पुनर्जन्म

Submitted by केशवकूल on 14 June, 2022 - 12:27

“चला चला. वेळ झाली.”
किती छान झोप लागली होती. लोक झोपू पण देत नाहीत.
अंधाऱ्या भोगद्यातून प्रवास. ए धक्का देऊ नकोस. कुणीतरी ढुंगणावर चापट्या मारत होता. डोळे उघडले तर लख्ख प्रकाश! एलइडी लॅंप हं.
मागच्या खेपेला कंदिल होता. गावातली सुईणबाई होती. आता पांढरा शुभ्र पोषाख केलेली नर्स बाई. प्रगति आहे.
अरे बापरे! म्हणजे पुन्हा सगळे नशिबी आले. गमभन, पाढे, व्हफा, मॅट्रिक, नोकरी, लग्न, मुलेबाळे, हगेरी मुतेरी, त्यांचं शिक्षण, त्यांची लग्नं, त्यांची मुलेबाळे, त्यांची लग्नं, त्यांची मुलेबाळे, त्यांची लग्नं, त्यांची...
ओ, शिट! रडू आवरेना. .
“सुलोचनाबाई, अभिनंदन. मुलगा...”
“काय पण वेडे विद्रूप टकलू माकड.”
“अगं अस का बोलतेस...”
“अहो असच बोलायचं असतं. नाहीतर आपलीच दृष्ट .. देवाने पदरात टाकलेय...”
“पहा, गुलाम हसतोय कसा.”
हसू नाही तर काय करू, माते?
म्हणे देवाने पदरात टाकलेय! मजा तुम्ही करा आणि फाडा देवाच्या नावाने पावत्या. एवढे घोडे झाले तरी ह्यांना अजून माहित नाही मुलं कशी होतात. काय तर म्हणे देव देतो!
"नर्सबाई, नाष्ट्याला काय आहे?"
"पोहे! वरून काय टाकू? पातळ चटणी का शाम्पल का आपलंं सांबार?"
"हायला, पुन्हा पुण्यालाच आलो वाटतय!"

(चित्र विचित्र कथांसाठी माझा ब्लॉग इथे आहे.)
(https://iammspd.blogspot.com)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवटचे पोहे!
कॉमी, मी आपला आभारी आहे.
-----------केशव कुलकर्णी

हाहा
असा विनोद मागेही ऐकलेला. त्यात दुसरे शहर होते आणि काहीतरी वेगळा खाद्यपदार्थ होता. तिथला स्पेशल.. पुण्याचा पोहे सांबार आहे हे माहीत नव्हते.

माझा कल्चरल शॉक!
मी फक्त पुण्यातच बघितले कि पोह्यावर "सॅंपल मारके " पोहे खातात. त्यापेक्षा सरळ "सांबार भाथ" का खात नाहीत?