साधारण माहिती -
युके मध्ये बरेच भारतीय आहेत त्यामुळे जेवण आपल्यासारखे मिळते. डाळ, तांदूळ, उसळी, भाज्या, वै. सामान मिळते. मसाले - हळद, तिखट मिळते सहज. पण विशिष्ठ ब्रँड मिळत नाही , जसे एवरेस्ट, बेडेकर किंवा बादशाह (इथे मंगल का असाच काही तरी ब्रँड होता). तसे काही हवे तर घेउन जा. इथे बरीच पाकिस्तानी दुकाने असतात त्यामुळे पोहे, रवा पण मिळतो.
सेंसबरी, टेस्को ही रोजच्या खरेदीची दुकाने आहेत. टेस्कोमधूनदेखिल आपले सामन मिळते. लंडनजवळ साउथॉल म्हणुन स्टेशन आहे तिथे तर बरेच भारतीय रहातात.. तिथे देखील मसाले, भाज्या, केशर, वेलची अशी खरेदी करता येते. लंडनजवळ अजुन एक जागा आहे वेम्बली, तिथे देखिल हे सगळे मिळते.
भारतात फोन करण्यासाठी कार्ड मिळतात.. आता नाव विसरले आहे मी.. तिथल्या भारतीय व्यक्तीला विचारल्यास त्यांना माहीत असते. ५ पाऊंड्ची ३ कार्डस घेतली तर स्वस्त मिळतात.
प्रवासखर्च जास्त असतो त्यामुळे ऑफिसच्या जवळ घर बघावं. बेड आणि ब्रेकफास्ट्ची पण सोय असते, स्टुडंट हॉस्तेल्स असतात. नेटवर याची माहिती असते. बाहेर कितीही थंडी असली तरी घरात २० डिग्रीच्यावर हिटींग ठेवु नये, एक तर हिटींग बिल कमी येते आणि घराबाहेरच्या थंडीत अॅडजेस्ट होता येतं. घराबाहेर पडताना तापमान १५ वैगेरे करुन जाव.. म्हणजे घरात आल्यावर थोड्याचवेळात आपलं डिहायड्रेशन होत नाही.
१६ वर्षांखालील मुलांना सिगरेट किंवा दारु विकत घेता येत नाही. त्यामुळे कोणी तशी रिक्वेस्ट केली तर ऐकू नये. बरेचदा पोरे, पोरी मागे लागतात.
इलेक्ट्रॉनिक वस्तू तिथे स्वस्त आहेत कॅमेरा वै. तिथे घ्यावेत. कॉमेट, अर्गोस च्या लिन्क्स इथूनही चेक करुन किम्मत कंपेअर करु शकतो. कूकर आणि हँड मिक्सी इथून न्यावेत हे आटेम्स तिथे २० पाऊंडांना घ्यायला जीवावर येते.
NHS वर्क व्हिसा साठी आहे.
NHS वर्क व्हिसा साठी आहे.
डे केअर - उदाहरण म्हणून हे बघा https://www.busybeeschildcare.co.uk/nursery
माझी मुलगी यांच्या एका ब्रँच मध्ये जायची.
किती खर्च हे राहणीमानावार अवलंबून आहे. डे केअर आणि घरभाडे हे सगळ्यात मोठे खर्च असतात.
घरात एकाला sponsored नोकरी असेल तर दुसरा त्यावर अवलंबून व्हिसा काढून इकडे नोकरी शोधू शकतो.
ही सगळी जुजबी माहिती झाली. खोलात जाऊन माहिती काढायची असेल तर तुमच्या कंपनीमध्ये गेल्या 2-4 वर्षात इकडे आलेले कुणितरे असेल तर त्यांच्याशी बोलून घ्या सविस्तर.
कोणि west midlands / Solihull
कोणी west midlands / Solihull मधले आहेत का इथे?
long term work visa stamping process मधे आहे पण सध्या युक्रेन विस्थापीतांना प्राधन्य दिले जातेय
यु के मधे फॅमिली सोबत राहण्यासाठी ४ ते ४.५ हजार GBP पगार हातत मिळणे आवश्यक आहे
माझे काही सहकारी PG म्हणुन Indian फॅमिली / घरात रहातायेत त्यांचा महिन्याचा खर्च ५०० ते ६०० GBP (रहाणे - खाणे, इंटर नेट ई) मधे भागतो. प्रवास आणि इतर खर्च - ४०० जरी धरले तरी महिना १००० काम भागेल
पण जर कुटुंब (४ जणं) बरोबर असेल तर महिना
घरभाडे ११००-१२०० (२ बेडरुम)
वाण्याच सामान ५०० - ६००
Utilities - २०० - २५०
Outings (Restaurant, McD) 4 times a month - १००-१२०
Preschool (or Kindergarten) - १००० - ११००
+ Savings
वरील किमंती west midlands / Solihull मधिल आहेत आणी हा बराच conservative खर्च दिला आहे
internet वर of Living (City) जरी शोधलं तरी बरीच माहीती मीळेल
धन्यवाद king_of_net
धन्यवाद king_of_net
Dublin की London.. cost of
Dublin की London.. cost of living, education medium in Dublin ,work permit for dependent ... कोणते ठिकाण better राहील? Salary is average in both the places
नमस्कार! मला थोडी माहिती
नमस्कार! मी माबोवरची जुनी पण वाचनमात्र सदस्य आहे. मला थोडी माहिती हवी आहे. आम्ही लवकरच युके ला मूव्ह होणार आहोत. high wycombe आणि harrow टाऊन र्राहण्यासाथी कसे आहे? दोन्हीपैकी कोणते शहर रहण्यासाट्।ई योग्य ठरेल? दोन्ही ठिकाणी शाळेचा choice Ahe. तर प्लीज अर्जन्ट मदत करा.
यु के मधिल माबोकरांनो,
यु के मधिल माबोकरांनो,
भारतात पैसे कसे पाठवता?
सरळ व सहज उपाय म्हणजे येथील
सरळ व सहज उपाय म्हणजे येथील भारतीय बन्का मध्ये खाते उघडले ओन लाईन करु शकता. ईकडे SBI,PNB,ICICI BoB आहेत.
wise ( old TransferWise)
wise ( old TransferWise) नावाचे app वापरुन पाठवतो..,
Pages