भाग्य दिेले तू मला

Submitted by माझेमन on 13 May, 2022 - 09:04

एक (मालिकेतील) परंपरा जपणारी मुलगी, यशस्वी आणि परंपरांचा सन्मान करणारी उद्योजिका आणि तिचा यशस्वी पण खडूस मुलगा यांची ही कहाणी आहे असं वाटते.
नायिका कोकणातली आहे. तिची आई स्वर्गवासी झालेली आहे. वडीलांची आर्थिक स्थिती कमजोर आहे. त्यांच्या घरावर कर्ज असल्याने ती मुंबईत नोकरी करायला आलेली आहे व उद्योजिकेचा जो काही उद्योग आहे त्यात ती काम करते. सिरिअल अधून मधून बघत असल्याने नक्की कसला उद्योग आहे ते कळले नाही. नायकही त्याच उद्योगात असतो आणि त्याची आई प्रॅक्टिकल निर्णय घेत नसल्यामुळे त्याचे आईशी अधुन मधुन खटके उडत असतात. साधी रहाणी असल्यामुळे आपल्या नायिकेवर उच्च विचारसरणीची जबाबदारी आलेली आहे. शिवाय तिची आर्थिक स्थिती सामान्य असल्याने मालिकावाल्यांच्या नियमाप्रमाणे ती स्वभावाने चांगली असणार. नायक खडुस असल्यामुळे त्याला माणसात आणण्यासाठी तिला पुढे खूप स्कोप मिळेलच.

बाकी एकत्र कुटुंब, कुटील कारस्थाने करणारी नातेवाईक मंडळी, मॉडर्न दिसणारी आणि त्यामुळे खलप्रवृत्तीची ठरेल अशी सून, तिचे कान भरणारी आई, बायकोपुढे काही न बोलणारा नवरा वगैरे स्टिरिओ टाईप्स ठासून भरलेले आहेत.

निवेदिता जोशी (उद्योजिका) सोडल्यास इतर कलाकारांना मी ओळखत नाही. 'अजुनही बरसात आहे' मधील मनू इथे एका साईड रोल मधे आहे.

तर चला घेऊ रसास्वाद 'भाग्य दिले तू मला' या मालिकेचा...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एखादीला महत्वाचे काम असेल तर ते सोडून केवळ त्या दिवशीचे भरीत आपल्याऐवजी मैत्रिणीने केलेले आहे हे समजू नये म्हणून मीठ घालायला यायचं, धन्य .

हो छान आहे. तिचा मेकअप मात्र जाम डोळ्यावर येतो. विदाऊट मेकअप बहुतेक छान दिसेल.

काकु राजशी बोलताना सरळ कधीच का बोलत नाहीत, कायम आगाऊ मोड मधे.

अजून एक म्हणजे आता नि जो नसेल का काही दिवस इथे किंवा कलाकार बदलतील. झीवाले अशोकमामा, नि जो परत लग्न लावायला निघालेत ना. मग नि जो तिथे बिझी असेल.

काकू सारखी माझी आई व आईला समजून घेण्यावर लेक्चर देत असते. तिचे तिच्या सावत्र आईशी काहीच नाते नाही वाटते. ती आईही चांगलीच वागते ना. मग इतकी 'समजूतदार व संस्कारी' कावेरी तिच्याशी फारशी बोलतही नाही. मावशी म्हणून रत्नमालाच्य मात्र गळ्यात पडत असते. हे जरा पटायला कठीण आहे.

झीवाले अशोकमामा, नि जो परत लग्न लावायला निघालेत ना. >>> खरं की काय?

त्या प्रोमो मध्ये मृण्मयी बिनामेकप आहे का. आयब्रो पण केले नाहीयेत बहुतेक. ती एकटीच जाहिरात करतेय. बाकीचे वराती कुठे आहेत.

तो राज स्वतःसाठी टीशर्ट मागवतो, हिचं काय जातं, लगेच टोमणे.

तो पिझ्झा मागवतो, लगेच लेक्चर, जाम भोचक आहेत काकू.

आज नि जो ची पिठलं रेसिपी बघायला मिळाली.

तो राज स्वतःसाठी टीशर्ट मागवतो, हिचं काय जातं, लगेच टोमणे. >> अगदी अगदी.. मलाही कळेना. हा घर सोडून आलाय, कपडे नाहीयेत मग मागवणारच ना एक्सट्रा कपडे. हिचे पैसे थोडेच वापरतोय आणि ही पण मैत्रिणीकडे राहते ना. किती बोलते त्याला.

पिठलं रेसिपी नाही पाहिली. पूर्ण एपिसोड मला दिसतच नाही इथे.

कालचा एपिसोड पाहून काही बेसिक प्रश्न पडलेत.

नोटीस पिरीअड नसतो का त्यांच्यात राजीनामा दिल्यावर?

राज घर सोडून का आलाय? म्हणजे काकूने उकसावल्यामुळे राजीनामा दिलाय ते ठीक आहे. पण स्वतःला सिद्ध का करायचंय त्याला? तसंही तो फार प्रोफेशनली बिझनेस चालवत होता ना? आणि नवं काम घरात राहूनही करू शकतो ना? नोकरी गेल्यावर लगेच काही कुणी घरातून बाहेर काढत नाही.

आणि सुसंस्कारी काकू एका तरूण मुलाबरोबर फ्लॅट शेअर करतात? संस्कृतीचा जप करणार्या रत्नमालाबाईंनाही यात वावगं वाटत नाही. आश्चर्य आहे…

दिवंगत आईची साडी दुसर्याने चुकून जाळली तर एखादी मुलगी इमोशनल होईल. नंतर भांडेलही कदाचित. पण सुरूवातीला तर नक्कीच वाईट वाटेल तिला. इथे तिला राजला बोल लावायला मिळतोय याचाच आनंद झाल्यासारखी वागतेय.

काकूला राजला कंपनीत परत आणायचं आहे तर त्याच्या कलाने नको वागायला? अपोझिट्स अट्रॅक्ट दाखवण्यासाठी प्रत्येक बाबतीत भांडण दाखवायची गरज नाही. जेन ऑस्टेन परत एकदा वाचून काढा.

ते काकूने विचारलं की ‘जेवण म्हणून पिझ्झा कोण खातं?’ तर फिस्सकन हसूच आलं. एकदम ऋजूता दिवेकरसारखं पारंपारिक जेवणच कसं आपल्याला सुट होतं वगैरे वगैरे. ऋदि पण कधीतरी पिझ्झा वगैरे चालेल असं सांगते.

पिझ्झा वर्सेस पिठलं मेंटॅलिटीतून बाहेर या सिरीअलवाल्यांनो. माणसं बायनरी नसतात. पिझ्झा, पिठलं, चायनीज, जॅपनीज एकाच वेळी आवडू शकतं माणसांना. काही बाबतीत पारंपारिक, काहीत आधुनिक असू शकतात.

बाकी काल वैदेहीने दोघांना झाडलं ते एक नॉर्मल वाटलं. तिचं वागणं, कपडे आत्ताच्या काळातले वाटतात.

मधे कुठल्यातरी एपिसोडमधे निजो काकूला राजला उठवायला सांगते तर अगदी कानावर फुलाने गुदगुल्या करून उठवते. एखाद्याचा हात किंवा खांदा हलवून किंवा फोनचा गजर मोठ्याने करून उठवता येत नाही का?

राज च्या काकाने रंग दाखवायला सुरुवात केली। आधी वाटले होते कि हा नुसता मान डुलवायला आहे कि काय पण गोगल गाय आणि पोटात पाय।

ह्या काकुच्या एक मुस्कटात द्यावीशी वाटली आज, मी voot वर बघितला एपिसोड. आधीचा नव्हता बघितला. एकतर हिने संस्था वेरीफीकेशन नीट नाही केलं, वीस लाख घालवले रत्नमालाचे आणि वर राज बरोबर म्हणतोय त्याच्या काकाबद्दल तर एवढं तोंड सोडलं की बास रे बास. नाती जपण्यासाठी फसवणुक करून घ्यायची का रत्नमालाने. नाती जपण्यावरच लेक्चर झोडत बसली राजला. राजने म्हणायला हवं होतं, तुझ्या नीट काम न करण्यामुळे आमचे पैसे गेले काकाच्या खिशात. ती रत्नमाला एक मूर्ख आणि ही काकु दहा मूर्ख.

बरं तो चेक स्टॉप करता येतोना, मोठा चेक असेल तर बँकेकडून फोनही येतो. रत्नमालापण किती सहज घेते वीस लाख रुपये फसवणुक.

काकू त्याला म्हणते की नाती जपणारी माणसांची किंमत नसेल तर कशाला राहतय आमच्या घरात ? हे हिचे घर कधीपासून झाले? वैदेहीच्या कृपेने ही पण राहते आहे ना? मग कोणत्या अधिकाराने ही त्याला म्हणतेय. काहीही.. इतका अपमान झाल्यावरही राज तिथेच राहतोय.

आज दुपारी बराच वेळ दाखवत होते. वर उल्लेख केलेले काही प्रसंग बघितले. कावेरी का सारखी त्याच्या आयुष्यात नाक खुपसते, जगा आणि जगू द्या ऐकलं नाही का कधी. माझी आई म्हणते ती त्याची काकू कशी लागते Lol वैदेहीला तो आवडतो बहुतेक. राज नेहमीच बरोबर वाटतो. या मूर्ख बायकांनी पिठलं भाकरीच बनवावी. राज काही श्रीमंत दिसत नाही पण. मध्यमवर्गीय वाटतो. ते वीस लाख प्रकरण नाही बघितले. संस्थेचे लोक घरी येतात आणि काका सगळी उत्तरे देतो ते बघितले.

काकू आणि निजो आता मात्र डोक्यात जात आहेत.
राज म्हणतो त्याप्रमाणे सुदर्शन आणि कंपनीने निजोला नुसतच लुबाडल नाही तर रस्त्यावर आणल पाहिजे
राज आणि वैदेही ही जोडीच जमली पाहिजे
आणि या काकूलाच घरातून हाकलल पाहिजे.

आजच्या भागात संस्कृती आणि परंपरा रक्षण करणाऱ्या रत्नमाला बाई(निजो) चप्पल घालून मुलाचे औक्षण करत होत्या

वैदेहीपण तेच तेच ड्रेसिंग करते आणि तेच तेच डायलॉगज. ती ही नाही आवडत. फक्त राज आवडतोय हल्ली मला, बाकी डोक्यात जातायेत. ती राजची चुलत बहीण बरी वाटते, भाऊ चांगला पण कणाहीन आहे.

राज एवढा मोठा उद्योजक असतो पण त्याला स्वतःचा वाढदिवस लक्षात नसतो, त्याला रात्री बारा वाजता कोणी फोन करत नाही, भेटायला येत नाही. सकाळी उठून तो विचारतो आज काही सण आहे का जेव्हा की समोर हैप्पी बड्डेची चमचमती पट्टी टांगलेली असते. तिच्या पायाला लागलेलं असतं तेव्हा तिला स्वयंपाकघरात घेऊन येतो आणि सांगतो खायला बनव काहीतरी Proud आता काकू दारू पिऊन गोंधळ घालणार आहेत चांगले दोन भाग, न बघितलेलं बरं. अरे हो, कावेरीच्या पायाला लागल्यामुळे ती ऑफिसला जात नाही, इथपर्यंत ठिक आहे पण निजो तिला स्वतः फोन करते की आज अजून आली का नाहीस. तेव्हा मॅडम सांगतात की दुपारी येते मी ऑफिसला. आम्हाला पंधरा मिनिट उशीर होणार असेल तरी कळवावे लागते. निजोलाही काहीच वाटत नाही, ती सारखी काळजी घे असे सांगत राहते कावेरीला. झीच्या मालिकेतली ऑफिस हा टिंगल करण्याच्या पलीकडचा विषय आहे. तिकडे रेशीमगाठमध्ये नेहाला एक आठवडा मुंबई शाखा सांभाळायची आहे, शिक्षा म्हणून. जगप्रसिद्ध यशच्या घरात नेहाचा आधीचा नवरा घुसतो, ड्राइवर म्हणून गाडी चालवतो (ती घरातली गाडी नाही, खरी रस्त्यावरची गाडी) पण कुणाला संशयसुद्धा येत नाही. कसली डोंबलाची सिक्युरिटी.

हाहाहा.

महान आहेत सर्व सीरियल्स.

परवा मनू आणि काहीतरी नावाच्या सरड्यासारख्या दिसणार्या पालींचा एपिसोड पाहिला. ठाणेकरांनी मेंटल असायलममधे जागा असल्यास कळवा. लेखक दिग्दर्शकाला स्वखर्चाने भरती करावं म्हणतेय.

सध्या चालू असलेला ट्रॅक :- वैद्यही गोव्याला गेलीय बोका आणि काकू रूम शेअर करत आहेत। मोठ्या काकूंचे (निजो ) चे पावसाळी चहा मसाले (तुळशी , अश्वगंध आणि काही बाही घातलेले ) लॉन्च होणार आहेत। शंभर माणसांचे युनिट असलेले माहेरचा चहा ज्याचा करोडोंचा टर्नओव्हर आणि अनेक फ्रॅन्चायजी आहेत मात्र सिक्युरिटी च्या नावाने बोंब आहे .
घरातील कारस्थानी लोक मोठ्या काकूंचा कायमचा बंदोबस्त करायच्या मार्गावर आहेत. काका, सुनेला अंमली पदार्थ पावसाळी मसाल्यात मिसळायला सांगतो आणि ती ते काम चोख बजावते। मोठ्या काकूंना पोलीस पकडून नेणारच असतात तेव्हा बोका अटकपूर्व जामीन घेऊन येतो . आता विसराळू मामा, छोट्या, मोठ्या काकू केस सॉल्व करत आहेत कि हे सर्व कोणी केले

काका, सुनेला अंमली पदार्थ पावसाळी मसाल्यात मिसळायला सांगतो आणि ती ते काम चोख बजावते। >>> कायच्या काय! मला हा मूर्खपणाच वाटतो. अशाने कंपनीची बदनामी होऊन एकूणच सेल्स कमी नाही का होणार? मग ती लॉसची कंपनी घेऊन काय करणार हे व्हिलन लोक? त्यापेक्षा आता तो मुलगा जॉईन झाला आहे त्यालाच पुढे ती कंपनी कशी मिळेल हे पाहावे. उगीचच काहीही दाखवत असतात.
रच्याकने तो आदित्य याआधी काही दुसरा काम धंदा करत असतो का ? निजोने म्हटल्याबरोबर कंपनीत आलाही लगेच.

राज आता त्या वैदेहीला लीड करत आहे पुढे जाऊन कावेरीशी लग्न झाले कि हिला म्हणेल की आपली फक्त मैत्री होती. मग ती नेगेटिव्ह होणार.सो प्रेडीक्टबल

रच्याकने तो आदित्य याआधी काही दुसरा काम धंदा करत असतो का ? निजोने म्हटल्याबरोबर कंपनीत आलाही लगेच.
>>> दुसरीकडे जॉब करतो, त्याला या बिझनेसमधे नाही इंटरेस्ट पण राजने सांगितलं आहे, तू तिथे मदतीला जा. बाकी तिघांना राज आणि आदीत्य ओळखून आहे, तो रामाचा भरत म्हणून गेलाय तिथे, हाहाहा.

पोलिसांनी सगळं तपासलं... त्यांच्या अनुभवी नजरेतून महत्वाचे दुवे सुटले...
नेमकं हिरविन ला तो वेगळा बॉक्स दिसला अन हिरो ला cctv मधला घोळ लक्षात आला...

कायच्या काय! मला हा मूर्खपणाच वाटतो. अशाने कंपनीची बदनामी होऊन एकूणच सेल्स कमी नाही का होणार? मग ती लॉसची कंपनी घेऊन काय करणार हे व्हिलन लोक? >>>>>प्रॉफिट वाली व नावाजलेली कंपनी पेक्षा त्यांना मोठ्या काकूंना खालीपणा व माहेरचा चहा मधून तिचा पायउतार आणि त्या घारोटी सुनेला राजबंदरच्या खुर्चीवर कसे बसायला मिळते हे बघण्यात धन्यता आहे। बाकी काका चांगलाच कावेबाज आहे।

हल्ली मराठी सिरीयलमधे घरातलेच इतके क्रुर व्हिलन असतात की बाहेरच्यांची गरज नसते.

रत्नमालाबाई एवढी मुर्ख आहे, दिर निरागस वाटतो तिला, तो संस्था मदत घोटाळा त्याने केला होता तरी.

असे लाखो रुपये घालवले, ड्र्ग्ज वगैरे ठेवलं तरी शिक्षा काय तर एक मुस्कटात. ड्र्ग्ज अपराध काय असतो हे तरी माहीतेय का बाईसाहेबांना, तुरुंगात खितपत पडली असती ती स्वतः .

दोन्हीवेळा ह्या काकुंनीच तोंडघशी पाडलं आहे बाईंना. एकदा, संस्था नीट चेक केली नाही आणि नंतर सानियाला फुड टेस्टींगला लोक्स कधी येणार ते सांगुन,

Pages