‘Full Body चेक - अप’ करतो तस ‘Full mind चेक अप’ - एक Innovation

Submitted by Psychology4all on 25 June, 2022 - 00:44

‘Full Body चेक - अप’ करतो तस ‘Full mind चेक अप’ - एक Innovation

सगळ्या विद्यार्थ्यांनी Assessment पूर्ण केल्याचा प्राचार्यांचा फोन आला आणि मी ताबडतोब माझ्या लॅपटॉप कडे धाव घेतली. Assessment चा consolidated रिपोर्ट बघायला मी अधीर झालो होतो. आजच्या तरुण पिढीच्या मानसिक अवस्थेचे चित्र मला त्यातून दिसणार होते. सॉफ्टवेअर वरचे GENERATE बटण मी दाबले आणि समोर आलेले graphs, आकडे बघून मन सुन्न झाले. मला वाटले बहुतेक माझ्याकडून कुठेतरी चूक झाली असावी म्हणून परत परत सगळे thresholds, formulae तपासून बघितले. दुर्दैवाने सगळे बरोबर होते.

मध्य महाराष्ट्रातील एका जिल्ह्याच्या प्रतिथयश कॉलेज मध्ये जाऊन सुमारे २५० विद्यार्थ्यांची जनरल psychological assessment आम्ही केली होती आणि त्याचे आलेले परिणाम मी माझ्या समोर बघत होतो. Mild depression सोडून दिले तरी ज्याला आपण moderate to severe depression म्हणू ते प्रथम दर्शनी तरीसुमारे १५ % विद्यार्थ्यां मध्ये होते. Anxiety disorder सुद्धा moderate to severe category मध्ये प्रथम दर्शनी १८% मुलांमध्ये होता. हे खूप जास्त वाटेल पण तुम्ही कुठल्याही तज्ञ psychiatrist किंवा या विषयात काम करणाऱ्यांना विचार त्यांना याचे अजिबात आश्चर्य वाटणार नाही इतके हे अपेक्षित आहे. ADHD विषयी तुम्ही ऐकलेच असेल. एक नंबर चा छुपा रुस्तुम मनोविकार आहे तो. माणसांची आयुष्य जातात तरी त्यांना माहीतच नसते कि आपल्याला ADHD आहे. तो १०-११% विद्यार्थ्यांमध्ये लक्षण दाखवत होता. Co - morbidity ची टक्केवारी म्हणजे दोन - तीन मनोविकार बरोबरीने होण्याचे प्रमाण बरेच जास्त होते. एवढे सगळे झाल्यावर Internet addiction २८ - ३०% विद्यार्थ्यांमध्ये असण्याचे काही आश्चर्य वाटायला नको. Social problems विषयी तर बोलायलाच नको. राहून राहून मनात हेच विचार येत होते की आजच्या तरुण मुला मुलींना नेमके झालेय तरी काय? का त्यांना एवढ्या मनोविकारांनी ग्रासलंय? आणि हे त्यांना, त्यांच्या आई वडिलांना वेळीच समजले नाही तर यांच्या पुढच्या आयुष्यात काय काय होईल?

तर मुख्य मुद्दा हाच आहे कि आपण जनरल physical चेक अप करायला कधीही तयार असतो पण त्याच धरती वर psychological चेक अप का करत नाही? कोणी विचार पूस पण करत नाही की Thyrocare जसे हजार रुपयात ६३ का ऐंशी blood टेस्ट्स करते तसे मनाचे सरसकट Psychological चेक अप होते का हो कुठे? कोणी असा आग्रह पण धरत नाही की प्रत्येक विद्यार्थ्याचे, प्रत्येक नोकरदारांचे, प्रत्येक ज्येष्ठाचे किंवा आपल्या कुटुंबातील प्रत्येकाचे असे psychological चेक अप दर वर्षी झालेच पाहिजे. हे असे का? त्यासाठी दृश्य स्वरूपात तो मानसिक आजार व्हायची वाट का बघायची? तशी वाट बघायची म्हणले तर तो आजार जे आक्राळ विक्राळ रूप घेऊन आपल्या समोर येईल ते आपल्याला सहन होणार नाही. त्यापेक्षा वर कॉलेज मध्ये केलेल्या परीक्षणात जसे या अशा मनोविकारांना आपण स्वतः हुन पकडण्याचा प्रयत्न केला, तसे प्रत्येकाला जमले तर पुढची disasters होण्यापासून अनेक कुटुंब वाचू शकतात. आणि हे मनोविकार किती मोठ्या प्रमाणावर आपल्या सर्वांच्या आसपास पोचलेत त्याचे आकडे वर दिलेलेच आहेत तेव्हा आपला याच्याशी काहीच संबंध नाही असे आपण म्हणू शकत नाही. याच विचारांना पुढे नेत Psychology testing for all ही कल्पना आम्ही एक social Innovation स्वरूपात पुढे नेली. कधी कधी खूप साध्या कल्पना मोठ्या innovative ठरतात, त्यातलीच ही एक.

या प्रोजेक्ट मध्ये आम्ही most common आढळणारे जे psychological disorders आहेत त्यांच्या जगात सर्वत्र वापरल्या जाणाऱ्या screening tests एकत्र करून त्याचे एक package तयार केले. त्यासाठी गेले दोन वर्ष या वर बरेच कष्ट घेतले. त्या टेस्ट वापरायला जरुरी त्या परवानग्या घेऊन, त्यांची निवड बरोबर आहे का नाही हे एक नाही तर अनेक तज्ञ psychiatrist लोकांकडून तपासून घेऊन, त्याची मराठी भाषांतर करून हे package तयार केले. मुद्दामून अशाच tests घेतल्या ज्या सर्व जगभर करोडो लोकांनी वापरून सिद्ध झाल्या आहेत त्यामुळे त्यांच्या वैधतेविषयी अजिबात शंका नको. उदा. डिप्रेशन साठी PHQ - 9 म्हणजे तर गोल्ड स्टॅंडर्ड. ADHD साठी WHO ने recommend केलेली ASRS 1.1 पण सर्व जगभर वापरतात म्हणून घेतली, वगैरे. अर्थातच वयानुसार मनोविकार थोडे वेग वेगळे असल्याने पौगंडावस्थेत (adolescent) असणाऱ्यांसाठी, तरुण (Adult) असणाऱ्यांसाठी आणि ज्येष्ठांसाठी वेग वेगळी packages तयार केली. आणि ती एका प्लॅटफॉर्म वर ठेवून एका लिंक द्वारे Online उपलब्ध केली. सर्वाना सहभागी होता यावे म्हणून English आणि मराठी मध्ये हे package तयार केले आहे आणि सर्वात मुख्य म्हणजे ही टेस्ट घेण्यासाठी कुठलाही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष असा charge किंवा फी ठेवली नाहीये. तुम्हाला इच्छा असेल तर निवांत असा ३० - ४० मिनिटांचा वेळ काढा आणि आपल्या फोन / टॅबलेट किंवा कॉम्पुटर वर हे परीक्षण ONLINE पूर्ण करा. पुढील मिनिटाला तुमचा रिपोर्ट तुमच्या मेल बॉक्स मध्ये असेल.

तुम्ही सहभागी झालात तर माझी अशी विनंती राहील की परीक्षणा मध्ये विचारलेल्या प्रश्नांना तुम्ही प्रामाणिक पणे उत्तरे द्या. तुम्ही दिलेली उत्तरे किंवा माहिती संपूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल आणि परीक्षणाचा RESULT, त्याच प्रमाणे पुढील मार्गदर्शन फक्त तुम्हालाच तुमच्या वैयक्तिक ई-मेल वर पाठवण्यात येईल. तुम्हाला तुमची ओळख (पूर्ण नाव) सुद्धा द्यायची अजिबात जरुरी नाही पण उत्तरे प्रामाणिक पणे द्या. रिपोर्ट पाठवण्यासाठी ई-मेल id लागेल तीच तुमची ओळख. तुमच्या उत्तरांच्या अचूकतेवरच तुम्हाला पुढे मिळणारे RESULT आणि मार्गदर्शन अवलंबून असणार आहे हे ध्यानात ठेऊन यात प्रामाणिक पणाने सहभागी व्हा.

मायबोली वरील तरूणांना आणि वृद्धांना संगळ्यांनाच हा प्रोजेक्ट अतिशय उपयुक्त आहे. तरुणांना मी असे सांगेन तुम्ही सगळे मॅरेथॉन पळण्याचे स्वप्न बघताय हे चांगलेच आहे पण ती मॅरेथॉन पळण्यापूर्वी एकदा आपल्या पायांची ताकद अजमावूया, तसेच कुठे काही दुखते खुपते आहे का हे एकदा बघून घेऊया. काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतील तर ते अगोदर ठीक करून मग मॅरेथॉन पळायला सुरुवात करूया. दुखणाऱ्या पायांनी जसे मॅरेथॉन पळता येणार नाही तसेच मानसिक अनारोग्य घेऊन आपण करिअर मध्ये फार मोठी मजल मारू शकणार नाही. मध्यम वयीन लोक कदाचित ह्या रेस च्या मध्यापर्यंत पोचले असतील. त्यांच्यासाठी ही असे परीक्षण तितकेच महत्वाचे आहे कारण इथे नुसतेच करिअर येत नाही तर त्याबरोबर नातेसंबंध, कुटुंब हे सर्व येते. ज्या मनाच्या आधारे आपल्याला ह्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे त्याचा कानोसा एकदा घेतलेला कधीही चांगला. नकारात्मकता भरलेल्या मनाने ना आपण करिअर मध्ये उंच मजल गाठू शकतो ना नातेसंबंधांमध्ये. मानसिक स्वास्थ्य आणि आरोग्य हा आपल्या जीवनातील अत्यंत महत्वाचा भाग आहे पण दुर्दुदैवाने आपल्या प्रार्थमिकते मध्ये तो कायमच दुर्लक्षित राहिला आहे. ज्येष्ठांच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्यांचे शारीरिक स्वास्थ्य हे बऱ्याच अंशी त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर अवलंबून असते. जे काही उरलेले आयुष्य आहे ते त्यांना मजेत घालवता येण्या साठी त्यांच्या मनाचे आरोग्य उत्तम असणे फारच जरुरी आहे. म्हणून त्यांच्यासाठी पण अशा परीक्षणाचे महत्व आहे.

मी ज्यांना ज्यांना या प्रोजेक्ट विषयी सांगतो त्यांना याचे महत्व लगेच पटते पण लगेच अनेक प्रश्न त्या पाठोपाठ त्यांच्या मनात येतात. म्हणूनच खाली मी FAQ देत आहे ते जरूर वाचा. ज्या कोणाला अशा assessment चा लाभ घ्यायचा आहे त्यांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ती टेस्ट द्या. हा एक Social Innovation प्रोजेक्ट असल्याने यात पैशाचे कुठलेही transaction ठेवलेले नाही. तुमचे RESULT तुम्हाला मोफत कळवायचे आणि मग counseling मध्ये ओढून त्यातून पैसे कमवायचे असाही प्रकार इथे ठेवलेला नाही. तेव्हा निःसंकोच पणे याचा फायदा घ्या. याशिवाय तुमच्या संपर्कात असणाऱ्या एखाद्या कॉलेज मध्ये, ज्येष्ठ नागरिक संघामध्ये किंवा सोसायटी च्या फोरम मध्ये अशा प्रकारचे सरसकट परीक्षण करायचे असेल तर जरूर संपर्क साधा. तिथे सगळीकडे वेगवेगळे camps होताच असतात त्यामुळे आपल्याला आपला प्रश्न उपस्थित करायला चान्स आहे - ‘Full Body चेक - अप’ करतो तसा ‘Full mind चेक अप’ का नाही?

Test Links - तुमच्या वयानुसार लिंक निवडा आणि क्लिक करा -

१८ ते ६० वर्षे वयोगट - https://forms.gle/HDDv4Gf2ZJF8hQuF9

६० + वर्षे वयोगट - https://forms.gle/9hRg1BRxmMT1htDN7

For Any Question Write to psychologyonlinetest@gmail.com
For Author and Innovation details please visit www.psychologytestingforall.com
—-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Use following WHATSAPP Message to inform others -

*Full body check-up असते तसे Full mind check-up का नाही?*

Good news - की तुम्ही तसा check-up करू शकता आणि तेही मोफत. पुण्यातील एका स्वयंसेवी Social-Innovation प्रोजेक्ट द्वारे हे आता शक्य आहे. मनोविकार असण्याचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे ‘तो आहे’ हे समजणे. आणि नेमके हेच उद्दिष्ट या mind टेस्टिंग package ने साध्य केले आहे. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी website ला भेट द्या किंवा सरळ त्या tests घेऊनच बघा ना! तुमची उत्तरे मात्र अगदी प्रामाणिक पणे दिलेली पाहिजेत. तर आणि तरच results खरे येतील. Test English / मराठी अशी आहे, संपूर्ण online आहे, साधारण पणे ३० मिनिट्स लागतील आणि रिपोर्ट एका मिनिटात तुमच्या मेल box मध्ये. तुमची उत्तरे अर्थातच confidential ठेवली जातील पण मुळात तुम्ही तुमची खरी ओळख नोंदवायची देखील गरज नाही. आहे कि नाही Deal?

एरवी हजारो रुपये charges असणाऱ्या या tests शाळा, कॉलेज, वेगवेगळ्या संस्था आणि ग्रुप्स ना मोफत उपलब्ध करून देणारे हे एक समाज सेवी social Innovation आहे. Healthy minds create healthy nation असा त्यांचा विश्वास आहे. खालील पैकी तुमच्या वयानुसार टेस्ट निवडा आणि याचा लाभ घ्या.

१८ ते ६० वर्षे वयोगट - https://forms.gle/HDDv4Gf2ZJF8hQuF9

६० + वर्षे वयोगट - https://forms.gle/9hRg1BRxmMT1htDN7

www.psychologytestingforall.com

Or Write to psychologyonlinetest@gmail.com

(Feel free to forward to whatsapp groups)
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Frequently asked questions :

(१) मानस शास्त्रीय परीक्षण कसे होते?
उत्तर - मानस शास्त्रीय परीक्षणात (टेस्ट) मध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात आणि त्याची संभाव्य उत्तरे खाली पर्याय म्हणून दिली जातात. तुमच्या मनातील भावने नुसार, तुमचा स्वतःच्या अनुभवानुसार किंवा तुमच्या ability नुसार तुम्ही त्याचे उत्तर द्यायचे असते. तुम्ही अशा अनेक प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर त्या उत्तरांचे विश्लेषण करून एखादा गुण धर्म किंवा विकार तुमच्या मनामध्ये कसा आणि किती प्रमाणात आहे याचे अनुमान काढले जाते. उदा समजा तुम्ही social फोबिया संदर्भात टेस्ट देत असाल तर तुम्हाला समाजात मिसळताना तुमच्या असणाऱ्या वर्तुणीकीविषयी किंवा तुम्हाला मनात येणाऱ्या भावनांविषयी प्रश्न विचारले जातील. जर तुम्ही त्याची प्रामाणिक उत्तरे दिली तर मानस शास्त्रीय दृष्टिकोनातून तुम्हाला social फोबिया हा विकार आहे का नाही याचे प्रार्थमिक अनुमान काढले जाते की जे ८० -९० % खरे ठरते कारण हि परीक्षा, त्यातील प्रश्न हे खूप मोठ्या संशोधन नंतर आणि अनेक प्रयोगांती निश्चित केलेले असतात. तसेच या टेस्ट्स पूर्वी लाखो लोकांनी दिलेल्या असतात आणि त्याचे आलेले results हे खरे ठरलेले आढळलेले असतात. थोडक्यात त्या पूर्ण पणे सिद्ध झालेल्या असतात. अर्थात ही टेस्ट म्हणजे medical diagnosis नाही. प्रत्यक्ष psychiatrist ने तपासून मगच आपला मनोविकार हा निश्चित होत असतो. पण प्रथम दर्शनी हा विकार आपल्याला आहे हे या टेस्ट मुले आपल्याला कळते. उदा depression च्या संदर्भात विचार केला तर मधून मधून आपल्याला अनेक गोष्टी अस्वस्थ करत असतात, निराश करत असतात त्यामुळे तो depression नावाचा मनोविकार आहे का ती एक मनाची तात्पुरती निराशाजनक अवस्था आहे हे समजायला मार्ग नसतो आणि म्हणून लोकं तसेच स्वतःला खेचत राहतात. त्यामुळे आपल्या मनोविकाराची तीव्रता डॉक्टरांच्या कडे जाण्या इतपत गंभीर आहे का नाही हे ठरवायला पण हि टेस्ट उपयोगी पडते.

(२) या टेस्ट्स ने नेमके मला माझ्याविषयी काय समजेल?
उत्तर - तसा मानसशात्रीय परीक्षणाचा आवाका फार मोठा आहे. एकूण एक मनोविकारांचे परीक्षण करणे निश्चितच शक्य आहे पण त्यासाठी परीक्षा घेणाऱ्याने तेवढा वेळ द्यायची गरज आहे. साधारण पणे एका वेळेला ३० -४५ मिनिटाचे परीक्षण आपण करू शकतो. त्यानंतर परीक्षा देणाऱ्याला fatigue येऊ शकतो आणि मग त्याच्या उत्तरांची अचूकता कमी होऊ शकते. त्यामुळे आपण या परीक्षणाचे अनेक भाग पडले आहेत. पहिल्या भागात सर्वात महत्वाच्या आणि सर्वात प्रामुख्याने आढळून येणाऱ्या disorders ला आपण तपासून बघतो जसे की डिप्रेशन, चिंता, dementia, autism वगैरे. दुसऱ्या भागात अजून काही गोष्टी जसे की aggressiveness, Bi - Polar, OCD, personality disorder वगैर तपासल्या जातील.

(३) Psychology च्या अशा टेस्ट्स करून फक्त मनोविकारचं समजू शकतात का मनाच्या काही चांगल्या बाजू समजू शकतात?
उत्तर - Psychological tests चा जेवढा उपयोग मनोविकार ओळखण्यासाठी होतो तेवढाच तो स्वतःच्या विकासासाठी (Development) म्हणजे चांगल्या बाजू मजबूत करण्यासाठी होऊ शकतो. पण योग्य क्रम म्हणजे प्रथम आपल्यामध्ये काही विकार असतील तर त्याचा उपाय करून मग मनाचा विकास करणे हे जास्त उचित होते. त्यासाठी पण packages तयार करणे चालू आहे. उदा. IQ विषयी आपण ऐकूनच आहोत. तो online टेस्ट च्या द्वारे कुठल्या टेस्ट द्वारे मोजता येईल त्याचे संशोधन चालू आहे. अनेक टेस्ट्स आहेत पण सर्वच अचूक आहेत असे नाही आणि सगळ्याच मोफत पण नाहीत. IQ महत्वाचा आहेच पण एक उत्तम लीडर बनण्यासाठी IQ पेक्षा तुमचा EQ (Emotional Intelligence Quotient) महत्वाचा आहे. मग त्यासाठी असणाऱ्या वेग वेगळ्या psychological tests चा तौलनात्मक अभ्यास चालू आहे. लवकरच ती परीक्षा पण या platform वर उपलब्ध करून दिली जाईल. अशा परीक्षांचा वापर करून आपण कुठे कमी आहोत हे जाणून घेणे आणि त्यात प्रयत्नपूर्वक सुधारणा करणे आणि मग परत परीक्षण करून स्वतःमध्ये सुधारणा घडून आली आहे कि नाही हे निश्चित करणे असा त्याचा वापर असेल. सुधारणा करण्या करता लागणारे training material पण या platform वर ठेवण्यात येईल. अशा अनेक qualities आहेत ज्या आपण स्वतःमध्ये आणून एक उत्तम आणि सर्वांना हवीहवीशी वाटणारी अशी व्यक्ती बनू शकतो. हे सर्व लोकांनी psychologytestingforall या platform चा वापर करून साध्य करावे अशी अपेक्षा आहे.

(४) समजा मला या तुमच्या assessment घेतल्यानंतर कळले की माझ्यात काही disorders ची लक्षणे आहेत, तर पुढे काय? नुसत्या कळण्याचा काय उपयोग? पुढील मार्गदर्शन पण मोफत देणार आहेत का?
उत्तर - वर सांगितल्या प्रमाणे या assessment ने आपल्यामध्ये एखाद्या disorder ची प्रथम दर्शनी लक्षणे आहेत हे समजते परंतु असा online परीक्षणाने दिलेला निकाल हे म्हणजे मेडिकल diagnosis नाही. त्यासाठी qualified psychiatrist किंवा psychologist ची आवश्यकता आहे. Psychiatrist कडे गेल्यावर तो पण अशाच प्रकारची टेस्ट तुम्हाला देईल किंवा टेस्ट मध्ये असणारे प्रश्न तो अप्रत्यक्ष रित्या तुम्हाला विचारेल आणि त्यांच्या तुम्ही दिलेली उत्तरांचे तो स्वतः विश्लेषण करून त्याचा निष्कर्ष काढेल जे अर्थातच जास्त अचूक असेल. त्यामुळे या assessment चा उपयोग मुख्यत्वे आपल्याला मनोविकाराची लक्षणे आहेत किंवा मनोविकार झालेला असण्याची दाट शक्यता आहे ‘असे समजणे’ असा आहे. हे ‘समजणे’ हे अतिशय महत्वाचे आहे कारण शरीराचे आजार माणसाला अंथरुणाला खिळवतात त्यामुळे ते समजणे तसे सोपे. पण मनोविकारांचे तसे नाही. तर तुमचा प्रश्न आहे कि असा disorder आहे हे कळले तर पुढे काय? तर त्याचे उत्तर म्हणजे पुढे त्याचे psychiatrist कडून निदान करून घेणे. इथे अगदीच आर्थिक परिस्थिती खराब असेल तर free counseling करणाऱ्या संस्थांना आम्ही जोडून देतो पण त्याचा उपयोग खऱ्या गरजवंतांनीच घ्यावा अशी अपेक्षा आणि विनंती आहे. मानसिक आजारांचे उपचार सध्या खूप महाग आहेत पण त्याकडे आपण स्वतः वर केलेली investment म्हणून बघु शकतो. तर तुमच्या प्रश्नाचा दुसरा भाग आहे की ‘ नुसत्या कळण्याचा काय उपयोग?’ - हे विधान चुकीचे वाटते. आपल्याला disorder आहे हे कळणे आणि ते आपण accept करणे हे म्हणजे मनोविकाराच्या बरे होण्याच्या प्रवासातील निम्मे अंतर गाठण्यासारखे आहे. त्यामुळे केवळ कळण्याला कधीही कमी लेखू नका. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हे कळल्यामुळे अनेक गोष्टी होऊ शकतात. तुमच्या स्वतःकडून आणि कुटुंबाकडून असणाऱ्या अपेक्षा या योग्य पातळीवर येऊ शकतात आणि त्याने तुम्हाला बराच आराम मिळू शकतो. तुम्ही तुमच्या जीवन शैलीमध्ये काही बदल करू शकता. स्वतःची काळजी घेऊ शकता. तुमचे कुटुंब तुम्हाला टोमणे मारण्या ऐवजी आधार देऊ शकते. हे सर्व जर त्यांना माहीतच नसेल तर कसे घडणार? तुम्ही डॉक्टर कडे जाण्याचा निर्णय घेऊन योग्य treatment घेऊ शकता आणि स्वतःला मनोविकाराच्या दरीत अजून खोल जाण्यापासून वाचवू शकता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< ‘प्रवाहाविरुद्ध वाहणाऱ्या मायबोली वरच्या व्यक्ती ओळखण्या साठी' वगैरे ... >>

Narcissistic personality disorder ओळखण्यासाठी, तसे काही प्रश्न विचारले आहेत का?

तुम्हाला सामाजिक संकेत समजण्यात अडचणी येत आहेत का? (सामाजिक संकेत म्हणजे इतरांनी चेहरा, देहबोली, आवाजाचा टोन इत्यादीद्वारे व्यक्त केलेले संकेत किंवा भावना.

- प्रत्येकजण या प्रश्नाचे 'नाही' असेच देइल कारण प्रत्येकाच्या आपण स्वतः 'रॅशनल' असतो. तसे नसेल, तर ती व्यक्ती फन्क्शनच करु शकणार नाही .

उपाशी बोका >>Narcissistic personality disorder ओळखण्यासाठी, तसे काही प्रश्न विचारले आहेत का?>> Narcissistic personality disorder या परीक्षणात ठेवलेला नाही त्याचे कारण म्हणजे वेळेची मर्यादा. मानसशात्रीय परीक्षण हे ३०-४० मिनिटाच्या पुढे गेले कि उत्तरांची quality खालावते म्हणून सगळ्यात महत्वाचे जे disorders आहेत तेच यामध्ये ठेवले. ते सुद्धा शक्यतो शॉर्ट टेस्ट च्या स्वरूपात ठेवले आहे. आता यापुढे पाठवल्या जाणाऱ्या पार्ट २ मध्ये काही मनोविकारांचे पूर्ण परीक्षण आणि जोडीला नुसत्याच Narcissistic नाही तर सगळ्याच प्रकारचे personality disorder cover करणार आहे. एकंदरीत १०-११ प्रकारचे personality disorders आहेत (Paranoid, Schizoid, Borderline, Histrionic etc) आणि त्याच्या परिक्षणाची लांबी थोडी जास्त आहे (३० मिनिटे). त्यामुळे त्यांना स्वतंत्रपणे भाग २ मध्ये ठेवले आहे. माझ्यामते ते परीक्षण तर फारच interesting होईल कारण या दोषांच्या छोट्या मोठ्या shades आपल्या मध्ये असतातच. त्या किती कमी आहेत का जास्त आहेत हे समजायला मदत होईल. तत्पूर्वी कुठल्या टेस्ट्स जास्त योग्य आहेत आणि त्या घेणे योग्य आहे का वगैरे साठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे चालू आहे.

छान उपक्रम आहे.

मी टेस्ट घेतली. माइल्ड डिप्रेशन व probable ADHD हे निदान झाले. डिप्रेशनवर काय करता येईल?

स्वतःच्या रिपोर्ट ची माहिती आंतरजालावर जाहीररित्या देऊ नये, असे वाटते. ट्रोलिंगसाठी किंवा वैयक्तिक हल्ला करण्यासाठी, त्याचा कधी, कुठे गैरवापर केला जाईल याची खात्री नाही. (वैयक्तिक मत)

सामो >>प्रत्येकजण या प्रश्नाचे 'नाही' असेच देइल कारण प्रत्येकाच्या आपण स्वतः 'रॅशनल' असतो. तसे नसेल, तर ती व्यक्ती फन्क्शनच करु शकणार नाही .>> प्रत्यक्षात लोकांनी निवडलेल्या पर्यायांमध्ये तिन्ही options घेतलेले दिसले याचा अर्थ जगात सगळ्या प्रकारे विचार करणारे लोक आहेत असे म्हणूया आपण. पण तत्वतः मी तुमचा मुद्दा मान्य करतो जास्त करून उत्तर एकाच प्रकारचे येईल. हा प्रश्न Autism spectrum साठी आहे आणि त्याचे आढळणे तसे कमीच आहे त्यामुळे बहुतेक उत्तरे नाही असली तरी जी कोणी या spectrum वर आहेत त्यांनी हि टेस्ट घेतली तर त्यांची उत्तरे सगळ्यांसारखी नसतील.

ट्रोलिंगसाठी किंवा वैयक्तिक हल्ला करण्यासाठी, त्याचा कधी, कुठे गैरवापर केला जाईल याची खात्री नाही.>>>

करुदे… मला ह्या दोन्ही गोष्टींचा काहीही फरक पडत नाही.

पण तुमच्या मताशी मात्र सहमत.

Sadhana mam >> उपाशी बोका यांच्या मताशी मी सहमत आहे.

ADHD संदर्भात रिपोर्ट खाली आणि शेवटच्या पाना वर पण सूचना दिल्या आहेत.
तसेच रिपोर्ट मध्ये लिहिल्या प्रमाणे MILD लेवल च्या कुठल्याही मनोविकार बाबत एकाच प्रकारचा सल्ला सगळ्यांना दिला आहे. सध्या फारसे काहीच करायचे नाही कारण MILD मनोविकार हा तात्पुरत्या कारणाने पण येऊ शकतो. आणि साधारण पणे २५-३०% लोकांमध्ये तो आढळतो त्यामुळे तसा तो common आहे. मनोविकाराचा तुम्हाला स्वतःला खास असा त्रास होत नसेल म्हणजे अभ्यास / काम यावर खास परिणाम होत नसेल तर काही छोट्या गोष्टी करून बघा. म्हणजे स्वतः कडे अधिक सजग होऊन बघा, या विषयावर अधिक माहिती गोळा करा, जीवन शैली आणि विचार करायची पद्धती यात जे काही सकारात्मक बदल करता येतील ते करा. व्यायाम, प्राणायाम, relaxation, वर भर ठेवा आणि महिन्या नंतर परत परीक्षण करा.
याशिवाय वैयक्तिक रिपोर्ट विषयी शंका असल्यास तुम्ही ११ ते ६ pm या वेळेत माझ्याशी बोलू शकता फक्त मला अगोदर कल्पना द्या .. ...त्यासंबंधी चा तपशील रिपोर्ट मध्ये आहे.

स्वतःच्या रिपोर्ट ची माहिती आंतरजालावर जाहीररित्या देऊ नये, असे वाटते >>
+७८६
पण तेच ती समस्या उपाय करून सोडवली तर जरूर तो अनुभव शेअर करावा. ईतरांना मार्गदर्शन होणे नेहमीच चांगले.

Narcissistic personality disorder ओळखण्यासाठी, तसे काही प्रश्न विचारले आहेत का?
>>>>
मलासुद्धा या टेस्टबद्दल उत्सुकता आहे. बरेचदा ईथल्या टिकेमुळे मी सेल्फ चेक घेत असतो. पण त्या टेस्टमधील प्रश्न काय असावेत याची उत्सुकता आहे. त्यामुळे आता दुसऱ्या भागाची वाट बघतो. या भागात काही चिंताजनक वाटले नाही. तरी ऑनलाईन छंदाच्या नादात जागरण होते वा पर्सनल कामांकडे दुर्लक्ष होते. हे प्रश्नांना ऊत्तर देतानाच समजले. ते जरा टाळायला हवे.

खूप छान उपक्रम आहे.दोन दिवसांपुर्वी टेस्ट दिलेली आहे.अपेक्षेप्रमाणेच रिजल्ट आला आहे.बाकी खूप शंका मनात डोकावत होत्या त्या शब्दात ऋन्मेSSष यांनी मांडलेल्या आहेत.उत्तरे ही छान दिली तुम्ही.ते modarate चा अर्थ तेवढा सांगा कशा प्रकारे घ्यायचा.

जर एखाद्या व्यक्तीची वर्षानुवर्षे कोंडी झाली असेल त्याला त्याच्या भावना व्यक्त करता आल्या नसतील त्याचे कधी कोडं-कौतुक झाले नसेल,अपमान सोसावे लागले असतील,दु:ख दाबून ठेवावे लागले असेल, कायम दुसर्याची पात्रता नसताना त्याला मान द्यावा लागला असेल,खोटारडी माणसे खोटी साक्ष उभी करुन त्या व्यक्तीचे नाव खराब करत असतील ,खोट्या अफवा उठवत असतील आणी हे काम काही लोक वर्षानुवर्षे करत असतील तर अशा व्यक्तीच्या स्वभावात काय बदल होतील वीस वर्षांनी?
अशी एक व्यक्ती पाहण्यात आहे त्यांचे निम्मे आयुष्य गैरसमज दूर करण्यातच गेले.

सोना पाटील - धन्यवाद ! मनोविकाराच्या तीव्रतेचे निष्कर्ष चार categories मध्ये दिले आहेत. तीव्रतेच्या चढत्या क्रमामध्ये ते (१) मनोविकार नाही (२) MILD (३) MODERATE आणि (४) SEVERE असे आहेत. MODERATE याचा अर्थ मनोविकार या टेस्ट नुसार तरी स्पष्ट आढळला आहे आणि SEVERE म्हणजे तो चांगल्याच तीव्रतेने आढळला आहे. अनुभव असा आहे कि जेव्हा निष्कर्ष MILD कॅटेगरी मध्ये असतो तेव्हा तो तात्पुरत्या कारणाने असु शकतो किंवा प्रश्नांची उत्तरे देताना एखाद्या दोन प्रश्नांची उत्तरे जास्तीच्या बाजूला दिल्यामुळे दिसू शकतो. पण जेव्हा तो MODERATE किंवा SEVERE असा आला असेल तर त्याचे अस्तित्व निश्चितच आहे. अर्थात हे मेडिकल diagnosis नाही आणि आपण ते डॉक्टरांकडे जाऊन कन्फर्म करून घ्यायचेच आहे पण डॉक्टरांकडे जायचे का नाही अशी जेव्हा द्विधा मनस्थिती असते तेव्हा MODERATE आणि SEVERE कॅटेगरी साठी तरी डॉक्टर कडे ताबडतोब जा असाच सल्ला दिला जातो.

आज टेस्ट घेतली. अपेक्षित निकाल आला. काही ठिकाणी several days चा मराठी पर्याय काही दिवस आहे. पण मला वाटते की काही दिवस म्हणजे a few days आणि several days म्हणजे अनेक दिवस. यात पुढे महिन्यात पंधरा दिवसांहून अधिक असा पर्याय दिसला. ते बघून मग आधीचा पर्याय १५ दिवसांपेक्षा कमी असा ठेवायचा आहे असे वाटले.
Several काही अशा मोघम शब्दांपेक्षा रेंज दिली तर अजून अचूक उत्तरे देता येतील.

हो
Few डेज चा पर्याय हवा होता.

जिज्ञासा आणि मी_अनु >> तुमचे मुद्दे बरोबर आहेत. ‘काही दिवस’ हा मराठी सर्वात योग्य आहे आणि English मधील Several days ह्या पर्याया पेक्षा a few days हे जास्त योग्य झाले असते हे पण मला पटतेय. पण वर ऋन्मेSSष च्या प्रश्नाला उत्तर देताना ही मी सांगितले की Original टेस्ट हि इंग्लिश मध्ये आहे आणि तिच्यात आपण कान्हा मात्रा सुद्धा बदल करू नये असा शिरस्ता आहे त्यामुळे त्यात बदल केला नाही. कंसामध्ये आपण काही सूचना देऊ शकतो त्याचा वापर करून हे जमवता येते का ते मी बघतो. धन्यवाद!

@सोना पाटील >>जर एखाद्या व्यक्तीची वर्षानुवर्षे कोंडी झाली असेल… >> तुम्ही सांगितलेल्या व्यक्तीचे आयुष्य निश्चितच खडतर असणार आणि त्यातून मनोविकार उद्भवणे मला तर साहजिकच वाटते. डिप्रेशन किंवा anxiety किंवा दोन्ही होण्याची शक्यता जास्त वाटते. यात थोडेसे त्या व्यक्तीच्या मूळ मनःस्थिती वर पण अवलंबून आहे. जसे कि बुरुज फारच मजबूत असतील तर बाहेरून कितीही तोफेचे गोळे आले तरी तो ढासळून जात नाही. त्याउलट तो जेमतेम मजबूत असेल तर काही दिवस तग धरेल मग ढासळेल. मन आणि त्यावर येणाऱ्या संकटांचे तसेच आहे. जर ती व्यक्ती अजूनही मनाने सुद्रुढ असेल तर फारच बहाद्दर म्हणाले पाहिजे.

सर खूप खूप धन्यवाद. फारच माहितीपूर्ण आणि उपयुक्त धागा. हे खरेच आहे कि मानसिक आजारांबाबत अजून आपल्याकडे घोर अज्ञान आहे. त्यामुळे असे उपक्रम खूप स्तुत्य वाटतात आणि म्हणूनच आपल्या सूचनेनुसार मी हे माझ्या काही WHATSAPP ग्रुप्स मध्ये पेस्ट/फोरवर्ड करत आहे.

प्रतिसादांतून सुद्धा चांगली चर्चा आणि उपयुक्त मुद्दे चर्चिले जात आहेत.

मला फक्त एकच शंका विचारायची आहे, आणि हि शंका केवळ याच नाही तर अशा सर्वच प्रश्नावलीना लागू पडते ती अशी कि;
काही प्रश्नांची उत्तरे ठामपणे देता येतात, तर काहींची उत्तरे परिस्थितीनुसार वेगवेगळी असतात. उदाहरणार्थ वरती एकदोन प्रतिसादात प्रश्न येऊन गेलेत कि
१. तुम्ही समवयस्क मित्रांसोबत बाहेर जाणे पसंद करता कि घरी एकटे थांबणे?
२. लोकांसमोर एखादी गोष्ट सादर करताना धडधडते का?
केवळ उदाहरण म्हणून हे प्रश्न घेतलेत असे अजूनही काही प्रश्न असतील. यांची उत्तरे परिस्थितीनुरूप कधी "नेहमीच" तर कधी "कधीही नाही"
खरी उत्तरे अशी असतात:
१. मित्र कोण आहेत, वेळकाळ काय आहे, मूड कस आहे त्यावर अवलंबून
२. कोण लोक आहेत, काय गोष्ट करायची आहे, आपली तयारी कितपत झाली आहे त्यावर अवलंबून

तर अशा वेळी या सर्वे मध्ये नक्की काय उत्तर द्यायचे हे न कळल्याने काहीतरी उत्तर दिले जाते. त्याचा सर्वेच्या निष्कर्षावर परिणाम होऊ शकेल नाही का?

या इंटरेस्टिंग व उपयुक्त टेस्ट बद्दल आभारी आहे
मी टेस्ट घेतली
काही दुरुस्त्या
सेव्हरल या शब्दाचा अर्थ --- काही असा दिला आहे... इंग्रजी मूळ गृहित धरल्यास तो अधिक असा असला पाहिजे
सुरुवातीचे ऑन लाईन चे प्रश्न बहुतेक सिनियर सिटिझन्स ना लागू नाहीत
फोबिया चे स्पेलिंग phobia आहे

खालील उत्तरावरून या उपक्रमात गुणवत्तेस किती प्राधान्य दिले जाते हे दिसून येईल

>>>>DearV A Upadhye

Here is a report of psychological assessment you completed with us. The observations are based on your responses. The report is self explanatory however feel free to write back to us if you have any question.
Hi Santosh
Here is a report of a psychological assessment you completed with us. The observations are based on your responses. The report is self explanatory.
Feel free to write back to us if you have any question.
If you want to have ONE ON ONE meeting with us to discuss your results, please write back to us on psychologyonlinetest@gmail.com with a suitable date and any half an hour slot between 11 am to 9 pm. We will confirm and send you the link for the Google meet. This session too will be FREE.
मला हे आण्खी एक विक्री चे स्टंट वाटते

या उपक्रमाच्या वेबसाइटवर अबाऊट अस मध्ये हे वाचले
>>>Founder of Psychologytestingforall.com

Have more than 25 years of experience in IT

Retired Associate Director from Accenture, Global IT MNC

A hard core researcher,

Ph. D. in Solid State Physics from Pune University

Started career as a Sr. Scientist in ISRO

Moved to IT and worked to lead Innovation programs

5 patents in IT / communications

28 papers in International journals

Developed a psychology assessment for 'Motivation to learn'>>>
https://www.psychologytestingforall.com/about-us
यात सायकॉलॉजीची शैक्षणिक अर्हता काय आहे?
अशा प्रकारचे उपक्रम हाती घेण्यासाठी परवाना लागतो.
इतर डॉक्टरांप्रमाणे या विषयात प्रॅक्टिस करण्यासाठी अमेरिकेत तरी ३००० तास ची इंटर्न शिप आवश्यक आहे. भारतात तत्स म आवश्यकता आहे.
यांच्या कडे तो आहे का?
सावधान

माझी कन्या अशा प्रकारच्या टेस्ट कंडक्ट करते. ती सायकॉलॉजी मध्ये पीएच डी आहे. मी तिला विचारल्यानंतर तिने मला बरीच माहिती दिली.
तिने दिलेल्या आवश्यकतांच्या कोणत्याही चौकटी त या उपक्रमाचे निर्माते बसत नाहीत.
बाकी निर्णय मायबोलीकरांवर सोडून देतो;
काही संदर्भ
6) LICENSES QUALIFIED TO SUPERVISE PSYCHOMETRIC TESTING. The only professionals qualified to supervise psychometric testing are licensed psychologists, licensed marriage and family therapists, licensed professional counselors, and licensed clinical social workers who meet the requirements in sub. (5) (a) and (b).
Section MPSW 1.11 - Psychometric testing
(1) AUTHORITY. This rule is adopted pursuant to ss. 15.08(5) (b), 227.11(2) and 457.033, Stats.
(2) DEFINITION. In this section, the term "psychometric test" means a procedure for measuring psychological, behavioral or interpersonal characteristics in which a sample of an examinee's behavior is obtained and subsequently evaluated and scored using a standardized process. A person credentialed by the board may not use a testing instrument for diagnostic or assessment purposes unless he or she satisfies the requirements in sub. (5). Psychometric testing does not include a test instrument used solely to screen for problems, to assist in treatment planning, to clarify treatment goals, to plan for interventions, to monitor progress in treatment or an unstandardized questionnaire, unstructured behavior sample or a test used to evaluate performance in education or training or training prepared by a teacher or trainer.
(3) REQUIREMENTS FOR PERFORMING PSYCHOMETRIC TESTING. The competent use of a psychometric test requires that the licensee or person supervised by the licensee have the requisite knowledge, skills, training and experience needed to do all of the following:
(a) Independently select and administer tests appropriate to the practice setting and area of practice.
(b) Accurately administer, score, and interpret the test.
(c) Understand and communicate the strengths and limitations of the test appropriate to the context in and purpose for which it is given.
(d) Use culturally appropriate and sensitive instruments and norms.
(e) Analyze the results within a broad context of information about the examinee's life.
(f) Seek supervision or consultation as needed from any licensee who are authorized to perform psychometric testing under this subsection.
(4) LICENSES AUTHORIZED TO PERFORM PSYCHOMETRIC TESTING. Psychometric testing may be performed by the following individuals:
(a) A psychologist licensed under ch. 455, Stats.
(b) A licensed or training licensed marriage and family therapist, a licensed or training licensed professional counselor or a licensed or training licensed clinical social worker or a certified advanced practice social worker or independent social worker who satisfies the requirements in sub. (5) (a) and is acting under the supervision of a licensed psychologist.
(c) A licensed marriage and family therapist, licensed professional counselor or licensed clinical social worker who satisfies the requirements in sub. (5) (a) and (b).
Can anyone administer psychometric tests?
Can anyone offer psychometric testing? No, only trained professionals should offer psychometric tests. While there are free tests online, these are not the same

यात सायकॉलॉजीची शैक्षणिक अर्हता काय आहे?
अशा प्रकारचे उपक्रम हाती घेण्यासाठी परवाना लागतो.
इतर डॉक्टरांप्रमाणे या विषयात प्रॅक्टिस करण्यासाठी अमेरिकेत तरी ३००० तास ची इंटर्न शिप आवश्यक आहे. भारतात तत्स म आवश्यकता आहे.
यांच्या कडे तो आहे का?>>>>>>>>हे निकष जर कोणत्याही क्षेत्रातील उपक्रमशीलतेला त्या त्या पातळीवर लावले तर असंख्य लोकोपयोगी उपक्रम बंद पडतील. करोना काळात किंवा सध्याही घरगुती डबा देणारे एफडीए च्या जाळ्यात आणता येतील. पण तुमची भिती तर्कसुसंगत आहे. टेस्टचे निर्माते ते नाहीत. ते फक्त वाहक आहे त्यांनी फक्त उपक्रमशीलतेसाठी प्लॅटफॉर्म पुरवला आहे.त्या क्षेत्रातील तज्ञांची मदत घेतली आहे. त्यांच्या फलज्योतिष संशोधनातील प्रकल्पात मी सोबत होतो. हेतु विषयी माझ्या मनात शंका नाही. तुम्ही मांडलेल्या तांत्रिक मुद्द्यांवर विचार करायला पाहिजे हे खरे.

रेव्यु कृपया गैरसमज करून घेऊ नका आणि दुसऱ्यांचा करू नका. यात कुठलेही business interest nahi. Eka पैशाचे पण transaction nahi. पैसा हा अडथळा असतो कुठलेही मार्गदर्शन घ्यायला म्हणून मोफत session आहे असे लिहिले. बाकी काही नाही. पुढेही कुठला पैसा मागणार नाहीये हे वारंवार स्पष्ट केले आहे.
तेव्हा हेतू विषयी शंका नको.
आता येऊ technical मुद्द्याकडे. मी ह्याची practice करत नाही. Report मी analyse करत नाही. टेस्ट ने सांगितल्याप्रमाणे score करून निष्कर्ष काढणारे algorithm develop केला आहे. तो टेस्ट पण केला आहे. तो लोकांना एक tool म्हणून देतो यात माझ्या डिग्री चा संबंध येत नाही. परत सांगतो रिपोर्ट मी analyse karat नाही त्यामुळे माझ्या डिग्री ची जरूर नाही. तुम्ही ह्याची psychology practitioner shi तुलना करताय म्हणून तुमचे confusion hot आहे. पुढच्या काळात अशा technology based tools ची मदत घेणे common होईल पण आत्ता ते नवीन आहे म्हणून गैरसमज होतोय. याचा होणारा फायदा पण तुम्ही विचार करा.

Report मध्ये अगदी स्पष्ट वारंवार लिहिले आहे की हे प्रथम दर्शनी तुम्ही दिलेल्या उत्तर नुसार आलेला निष्कर्ष आहे आणि तो म्हणजे medical diagnosis नाही. त्याच प्रमाणे डॉक्टर कडे जाऊन confirmation करायचा सल्ला आहे. पण प्रॉब्लेम लक्षात घ्या की डॉक्टर कडे जाण्यासाठी आपल्याला तशी लक्षणे आहेत हे माहिती नसते. कित्येकदा लोक सावध न झाल्याने आजार बलाऊन आत्महत्या होतात. मुलांना आपल्याला concentration करण्याचा प्रॉब्लेम आहे हे समजलेच नाही किंवा low वाटते म्हणजे ते किती serious aahe he समजलेच नाही तर काय होईल? त्यांना तसे सावध करणारे माहिती करून देणारे हे tool आहे. तुम्ही दिलेले कायदे अशा ऑनलाईन tool la lagu padat nahi कारण इथे कुठलीही व्यक्ती diagnosis karat नाहिये.
लवकरच मी दोन NGO संस्था बरोबर officially tie up करतो आहे त्यात अनेक psychiatrist aahet. Hopefully tya नंतर तुम्हाला कुठलीच शंका राहणार नाही. माझी विनंती ही आहे की आपण फोन वर बोलू , अगोदर निष्कर्ष काढू आणि मग सोशल media वर मांडू. म्हणजे genuine उपक्रमाची अशी बदनामी होणार नाही. ही एक विनंती आहे.

तुम्ही दिलेल्या संदर्भातून मी point 5 कडे तुमचे लक्ष वेधू इच्छितो.
5. Psychometric testing does not include a test instrument used solely to screen for problems, to assist in treatment planning, to clarify treatment goals,

Mi जे तयार केले आहे ते एक computerised screening tool आहे आणि त्याला तुम्ही दिलेले निर्बंध लागू नाही असे हा मजकूर सांगतो. Screening tool माणसाला आपली treatment plan करायला मदत करते.
जसे मी मेडिकल diagnosis करत नाही तसे मी counselling पण करत नाही. त्यासाठी दोन संस्थांना जोडून देतो ज्या ही service लोक कल्याणार्थ मोफत पुरवतात. त्यांचे नंबर टेस्ट रिपोर्ट मध्ये दिले आहेत.

Pages