B. E. Rojgar

Submitted by मोहिनी१२३ on 4 June, 2022 - 06:07

यु-ट्युब वर भाडिपाची B.E. Rojgar वेबसिरीज कोणी पहातंय का? छान आहे. विषय, कलाकार, अभिनय सगळंच मस्त. दर शुक्रवारी नवीन भाग येतो. आत्तापर्यंत ३ भाग रिलीज झाले आहेत. सई ताम्हणकर छान दिसतेय;छान अभिनय करतेय. बाकी दोघेही जबरदस्त.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कळलं ना,
शेवटी ऋन्मेष म्हणतो तेच खरं>>> काय! बरं

पहिले तीन एपिसोड्स बघितले. आवडले. पापड्या सर्वात जास्त आवडला. सई ताम्हणकर आणि त्या अक्षयनेपण मस्त केलंय काम.
सईचं character बंडखोरच दाखवलं आहे त्यामुळे ती मित्रांसोबत राहते हे खटकलं नाही. घरी आवडणार नाही हे तिलाही माहिती आहे त्यामुळे तिने घरी सांगितलेलं नसतं.

घरच्यांपासून किती तरी मोठ्या गोष्टी लपवून पुण्यात शिकायला रहात असलेल्या मुली पाहिलेल्या आहेत. (मुलंही असतीलच) त्यामुळे यात काही आश्चर्य नाही.

कोथरूडचा उल्लेख आहे का कुठे एपिसोड्समधे? आणि जरी कोथरूड म्हटलं तरी अख्ख्या कोथरूडमधे सगळीकडे टिपिकल पारंपरिक मनोवृत्तीच्या माणसांच्या सोसायट्या असतील असं काही नाही. ह्यांचा घरमालक तर स्वतःच लफडी करणारा आहे. (तो नट जरा अजून कुर्रेबाज घ्यायला हवा होता. सुरुवातीसुरुवातीला अगदीच पोऱ्या वाटला. नंतर जरा 'पोचलेला' वाटला. )

RTO खडकी आणि त्याभोवती केलेला गोल बघून फरासखाना पोलीस चौकी हे नाव आणि अशीच एक आठवण जागी झाली Lol

काल एक मोठा प्रतिसाद लिहिलेला पण बहुतेक सेव्ह केलाच नाही.

मी पहिला एपिसोड बघितला या सिरीजचा, मस्त होता.

मुलं मुली एकत्र राहतात आणि त्यांच्यात फक्त निखळ मैत्री नातं असु शकते हे दिल दोस्ती दुनियादारीने पटवून दिलेलं आहे, फक्त तिथे मुलं मुली सम प्रमाणात होते, इथे अजून एखादी मुलगी हवी होती का, उगाच वाटलं. अर्थात फार वावगे वाटलं नाही तरी माझ्या अपत्याबाबत मी असं पचवू शकले असते का हे खरंच सांगता येत नाही त्यामुळे तिच्या बाबांना जे वाटलं ते काही चुकीचे होतं असं वाटलं नाही.

तिघेही एकत्र राहणारे मला ज्येन्यूईन वाटले, तसे त्या बाबांनाही वाटले असावेत त्यामुळे नंतर ते शांत झोपले असावेत, काळजी कमी झाली असावी.

दुसरा भाग जाम बोअर होता, थोडा अग्लीही वाटला, त्या owner मुळे .

सई मला नेहेमीच साधी, सिम्पल जास्त आवडते. तशी ती आहे यात. एरवी नाही आवडत फार.

मेन तिघांनी छान अभिनय केला आहे.

Pages