‘Full Body चेक - अप’ करतो तस ‘Full mind चेक अप’ - एक Innovation

Submitted by Psychology4all on 25 June, 2022 - 00:44

‘Full Body चेक - अप’ करतो तस ‘Full mind चेक अप’ - एक Innovation

सगळ्या विद्यार्थ्यांनी Assessment पूर्ण केल्याचा प्राचार्यांचा फोन आला आणि मी ताबडतोब माझ्या लॅपटॉप कडे धाव घेतली. Assessment चा consolidated रिपोर्ट बघायला मी अधीर झालो होतो. आजच्या तरुण पिढीच्या मानसिक अवस्थेचे चित्र मला त्यातून दिसणार होते. सॉफ्टवेअर वरचे GENERATE बटण मी दाबले आणि समोर आलेले graphs, आकडे बघून मन सुन्न झाले. मला वाटले बहुतेक माझ्याकडून कुठेतरी चूक झाली असावी म्हणून परत परत सगळे thresholds, formulae तपासून बघितले. दुर्दैवाने सगळे बरोबर होते.

मध्य महाराष्ट्रातील एका जिल्ह्याच्या प्रतिथयश कॉलेज मध्ये जाऊन सुमारे २५० विद्यार्थ्यांची जनरल psychological assessment आम्ही केली होती आणि त्याचे आलेले परिणाम मी माझ्या समोर बघत होतो. Mild depression सोडून दिले तरी ज्याला आपण moderate to severe depression म्हणू ते प्रथम दर्शनी तरीसुमारे १५ % विद्यार्थ्यां मध्ये होते. Anxiety disorder सुद्धा moderate to severe category मध्ये प्रथम दर्शनी १८% मुलांमध्ये होता. हे खूप जास्त वाटेल पण तुम्ही कुठल्याही तज्ञ psychiatrist किंवा या विषयात काम करणाऱ्यांना विचार त्यांना याचे अजिबात आश्चर्य वाटणार नाही इतके हे अपेक्षित आहे. ADHD विषयी तुम्ही ऐकलेच असेल. एक नंबर चा छुपा रुस्तुम मनोविकार आहे तो. माणसांची आयुष्य जातात तरी त्यांना माहीतच नसते कि आपल्याला ADHD आहे. तो १०-११% विद्यार्थ्यांमध्ये लक्षण दाखवत होता. Co - morbidity ची टक्केवारी म्हणजे दोन - तीन मनोविकार बरोबरीने होण्याचे प्रमाण बरेच जास्त होते. एवढे सगळे झाल्यावर Internet addiction २८ - ३०% विद्यार्थ्यांमध्ये असण्याचे काही आश्चर्य वाटायला नको. Social problems विषयी तर बोलायलाच नको. राहून राहून मनात हेच विचार येत होते की आजच्या तरुण मुला मुलींना नेमके झालेय तरी काय? का त्यांना एवढ्या मनोविकारांनी ग्रासलंय? आणि हे त्यांना, त्यांच्या आई वडिलांना वेळीच समजले नाही तर यांच्या पुढच्या आयुष्यात काय काय होईल?

तर मुख्य मुद्दा हाच आहे कि आपण जनरल physical चेक अप करायला कधीही तयार असतो पण त्याच धरती वर psychological चेक अप का करत नाही? कोणी विचार पूस पण करत नाही की Thyrocare जसे हजार रुपयात ६३ का ऐंशी blood टेस्ट्स करते तसे मनाचे सरसकट Psychological चेक अप होते का हो कुठे? कोणी असा आग्रह पण धरत नाही की प्रत्येक विद्यार्थ्याचे, प्रत्येक नोकरदारांचे, प्रत्येक ज्येष्ठाचे किंवा आपल्या कुटुंबातील प्रत्येकाचे असे psychological चेक अप दर वर्षी झालेच पाहिजे. हे असे का? त्यासाठी दृश्य स्वरूपात तो मानसिक आजार व्हायची वाट का बघायची? तशी वाट बघायची म्हणले तर तो आजार जे आक्राळ विक्राळ रूप घेऊन आपल्या समोर येईल ते आपल्याला सहन होणार नाही. त्यापेक्षा वर कॉलेज मध्ये केलेल्या परीक्षणात जसे या अशा मनोविकारांना आपण स्वतः हुन पकडण्याचा प्रयत्न केला, तसे प्रत्येकाला जमले तर पुढची disasters होण्यापासून अनेक कुटुंब वाचू शकतात. आणि हे मनोविकार किती मोठ्या प्रमाणावर आपल्या सर्वांच्या आसपास पोचलेत त्याचे आकडे वर दिलेलेच आहेत तेव्हा आपला याच्याशी काहीच संबंध नाही असे आपण म्हणू शकत नाही. याच विचारांना पुढे नेत Psychology testing for all ही कल्पना आम्ही एक social Innovation स्वरूपात पुढे नेली. कधी कधी खूप साध्या कल्पना मोठ्या innovative ठरतात, त्यातलीच ही एक.

या प्रोजेक्ट मध्ये आम्ही most common आढळणारे जे psychological disorders आहेत त्यांच्या जगात सर्वत्र वापरल्या जाणाऱ्या screening tests एकत्र करून त्याचे एक package तयार केले. त्यासाठी गेले दोन वर्ष या वर बरेच कष्ट घेतले. त्या टेस्ट वापरायला जरुरी त्या परवानग्या घेऊन, त्यांची निवड बरोबर आहे का नाही हे एक नाही तर अनेक तज्ञ psychiatrist लोकांकडून तपासून घेऊन, त्याची मराठी भाषांतर करून हे package तयार केले. मुद्दामून अशाच tests घेतल्या ज्या सर्व जगभर करोडो लोकांनी वापरून सिद्ध झाल्या आहेत त्यामुळे त्यांच्या वैधतेविषयी अजिबात शंका नको. उदा. डिप्रेशन साठी PHQ - 9 म्हणजे तर गोल्ड स्टॅंडर्ड. ADHD साठी WHO ने recommend केलेली ASRS 1.1 पण सर्व जगभर वापरतात म्हणून घेतली, वगैरे. अर्थातच वयानुसार मनोविकार थोडे वेग वेगळे असल्याने पौगंडावस्थेत (adolescent) असणाऱ्यांसाठी, तरुण (Adult) असणाऱ्यांसाठी आणि ज्येष्ठांसाठी वेग वेगळी packages तयार केली. आणि ती एका प्लॅटफॉर्म वर ठेवून एका लिंक द्वारे Online उपलब्ध केली. सर्वाना सहभागी होता यावे म्हणून English आणि मराठी मध्ये हे package तयार केले आहे आणि सर्वात मुख्य म्हणजे ही टेस्ट घेण्यासाठी कुठलाही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष असा charge किंवा फी ठेवली नाहीये. तुम्हाला इच्छा असेल तर निवांत असा ३० - ४० मिनिटांचा वेळ काढा आणि आपल्या फोन / टॅबलेट किंवा कॉम्पुटर वर हे परीक्षण ONLINE पूर्ण करा. पुढील मिनिटाला तुमचा रिपोर्ट तुमच्या मेल बॉक्स मध्ये असेल.

तुम्ही सहभागी झालात तर माझी अशी विनंती राहील की परीक्षणा मध्ये विचारलेल्या प्रश्नांना तुम्ही प्रामाणिक पणे उत्तरे द्या. तुम्ही दिलेली उत्तरे किंवा माहिती संपूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल आणि परीक्षणाचा RESULT, त्याच प्रमाणे पुढील मार्गदर्शन फक्त तुम्हालाच तुमच्या वैयक्तिक ई-मेल वर पाठवण्यात येईल. तुम्हाला तुमची ओळख (पूर्ण नाव) सुद्धा द्यायची अजिबात जरुरी नाही पण उत्तरे प्रामाणिक पणे द्या. रिपोर्ट पाठवण्यासाठी ई-मेल id लागेल तीच तुमची ओळख. तुमच्या उत्तरांच्या अचूकतेवरच तुम्हाला पुढे मिळणारे RESULT आणि मार्गदर्शन अवलंबून असणार आहे हे ध्यानात ठेऊन यात प्रामाणिक पणाने सहभागी व्हा.

मायबोली वरील तरूणांना आणि वृद्धांना संगळ्यांनाच हा प्रोजेक्ट अतिशय उपयुक्त आहे. तरुणांना मी असे सांगेन तुम्ही सगळे मॅरेथॉन पळण्याचे स्वप्न बघताय हे चांगलेच आहे पण ती मॅरेथॉन पळण्यापूर्वी एकदा आपल्या पायांची ताकद अजमावूया, तसेच कुठे काही दुखते खुपते आहे का हे एकदा बघून घेऊया. काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतील तर ते अगोदर ठीक करून मग मॅरेथॉन पळायला सुरुवात करूया. दुखणाऱ्या पायांनी जसे मॅरेथॉन पळता येणार नाही तसेच मानसिक अनारोग्य घेऊन आपण करिअर मध्ये फार मोठी मजल मारू शकणार नाही. मध्यम वयीन लोक कदाचित ह्या रेस च्या मध्यापर्यंत पोचले असतील. त्यांच्यासाठी ही असे परीक्षण तितकेच महत्वाचे आहे कारण इथे नुसतेच करिअर येत नाही तर त्याबरोबर नातेसंबंध, कुटुंब हे सर्व येते. ज्या मनाच्या आधारे आपल्याला ह्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे त्याचा कानोसा एकदा घेतलेला कधीही चांगला. नकारात्मकता भरलेल्या मनाने ना आपण करिअर मध्ये उंच मजल गाठू शकतो ना नातेसंबंधांमध्ये. मानसिक स्वास्थ्य आणि आरोग्य हा आपल्या जीवनातील अत्यंत महत्वाचा भाग आहे पण दुर्दुदैवाने आपल्या प्रार्थमिकते मध्ये तो कायमच दुर्लक्षित राहिला आहे. ज्येष्ठांच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्यांचे शारीरिक स्वास्थ्य हे बऱ्याच अंशी त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर अवलंबून असते. जे काही उरलेले आयुष्य आहे ते त्यांना मजेत घालवता येण्या साठी त्यांच्या मनाचे आरोग्य उत्तम असणे फारच जरुरी आहे. म्हणून त्यांच्यासाठी पण अशा परीक्षणाचे महत्व आहे.

मी ज्यांना ज्यांना या प्रोजेक्ट विषयी सांगतो त्यांना याचे महत्व लगेच पटते पण लगेच अनेक प्रश्न त्या पाठोपाठ त्यांच्या मनात येतात. म्हणूनच खाली मी FAQ देत आहे ते जरूर वाचा. ज्या कोणाला अशा assessment चा लाभ घ्यायचा आहे त्यांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ती टेस्ट द्या. हा एक Social Innovation प्रोजेक्ट असल्याने यात पैशाचे कुठलेही transaction ठेवलेले नाही. तुमचे RESULT तुम्हाला मोफत कळवायचे आणि मग counseling मध्ये ओढून त्यातून पैसे कमवायचे असाही प्रकार इथे ठेवलेला नाही. तेव्हा निःसंकोच पणे याचा फायदा घ्या. याशिवाय तुमच्या संपर्कात असणाऱ्या एखाद्या कॉलेज मध्ये, ज्येष्ठ नागरिक संघामध्ये किंवा सोसायटी च्या फोरम मध्ये अशा प्रकारचे सरसकट परीक्षण करायचे असेल तर जरूर संपर्क साधा. तिथे सगळीकडे वेगवेगळे camps होताच असतात त्यामुळे आपल्याला आपला प्रश्न उपस्थित करायला चान्स आहे - ‘Full Body चेक - अप’ करतो तसा ‘Full mind चेक अप’ का नाही?

Test Links - तुमच्या वयानुसार लिंक निवडा आणि क्लिक करा -

१८ ते ६० वर्षे वयोगट - https://forms.gle/HDDv4Gf2ZJF8hQuF9

६० + वर्षे वयोगट - https://forms.gle/9hRg1BRxmMT1htDN7

For Any Question Write to psychologyonlinetest@gmail.com
For Author and Innovation details please visit www.psychologytestingforall.com
—-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Use following WHATSAPP Message to inform others -

*Full body check-up असते तसे Full mind check-up का नाही?*

Good news - की तुम्ही तसा check-up करू शकता आणि तेही मोफत. पुण्यातील एका स्वयंसेवी Social-Innovation प्रोजेक्ट द्वारे हे आता शक्य आहे. मनोविकार असण्याचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे ‘तो आहे’ हे समजणे. आणि नेमके हेच उद्दिष्ट या mind टेस्टिंग package ने साध्य केले आहे. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी website ला भेट द्या किंवा सरळ त्या tests घेऊनच बघा ना! तुमची उत्तरे मात्र अगदी प्रामाणिक पणे दिलेली पाहिजेत. तर आणि तरच results खरे येतील. Test English / मराठी अशी आहे, संपूर्ण online आहे, साधारण पणे ३० मिनिट्स लागतील आणि रिपोर्ट एका मिनिटात तुमच्या मेल box मध्ये. तुमची उत्तरे अर्थातच confidential ठेवली जातील पण मुळात तुम्ही तुमची खरी ओळख नोंदवायची देखील गरज नाही. आहे कि नाही Deal?

एरवी हजारो रुपये charges असणाऱ्या या tests शाळा, कॉलेज, वेगवेगळ्या संस्था आणि ग्रुप्स ना मोफत उपलब्ध करून देणारे हे एक समाज सेवी social Innovation आहे. Healthy minds create healthy nation असा त्यांचा विश्वास आहे. खालील पैकी तुमच्या वयानुसार टेस्ट निवडा आणि याचा लाभ घ्या.

१८ ते ६० वर्षे वयोगट - https://forms.gle/HDDv4Gf2ZJF8hQuF9

६० + वर्षे वयोगट - https://forms.gle/9hRg1BRxmMT1htDN7

www.psychologytestingforall.com

Or Write to psychologyonlinetest@gmail.com

(Feel free to forward to whatsapp groups)
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Frequently asked questions :

(१) मानस शास्त्रीय परीक्षण कसे होते?
उत्तर - मानस शास्त्रीय परीक्षणात (टेस्ट) मध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात आणि त्याची संभाव्य उत्तरे खाली पर्याय म्हणून दिली जातात. तुमच्या मनातील भावने नुसार, तुमचा स्वतःच्या अनुभवानुसार किंवा तुमच्या ability नुसार तुम्ही त्याचे उत्तर द्यायचे असते. तुम्ही अशा अनेक प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर त्या उत्तरांचे विश्लेषण करून एखादा गुण धर्म किंवा विकार तुमच्या मनामध्ये कसा आणि किती प्रमाणात आहे याचे अनुमान काढले जाते. उदा समजा तुम्ही social फोबिया संदर्भात टेस्ट देत असाल तर तुम्हाला समाजात मिसळताना तुमच्या असणाऱ्या वर्तुणीकीविषयी किंवा तुम्हाला मनात येणाऱ्या भावनांविषयी प्रश्न विचारले जातील. जर तुम्ही त्याची प्रामाणिक उत्तरे दिली तर मानस शास्त्रीय दृष्टिकोनातून तुम्हाला social फोबिया हा विकार आहे का नाही याचे प्रार्थमिक अनुमान काढले जाते की जे ८० -९० % खरे ठरते कारण हि परीक्षा, त्यातील प्रश्न हे खूप मोठ्या संशोधन नंतर आणि अनेक प्रयोगांती निश्चित केलेले असतात. तसेच या टेस्ट्स पूर्वी लाखो लोकांनी दिलेल्या असतात आणि त्याचे आलेले results हे खरे ठरलेले आढळलेले असतात. थोडक्यात त्या पूर्ण पणे सिद्ध झालेल्या असतात. अर्थात ही टेस्ट म्हणजे medical diagnosis नाही. प्रत्यक्ष psychiatrist ने तपासून मगच आपला मनोविकार हा निश्चित होत असतो. पण प्रथम दर्शनी हा विकार आपल्याला आहे हे या टेस्ट मुले आपल्याला कळते. उदा depression च्या संदर्भात विचार केला तर मधून मधून आपल्याला अनेक गोष्टी अस्वस्थ करत असतात, निराश करत असतात त्यामुळे तो depression नावाचा मनोविकार आहे का ती एक मनाची तात्पुरती निराशाजनक अवस्था आहे हे समजायला मार्ग नसतो आणि म्हणून लोकं तसेच स्वतःला खेचत राहतात. त्यामुळे आपल्या मनोविकाराची तीव्रता डॉक्टरांच्या कडे जाण्या इतपत गंभीर आहे का नाही हे ठरवायला पण हि टेस्ट उपयोगी पडते.

(२) या टेस्ट्स ने नेमके मला माझ्याविषयी काय समजेल?
उत्तर - तसा मानसशात्रीय परीक्षणाचा आवाका फार मोठा आहे. एकूण एक मनोविकारांचे परीक्षण करणे निश्चितच शक्य आहे पण त्यासाठी परीक्षा घेणाऱ्याने तेवढा वेळ द्यायची गरज आहे. साधारण पणे एका वेळेला ३० -४५ मिनिटाचे परीक्षण आपण करू शकतो. त्यानंतर परीक्षा देणाऱ्याला fatigue येऊ शकतो आणि मग त्याच्या उत्तरांची अचूकता कमी होऊ शकते. त्यामुळे आपण या परीक्षणाचे अनेक भाग पडले आहेत. पहिल्या भागात सर्वात महत्वाच्या आणि सर्वात प्रामुख्याने आढळून येणाऱ्या disorders ला आपण तपासून बघतो जसे की डिप्रेशन, चिंता, dementia, autism वगैरे. दुसऱ्या भागात अजून काही गोष्टी जसे की aggressiveness, Bi - Polar, OCD, personality disorder वगैर तपासल्या जातील.

(३) Psychology च्या अशा टेस्ट्स करून फक्त मनोविकारचं समजू शकतात का मनाच्या काही चांगल्या बाजू समजू शकतात?
उत्तर - Psychological tests चा जेवढा उपयोग मनोविकार ओळखण्यासाठी होतो तेवढाच तो स्वतःच्या विकासासाठी (Development) म्हणजे चांगल्या बाजू मजबूत करण्यासाठी होऊ शकतो. पण योग्य क्रम म्हणजे प्रथम आपल्यामध्ये काही विकार असतील तर त्याचा उपाय करून मग मनाचा विकास करणे हे जास्त उचित होते. त्यासाठी पण packages तयार करणे चालू आहे. उदा. IQ विषयी आपण ऐकूनच आहोत. तो online टेस्ट च्या द्वारे कुठल्या टेस्ट द्वारे मोजता येईल त्याचे संशोधन चालू आहे. अनेक टेस्ट्स आहेत पण सर्वच अचूक आहेत असे नाही आणि सगळ्याच मोफत पण नाहीत. IQ महत्वाचा आहेच पण एक उत्तम लीडर बनण्यासाठी IQ पेक्षा तुमचा EQ (Emotional Intelligence Quotient) महत्वाचा आहे. मग त्यासाठी असणाऱ्या वेग वेगळ्या psychological tests चा तौलनात्मक अभ्यास चालू आहे. लवकरच ती परीक्षा पण या platform वर उपलब्ध करून दिली जाईल. अशा परीक्षांचा वापर करून आपण कुठे कमी आहोत हे जाणून घेणे आणि त्यात प्रयत्नपूर्वक सुधारणा करणे आणि मग परत परीक्षण करून स्वतःमध्ये सुधारणा घडून आली आहे कि नाही हे निश्चित करणे असा त्याचा वापर असेल. सुधारणा करण्या करता लागणारे training material पण या platform वर ठेवण्यात येईल. अशा अनेक qualities आहेत ज्या आपण स्वतःमध्ये आणून एक उत्तम आणि सर्वांना हवीहवीशी वाटणारी अशी व्यक्ती बनू शकतो. हे सर्व लोकांनी psychologytestingforall या platform चा वापर करून साध्य करावे अशी अपेक्षा आहे.

(४) समजा मला या तुमच्या assessment घेतल्यानंतर कळले की माझ्यात काही disorders ची लक्षणे आहेत, तर पुढे काय? नुसत्या कळण्याचा काय उपयोग? पुढील मार्गदर्शन पण मोफत देणार आहेत का?
उत्तर - वर सांगितल्या प्रमाणे या assessment ने आपल्यामध्ये एखाद्या disorder ची प्रथम दर्शनी लक्षणे आहेत हे समजते परंतु असा online परीक्षणाने दिलेला निकाल हे म्हणजे मेडिकल diagnosis नाही. त्यासाठी qualified psychiatrist किंवा psychologist ची आवश्यकता आहे. Psychiatrist कडे गेल्यावर तो पण अशाच प्रकारची टेस्ट तुम्हाला देईल किंवा टेस्ट मध्ये असणारे प्रश्न तो अप्रत्यक्ष रित्या तुम्हाला विचारेल आणि त्यांच्या तुम्ही दिलेली उत्तरांचे तो स्वतः विश्लेषण करून त्याचा निष्कर्ष काढेल जे अर्थातच जास्त अचूक असेल. त्यामुळे या assessment चा उपयोग मुख्यत्वे आपल्याला मनोविकाराची लक्षणे आहेत किंवा मनोविकार झालेला असण्याची दाट शक्यता आहे ‘असे समजणे’ असा आहे. हे ‘समजणे’ हे अतिशय महत्वाचे आहे कारण शरीराचे आजार माणसाला अंथरुणाला खिळवतात त्यामुळे ते समजणे तसे सोपे. पण मनोविकारांचे तसे नाही. तर तुमचा प्रश्न आहे कि असा disorder आहे हे कळले तर पुढे काय? तर त्याचे उत्तर म्हणजे पुढे त्याचे psychiatrist कडून निदान करून घेणे. इथे अगदीच आर्थिक परिस्थिती खराब असेल तर free counseling करणाऱ्या संस्थांना आम्ही जोडून देतो पण त्याचा उपयोग खऱ्या गरजवंतांनीच घ्यावा अशी अपेक्षा आणि विनंती आहे. मानसिक आजारांचे उपचार सध्या खूप महाग आहेत पण त्याकडे आपण स्वतः वर केलेली investment म्हणून बघु शकतो. तर तुमच्या प्रश्नाचा दुसरा भाग आहे की ‘ नुसत्या कळण्याचा काय उपयोग?’ - हे विधान चुकीचे वाटते. आपल्याला disorder आहे हे कळणे आणि ते आपण accept करणे हे म्हणजे मनोविकाराच्या बरे होण्याच्या प्रवासातील निम्मे अंतर गाठण्यासारखे आहे. त्यामुळे केवळ कळण्याला कधीही कमी लेखू नका. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हे कळल्यामुळे अनेक गोष्टी होऊ शकतात. तुमच्या स्वतःकडून आणि कुटुंबाकडून असणाऱ्या अपेक्षा या योग्य पातळीवर येऊ शकतात आणि त्याने तुम्हाला बराच आराम मिळू शकतो. तुम्ही तुमच्या जीवन शैलीमध्ये काही बदल करू शकता. स्वतःची काळजी घेऊ शकता. तुमचे कुटुंब तुम्हाला टोमणे मारण्या ऐवजी आधार देऊ शकते. हे सर्व जर त्यांना माहीतच नसेल तर कसे घडणार? तुम्ही डॉक्टर कडे जाण्याचा निर्णय घेऊन योग्य treatment घेऊ शकता आणि स्वतःला मनोविकाराच्या दरीत अजून खोल जाण्यापासून वाचवू शकता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुढच्या काळात अशा technology based tools ची मदत घेणे common होईल पण आत्ता ते नवीन आहे म्हणून गैरसमज होतोय.>>>संगणकावर कुंडली तयार करताना हाच प्रश्न वा शंका येत असे. मी 2008 च्या मतिमंद/ हुशार मुलांच्या प्रोजेक्ट वेळी प्रथम पारंपारिक पद्धतीने तयार करुन व नंतर संगणकावर तयार करुन काही फरक पडतो का हे पाहिले होते.

रेव्यू यांनी शंका विचारल्या हे योग्यच झाले. तुमच्या उत्तरातून बहुतेकांच्या शंका मिटल्या असतील.
मी तर सुरुवातीलाच धागा उघडलेला. पण तरीही चटकन कुठल्या लिंक वर क्लिक करायचे टाळतो म्हणून एक दिवस टेस्ट करायचे थांबलो होतो.

२० ते ६० हा वयोगट खूप मोठा नाही का वाटत ?
(२० वर्षाच्या मुलाचे प्रॉब्लेम्स वेगळे ४० ते ५०, ५० ते ५५ आणि ५५ नंतरच्या समस्या वेगळ्या नाहीत का ? )
टेस्ट केल्यावर रिपोर्ट्स इथे अपलोड करायचेत का ?

टेस्ट देताना 10 वर्षाच्या रेंज चा ब्रेकअप आहे, त्यानुसार वेगवेगळी टेस्ट उघडते.
रिपोर्ट स्वतः पुरते ठेवायचे आहेत.आणि नंतर स्वतःला गरज वाटल्यास सुचवलेल्या माणसांना संपर्क (किंवा आपल्याला वेगळी माणसे या क्षेत्रात माहीत असल्यास त्यांना) करू शकतो

झाली टेस्ट. रिपोर्ट पण मिळाला.
पण सुरूवातीचे काही प्रश्न हे बहुतेक कॉलेजच्या मुलांसाठी आहेत. प्रोजेक्ट पूर्ण करण्यासंबंधीचा प्रश्न स्पेसिफिक वाटला. पण बाकीच्या बर्‍याचशा प्रश्नातच अनेक धोके लक्षात आले. कुठे काळजी घ्यायची आहे हे समजले. टेस्ट दिल्याचा फायदा वाटला.

Why do you need e mail id?

नवीन Submitted by अश्विनीमावशी on 28 June, 2022 - 08:54>>+१११
नशीब आधार कार्ड नंबर विचारला नाही.
आणि मोबाईल नंबर विचारला आहे की नाही?

आपल्या कडे ऑर्थोपेडिक तपासण्या, बोब डेन्सिटी तपासण्या मोफत करतात मग पुढे त्यांचा हेतू काय असतो?
या चाचण्या काही मान्यवर संस्थां कडून मान्यताप्राप्त आहेत का?
अशा टेस्ट मधील निष्कर्ष वाचून अर्धवट काही समजल्यानंतर पुढे काय? प्रत्येक बाबतीत तज्ञांचा सल्ला घ्यायचा का-बॉर्डरलाईन निष्कर्ष आल्यावर !!
यातील महत्त्वाच्या अनेक प्रश्नांत सेव्हरल व सम - अनेक व काही हा खूप मोठा घोळ आहे.
त्यामुळे ज्यांना सेवहरल नाही पण सम आहे... त्यांचे काय?

These tools are to be used and handled by trained counsellors only. Just because you have tools and they are automated, does not mean anyone can administer them.
I somehow feel , irrespective of the intentions, which I do not doubt at all, this is not a proper way.
It should be conducted by an eminent body.

शांत प्राणी <<२० ते ६० हा वयोगट खूप मोठा नाही का वाटत >> वयानुसार आजार बदलतात हे खरे आहे आणि म्हणूनच तीन गट केले. ADHD हा आजार Senior citizen साठी महत्वाचा नसल्याने तो काढून टाकला. त्याऐवजी Dementia शी संबंधित मेमरी recall, numerical ability वगैरे त्यांच्या package मध्ये ठेवले आहे. आता २०-६० या गटा साठी २० आणि ५० च्या समस्या वेगळ्या आहेत हे खरेच आहे पण माझा विचार असा आहे कि जोवास्तवार माणसे नोकरी करतात तोवास्तवर त्याची life style एक सारखी असते (म्हणजे stress असणे, कामाचे pressure, competition वगैरे) आणि त्यामुळे त्या package मध्ये असलेल्या tests म्हणजे depression, चिंता, addiction, stress आणि social disorder हे सगळ्यांना सारखेच matter होते. म्हणजे यावर argument होऊ शकतात पण माझ्या मते असे करण्यात चुकीचे काही नाही. टेस्ट मध्ये तर आपण बदल करू शकत नाही कारण या standard टेस्ट्स आहेत. आणि जेवढे वयोगट वाढवू तेवढ्या लिंक्स चे management, त्यांच्या forms ची management, पोस्ट वरची space हे सगळेच वाढत जाते.

<<टेस्ट केल्यावर रिपोर्ट्स इथे अपलोड करायचेत का >> Mi_anu यांनी उत्तर दिलेच आहे. इथे किंवा इतर कुठेही upload करू नका.

Mi_anu धन्यवाद !

अश्विनीमावशी <>> ई-मेल id नसेल तर मग त्याशिवाय टेस्ट रिपोर्ट तुम्हाला कसा कळवणार? दुसरे पर्याय सुरक्षित असणे पण तेवढेच महत्वाचे आहेत. ही टेस्ट फक्त एकाच मनोविकाराची असती म्हणजे उदा नुसतीच depression ची तर submission केल्यावर तुम्हाला दिसणाऱ्या संदेशामध्ये रिपोर्ट दाखवू शकलो असतो पण इथे अनेक टेस्ट्स आहेत. माझ्या कडे जी technology आहे त्यामध्ये तरी यापेक्षा वेगळ्या प्रकारे रिपोर्ट कळवण्याची व्यवस्था मी करू शकत नाही.

केशवकूल << नशीब आधार कार्ड नंबर विचारला नाही. आणि मोबाईल नंबर विचारला आहे की नाही?>>
बाजारात सध्या मार्केटिंग चे अनेक प्रकार चालतात त्यामुळे अशा शंका येणे साहजिक आहे पण तरीही पूर्ण शहानिशा केल्याशिवाय सगळ्यांना एकाच तराजूत तोलू नका. मी लेखा मध्ये लिहिले होते कि तुमची खरी ओळख पण देऊ नका. कारण उत्तरे प्रामाणिक येणे जास्त महत्वाचे आहेत. आधार नंबर चा त्यामुळे प्रश्नच येत नाही. फोन नंबर पण याच कारणासाठी विचारलेला नाही. ई-मेल id का विचारला त्याचे उत्तर वरती दिले आहे. आजकाल जावे त्या website वर, APP वर ई-मेल id विचारतात त्यामुळे प्रत्येकाकडे एक general purpose ई-मेल id असतो आणि एक खास ई-मेल id असतो असे मी मानतो. तुमचा general purpose ई-मेल id वापरून तुम्ही टेस्ट द्या आणि रिपोर्ट मिळवा.

अश्विनी मावशी <<जमा झालेला डेटा त्याचे काय करणार?>> डेटा काही दिवसांनी destroy करण्यात येईल. तुमचा डेटा (ज्यात नाव खोटे द्यायला मीच सांगितले आहे, आणि फोन नंबर नाहीयेत) कसाही असला तरी बाहेर जाणार नाही याचे मी आश्वासन दिलेले आहे, ते पाळले जाईल.

रेव्यु - चला एकतर चांगले झाले कि तुमचा माझ्या हेतूविषयी चा गैरसमज दूर झाला. आता दुसऱ्या मुद्द्य कडे येऊ. तुम्ही जर थोडे खोलात जाऊन मी काय करतो हे समजून घेतले तर त्याविषयी पण शंका राहणार नाही. २+२ म्हणजे चार होतात आणि ४ हा आकडा ० ते ५ मध्ये येतो एवढेच मी या tool द्वारे सांगत आहे यापेक्षा जास्त काही नाही. तुम्हाला मी उदा. देतो - जर तुम्ही डिप्रेशन चे टेस्ट घेतली तर PHQ - ९ हि जगभर लाखो लोकांनी वापरलेली टेस्ट आहे. त्यात काही प्रश्न विचारले जातात आणि उत्तरानुसार तुमचा score येतो. प्रत्येक पर्यायाला किती मार्क्स द्यायचे ते आणि अखेर त्याची बेरीज करून score काढायचा ते - हे सगळे टेस्टच सांगते. कोणीही त्यात बदल करू शकत नाही. म्हणजे जगभर ते याच पद्धतीने केले जाते. score आल्यावर त्याच्या threshold नुसार severity सांगितली जाते जसे कि ०-५ म्हणजे डिप्रेशन नाही, ६-१० म्हणजे MILD वगैरे. ते thresholds (म्हणजे या उदाहरणात ५ , १० वगैरे) टेस्ट बरोबरच येतात त्यातही कोणीही बदल करू शकत नाही. आता हे काम लोकं इंटरनेट वरून टेस्ट download करून स्वतः पण करू शकतात- ते फक्त मी त्यांना computerized करून दिले आहे. या पेक्षा जास्त काहीच करत नाहीये. इथे माझी contribution दोन प्रकारे आहे. एक डिप्रेशन साठी मी PHQ - ९ टेस्ट सापडवून आणली. मी म्हटल्या प्रमाणे ते गोल्ड स्टॅंडर्ड आहे आणि मी ते psychology experts कडून तपासून घेतले आहे. आणि दुसरे म्हणजे प्रश्न, पर्याय, scoring आणि severity या त्या टेस्ट च्या स्टॅंडर्ड नुसार मी computerised करून दिल्या. इथे कुठेही judgement ला जागा नाही त्यामुळे कुठल्याच प्रकारे टेस्ट घेणाऱ्यांचे नुकसान होऊ शकत नाही. रिपोर्ट मध्ये स्वच्छ लिहिले आहे कि हे computerised results आहेत. हे पण लिहिले आहे कि त्यांनी डॉक्टर कडे जाऊन confirmation घ्यावी. लक्षात घ्या अशी सुविधा नसण्याने किती नुकसान होते आहे. आणि तो प्रॉब्लेम solve करतोय त्याचे पण appreciation करा. हा किती मोठा प्रॉब्लेम आहे याची कल्पना हि येणार नाही. लोकं डॉक्टर कडे जातच नाहीत आणि suffer होताहेत, त्यामुळे पुढे जाऊन अनेक disasters होताहेत. हे प्रॉब्लेम कुठल्याही bodies सोडवत नाहीयेत आणि सोडवणार पण नाहीत. अशा टेस्ट्स च्या कॉस्ट कडे बघून त्या कित्येकजण घेत नाहीत म्हणून त्या मोफत करून द्यायची जरूर आहे. ते हि प्रॉब्लेम कुठल्याही bodies सोडवणार नाहीत. ते तुमच्या आमच्या सारख्यांनाच काही तरी वेगळे करून, technology चा वापर करून सोडवायचे आहेत. आणि मी हेच करायचा प्रयत्न करतो आहे. आता याच माझ्या प्रयत्नांना माझ्या बरोबर केवळ एखादा psychology चा डिग्री होल्डर माझा पार्टनर असण्याने प्रत्यक्षात काय फरक पडणार आहे. Efforts आणि process सगळी तेच राहील. तुमचे त्याने समाधान होणार असेल तर तेही होणारच आहे लवकरच.

माईंड जिम नावाचा एक उपक्रम पुण्यात आहे. त्यात ही अशीच संकल्पना आहे की शारिरिक फिटनेससाठी आपण जिम मधे जातो तर मानसिक फिटनेस साठी माईंड जिम का असू नये? मानसशास्त्रात तर अनेक अभ्यासांमधे/ उपक्रमांमधे जिज्ञासू लोक स्वयंसेवक म्हणूनही सहभागी होतात. मी इथे उत्सुकता म्हणुनच सहभागी झालो. म्हटल पहाव काय निघतयं टेस्ट मधे. मला माझ्या अभ्यासानुसार अपेक्षित होत तेच निघाल. टाटा सामाजिक विज्ञान संस्था देखील अशा प्रकारच्या स्वयंसेवकांच्या मदतीने सामाजिक अभ्यास करत असतात. अशाच प्रकारचे चाचण्या/अभ्यास सर्व क्षेत्रात व्हावेत.

आता २०-६० या गटा साठी २० आणि ५० च्या समस्या वेगळ्या आहेत हे खरेच आहे पण माझा विचार असा आहे कि जोवास्तवार माणसे नोकरी करतात तोवास्तवर त्याची life style एक सारखी असते (म्हणजे stress असणे, कामाचे pressure, competition वगैरे) आणि त्यामुळे त्या package मध्ये असलेल्या tests म्हणजे depression, चिंता, addiction, stress आणि social disorder हे सगळ्यांना सारखेच matter होते. म्हणजे यावर argument होऊ शकतात पण माझ्या मते असे करण्यात चुकीचे काही नाही. टेस्ट मध्ये तर आपण बदल करू शकत नाही कारण या standard टेस्ट्स आहेत. आणि जेवढे वयोगट वाढवू तेवढ्या लिंक्स चे management, त्यांच्या forms ची management, पोस्ट वरची space हे सगळेच वाढत जाते. >> हे उत्तर वाचल्यानंतर पुन्हा प्रतिवाद करू नये असे माझे मत झाले. कारण मी या क्षेत्रातला नाही. तुम्हीही नाहीत. टेस्ट मधे आपण बदल करू शकत नाही हे तुम्ही अनेकदा सांगितले आहे. पण,

टेस्ट मध्ये तर आपण बदल करू शकत नाही >> जनहितार्थ हे योग्य नाही. टेस्ट मधे आपण बदल करू शकत नाही हे ठीक. पण ज्यांच्याकडून आपण टेस्ट बनवून घेतली आहे त्यांच्याशी लोकांनी उपस्थित केलेले मुद्दे तुम्ही डिस्कस करू शकता. माझा एक मित्र या क्षेत्रात आहे. तो स्वतःही काही टेस्ट्स तयार करतो. त्यांच्या मान्यतेसाठी जे काही प्रोसिजर असेल ते पार पाडतो. त्यात काही चुका आढळल्या तर तसे बदल करतो आणि ते जर्नल मधे प्रकाशित करतो. टेस्ट मधे बदल करू शकत नाही हे त्यामुळे योग्य वाटत नाही. सायन्स मधे अशी कोणतीच गोष्ट नाही , जी योग्य कारणांसाठी बदलता येत नाही. ( तुमच्या टेस्ट्स चुकीच्या आहेत असे म्हणत नाही. बदल करता येत नाही हे अयोग्य म्हणणे आहे असे वाटते).

management, त्यांच्या forms ची management, पोस्ट वरची space हे सगळेच वाढत जाते >> ही तुमची अडचण आहे. जर लोकांचे मुद्दे योग्य असतील आणि तुमची अडचण दूर होत नसेल तर हा एक्सरसाईज करण्यापासून दूर राहता येऊ शकेल. एव्हढी मेहनत केलीच आहे तर आणखी थोडी. तुम्ही मुद्दे अयोग्य आहेत असे म्हणत नाहीत.

तुमची हरकत नसेल तर पुढच्या पोस्ट मधे वयोगटाबाबत बोलू. कदाचित माझे म्हणणे चूक असेल.

२० आणि ५० च्या समस्या वेगळ्या आहेत हे खरेच आहे पण माझा विचार असा आहे कि जोवास्तवार माणसे नोकरी करतात तोवास्तवर त्याची life style एक सारखी असते (म्हणजे stress असणे, कामाचे pressure, competition वगैरे) आणि त्यामुळे त्या package मध्ये असलेल्या tests म्हणजे depression, चिंता, addiction, stress आणि social disorder हे सगळ्यांना सारखेच matter होते. >>>> बोल्ड केलेल्या वाक्याशी पुढचा प्रतिसाद विरोधाभास दर्शवतो. कदाचित फार विचार केलेला दिसत नाही किंवा स्पष्टीकरणे देताना गोल गोल उत्तरे दिली गेली असावीत.

२० व्या वर्षी सोडा २५ पर्यंत आजच्या जमान्यात नोकरी मिळत नाही. शिक्षणाचे वय वाढले आहे. हा काळ नोकरी न मिळण्याच्या ताणाचा असतो. पण स्वच्छंदी लाईफस्टाईल असते. घरातल्या जबाबदार्‍या घेणारे सुद्धा असतात. शहरी भागात न्युक्लीअर फॅमिलीत तसेच ग्रामीण भागात एकत्रित कुटुंबातल्या मुलांमधे जबाबदारीमधे फरक पडतो. आता तो ही कमी होत चालला आहे.

२३ ते २५ उत्तम नोकरी मिळाली तर उलट स्वातंत्र्य आणि खर्चायला पैसे हा काळ कमीत कमी ताणाचा असू शकतो.

२६ ते ३० या वयोगटात समजा लग्न झाले तर जबाबदार्‍या वाढू लागतात. ताण वाढतात.

२७ ते ३५ पर्यंत मूल झाले तर जबाबदार्‍यांमधे अधिक भर पडते. पगार पुरत नाही किंवा मोठे घर घेणे, अधिकच्या गरजा यामुळे ताण वाढू लागतो.

३५ ते ५० - मुलांना चांगल्या शाळा मिळणे, शाळेच्या फिया, त्यांची शैक्षणिक प्रगती, क्लासेस, त्यांचा एकूणच विकास, त्यांच्याबद्दलच्या भविष्यातल्या काळज्या, पुढे डिग्रीसाठी चांगल्या कॉलेजमधे प्रवेश मिळण्यासांबंधी चिंता, त्याचा खर्च, परदेशी पाठवायचे झाल्यास कर्ज, आधीचे हप्ते, शैक्षणिक कर्जाचे हप्ते ( शैक्षणिक कारणासाठी मिळालेले नसल्यास) या चिंंता भेडसावू लागतात. हा ताण आधीच्या वयोगटापेक्षा वाढता असतो.

५० ते ६० - मुलांचे भले झाले तर ठीक. नाहीतर त्यांचे काय करायचे, त्यांचे लग्न झालेच तर यांचे पुढे काय, आपण निवृत्त होणार, वाढते कुटुंब, वाढते खर्च. यामुळे या वयातले ताण सर्वोच्च असतात.

वरचे जर पटत असेल तर या गटांना एकाच प्रश्नाला सारखेच गुण देऊन रिझल्ट कसा अचूक येतो हे जाणून घ्यायला आवडेल.

@शांत प्राणी <<जनहितार्थ हे योग्य नाही. टेस्ट मधे आपण बदल करू शकत नाही हे ठीक. पण ज्यांच्याकडून आपण टेस्ट बनवून घेतली आहे त्यांच्याशी लोकांनी उपस्थित केलेले मुद्दे तुम्ही डिस्कस करू शकता. >> हि टेस्ट किंवा या package मध्ये एकत्र केलेल्या टेस्ट्स मी बनवून घेतलेल्या नाहीयेत. त्या जगभर वापरल्या जातात. उदा ज्या टेस्ट्स मध्ये बदल करावा असे सुचवले जातेय ती टेस्ट म्हणजे PHQ - ९ - हि डिप्रेशन साठी एक गोल्ड स्टॅंडर्ड आहे. Columbia University चे Kurt Kroenke,आणि त्याचे सहकारी यांनी हि टेस्ट 1999 मध्ये Pfizer कंपनीच्या अर्थ साहाय्याने बनवली. हजारो संशोधनात ती वापरली गेली. या सगळ्या काळात त्यांनी टेस्ट् मध्ये जे काही छोटे मोठे बदल करायचे होते ते केले असतील. बदल करण्यासाठी पण खूप मोठी प्रक्रिया ते राबवतात. आणि शेवटी एक version फ्रीझ करतात. त्यांनंतर ती टेस्ट million वेळा वापरली गेली असेल. इतक्यावेळा वापरल्या वर Pfizer कंपनीने ती license फ्री करून टाकली. त्यामुळे आता ती एक ग्लोबल टेस्ट झाली आहे. या पार्श्वभूमीवर माझ्यासारख्या एका साध्या विद्यार्थ्याने त्या टेस्ट मध्ये आपण काही बदल सुचवावे हे मला बरोबर वाटत नाही. हीच case बाकी सर्व टेस्ट्स ची आहे त्या सर्व त्या त्या मनोविकारांसाठी जगमान्य टेस्ट्स आहेत, अनेक प्रयोगांती सिद्ध झालेल्या आहेत आणि सर्व प्रामुख्याने अमेरिका आणि युरोप मध्ये संशोधित केल्या गेलेल्या आहेत. त्यांच्या संशोधकांशी माझी ओळख पण नाहीये आणि वरती म्हणाल्या प्रमाणे त्या एवढ्या मोठ्या शास्त्रज्ञांकडून संशोधित झालेल्या असताना आणि या एवढ्या मोठ्या प्रमाणावर वापरून सिद्ध झालेल्या असताना त्यामध्ये एखादा बदल सुचवावा अशी माझी हैसियत नाहीये. माझ्या पुढे ती टेस्ट जशीच्या तशी वापरणे अथवा दुसरी टेस्ट शोधून ती वापरणे हे पर्याय असतात. यात परत मी ज्या psychology experts बरोबर काम करतो त्यांचीही काही मतं असतात त्यालाही मला पाळावे लागते. या सर्वाचा परिपाक म्हणजे हे package जे तुमच्या समोर आहे ते आहे.

आता ज्या बदला बद्दल हा मुद्दा निघाला त्याबद्दल सांगतो - SEVERAL DAYS हा पर्याय बरोबर आहे का नाही या पेक्षा त्या पर्यायाच्या त्या wording सकटच ती टेस्ट वर सांगितलेल्या scale वर (million times) सिद्ध झालेली आहे. याचा अर्थ असा होतो कि लोकं त्याच्या अगादरचा पर्याय ‘Not at all’ असे वाचतात, त्याच्या नंतरचा पर्याय ‘More than half the days असा वाचतात आणि त्याच्या मधल्या पर्यायाचा म्हणजे SEVERAL DAYS चा अर्थ या दोन frequency च्या मधली frequency अशी समजूनच त्या पर्यायाला निवडतात. आणि या wording सकट आलेल्या निष्कर्शांना जेव्हा empirically prove केलेले असते तेव्हा लोकांच्या अशा interpretation करण्याच्या प्रक्रियेचे पण empirical testing झाले आहे असे मी म्हणेन. म्हणजे लोक अशा प्रकारे त्याचा अर्थ काढतात हे हि सिद्ध होते. त्यामुळे several days असा पर्याय ठेवल्याने निष्कर्ष चुकणार नाहीत असे माझे मत आहे. टेस्ट मध्ये कान्हा मात्र पण बदलायचा नाही हे तत्व मी psychology च्या दिग्गजांकडूनच शिकलो आहे.

हि टेस्ट किंवा या package मध्ये एकत्र केलेल्या टेस्ट्स मी बनवून घेतलेल्या नाहीयेत. त्या जगभर वापरल्या जातात. >> हो, हे मला ठाऊक आहे. आणि हे तुम्ही बर्‍याच प्रतिसादात लिहीलेले आहे, ते प्रत्येक प्रतिसाद मी वाचलेले आहेत. तुम्ही माझ्या एव्हढ्या मोठ्या प्रतिसादातले एक वाक्य कोट केले आहे आणि त्यावर भला मोठा प्रतिसाद लिहीलेला आहे. त्यामुळे तुमचे म्हणणे अयोग्यच असेल असे नाही असे जे म्हटले आहे त्याला अर्थ उरत नाही. तुम्ही एक दोन टेस्ट्स गोल्ड स्टँडर्ड आहेत असे म्हटले आहे. एखादी टेस्ट जर कुणी बनवलेली असेल किंवा तुम्ही कुणाच्या संपर्कात असाल त्यांच्याशी डिस्कस करू शकता. माझ्या म्हणण्याचा अर्थ कधीही तुम्ही त्यात बदल करा असा नव्हता. तो कसा काय काढला हे समजत नाही.

बदल होऊच शकत नाही हे वाक्य बरोबर नाही इतकेच सांगायचे होते. जर योग्य आक्षेप असतील तर बदल होतात. न्यूटनच्या नियमात बदल होईल असे कधी कुणाला वाटले नव्हते. हे अर्थात उदाहरण आहे. इथे कुणी कुणाला न्यूटन आणि आईनस्टाईनच्या उपमा देत नाही. जर योग्य असेल तर बदल केले जाऊ शकतात इतकेच.

माझे म्हणणे ( पूर्ण आणी शांतपणे वाचून) समजून घेतले तर रिपीटेशन टाळता येईल इतकेच सुचवतो आणि ( हैसियत वगैरे उच्च वैज्ञानिक संज्ञा येऊ लागल्याने) इथेच थांबतो.

शांत प्राणी <<<वयोगटासंबंधी च्या प्रश्नांबाबत >>> मी वयाच्या गटाचा विचार फक्त कुठली टेस्ट घ्यायची आणि कुठली नाही या साठी करणे उचित समजतो. त्यानुसार १८ -६० वर्षासाठी ADHD ची टेस्ट package मध्ये घेतली पण ती ६०+ वयासाठी घेतली नाही, कारण ६०+ वयोगटा साठी तो एवढा महत्वाचा नाही. त्याच प्रमाणे dementia हा विकार ६०+ वयोगटासाठी घेतला तो adults ग्रुप साठी घेतला नाही. याशिवाय अजूनही काही महत्वाच्या टेस्ट घ्यायला याच packages मध्ये घ्यायला आवडले असते पण टेस्ट घेण्याची एकूण वेळ ३०-४० मिनिटापेक्षा जास्त ठेवायची नाही हे तत्व पाळल्यामुळे त्या घेतल्या नाही. बाकी प्रत्येक १० वर्षा साठी वेगळे package करायला अशा कुठल्याच टेस्ट्स नाहीयेत कि ज्या त्या त्या age ग्रुप साठीच applicable आहेत. याधर्तीवर मी केलेले गट मला ठीक वाटतात.

आता तुमच्या प्रश्न कडे वळूया. <<<या गटांना एकाच प्रश्नाला सारखेच गुण देऊन रिझल्ट कसा अचूक येतो हे जाणून घ्यायला आवडेल.>>> वयानुसार ताण कमी जास्त होतो हे तुम्ही दाखवले आहे. पण व्यक्तीला होणारे मनोविकार हे अनेक गोष्टींवर अवलंबून आहे तो केवळ आजूबाजूच्या असलेल्या समस्यांवर अवलंबून नाहीये. परत प्रत्येक मनोविकारा ची करणे वेगळी आहेत. डिप्रेशन चे उदाहरण घ्यायचे म्हणाले तर त्या व्यक्तीची मेंदू संदर्भात असलेली जनुकीय रचना, मेंदूमधील chemical balance, आजूबाजूला असलेली परिस्थिती (समस्या) असे कितीतरी फॅक्टर्स त्यामध्ये आहेत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला ताण अजिबात नसताना पण केवळ जनुकीय रचने मुळे डिप्रेशन येऊ शकते तर एखाद्याला टाऊ प्रचंड असून पण येणार नाही तेव्हा समस्या हा एक पॅरामीटर नाहीये हे महत्वाचे. दुसरे म्हणजे टेस्ट मधील प्रश्न हे समस्यां बाबत नाहीयेत. टेस्ट हि नेहमी लक्षणांना समोर ठेवून design केलेली असते. ऋन्मेष याच्या प्रश्नाला उत्तर देताना याविषयी मी लिहिले आहे. DSM - ४ किंवा अलीकडील ५ version हे document मनोविकारांच्या लक्षणांची यादी करते आणि त्या लक्षणांना समोर ठेवून ती लक्षणे आहेत का हे probe करण्यासाठी प्रश्न design केलेले असतात. वयानुसार समस्या जरी बदलत असतील तरी त्या विकाराची असणारी लक्षणे हि वयानुसार बदलत नाहीत. म्हणजे ‘Not being able to stop or control worrying?’ किंवा ‘Feeling bad about yourself -हे घ्या किंवा ‘ that you are a failure or have let yourself or your family down?’ असा प्रश्न असेल तर तो त्या लक्षणासाठी आहे. २०-२५ वर्षाची व्यक्ती असेल तर तिला तुम्ही वर सांगितलेल्या समस्यां मुळे ते लक्षण येईल, कि ५० ते ६० वर्ष साठी असेल तर वेगळ्या कारणासाठी असेल पण लक्षण तेच राहणार. त्यामुळे टेस्ट तीच राहते आणि प्रश्नांना दिलेले weightage पण तेच राहते. एकंदरीतच विषय खूप कॉम्प्लेक्स आहे आणि जागेअभावी (आणि वेळेअभावी) तो पूर्ण विस्तृत करणे कठीण आहे तरीही प्रयत्न केला आहे.

बरं.

शांत प्राणी - तुम्ही प्रश्न अतिशय योग्य आणि अचूक विचारले आहेत. आणि तुमची प्रश्न विचारायची पद्धती पण अतिशय सौम्य आणि social मीडिया वर जशी असायला पाहिजे तशी आहे. ती मला खरच आवडली. त्याबद्दल धन्यवाद. उत्तर देताना एखादा शब्द इकडे तिकडे झाला असेल तर तो सोडून द्या. त्याच प्रमाणे तुम्हाला दिलेल्या उत्तराचा तपशील हा मागील अनेक लोकांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायला योग्य पार्श्वभूमी तयार करत होता म्हणून त्या प्रश्नांना इथेच उत्तर दिले. ते त्या ओघात येऊन गेले एवढेच.

रेव्ह्यू यांच्या प्रतिसादांमुळे यावर थोडे वाचन केले. या टेस्ट्स जेव्हां एखादा मनोविकारतज्ञ घेतो तेव्हां तो त्याचे स्वतःचे विश्लेषण करतो.
डिप्रेशन कोणकोणत्या कारणांमुळे येते याबद्दल सर्च दिला तर सहज समजून येते. सर्वांनाच जनुकीय कारणांने ते असत नाही. वयोगटाची माझी शंका एव्हढ्याच साठी होती.
तुम्ही नोकरीत सर्वांची लाईफस्टाईल सारखी असते असे वर म्हटले आहे. ते योग्य वाटत नाही. अर्थात माझे म्हणणे चुकीचे असेल.
एखाद्या प्रिय व्यक्तीच्या निधनामुळे येणारे नैराश्य हे तात्पुरते असू शकते. ते निघूनही जाते. तसेच तात्कालिक कारणांमुळे येणारे नैराश्य हे काहीही न करता कमी होऊ शकते असे माझ्यासारख्या या विषयातल्या अडाणी मनुष्याला वाटू शकते.

माझा रोख हा वाढत्या वयानुसार येणार्‍या ताणांचे व्यवस्थापन न करता आल्याने होणारे मनोविकार याकडे होता. नोकरीत बढती न मिळणे, व्यावसायिकांवर वाढणारे कर्ज, व्यवसाय नीट न चालणे याचे व्यवस्थापन जमले नाही तर दीर्घ काळानंतर नैराश्य येत जाते. त्याचे परिणाम गंभीर असतात. आत्महत्येपर्यंत ते प्रकरण जाते. हे ताणतणाव कमी वयात असत नाहीत. या ताणतणावांची परिणती मनोविकारात होत असल्याने एकच पेपर सर्व वयोगटाला कसा हा प्रश्न पडतो.
निव्वळ लक्षणांवरून या व्यक्तीवर केव्हढे द्डपण आहे हे कसे समजते ? तात्कालिक कारणातून जाणार्‍या टीन एजर मधे आणि दीर्घकाळच्या ताणांमुळे दिसणार्‍या लक्षणांना एकच ट्रीटमेंट तरी कशी असेल ?
तत्कालिक कारणांमुळे येणार्‍या नैराश्याला ट्रीटमेंटचीही गरज पडत नाही. एव्हढेच.

शांत प्राणी, सर आपण अनेक पैलू असणाऱ्या अशा विषयाची चर्चा करतोय त्यामुळे थोडी वेगळी असलेली मते मांडण्याचे स्वातंत्र्य घेतो. अर्थातच चर्चेने नवीन शिकायला मिळेल हे पण धोरण आहेच. मला वाटते ज्या मुख्य प्रश्नाकडे आपण भिन्न बघतोय ते म्हणजे आहे मनोविकारांचे कारण किंवा तात्पुरते डिप्रेशन या विकाराचे कारण असे घेऊया. मला हि या प्रश्नाविषयी कायमच उत्सुकता राहिलेली आहे म्हणून मी जो जो तज्ञ् भेटेल त्याला हा प्रश्न विचारत असतो. त्यावरून मला असे कळले आहे कि या प्रश्नाला निश्चित असे उत्तर नाहीये.
Webmed हि खूप genuine website आहे ते पण म्हणतात कि - Depression is a complex disease. No one knows exactly what causes it, but it can happen for a variety of reasons. आणि मग ते यापुढे शक्यतांची लांब यादी देतात ज्यात जनुकीय करणे आहेत तशीच आयुष्यात घडणाऱ्या वेग वेगळ्या गोष्टींची पण यादी आहे जसे कि प्रामुख्याने तुमचे लहान पण कसे गेले, आई वडील कसे होते, आणि काही घटना उदा जवळील व्यक्तीचा मृत्य, business loss, आर्थिक संकट, नातेसंबंधांना मधील ताण वगैरे. या सर्व फॅक्टर्स च्या combination मुळे depression येत असल्यामुळे अमुक case मध्ये अमुक कारणाने डिप्रेशन आले हे निश्चित पणे सांगणे अवघड. यातले कुठले कॉम्बिनेशन समोरच्या व्यक्तीच्या बाबतीत घडले आहे याचा डॉक्टर लोक अंदाज घेतात पण ते पिन पॉईंट करून सांगणे तसे अवघड. तुमच्या मुद्द्यांमध्ये आयुष्यातील समस्यांवर खूप जास्त भर दिलेला आहे तो माझ्या मते एक contributing फॅक्टर आहे असे मला सांगायचे आहे. तात्पुरत्या कारणाने आलेले डिप्रेशन काही केसेस मध्ये दीडदोन वर्षात जाते हे खरेच आहे पण कधी कधी ते तात्पुरत्या आणि किरकोळ कारणाने ट्रिगर होते आणि मग दीर्घ काळ राहते अशाही केसेस आहेत. सगळेच प्रकार असल्याने जनरिक असे काही सांगता येत नाही. हे सर्व ऐकून मी माझ्या स्वतःच्या समजुती साठी हे निश्चित केले आहे कि - नैराश्य येण्याचे प्रमुख कारण म्हणजे मेंदू मधील chemicals किंवा हार्मोन्स चा असलेला imbalance. आता हा imbalance जन्मापासून genetically तुमच्या मध्ये येऊ शकतो किंवा परिस्थिती ने पण येऊ शकतो, किंवा दोन्हीच्या combination मुळे पण येऊ शकतो. अमुक व्यक्तीसाठी त्याची मूळ कारणे ओळखणे, म्हणजे हे जनुकांमधील रचने मुळे आहे का परिस्थिती मुळे आहे असेल तर परिस्थितीमुळे किती टक्के आहे, का त्यांच्या मिश्रणा मुळे आहे, हे सांगणे खूप अवघड. म्हणजे असे कि, एखाद्याच्या genes मध्येच तशी रचना आहे आणि त्यामुळे तो काहीही कारण नसताना नैराश्यात गेला असे घडू शकते. किंवा त्याच्या genes मध्ये आहे आणि तो कॉलेज मध्ये गेल्या वर एखाद्या विषयात नापास झाला म्हणून त्याचे ते नैराश्य trigger झाले असेही होऊ शकते. तशी अनेक मुले नापास होतात पण प्रत्येकजण नैराश्यात जातो का? तर नाही. याच्या जनुकांमध्ये ती रचना होती ती trigger झाली. Adolescent वयात नैराश्य हमखास trigger होते हे सर्वश्रुत आहे. आणिक एक कारण म्हणजे तुमच्या जनुकात तशी काही रचना नाहीये पण तुमच्या आयुष्यात एवढा वाईट प्रसंग घडला कि तुमच्या मेंदू ची आनंदी राहण्याची यंत्रणाच कोलमडून पडली. जसे कि प्रेमभंग होणे, करिअर मध्ये अपयश, कोणाचा मृत्यू, घटस्फोट वगैरे. इथे त्या समस्यांबरोबरच व्यक्तीच्या विचार करण्याचा द्रीष्टीकोन महत्वाचा ठरू शकतो. जर आई वडिलांनी अपयश पचवायला शिकवले नाही, positive राहायला शिकवले नाही, confident राहायला शिकवले नाही तर मुलांच्या नैराश्याला ते कारणी भूत ठरू शकतात पण खरे तर आपल्या विचारांचे framework हे फक्त आई वडिलांच्या पैदाशीवरच अवलंबून असते असेही नाहीये. आपण मोठे होत असताना आपण अनेक गोष्टी अनेक जणांकडून शिकत असतो. म्हणजे बघा प्रत्येक गोष्टच एकमेकात मिसळली आहे. असेही आढळले आहे कि एखाद्याचे बालपण खूप असुरक्षित गेले असेल तर त्याचा परिणाम त्याच्या मानसिक स्वास्थ्यावर निश्चित होतो. जसे कि आईवडिलांमध्ये भांडणे असतील, किंवा त्यांच्या पैकी एक जण अतिशय रागीट, विचित्र स्वभावाचा असेल किंवा अवती भवती खूप असुरक्षित परिस्थिती असेल आणि आई वडिलांनी आपली काळजी घेतली नाही किंवा लहान वयात अन्याय अत्याचार झाले तर तुमच्या संपूर्ण मानसिक अवस्थेची तोड मोड होऊन त्याचा परिणाम म्हणून नैराश्य किंवा दुसरे मनोविकार होऊ शकतात.
या पार्श्वभूमीवर आता इथे समस्या असलेल्या व्यक्तींसाठी आपण विचार करू - सर्व प्रथम त्याच्या जनुकीय रचणे नुसार त्याची हार्मोनल सिस्टिम कितपत मजबूत आहे ते, जन्म झाल्या पासून आत्तापर्यंत त्याच्या मनाची झालेली तोडमोड कितपत आहे ते, आणि समस्येची तीव्रता कितपत आहे ह्या तिन्ही फॅक्टर्सच्या वर डिप्रेशन येणे किंवा न येणे, आले तर ते किती तीव्रतेचे असेल ते अवलंबून राहील. माझ्या समजुतीने तरी कुठल्याही कारणाने ते आले तरी दिसणारी लक्षणे तीच असणार आहे त्यामुळे परीक्षण किंवा डॉक्टर घेत असलेला interview या लक्षणांचा वेध घेतात. अर्थातच पार्श्वभूमी लक्षात घेऊन ते ट्रीटमेंट देतात कि जी तुमच्या म्हणण्या नुसार / वयानुसार वेग वेगळी असू शकते. बहुतेक वेळा थेरपी आणि (जरूर असेल तर) मेडिकेशन याचे कॉम्बिनेशन वापरतात. दोन्ही गोष्टी वयानुसार वेगळ्या असू शकतात. molecule विषयी माझा अभ्यास नाही पण थेरपी हि तर निश्चितच वयानुसार, पार्श्वभूमीनुसार वेग वेगळी दिली जाईल. उत्तर फारच लांबले असेल तर क्षमस्व. लिहिण्यात मी इतका प्रवीण नाही त्यामुळे articulation करण्याचा माझा नेहमीच प्रॉब्लेम असतो. तुम्हाला चर्चा करायची असेल तर आपण फोन वर कधीही बोलू शकतो.

Webmed मी या साईटची मदत घेतली आहे. इतका वेळ माझा असा समज होता कि तुम्ही संगणकीय किंवा जालीय मदतीने हे टूल्स उपलब्ध करून देत आहात. मानसोपचारतज्ञ किंवा मानसशास्त्रज्ञ वेगळे आहेत. पुढे असा समज झाला कि तुम्ही विद्यार्थी आहात. आता असा समज होतोय कि तुम्ही स्वतः या शास्त्रातले तज्ञ आहात. तुम्ही जी चाचणी इथे बनवली आहे तिच्या मर्यादांबाबत पुन्हा नको बोलूयात. त्या लक्षणे शोधतात आणि त्यावर कुठला आजार किती प्रमाणात आहे हे सांगतात हे माहिती आहे. मला या शास्त्राची माहिती नाही आणि मी या शास्त्राशी संबंधित नाही. जालीय माहितीवरच चर्चा करतोय.

मागच्या एका प्रतिसादात सांगितल्याप्रमाणे माझ्या मित्राने बनवलेल्या दोन चाचण्यांना मान्यता मिळाली आहे. अजून दहा टेस्ट्स त्याने बनवलेल्या आहेत. त्या वेळी त्यांच्या मान्यतेसाठी तो सर्व्हेज करत होता. या दरम्यानच त्याला हेच प्रश्न विचारले होते. त्याने ही "पण बदल करण्याची आवश्यकता काय ?' हा प्रश्न सातत्याने विचारला होता. पण शेवटी प्रिन्सिपली अ‍ॅग्रीड असा शेवट झाला. भविष्यात एखाद्या केस मुळे बदल करण्याची गरज पडली तर का नाही करणार ? शेवटी शास्त्र आहे त्यातून हे शास्त्र सातत्याने विकसित होणारे आहे. सध्या त्यात बदलाची गरज पडलेली नाही असे त्याचे म्हणणे होते.
माझ्यासारख्या लोकांमधे असे झाले तर काय, तसे झाले तर काय हे कुतूहल असते इतकेच. यात कुठे या क्षेत्राला आव्हान देण्याचा विचार नाही.

केवळ लक्षणांवरून एव्हढ्या मोठ्या वयोगटाला सारख्याच पद्धतीने जज्ज करणे हे खटकले. तुम्हीच म्हणाल्याप्रमाणे जेव्हां आपण मानसोपचार तज्ञाकडे जातो तेव्हां याच चाचणीतले प्रश्न तो अनुभवाने थोडे फार बदल करून विचारत असतो असे म्हटल्याने थोडा वादविवाद झाला.

मला इतकेच वाटले कॉलेजमधल्या विद्यार्थ्याला आणि एखाद्या कर्जबाजारी झालेल्या ५० च्या माणसाच्या बाबत सारखीच लक्षणे असतील आणि दोघांनाही डिप्रेशन सारख्याच प्रमाणात दाखवत असेल तर किमान टेस्ट कंडक्ट करण्याच्या पद्धतीत बदल व्हायला पाहीजे. आत्महत्या तकालिक कारणांनी देखील होतात. पण दीर्घ काळ ताण सोसल्याने होणारे परिणाम हे दीर्घ काळ बरे होणारे नसतात किंवा कायमस्वरूपी बदल झालेले असतात तसे तात्कालिक कारणांमुळे कमी प्रमाणात होत असावे असे वाटले.

आपण इथे थांबूयात असे मला वाटते. सार्वजनिक ठिकाणच्या चर्चा फोनवर नेण्यात हंशील नाही.

शांत प्राणी >>> चालेल, आपण इथे या प्रश्नावरची चर्चा थांबवूया.
तुमच्या मित्रांनी टेस्ट develop केल्या ते अतिशय स्तुत्य आहे कारण या क्षेत्रात काम करताना मला जाणवले कि भारतीय शास्त्रज्ञांच्या psychology टेस्ट्स लोकं जगभर वापरताहेत असे कुठे चित्रच नाहीये. आपली टेस्ट असेल तर जसे तुम्ही म्हणाला त्या प्रमाणे आपण त्यात बदल करू शकतो आणि दुसरे म्हणजे ती आपल्या भारतीयांच्या मानसिकते नुसार तयार केली असल्याने जास्त अचूक उत्तर देईल. दुर्दैवाने आपल्या देशातील बरेचशे संशोधन म्हणजे तिकडच्या टेस्ट घ्यायच्या, त्यात थोडे फार बदल करून नवीन टेस्ट तयार करायची, त्याला cultural adjustment किंवा adoption असे नाव द्यायचे आणि येथील लोकांवर परीक्षण करून ती validate करायची, अश्या प्रकारचे आहे. हे हि जरुरी आहे पण अजूनही उच्च पातळीवर या क्षेत्रात खूप काम करायची जरुरी आहे. ICMR पण त्यांच्या कॅपॅसिटी च्या मानाने फार काही output देताना दिसत नाहीये. Personality डिसऑर्डर टेस्ट चे उदाहरण घेतले तर त्याची टेस्ट बऱ्याच treatments मध्ये लागते पण सरसकट सगळे जण अमेरिकेत संशोधित केलेल्या टेस्ट्स पाच सातशे रुपये / टेस्ट असे पैसे देऊन करतात (उदा. Pearson कंपनी ची टेस्ट खूप प्रचलित आहे). कोणीही, आपली भारतीय अशी टेस्ट तयार करून त्याला वापरात आणायचा प्रयत्न केलेला नाहीये. ज्या eminent bodies कडून अशा प्रकारचे काम होईल अशी वरती लोकांनी अपेक्षा केली आहे ते हे अगदी मूलभूत असलेले काम पण करत नाहीयेत तर त्याच्या उपर जाऊन समाजाचे हित करण्यासाठी computerized मोफत टेस्ट वगैरे कधी आणतील याची अशा सुद्धा बाळगायला नको. एकंदरीत खूप काही काम बाकी आहे. मी स्वतः पण नुकतीच एक टेस्ट develop केली आहे ज्याने विद्यार्थ्यांचे ‘motivation to learn’ मोजता येते. त्यासाठी IIM मधील एका प्राध्यापका कडून मार्गदर्शन घेत आहे. पण अर्थातच या विषयात मी फार उच्च पातळीवरचे संशोधन करू शकणार नाही कारण माझी डिग्री या विषयातील नाहीये, त्यामुळे पदोपदी अडथळे आहेत. परंतु विषयात रस असल्याने आणि आपल्या आहे त्या ज्ञानाचा आणि technology मधील अनुभवाचा समाजाला फायदा व्हावा या हेतूने हा फ्री टेस्टिंग चा प्रोजेक्ट हातात घेतला आहे. असो, या निमित्ताने आत्ता पर्यंतच्या प्रवासा मधील मिळालेले अनुभव आणि निरीक्षणे तुमच्या सर्वां बरोबर share करता आली.

Pages