पुरुषाच पितृत्व

Submitted by माधुरी बर्गे on 20 June, 2022 - 03:03

बाळाची पहिली चाहूल लागल्या पासून आई त्या इवल्याशा जीवा शी जोडली जाते. गर्भात हुंकार घेणारा तो अंकुर तिच्या शरीरात आमूलाग्र बदल घडवतो. तिच्या रक्तात वाहणारी संप्रेरक तिच्या भाव विश्वात मातृत्वाच्या असंख्य लाटा निर्माण करतात.. स्वतःच्या रक्ता मांसांचा तो गोळा तिच्या स्वप्नाचा चेहरा मोहरा घेऊन जेंव्हा तिच्या कुशीत पहिल्यांदा येतो तेंव्हा आयुष्यातील सर्वोत्तम सुखाचा अनुभव आई घेते. या मातृत्वाच्या अविष्कारा मध्ये निसर्गाने तिला भरभरून मदत केलेली असते. तिच्या शरीराच्या गाभ्याच अधिष्ठान असल्याने बाळा साठी तिच आई पण किती नैसर्गिक आहे...
त्या मानाने निसर्गाने वडिलांच्या बाबतीत अन्याय केला आहे.. बाळाची चाहुल लागली की, ना त्याच्या शरीरात काही बदल होतात ना कुठले हार्मोन्स तयार होतात.. तरी मग जेंव्हा बाळाला पहिल्यांदा हातात घेतल्या वर त्याच्या चेहऱ्यावर जे दिसत, डोळ्यातून जे वाहत ते मला स्वर्गीय वाटत.. कुठल्या ही प्रसंगी चेहऱ्या वरची रेष हलू न देणारे वडील लेकीच्या नुसत्या खरचटलेल्या हाता कड़े बघून कासाविस होतात तेंव्हा मला त्यांच्या आत पितृत्वाच्या उठणाऱ्या उमाल्यांच खुप अप्रूप वाटत.
पोटात नऊ महीने सांभाळून आयुष्यभर तिच्याशी असलेली आपली नाळ घट्ट जपणारी आई ही निसर्गाची देणगी असली तर मुलांसाठी असंख्य लाटा अंगावर झेलून दगडावर पाय रोवून दीपस्तंभा समान खंबीर पणे उभे असणारे वडील मला दैवी देणे वाटतात .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तरी मग जेंव्हा बाळाला पहिल्यांदा हातात घेतल्या वर त्याच्या चेहऱ्यावर जे दिसत, डोळ्यातून जे वाहत ते मला स्वर्गीय वाटत..
>>>>>

+७८६

छान लिहिले आहे. पटले.

माझे लग्न झाले नव्हते आणि मित्राचे झाले होते एक लहान मुलगी त्याला होती.
मी त्याच्या घरी गेलो भेटायला .तेव्हा त्याची ती लहान मुलगी continue रडत होती आणि हा तिला शांत करायचा प्रयत्न करत होता.
अगदी चेहऱ्यावर बिलकुल त्रासिक भाव नाही.
अगदी आनंदाने..
मी त्याला बोललो .किती रडते ही त्रास नाही वाटत का?
तेव्हा त्याने उत्तर दिले होते..
ते तुला बाप झाल्यावर च समजेल.
आणि खरेच मला जेव्हा मुलगा झाला तेव्हा माझ्या मनात पण त्याच्या सारख्या च भावना होत्या .
त्याचे रडणे बिलकुल त्रासदायक वाटत नव्हते.
पुरुषाचा बाप झाल्यावर आणि स्त्री ची आई झाल्यावर.
खुप मनसिक बदल होतो.

तरी मग जेंव्हा बाळाला पहिल्यांदा हातात घेतल्या वर त्याच्या चेहऱ्यावर जे दिसत, डोळ्यातून जे वाहत ते मला स्वर्गीय वाटत..>>>>>

खरयं..

त्याचे रडणे बिलकुल त्रासदायक वाटत नव्हते.>> असं काही नसतं. जेव्हा आपण खूप दमलेलो असतो, दुसरं काहीतरी महत्त्वाचे काम असते तेव्हा आपल्या मुलाचे रडणेही त्रासदायक वाटते. पण हे मूल सर्वस्वी माझ्यावर अवलंबून आहे, त्याच्या रड्ण्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर त्यातून काहीतरी मोठी समस्या उद्भवू शकते ह्या जबाबदारीची जाणीव होऊन आपण आपला त्रास बाजूला ठेवतो, दुर्लक्ष करतो. आणि मुलाच्या समस्या सोडवतो, त्याला शिस्त लावतो. कोणत्या गोष्टीसाठी किती प्रमाणात रडायचं हे त्याला शिकवतं जातो. जसंजसं मूल शिकतं, समंजस होतं तसंतसं ते रडताना झालेला त्रास आपण विसरतो, त्या त्रासाचे आनंदात रुपांतर होते. आणि पुढे जाऊन आपल्याला त्या पालकत्वामधला फक्त आनंद लक्षात रहातो.
पण मुळात त्रास होतचं नाही असं काही नसतं. पालक झालं की एका क्षणात काही जादूची कांडी फिरत नाही. पालकत्व ही एक मोठी प्रोसेस आहे. ती आपल्याला हळू हळूच उमगत जाते, जमायला लागते.