झी-मराठी : माझी तुझी रेशिमगाठ

Submitted by DJ....... on 16 August, 2021 - 07:12

२३ ऑगस्ट पासून रात्री ८.३० वाजल्यापासून सोमवार ते शनिवार रोज त्याच वेळी झी-मराठी वाहिनीवर नवीन सिरियल सुरु होत आहे.

या सिरियलच्या निमित्ताने श्रेयस तळपदे अन प्रार्थना बेहेरे बर्‍याच वर्षांनी डेलीसोप मधून छोट्या पडद्यावर दिसणार आहेत.

चर्चेसाठी अन पिसे काढण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

मध्येच अर्धा तास किंवा अधिक मोठा ब्रेक घेतला. एवढ्या मोठया महालात परीला सांभाळायला एक आया ठेवता येत नाही. सगळ्यांचे कपडे आणि मेकप एकसे एक होते (नव श्रीमंत). एवढ्या लोकांसमोर आजोबा सिम्मीला काहीही बोलतात. नो वंडर ती अशी वागते. सगळी वरात चाळीतली होती. चौधरी कोणालाच ओळखत नाहीत, काहीच जनसंपर्क नाही. बॅचलर पार्टीलाही आठ डोकी, त्यातली अर्धी घरातली. यशचे मित्र बिझनेसमन न वाटता नाक्यावरचे टवाळ वाटत होते. ती शेफाली नको वाटते. वागणं, बोलणं आणि दिसणं सगळंच लाऊड आहे. तिची ती विग लावलेली आई (?) अपंग आहे का. चाळीतले लोक अगदीच मॅनरलेस दाखवले आहेत, तसं बिलकुल नसतं. वागायचा आणि बोलायचा पोच असतो त्यांना. नेहाने डिवोर्स नाही घेतलाय का. सिम्मी परीचे कान भरणार आणि नेहाला त्रास देणार हे दुसरी मालिका सुरु होईपर्यंत चालू राहणार.

काहीतरी तांत्रिक अडचण आल्यामुळे ब्रेक होता.
घारतोंडे कुठे दिसले नाहीत बरेच दिवस. लग्नात पण नाही.
वहिनीच्या साड्या आवडल्या. नेहाने कानात पण नव्हते घातले. तिला सगळ्यात कमी मेकप केलाय.

अजून शेवट नाही झाला
आजच्या एपिसोड मध्ये परीला कळले तिचा बाबा अविनाश आहे,
अजून नेहा आणि यश मधले गैरसमज तसेच आहेत
आजोबांनी आपल्या दुसऱ्या मुलाशी धरलेला अबोला सोडला,दोघांमध्ये समेट झालाय

संकर्षण कर्‍हाडेच्या फेबु पेजवर आजच वाचलं समीर-यश चा शेवटचा सिन शूट केला म्हणून. म्हणजे संपतेय मालिका बहुतेक.
मला वाटलं होतं समीरची कोणतरी आधीची मैत्रिण आणणार आहेत.

मालिका संपणार आहे अशी शुभ वार्ता आहे.

कोणी बघतं आहे का ? नेहाची अनुष्का कशी झाली ह्याची फार उत्सुकता आहे.

एका accident मध्ये नेहा दरीत पडते,यश ला सापडत नाही,पण एका हॉस्पिटलमध्ये मेहता या माणसाला सगळं विसरलेली नेहा भेटते,ते तिला मुलगी/अनुष्का म्हणून घरी आणतात पण तिला खरं सांगत नाहीत
एका मीटिंग मध्ये यश तिला बघतो,आधी नेहा समजतो पण तिच्या आवडी वगैरे वेगळ्या आहेत हे बघून ती अनुष्का आहे अशी त्याची खात्री पटते
सतत भेटून दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात,पण मेहता तिचे लग्न दुसऱ्या मुलाबरोबर ठरवतात,आणि वडलांच्या आनंदासाठी अनुष्का त्या साठी तयार होते
योगायोगाने परी तिला बघते, आजारी पडते, आई चा धसका घेते so अनुष्का एक दिवसा साठी नेहा ची साडी वगैरे गेटप करून तिची आई बनण्याचे नाटक आणि पॅलेस,परी बघून मध्ये मध्ये भूतकाळ आठवून चक्कर येण्याचे नाटक करत आहे

मुळात मेहता असं कुठल्याही मुलीला स्वतःची मुलगी का मानतोय ? त्याची मुलगी तशी दिसायची असं काही आहे का

Pages