माझा न पिताच तळीराम होतो

Submitted by नितीनचंद्र on 26 June, 2022 - 11:46

मला जरा ताप येतो आहे. मीना म्हणाली बघु म्हणुन तीने मनगटाला हात लावला.
जरा सोयीचे म्हणुन तीला ते बरे वाटले असावे.

शेजारीच आई होती. माझ मातृप्रेम म्हणाल, अशी प्रतारणा करू नकोस.
आई आणि बायको सोबत संसार करताना ही काळजी मी घेतो.

मी आईला म्हणल तु या हाताला हात लाऊन पहा.

( नशीब दोघींना गळा धरावा असे सुचले नाही .... )

आईच मत पडल ताप नाही.
मीनाच मत पडल ताप आहे.

न पिता माझा तळीराम झाला. मी म्हणालो मग कुणाचे औषध सुरू ठेऊ ?

वैद्यांच की अॕलोपॕथी डाॕ च.

आई आणि बायको सोबत एकाच घरात दोघीच्या दयेने रहायचे म्हणजे मी असे काही करतो.

आई तिच्या आयुष्यातील सर्व अनुभव एकवटून म्हणाली "अॕलोपाथी."

मीना फारच लालची ती म्हणाली "दोन्हीही घे."
काय घ्यायच हे आपल्याला माहित असत पण विचारल नाही अस नको म्हणुन मी हे केल.

मी हसु लागलो. तशी आई डोळे मोठे करून म्हणाली "हसायला काय झाल ?"

( मी आजोबा झालो आहे हे आई विसरते. अजुनही कधी कधी ओरडते. तिचा हक्क आहे. )

मी म्हणालो एकच प्याला मधल्या तळीरामाची आठवण झाली.

"इतक काही झाल नाहीये. नाना ( माझे वडील ) शेवटचे खुब्याचे हाड मोडून आजारी
असताना त्यांना पाया सुप देण्याची टुम याने काढली होती." बायकोकडे पहात आई म्हणाली.

"असल काही तर सुरू नाही ना आजारपणाच्या नावाखाली."

मातोश्रींनी अस्त्र बाहेर काढले.

"पण नाना पाया सुप तर घेईन म्हणाले होते. ही योजना आमलात येण्यापुर्वी ते गेले हा भाग वेगळा ." मी म्हणालो

"ते गेले हे वाईट पण नाहीतर त्यांच हाड बाटवल असतस त्यांच." आई रागाऊन बोलली

( जुन्या गोष्टी आईला बरोब्बर आठवतात आणि कशाचा तरी संबंध कशाशी तरी जोडून ती मोकळी होते )

"नशिब तुला नेहा च लग्न सारस्वतांकडे करू का या बाबतीत सल्ला विचारला नाही. नाहीतर अजुनही जोडे झिजवत राहीलो असतो."
मी आई कडे न पहाता हळू पुटपुटलो.

माझ्या मुलीचे लग्नाचे सीन आठवून मी गप्प राहीलो. मीना जरा हो नाही करत होती पण मुलीच्या चॉईसवर मी ठाम होतो.

( माझी बायको पक्की यजुर्वेदी कानडी देशस्थ जे पाणी पण धुवून पितात; मी निर्णयाचे वेळी खिशात घातली पण याबाबतीत असे मी मनात म्हणालो )

तुम्ही वाचले तरी मीनाजवळ बोलू नका.

आजार पणात तो ही क्षण कसा घालवावा हे नव्याने शिकलो.

आई आणि बायको यांच्या सोबत एका घरात रहाणे सोपे नाही आणि कठीण नाही तुम्हाला आई व बायको कशा लाभतात यावर ९०% गोष्टी अवलंबुन आहेत. पार्टनर नावाच्या कादंबरीत वपुंनी केलाय उहापोह पण हा खरा कुणीतरी पी एच डी करायचा विषय आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

<<<आई आणि बायको यांच्या सोबत एका घरात रहाणे सोपे नाही >>>>
हा समतोल जर मुलाला / नवर्‍याला साधता आला नाही तर कोणातरी एकीचे आयुष्य अक्षरशः उध्वस्त होते... खूप उदाहरणे आजुबाजूला पहाते आहे.