युके मधलं आयुष्य

Submitted by जाईजुई on 25 March, 2009 - 11:58

साधारण माहिती -
युके मध्ये बरेच भारतीय आहेत त्यामुळे जेवण आपल्यासारखे मिळते. डाळ, तांदूळ, उसळी, भाज्या, वै. सामान मिळते. मसाले - हळद, तिखट मिळते सहज. पण विशिष्ठ ब्रँड मिळत नाही , जसे एवरेस्ट, बेडेकर किंवा बादशाह (इथे मंगल का असाच काही तरी ब्रँड होता). तसे काही हवे तर घेउन जा. इथे बरीच पाकिस्तानी दुकाने असतात त्यामुळे पोहे, रवा पण मिळतो.

सेंसबरी, टेस्को ही रोजच्या खरेदीची दुकाने आहेत. टेस्कोमधूनदेखिल आपले सामन मिळते. लंडनजवळ साउथॉल म्हणुन स्टेशन आहे तिथे तर बरेच भारतीय रहातात.. तिथे देखील मसाले, भाज्या, केशर, वेलची अशी खरेदी करता येते. लंडनजवळ अजुन एक जागा आहे वेम्बली, तिथे देखिल हे सगळे मिळते.

भारतात फोन करण्यासाठी कार्ड मिळतात.. आता नाव विसरले आहे मी.. तिथल्या भारतीय व्यक्तीला विचारल्यास त्यांना माहीत असते. ५ पाऊंड्ची ३ कार्डस घेतली तर स्वस्त मिळतात.

प्रवासखर्च जास्त असतो त्यामुळे ऑफिसच्या जवळ घर बघावं. बेड आणि ब्रेकफास्ट्ची पण सोय असते, स्टुडंट हॉस्तेल्स असतात. नेटवर याची माहिती असते. बाहेर कितीही थंडी असली तरी घरात २० डिग्रीच्यावर हिटींग ठेवु नये, एक तर हिटींग बिल कमी येते आणि घराबाहेरच्या थंडीत अ‍ॅडजेस्ट होता येतं. घराबाहेर पडताना तापमान १५ वैगेरे करुन जाव.. म्हणजे घरात आल्यावर थोड्याचवेळात आपलं डिहायड्रेशन होत नाही.

१६ वर्षांखालील मुलांना सिगरेट किंवा दारु विकत घेता येत नाही. त्यामुळे कोणी तशी रिक्वेस्ट केली तर ऐकू नये. बरेचदा पोरे, पोरी मागे लागतात.

इलेक्ट्रॉनिक वस्तू तिथे स्वस्त आहेत कॅमेरा वै. तिथे घ्यावेत. कॉमेट, अर्गोस च्या लिन्क्स इथूनही चेक करुन किम्मत कंपेअर करु शकतो. कूकर आणि हँड मिक्सी इथून न्यावेत हे आटेम्स तिथे २० पाऊंडांना घ्यायला जीवावर येते.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाईजुई,

हे शहाणपण मिळवण्यासाठी मला ज्या ठेचा खाव्या लागल्या असत्या, त्या चुकविल्या बद्द्ल मनःपूर्वक आभार.

Lebara - Direct Calling SIM - 5p & 7p per minute आणि नुकतेच एकलेले sim to dial अशी दोन कार्ड आहेत. Sim to Dial विषयी फारशी माहिती नाही, बहुदा ते फक्त लन्डन मध्येच मिळते

jaaijui thanks . Khup changali mahiti dilit. ajun ashach kahi goshti astil bhartatun nenyasarkhya tar kalava.
mi ase ekale ki tithe smoke detector vagaire khupach sensitive astat va aapala indian cooking kartana tras hoto..alarm vaajtat vagaire..khare aahe ka? te avoid karayla kay karayche?
ajun ek prash sarvansathi...Wellington, New Zealand madhun kuni ( Indian Paasport holder ) U. K. cha working Visa ghetala aahe ka? kahi mahiti asel tar please kalava. Biometric assay...time period..overall procedure. Aamhi New Zealand madhe rahat nahi. Pan te saglyat javalche British Consulate aahe aamhala.
Sorry kahi technical problem mule marathi type hot nahiye...

माझे चार शब्द :
युके मधे भारतिय खाद्य पदार्थ मिळण्याचि चान्गलि सोय आहे यात वाद नाहि.
एक लहान गोष्ट अशि.... इथे electrical appliances लावायला इथला connector लागतो, जो इथे देखिल विकत घेता येतो पण लहान गोष्टिला ६ - ७ पाउन्ड्स् द्यावे लागतात.
कपडे (जिन्स वगरे) भारतात घ्यावेत असा मझा अनुभव आहे. इथे वाजवि दरात अगदिच basic jeans, शर्ट्स मिळ्तात.

हॅलो, मी एप्रिल्-मे मध्ये युरोपमध्ये फिरायला येणार आहे. खरेदी काही करायची नाहिये पण तिथे मिळणारे पदार्थ ( जे मुंबईत अजुन मिळत नाहीत ) चाखुन बघायचेत. कुठे काय स्पेशल मिळेल?

लंडन मधे फिश अ‍ॅण्ड चिप्स , मिडल इस्टर्न फूड, थिएटर्सच्या भागात एक इन्डोनेशियन रेस्टॉ आहे, पब मधले खाणे , बीअर्स, आयरिश फूड , स्कॉच व्हिस्की

बेल्जियम / फ्रान्स मधे क्रेप्स, मूले-फ्रीत (स्टीम्ड मसेल्स अन फ्रेन्च फ्राइझ ) , तिथली चॉकलेट्स, ताजे बागेत, पेस्ट्रीज ,वेगवेगळे चीझ चे प्रकार, कोल्ड कट्स , स्मोकड सामनचे प्रकार.
स्विस चीझ,

इटली मधे ताजे पास्ता, पिज्झा , चीझ, ऑलिव्ह ऑइल्स, वाईन्स , क्युअर्ड हॅम,कॉफी, आइसक्रीम

स्पेन मधे ऑलिव्ह्स, ऑलिव्ह ऑइल्स, बोकरोनेस व इतर तापास , सेरानो व इबेरिको हॅम, चोरिझो / मोर्सिआ इत्यादी सॉसेजेस .

>बेल्जियम / फ्रान्स मधे क्रेप्स, मूले-फ्रीत (स्टीम्ड मसेल्स अन फ्रेन्च फ्राइझ ) , तिथली चॉकलेट्स, ताजे बागेत,

पॅरीसमधे ताज्या हवेत
बागेत बसून, खावे बागेत
डोळाभरून पाहून घ्यावी
मटकणारी तिथलीच ब्रूनेत

Happy

कणीक कोणती वापरता तुम्ही लोक?

आयतडक्यात गुजरात लोकवन कणीक मिळत असे पूर्वी; आता कधीच शिल्लक नसते.

सोहम उद्योगच्या कणकेच्या पोळ्या अगदी मऊसूत होतात. रेडिंगमध्ये मिळायची.
केप्र, चितळे, सोहम उद्योग, सकसच्या उत्पादनांची रेडिंगमधली एजन्सी जिने घेतली होती तिचे नाव तुला संपर्कातून पाठवू का मृदुला ?

केंब्रिज मधे पिल्सबरी, लैला आणि एलिफंट एवढे च ऑप्शन आहेत.
लंडन मधे पण कधी सोहम चे पीठ बघितल्याचे आठवत नाही.

>>रेडिंगमधली एजन्सी जिने घेतली
नक्की पाठव अगो.

सोहमचेच गुजरात लोकवन. एकदम मस्त होतात पोळ्या.

spardhateaser1.jpg

मी पिल्सबरी च वापरते
माझ्या एका मैत्रिणी ने सोहम प्रॉड्क्स ची एजन्सी घेतली आहे.. तिच्या कडुन नमुना म्हणुन १ किलो चा सोहम आटा घेतला आहे अश्यातच.. .. बरा वाटला मला..

>>पिल्सबरीच्या पोळ्या नीट मऊ
कमाल आहे.

मी पुष्कळ प्रयत्न करूनही लोकवनसारख्या मऊ होत नाहीत पिल्सबरीच्या.

Anyone staying in Reading from maayboli. I'm planning to move Reading from Abu Dhabi with my family ( child 10yrs). Can anyone guide me about school and accomadation in Reading. My company recommended me Early area. However it is far away from my office

रिडींग मध्ये खूप मराठी मंडळी आहेत. Earley , woodley चांगले एरिआ आहेत. तुमचे ऑफिस कुठे आहे? कम्पनीतल्या लोकांना संपर्क करा.
वय वर्ष 10 म्हणजे 6वी मध्ये जाणार तुमचे मूल. uk मध्ये सहावी हे प्रायमारीचे शेवटचे वर्ष. ७विला दुसऱ्या शाळेत जावे लागते. त्यामुळे आता जिथे प्रवेश मिळेल त्या शाळेत घालून 7विसाठी चांगली शाळा आणि त्यानुसार एरिआ शोधावा लागेल.

Pages