टॉप गनः विमाने, टॉम कृझ, बाइक्स, लेदर जॅकेट्स, डेंजर झोन, कॉल साइन चार्ली, वॉच द बर्डी, गुड नेस ग्रेशस ग्रेट बॉल्स ऑफ फायर!!!
१९८६ मध्ये चित्रपट आला तेव्हा लगेचच लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान झाला. एक प्रकारे अमेरिकन नौदलाची, नौदलातील वैमानिकांच्या नोकरीची जाहिरातच म्हणत असत. आजही ह्या चित्रपटाला एक कल्ट फॉलोइन्ग आहे. भारतातही फॅन्स आहेत.
टॉम कृझने डोक्यात प्रचंड भावनिक गोंधळ असलेला, नियम पाळणे आजिबात अवघड वाटतात ह्याला; व वरिष्ठांबद्दल आजिबात आदर नाही. पण मनाने संवेदनशील व प्रेमाचा भुकेला. साहसी वृत्तीचा हिरो जबरदस्त साकारला होता. इतका की मॅव्हरिक म्हणजे टॉम कृझ. हे समीकरण
जमून आलेले आहे. चित्रपटात थोडी इश्कबाजी, थोडी बहुत खोडकर मस्करी, वरिष्ठांना धक्के देणे ( व कॉफी सांडणे!!) अवाजवी साहसे करणे तारुण्यातली रिस्क घ्यायची हौस, मैदानी खेळ, एक प्रकारचे ८० च्या दशकातल्या अमेरिकेचे व त्यातील तरुणाईचे एक लोभसवाणे चित्र उभे केले होते.
त्यात ह्यातली नायिका पुरुषप्रधान क्षेत्रात पण हिरोच्या वरताण!!! म्हणजे एक प्रकारचे रोल मॉडेलच होते. मी तर चित्रपट बघायच्या आधी त्यावर आधारित मॅड मासिकातली उपहासिका वाचली होती. पुढे कधी तरी पिक्चर पाहिला व अनेकदा बघितला. तेव्हा मॅव्हरिकच आवडायचा. हा व मॅट्रिक्समधला निओ. कुठेही नोकरी करताना मला ह्या दोन व्यक्तिरेखांची मदत झाली आहे. मॅनेजिन्ग एक्स्पेक्टेशन्स!! कारण अगदी आतून नियम व वरिष्ठांचे वर्चस्व आजिबात आवडत नाही)आमच्या पिढीचे व्यवच्छेदक लक्षण!
टॉप गन पहिला: ह्याचे संगीत पण एका खास प्रकारचे होते. सुरुवातीचा विमान टेक ऑफ घेतानाचा टीमवर्कचा जॉब व पुढचा डेंजर झोन गाण्याचा भाग. मिशन वर जातानाचे संगीत एकदम आयकॉनिक!! अनेक वर्षांनी चित्रपट बघताना आइसमॅन खरंतर बरोबर बोलतो वागतो आहे. रुल्स आर मेंट फॉर सेफ्टी!! हे मनातनं पटलेलं आहे. एकदम १८० डिग्री वैचारिक परिवर्तन झाले आहे वयानुसार/ अनुभवानुसार. पण अजूनही गूजचा मृत्यु होतो तो सीन बघवत नाही. फॉरवर्ड केला जातो. त्याची बायको पण वारलेली आहे मधल्या काळात. पण तिने मॅव्हरिकला एक वचन मागितले आहे. ते तो पाळतो.
टॉप गन मॅव्हरिक ह्या सिनेमाचा दुसरा भागः तंत्रज्ञान बदलले, विमाने जास्त फॅन्सी झाली, नवे वैमानिक आहेत. नायक व इतर लोक म्हातारे झाले ओरिजिनल दिग्दर्शक २०१२ मध्ये वारले. पण हा चित्रपट आला नसता तर काहीतरी अपूर्ण राहिले असते. कॅप्टन पीट मिचेल ला परत एकदा तरी भेटावे ही मनिषा होती. कोविडमुळे चित्रपटाचा रिलीज पुढे पुढे ढकलला तेव्हा अरे आता हा बघायला मिळतो की नाही अशीही शंका मनात राहिली होती.
पण चित्रपट रिलीज झाला व दुसर्याच दिवशी बघितला. टायटल सिक्वेन्स तसा सेमच. व एकदा ते संगीत सुरू झाल्यावर आपण मॅव्हरिकच्या जगातच जातो. सुरुवातीलाच मॅव्ह आपले विमान दुरुस्त करताना मसल्स दाखवतो तेव्हा अमर अकबर अॅथनी मधील पर्वीन बाबी सारखे
फॅटास्टिक मसल्स!!!( अजुनही!!) असे चित्कारावेसे वाट्ते. मग तो ते लेदर जाकीट घालुन( ह्यावर तैवानचा झेंडा आहे म्हणून जालवादळ उठले होते. ) त्या बाइकवर मांड ठोकुन हपिसला जायला एक मोठी चक्कर घेउन निघतो तेव्हा आपले हार्ट पण बरोबर नेतो. ( इफ यु आर दॅट एटीज गर्ल!!) ब्लॅक स्टार फायटर जेट जे ध्वनीच्या वेगाच्याही पुढे जाउन उडते हे क्षमतेच्याबाहेर उड्वायचा - टीमच्या नोकर्या वाचवायच्या उदात्त हेतुने - प्रयत्नात ते विमान जळते व मॅव्ह कुठेतरी उतरतो. - अर्थ !!
ह्याला ऑफिशिअल टॉप गन स्कूलला रिपोर्ट करायचे आहे तश्या ऑर्डर्स पहिल्याच बॉस कडून मिळतात. - एड हॅरिस - तोंडावर सुरकुत्या अंमळ जास्त दिसतात पण खडूसपणा तस्स्साच. - तो सीन आठवतो. - एक एक संवाद अजरामर झाले आहेत. आता इतके कमी म्हणून की काय जॉन हॅम त्याचा आता बॉस असतो. कोणा कोणाकडे बघावे असे होते काही क्षण . सो मच स्टार पॉवर इन वन सीन ऑन वन स्क्रीन!!! सर्वांचे अॅक्टिन्ग अगदी टॉप क्लास व ना कम ना ज्यादा टाइपचे बरोब्बर झालेले आहे. दिग्दर्शकाचे कौतूक.
एक मिशन आहे त्यासाठी बेस्ट पायलटना थोडे जास्तिचे ट्रेनिन्ग द्यायची असाइनमेंट आहे. आइस मॅन मॅव्हचा पाठिराखा राहिलेला आहे इतकी व वर्षे. मॅव्ह चे काही कॅप्टन च्यावर प्रमोशन झालेले नाही पण हा युएस पॅसिफिक फ्लीटचा अॅडमिरल झालेला आहे व आता आजारी - ते पुढे येतेच.
जॉन हॅम तू वशिल्याने इथे टिकून आहेस हे सांगायची एकही संधी सोडत नाही.
केली मॅक गिलीस- पहिली चार्ली - ही ह्या सिनेमात नाही. - ती ६२ वर्शाची असून त्या वयानुरूप दिसते. हिरविणीची गरज भागवायला जुनी( अॅडमिरल्स डॉटर!!!) जेनी आणली आहे. पण ही देखिल गोड आहे. हे दोघे एक बोट चालवतात तेव्हाचा सीन नक्की बघा. संवादही छान आहेत
तर हिचा एक बार अस्तो. तिथे मॅव्ह व नव्या टीमची ओळख होते.
ह्यात गूजचा मुलगा- आता मोठा झालेला -ही आला आहे. अपेक्षेनुसार दोघांच्यात वाद होतात. पण ऑल द वे मॅव्ह त्याचा फादर फिगरच वाटतो मला तरी. रूस्टर ला मॅव्ह बद्दल भयानक राग आहे व गैरसमज देखील आहेत. मॅव्हरिकच्या मनात ह्या मुलाला आपल्यामुळे पोरके पण आले ह्याची अपराधी भावना आहे. ती आपल्यालाही सारखी डाचत राहते. पुढे काय होते ते बघाच स्क्रीन्वर.
आइसमॅन येतो एका सीनपुरता -पण पदर डोळ्याला टाइप सीन आहे त्याचा. जास्त लिहीत नाही. अगदीच रिलेट झाला मला.
पहिल्या टॉपगन च्या वेळी जे ऐन तरूण होते ते आता साठीला आलेले - थोडे पुढे गेलेले असे आहेत. त्यांचे जीवनानुभव - काही जवळचे दूर होणे, तरुण मुलांच्या मनात आपल्याबद्दल गैरसमज असणे व ते आपण काढू न शकणे, आपण असे का वागले ते एक्स्प्लेन न करता येणे,
जवळ चे नातेवाइक / कलीग्ज मरणे व मनातले बोलायला कोणी नसणे , फेसिन्ग रिटायरमेंट - हे सिनेमात तंतोतंत अनुभवायला येतात. अॅक्षन चित्रपट असूनही ही मानवी परस्पर संबंधांची बाजू उत्तम सांभाळली आहे. आपला एखादा जुना मित्र भेटावा तसे वाट्ते.
नंतर एक खास फायटर प्लेन मनुव्हर आइसच्या आदरार्थ करतात. ते ही हृद्य आहे.
ह्या सर्वाच्या मध्ये मध्ये ट्रेनिंग चालू आहे. नव्या टेक्नोलॉजीची विमाने वापरली आहेत. ही सर्व अॅक्षन पैसा वसूल आहे. त्यातही मॅव्हरिक आपली अंतर्गत चुणूक दाखवत असतो. मी आयमॅक्स वर बघितला टूडी आहे. पण वर्थ इट. पहिल्या टॉप गन मध्ये जो बीच व्हॉली बॉलचा सीन आहे तो फारच प्रसिद्ध आहे. तो ही इथे येतो. दुसरा खेळ आहे. पण तो टीम बिल्डिन्ग साठी वापरतात.
आता मिशन व त्याची तयारी!! जे कोणी गेम्स खेळतात त्यांना हे लगेच रिलेट होईल. प्रेक्षकात खूपच तरुण मुले मुली होती त्यांना ह्या भागात मजा आली असेल. क्लायमॅक्स भरपूर वेळ आहे व टॉप क्लास अॅक्षन. व खास मॅव्हरिक टच. रूल्स आहेत पण त्या पुढे जाउन एक स्वतःच्या
धाडसाने मिशन जिंकावे लागते. कधी कधी स्वतःची इंटुइशन वापरावी लागते. असे इन्स्ट्रक्टर सांगतात ते प्रत्य क्षातही आणोन दाखवतात.
शेवटी मॅव्ह व रूस्टरला ते एक जुने विमान सापडते व त्यातून ते पलायन( उडायन करतात) हा भाग अगदी र्रोचक व मनोरंजक आहे. व हँग
मॅन त्यांना येउन वाचवतो ते ही. थोडे गेम लेव्हलचेच वाट्ते. पण धमाल येते बघायला.
एक महत्वाचे म्हणजे, एक महिला पायलट आहे व एक आफ्रिकन अमेरिकन पण त्यांच्या तसे असण्याला काहीही जास्त महत्व दिलेले नाही . सर्व स्क्रीन प्ले मध्ये एक प्रकारचा संयम बाळगलेला आहे. व जस्ट राइट अशी ही रेसीपी बनवलेली आहे. पहिल्यातले संवाद तरुणपणचा आगावूपणा दाखवतात तर ह्यातले संवाद वय, अनुभव - पण जुन्या वृत्ती अजूनही तश्याच आहेत ह्याचे अजब मिश्रण आहे.
संगीत लेडी गागा, व हान्स झिमर( बाप माणूस!!) ह्यांनी दिलेले आहे. दोन्ही साउंड ट्रॅक स्पॉटिफायवर उपलब्ध आहेत.
शेवटी नवरी मिळे नवर्याला व बारक्या विमानातून एक रोमांटिक चक्कर.
टॉम कृझ चा फिटनेस अमेझिन्ग आहे सीजी वाटत नाही. तो व हिरोइन दोघे पन्नाशीच्या पुढचे असूनही ब्लू जीन्स इतके छान कॅरी करतात.
शेवटी प्रत्येक कॅरेक्टर सोबत त्यांचे नाव आहे तेव्हा त्याची स्टार पॉवर खरी कळते. जरूर बघा एंजॉय द फ्लाइट.
मूळ टॉप गन पिच्चर पेक्षा
मूळ टॉप गन पिच्चर पेक्षा तुमचं वर्णन जास्त आवडलं
टॉम कृझ आवडतोच.
बघायचा योग कधी येतो काय माहित
चाळीस एक वर्षापूर्वीच्या
चाळीस एक वर्षापूर्वीच्या चित्रपटाची इतकी खडानखडा माहिती आहे, हे बघून तुमच्या स्मरणशक्तीची कमाल वाटली. मला तर कुठलाही चित्रपट (अगदी शोले सुद्धा अजिबात आठवत नाही.)
जुन्या टॉप गन सिनेमाला हा एक
जुन्या टॉप गन सिनेमाला हा एक चीजी एंटर टेन मेंट सिनेमा आहे म्हणून हिणवले जाते पण त्याला एका गाण्यासाठी ऑस्कर मिळालेले आहे. काल लेक व तिची मैत्रीण परत बघून आल्या मैत्रीणीने पहिल्यांदाच दुसराच सिनेमा बघितला व तिला खूप आवड ला. लेकीने परत बघितला ते कॉकपिट मध्ये सहा कॅमेरी बसविलेले व इतर फिल्मिंग लेखन दिग्दर्शन टेक्निक अभ्यासायला.
अमेरिकेत एक फायट र पायल ट पॉड्कास्ट आहे तिथे खरे फायटर पायलट इशू ज वर चर्चा करतात त्यांनी ही रिव्यू दिला आहे. ते खरे पायलट पण काय ऑसम दिसतात.
तुमची कॉल साइन काय असेल?
माझी ऑफ कोर्स विनी. माय डार्लिन्ग डॉग.
परफेक्ट लिहिलंय! प्रचंड
परफेक्ट लिहिलंय! प्रचंड आवडलाय हा पिक्चर.
त्या बाइकवर मांड ठोकुन हपिसला जायला एक मोठी चक्कर घेउन निघतो तेव्हा आपले हार्ट पण बरोबर नेतो >>> अगदी अगदी!
बीच व्हॉली बॉलचा सीन आहे तो फारच प्रसिद्ध आहे. तो ही इथे येतो >>> यात टॉम क्रूझ अ मे झिं ग दिसतो.
काल बघितला टॅाप गन.. लहानपणी
काल बघितला टॅाप गन.. लहानपणी बघितलेला आणि तेव्हा फार काही कळाला नव्हता.. घरी मात्र कित्येक वर्ष त्याचं ते बाईकवरचं पोस्टर होतं.. टॅाम क्रूझ मस्तच दिसतोय.. मैने प्यार किया मधली सलमानच्या जॅकेटची स्टाईल इथूनच ढापलेली असावी.. टॅाप गन २ आता थिएटरला बघेन
वैश्विक कलेक्षन $ सातशे मिली
वैश्विक कलेक्षन $ सातशे मिली यन च्या पुढे गेले आहे. टॉप गन लेदर जाकीट अमे झॉन वर २५०० ला मिळते आहे घ्यावे का.
चाळीस एक वर्षापूर्वीच्या
चाळीस एक वर्षापूर्वीच्या चित्रपटाची इतकी खडानखडा माहिती आहे, हे बघून तुमच्या स्मरणशक्तीची कमाल वाटली. >>> +१
मस्त लिहिलंय, एका फॅनचा रिव्ह्यू.
पहिला भाग तेव्हा पुण्यात अलकाला लागला होता, येता-जाता अनेकदा पोस्टर पाहिलं होतं, हे आठवतंय. पण थेट्रात पाहिला नाही, नंतर कधीतरी टीव्हीवर पाहिला.
टेक माय ब्रेथ अवे - आवडतं गाणं.
भाग-२ बघीन की नाही माहिती नाही.
Do watch . It is good as an
Do watch . It is good as an independent movie if you like the thriller game type genre second half is pretty much like a game mission.
एका फॅनचा रिव्ह्यू.>> अहो हा
एका फॅनचा रिव्ह्यू.>> अहो हा फॅन म्हणून लिहिलेला रिव्यु नाही. मी जनरली आव डलेल्या व न आव्डलेल्या सिनेमांवर लिहि त असते. ज्या कलाकृतींवर प्रेम करते त्यांना तर जास्त क्री टिकल नजरेने बघते.
अरे लोक्स हा पिक्चर अमेझॉन वर रेंटल आला आहे. ११९ रु भाडे. टीव्हीवरच क्यु आर कोड स्कॅन करायचे. ते मला येत नसल्याने मी लॅपटोप वर अमेझॉन स्टोअर मध्ये रेगुलर पैसे भरौन घेतला. आपला सोफा आपले एसी आता काहीतरी ऑर्डर केले की प्लॅन बन गया सी. एंजॉइ.
अमा, पहिल्या टॉप गनच्या आठवणी
अमा, पहिल्या टॉप गनच्या आठवणी भारीच आहेत.
पहिला भाग तेव्हा पुण्यात अलकाला लागला होता >>> तेंव्हाच पाहिला होता.
मी पाहिलेला आणि बर्यापैकी समजलेला पहिलाच नॉन-किड इंग्रजी सिनेमा होता. आधीचे सिनेमे गॉड्झीला, क्ष इन य शॅडो असल्या प्रकारचे असायचे. टॉम क्रूजचं जॅकेट, बाईक यावर जाम फिदा होतो आणि हिरवीण तर डोळ्यात बदाम. टॉम क्रूझ हा नाव माहित झालेला पहिलाच हॉलीवूडचा अभिनेता होता.
त्या डॉल्बीपूर्व काळातही 'फ्लाईंग टू द' चे ड्र्म बिट्स असले घुमायचे ! जेंव्हा हम आपके है कौनला डॉल्बी साऊंड ऐकला तेंव्हा मनातल्या मनात त्याची 'फ्लाईंग टू द' शी तुलना झालीच अणि तेंव्हा ही 'फ्लाईंग टू द' हेच वरचढ ठरलं.
टॉप गन थेट्रात बघायचा राहून
टॉप गन थेट्रात बघायचा राहून गेला !
प्राईम ला ११९ रू रेंट वर पाहायला मिळेल असे दिसत आहे !
माझा प्रश्न असा आहे की , रेंट वरील मूव्ही किती दिवस पाहू शकतो ?
रेंट दिल्यावर एकदाच पाहता येतो ?
नंतर चार दिवसांनी पुन्हा पाहता येतो का ?
कालच पाहिला. ऑफ कोर्स आवडला.
कालच पाहिला. ऑफ कोर्स आवडला. फ्लाईट मॅनुवर्स जबरदस्त आहेत. स्टोरी लाईन पण क्रिस्प आहे.
@फुरोगामी : रेंटल मुवी ४८ तासात बघावी लागते.
प्राइम चे रेंट बहुतेक एक
प्राइम चे रेंट बहुतेक एक महिन्याचे असावे मी पण घरी रेंट वरच बघितला. घरुन बघताना टॉम्या जास्त म्हातारा दिसतो. पर चलता है. मागे पुढे करुन बघता येते काही सीन्स परत बघता येतात.
काल टॉप गन पहीला पार्ट पाहीला
काल टॉप गन पहीला पार्ट पाहीला. आज मॅव्हेरिक म्हणजे दुसरा पाहीन. विकत घेतलेला आहे. ओटीटीवर असेल तर माहीत नाही.
टॉम क्रुझ किलर लुक्स. ओह माय गॉड!!! स्टीमी सिन्स तर इतके सुंदर आहेत. हिज टेंडरनेस, हिज टंग प्ले.- फार ओव्हर्ट नाही आणि हवा तितकाच (टिझर) दाखवलाय. सिंप्ली ब्युटिफुल!
अॅटिट्युड आणि लुक्स - मस्त मस्त.
Naman minar level i suppose
Naman minar level i suppose
अमा मी कॉलेजमध्ये असताना टॉप
अमा मी कॉलेजमध्ये असताना टॉप गन पाहीलेला नंतर नाहीच. तेव्हा टॉम क्रुझला अॅप्रिशिएट करता आलेले नव्हते. काल म्हणजे आय वॉज ब्लोन अवे. होश उड गये मेरे.
हाहाहा आय लव्ह युअर सेन्स ऑफ ह्युमर.
>>>> नमनमीनार लेव्हल
Topgun2 मधले काही सीन्स परत
Topgun2 मधले काही सीन्स परत परत बघायला आवडतात Maverick ची trainer म्हणून entry आणि त्याचं नंतरच 2-3 वाक्यांचच भाषण , त्यानंतरची flying assignment , maverick आणि iceman ची भेट , maverick आणि पेनीची भेट , practice मधल्या प्रत्येक failure नंतर तो प्रत्येक टीमला काय चुकलं तो सीन , assignment 3 मिनिटाच्या आत होऊ शकते याच practical maveric देतो तो पूर्ण सीन ,
नायिका फार आवडली. फक्त एकच
नायिका फार आवडली. फक्त एकच तक्रार शी गेव्ह इन व्हेरी ईझीली. त्याला त्रास द्यायला हवा होता
......
ती ऑर्डर देत नाहीये. ऑफ कोर्स हा प्रेमाचा आणि अनुरागाचह मामला आहे.
'मॅव्हरिक, यु बिग स्ट्ड !! टेक मी टु बेड ऑर लुझ मी फॉरेव्ह.'
यप "यु बिग स्टड. " - येस हाऊ कुड आय फर्गेट दॅट. संपादित केलेले आहे.
ती त्याची टिचर आहे. वयाने बरीच आहे. त्यांच्या पहील्या भेटीत, ती लेडीज रुममध्ये जाते आणि टॉम तिथे जाउन, तिला सिड्युस करण्याचा प्रयत्न करतो. जो की ती पार फेटाळून लावते. सॉलिड आहे तो प्रसंग.
आणि नंतरच्या भेटीत म्हणजे त्याला जेव्हा कळतं की हीच आपली शिक्षिका आहे, तेव्हाचे त्याचे एक्स्प्रेशन्स. अ वॉव!!
--------------
आईसमॅन - 'यु कॅन बी माय विंग मॅन'
मॅव्हरिक - बुलशिट!! यु बी माय विंगमॅन.
कसली खतरनाक अॅटिट्युड दाखवलीये.
>>>>>Maverick ची trainer
>>>>>Maverick ची trainer म्हणून entry आणि त्याचं नंतरच 2-3 वाक्यांचच भाषण
येस्स!!
मेग रायनला पार डिसेक्श्युलाइझ केलय. काय ते टोपलं केसांचं याईक्स.
मॅव्हरिक - एक संयत , पॉझ
मॅव्हरिक - एक संयत , पॉझ (ठहराव) असलेला सुरेख अभिनय. किती सुंदर काम करतो टॉम क्रुझ. जेव्हा आईसमॅन त्याला सांगतो 'लेट गो' आणि टॉम क्रुझ म्हणत असतो 'आय कॅनॉट' तेव्हाचे त्याचे डोळे, एक्स्प्रेशन्स आई ग! कमाल कमाल अभिनय. पिनॅकल! शिखर आहे सिनेमाचे.
हॉट बॉड वगैरे सर्व ठीक आहे. पण अभिनय काय सुरेख आहे.
पेनीचा ही अभिनय आवडला.
रात्री तो पेसोडतोत्याच्या
रात्री तो पेनीला, त्याच्या बाईकवरुन, घरी सोडतो आणि पेनी त्याच्याकडे पाठ करुन घरात शिरते. पण मागे न वळता ती म्हणते "डोन्ट यु गिव्ह मी दॅट लुक." आणि तो मिष्किलपणे तिला विचारतो "व्हॉट लुक?" आई गं हाऊ इंपिश ट्विंकल इन हिज आय.
इर्रेझिस्टिबल लुक!! कठोरातलं कठोर हृदय लोण्यासारखं वितळवणारा लुक.
म्हणुनच ती मागे वळून बघत नाही.
सामो , आता तुमच्यामुळे ,
सामो , आता तुमच्यामुळे , maverick परत बघायला लागेल
स्वस्ति बघच.
स्वस्ति बघच.
आज जॅक रीचर पाहीला टॉमचा. काय मस्त दिसलाय. पण एकही रोमॅन्स सीन नाही शॅ