हा अट्टहास का? >> हा अट्टाहास कुठे दिसला? उलट तुम्हीच मला इग्नोरंट म्हणालात त्यावर मी म्हणालो ओके. मी माझ्या समाधानाची ती किंमत मोजतो. सर्वांनी मोजावी असे गरजेचे नाहीयेच.
कारण ती चिटींग असते आणि ती सहन करणे चुकीचेच आहे. >>>> हे वाक्य मात्र फार ईंटरेस्टींग आहे. हे जे राजकीय नेते आपण भरलेल्या टॅक्स संपत्तीत जो भ्रष्टाचार करतात तो आपण नाईलाजाने का होईना सहन करतच असतो. एक पाच वर्षानंतर मत देण्याव्यतिरीक्त बहुतांश सामान्य माणसे काहीच करत नाहीत
आताचेच घ्या ना, ते आमदार विमानाने पळून गोवा गुजरात गुवाहाटीला कुठे कुठे गेले. तिथल्या पंचरात्रांकित हॉटेलमध्ये राहिले. लोकं विचारताहेत कुठून आला हा पैसा. अहो कुठून काय, तुमच्या आमच्या खिशातूनच आला आहे तो पैसा
50 आमदार म्हणून सिलेंडर 50 रु
50 आमदार म्हणून सिलेंडर 50 रु वाढले
1 रु पर हेड
राजकीय नेते आपण भरलेल्या
राजकीय नेते आपण भरलेल्या टॅक्स संपत्तीत जो भ्रष्टाचार करतात तो आपण नाईलाजाने का होईना सहन करतच असतो>> त्या विरोधात फारसे काही करणे नेहमी शक्य होईलच असं नाही, शेवटी आपण सामान्य नागरीक. म्हणुनच होता होईतो जिथे (ग्राहक म्हणुन) फसवणूक रोखू शकतो, ती रोखावी आणि कमित कमी नुकसान होईल असे पहावे. बहुधा म्हणुनच हा धागा काढला असावा
होय. खरं आहे.
होय. खरं आहे.
aashu29 >> आपण धन्य आहात.
aashu29 >> आपण धन्य आहात. कशाला त्या दगडावर डोके आपटत आहात
वेडी आशा..
वेडी आशा..
नवीन CM आल्यापासून
नवीन CM आल्यापासून आठवड्याच्या आत वीजबिल दरात वाढ, गॅस दरात वाढ, आणि पाणीकपात.
म्हणे जनतेचा विकास करायचाय आणि आधी मनासारखे काम करता येत नव्हते.
सगळीच राजकारणी मंडळी xxx बनवते.
कधी कधी वाटते मदारी सिनेमा प्रमाणे आपलाही उद्रेक होतो की काय...
मी पण ह्यावेळी पक्केपणाने
मी पण ह्यावेळी पक्केपणाने वागलो. माझा बजाज चा विमा ९ जुलैला संपत होता. १ तारखेपासून कंपनीचे ऑटोमेटेड कॉल चालू झाले आणि दरवेळेस तुम्हाला हिंदी बोलायचे तर एक दाबा आणि इंग्रजी बोलायचे तर दोन दाबा म्हणायचे. मी प्रत्येक वेळेस मराठीत बोलायचे म्हणून सांगायचो पण त्यांच्याकडे मराठी माणूस उपलब्ध नसायचा. विशेष म्हणजे फोन ०२० ह्या पुण्याच्या कोडवरुन चालू होणार्या क्रमांकावरुन यायचा. मी शेवट पर्यंत हिंदीत बोललो नाही. शेवटी मराठी असणार्या आणि बोलणार्या एकाकडून विमा काढला.