Submitted by मोहिनी१२३ on 4 June, 2022 - 06:07
यु-ट्युब वर भाडिपाची B.E. Rojgar वेबसिरीज कोणी पहातंय का? छान आहे. विषय, कलाकार, अभिनय सगळंच मस्त. दर शुक्रवारी नवीन भाग येतो. आत्तापर्यंत ३ भाग रिलीज झाले आहेत. सई ताम्हणकर छान दिसतेय;छान अभिनय करतेय. बाकी दोघेही जबरदस्त.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शेतकऱ्यांची जबाबदारी घेण्याचे
शेतकऱ्यांची जबाबदारी घेण्याचे खूप मोठे धाडस घेत आहेत अंगावर असे वाटलं पाचवा भाग बघून
सगळे भाग एकत्र बघितले. छान
सगळे भाग एकत्र बघितले. छान आहे सिरीज. स ता २६ ची वाटत नाही आणि भाषेचा लहेजाही ओरिजनल वाटत नाही. प्रयत्न चांगला केलाय. सारंग साठे एक एक पायरी पुढे जात आहे. बऱ्याच सामाजिक विषयांना एकाच वेळी समाविष्ट केले आहे. तो निवांत असतोय भाडीपाच्या कोथरूड विरुद्ध कोल्हापूरमध्ये कोल्हापूरचाच दाखवला आहे. तिथेही त्याचा हा संवाद आहे. पंकज गाढवे आवडला. पापड्याच्या गावात युवा नेता पोष्टरवर उमेश जगताप आहे असे वाटले. नकुशी म्हणजे ती गाडी चालवणारी का. एकीकडे मुली कमी झाल्या म्हणून मुलींना हुंडा देतात आणि दुसरीकडे बायकोला मारतात हे विरोधाभासी वाटले. बायको कधीच सोडून जाणार नाही याची खात्री असते का. साधी खेळण्यातली गाडी (इथे दुसरी कुठलीही इलेक्ट्रॉनिक वस्तू टाकता येईल) दुरुस्त करता येत नाही मग तुम्ही कसले इंजिनियर हे रिलेट झाले. Imb हा काय प्रकार आहे.
मला आवडली सिरिज, पापड्याच्या
मला आवडली सिरिज, पापड्याच्या गावाने काहीच्या काही नॉस्टॅलिजिक केल.
सईचे अॅक्सेन्ट मधे प्रॉबेल्म वाटला नाहि, ती मुळची सान्गलीचीच आहे, तिच पुणेरी मराठी एकायची सवय झाल्याने असेल.
सिरियल छानच आहे..पापड्या मस्त
सिरियल छानच आहे..पापड्या मस्त... सईचा अभिनय आवडला....ती मेव्हण्याची पोलिस मध्ये तक्रार करते त्यानंतर एकदम रडायला लागते..खूपच नॅचरल वाटलं ते...खरी खरी आतून रडल्यासारखी..
ती मेव्हण्याची पोलिस मध्ये
ती मेव्हण्याची पोलिस मध्ये तक्रार करते त्यानंतर एकदम रडायला लागते..खूपच नॅचरल वाटलं ते...खरी खरी आतून रडल्यासारखी..
>>>>
अगदी अगदी. मलाही आवडला तेव्हाचा अभिनय.
सईचे अॅक्सेन्ट मधे प्रॉबेल्म वाटला नाहि,
>>>>>
यालाही प्लस सेव्हन एटी सिक्स.
मला ईतके ग्रामीण अॅक्सेंटचे ग्यान नसल्याने अचूकते बाबत खात्री नाही. पण ऐकायला फार छान वाटत होता.
तसेही मी तिचा फॅन असल्याने माझ्या कौतुकाच्या मताला किंमत नसते
सुरवात केलीये बघायला. पापड्या
सुरवात केलीये बघायला. पापड्या एकदम अस्सल वाटतोय, अक्षा पण
सईबद्दल अंदाज नाही आलाय अजून.
तसेही मी तिचा फॅन असल्याने
तसेही मी तिचा फॅन असल्याने माझ्या कौतुकाच्या मताला किंमत नसते>>>
बस करा की सगलीकडे काय तेच दळण, एकतरी चांगला धागा सोडा की
चिकवा ची वाट लावून झाली, इथंही तेच
>> तसेही मी तिचा फॅन असल्याने
>> तसेही मी तिचा फॅन असल्याने माझ्या कौतुकाच्या मताला किंमत नसते>>>
बस करा की सगलीकडे काय तेच दळण, एकतरी चांगला धागा सोडा की>> नायतर काय. स्वतःचंच घोडं दामटत.
पापड्या, अक्ष्या खरे वाटतात, त्यांचा अॅक्सेंटही परफेक्ट जमलाय. सईचाच जरा ओढून ताणून वाटतो पण तिचंही काम चांगलं झालंय.
हो, सई सांगलीची असली तरी
हो, सई सांगलीची असली तरी (किंबहुना त्यामुळेच) वर्हाडी अॅक्सेंट हा तिचा मातृ-अॅक्सेंट नाही. तो मारायला तिला फार प्रयत्न करावे लागत आहेत हे जाणवतं. पापड्या सगळ्यात बेष्ट आहे. त्याचा तो मूळचाच अॅक्सेंट असणार. पुढच्या सीझनमध्ये सई नसणार असं वाटलं शेवट बघून.
सई असो किंवा नसो पण सई आणि
सई असो किंवा नसो पण सई आणि पापड्या असा लव्ह अँगल किंवा त्रिकोण नको दाखवायला. तूनळीवर लोकांनी असे प्रतिसाद दिले आहेत की वडा आणि पापड्याची केमिस्ट्री दाखवा. सारंग साठे असे काही करेल असे वाटत नाही.
सई असेलच..कारण तिघांपैकी १ ही
सई असेलच..कारण तिघांपैकी १ ही नसेल तर पुर्ण प्लॅन च फ्लॉप आहे असे शेवटच्या भागात अधोरेखित झालेय.
शेवटचा भाग अजून बघायचा आहे.
शेवटचा भाग अजून बघायचा आहे.
पण सई नसेल हे धक्कादायक आहे.
ती हवीच.
अगदीच तिच्या डेटस नसतील. दुसर्या प्रोजेक्टमध्ये बिजी असेल तर...
पण शेवटचा भाग बघून असे का वाटले हे जाणून घेण्यासाठी तो बघायची उत्सुकता वाढली.. बघावासा वाटत नाहीये तरी लगेच.. कारण मग ताटकळत बसावे लागणार पुढच्या सीजनसाठी..
शेवटचा भाग किती दिवसांनी
शेवटचा भाग किती दिवसांनी बघायचा तो वेळ क्ष मानला आणि तिथून पुढे दुसरा सीझन यायचा कालावधी य मानला, तर क्ष+य हा कॉन्स्टंट आहे. तुम्ही क्ष वाढवलात तर य कमी होईल, पण दोघांची बेरीज सेमच राहील. तात्पर्य, शेवटच्या भागासाठी ताटकळण्यापेक्षा दुसर्या सीझनसाठी ताटकळा. शेवटी ताटकळणे आपल्या नशीबी आहेच, ते काही चुकणार नाही.
शेवटचा भाग हाताशी आहे ना,
शेवटचा भाग हाताशी आहे ना, कधीही बघू शकतो हे आपल्याला माहीत असते ना, त्यामुळे ताटकळतोय असे वाटत नाही
अर्थात जास्त ताणून मजाही घालवणार नाही, बघेन या विकेंडला..
गेल्या वीकेंडला बसून सगळे भाग
गेल्या वीकेंडला बसून सगळे भाग पाहिले. छान आहे..पापड्या आणि अक्ष्या एकदम भारी! बाकी सगळी पात्रं सुद्धा आवडली. सता मला आवडत नाही पण ok. तिचा २६ वर्ष वयाचा उल्लेख नसता तर बरं झालं असतं.
२६ म्हणजे तिच्या घरच्यांच्या
२६ म्हणजे तिच्या घरच्यांच्या दृष्टीने उशीर झालाय लग्नाला हे दाखवायचे असेल.
पुढचा सिझन कधी येणार काही
पुढचा सिझन कधी येणार काही कल्पना?
लव्ह अँड शुक्ला नावाचा
लव्ह अँड शुक्ला नावाचा चित्रपट बघितला नेफिवर. त्यात पापड्या आहे छोट्या भूमिकेत.
हो का. मस्तच.
हो का. मस्तच.
सई ताम्हणकरचे काम पहिल्यांदा
सई ताम्हणकरचे काम पहिल्यांदा आवडले. कोल्हापूर साइडला मुली आलो गेलो अस बोलतात हे माहिती होत, विदर्भात पण बोलतात याची कल्पना नव्हती.
पापड्या अक्ष्या ची काम पण मस्त!
आवडली सिरीज चांगली झालीये. सई
आवडली सिरीज चांगली झालीये. सई फारशी आवडली नाही कधी पण यात आवडली. चांगला रोल केलाय तिने. तिचे दोन्ही मित्रही छान.
पण कितीही फॉरवर्ड म्हणलं आजकालच्या जमान्यात तरी दोन मुलांसोबत एकटी मुलगी एका घरात राहते हे मला तरी झेपलं नाही.
कोथरुडात असतात ना राहत ते, तिथे असं त्यांना रेंटवर राहू दिलं हे पचायला जड आहे जरा. बाकी कथा अभिनय छान.
ही पहीला भाग पाहील्यावर मला TVF pitchers चं मराठी वर्जन वाटली. त्यावरुनच inspired आहे. शेवट पण सेम.
पुण्यात राहतात असेही. त्यात
पुण्यात राहतात असेही. त्यात complications बरेचदा येत नाहीत, ज्यांच्यात येतात ते तेवढ्यापुरते करून सावरून मोकळे होऊ शकतात.
सई ताम्हणकर अस्सल विदर्भ टोन मध्येच बोलतेय. अगदी नागपूर स्टाईल नसेल पण यवतमाळ अमरावती नक्की आहे. सई ताम्हणकर इतर कुठं इतकी आवडल्याचे आठवत नाही, (तिचा usp hunterr सोडल्यास)... पण यात खूप जास्त छान ॲक्टिंग केलीय तिने.
चांगली आहे पण तिसर्या
चांगली आहे पण तिसर्या भागानंतर जरा बोर झाली. सईने चांगले काम केले आहे (फकबे... ) ते पहील्या भागात रिस्युम वाटत फिरती ते ज्यांनी ९४-९५ ची मंदी झेलली आहे त्यांना फार रिलेट होइल. पापड्या पण भारी. अक्षा नाही आवडला पण असली रडी लोकं असतात.
आम्ही २००२ साली पण रिझ्यूम
आम्ही २००२ साली पण रिझ्यूम वाटत फिरायचो.
हायला मी आणि माझा एक मित्र पण
हायला मी आणि माझा एक मित्र पण जयहिंद, बजाज, चाकण आणि नंतर तळेगाव MIDC त resume वाटत फिरलो होतो.
मुले मुली एकत्र राहणे आता
मुले मुली एकत्र राहणे आता सर्वमान्य व सर्वसामान्य आहे. त्यांच्या डोक्यात तसले काहीही नसते, पाहणारेच स्वतःला शॉट लाऊन घेतात.
सई असो किंवा नसो पण सई आणि
सई असो किंवा नसो पण सई आणि पापड्या असा लव्ह अँगल किंवा त्रिकोण नको दाखवायला. तूनळीवर लोकांनी असे प्रतिसाद दिले आहेत की वडा आणि पापड्याची केमिस्ट्री दाखवा. >>> अजिबात नको, तिघाची निखळ मस्त मैत्री दाखवलिये तर राहु दे की जरा.
सारन्ग साठेची सगळ्यात बकवास सिरिज म्हणजे ती कान्देपोहे वाली, पहिले एक दोन एपिसोड गमत म्हणून बरे वाटले पण आता मात्र आख्क्या महाराश्ट्रातली एक एक गाव निवडून पद्धतशिर अपमान करणच चालल आहे, एकतर या सिरिजला शुन्य अर्थ आहे, पुण्यातल्या मुली पुण सोडून कुठेही जात नाहीत (अगदी पिन्ची,हडपसरला सुद्धा जायला तयार नसलेल्या मुलीचे अपवादात्मक किस्से माहित आहेत , )तो त्यान्चा चॉइस आहे पण कोथरुड मधे राहिलेली मुलगी लातुरचा मुलगा बघणार नाहिच हे नक्की.
मुले मुली एकत्र राहणे आता
मुले मुली एकत्र राहणे आता सर्वमान्य व सर्वसामान्य आहे. >>> ते शहरातल्या मॉड लोकांसाठी कॉमन आहे पण खेडेगावातून शहरात शिकायला आलेली तरूण मुलगी एकाच घरात २ मुलांसोबत राहते, हे मला ही झेपलं नाही. तिच्या घरच्यांना झेपणं तर अशक्य वाटतं.
एकतर या सिरिजला शुन्य अर्थ
एकतर या सिरिजला शुन्य अर्थ आहे, पुण्यातल्या मुली पुण सोडून कुठेही जात नाहीत>>> अगदी अगदी. काही एपि. बरे आहेत पण बाकी पाणी घालून पातळ केल्या सारखे आता काहीही चालू आहे कोथरूड वर्सेस ...मधे.
खेडेगावातून शहरात शिकायला
खेडेगावातून शहरात शिकायला आलेली तरूण मुलगी एकाच घरात २ मुलांसोबत राहते, हे मला ही झेपलं नाही. तिच्या घरच्यांना झेपणं तर अशक्य वाटतं.
>>>>
हो खरेय, लॉजिकल वाटत नाही ते ज्या बॅकग्राऊंडमधून आलेले दाखवले आहेत ते पाहता.
त्यातही मुलगा मुलगी एकत्र लिव्ह ईन रिलेशनमध्ये राहणे वेगळे. पण नुसते मित्र मैत्रीण म्हणून एका घरात राहणे हे किती ठिकाणी होत असावे प्रश्न आहे. त्यातही मुलगी एकच असताना. तिला कोणा मैत्रीणीची सोबत नसताना.
Pages