Submitted by DJ....... on 16 August, 2021 - 07:12
२३ ऑगस्ट पासून रात्री ८.३० वाजल्यापासून सोमवार ते शनिवार रोज त्याच वेळी झी-मराठी वाहिनीवर नवीन सिरियल सुरु होत आहे.
या सिरियलच्या निमित्ताने श्रेयस तळपदे अन प्रार्थना बेहेरे बर्याच वर्षांनी डेलीसोप मधून छोट्या पडद्यावर दिसणार आहेत.
चर्चेसाठी अन पिसे काढण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
तो यश एवढा पाचशे करोडवाली
तो यश एवढा पाचशे करोडवाली कंपनी चालवतो, परांजपे सत्य अजून शोधून काढू शकला नाही ही आश्चर्याची गोष्ट आहे.
नेहा बोलताना बऱ्याच
नेहा बोलताना बऱ्याच वाक्यांच्या व्याकरणातलं शेवटचं अक्षर खाऊन टाकते. ऐकायला फारच विचित्र वाटतं >>> हो ना. अजिबात आवडत नाही ते मला
आणि परांजपे झोल वाला फोन त्या
आणि परांजपे झोल वाला फोन त्या काकांच्या जस्ट घराबाहेर येऊन करतो थोडं तरी लांब जा ना म्हणावं
कंपनीला ५० वर्षे पूर्ण
कंपनीला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ऑफिसमध्ये पूजा आणि मग एक मोठे डील हा एपिसोड पाहिला. त्यात त्या डीलच्या मिटिंगच्या वेळी नेहा यशला दुसऱ्या कंपनीच्या माणसांबरोबर हस्तांदोलन करतांना पाहते आणि तिला अनेक प्रश्न पडतात. शेवटी समीर (संकर्षण) काहीतरी सांगून यशला वाचवतो. परंतु संपूर्ण एपिसोडमध्ये इतर सर्व कर्मचारी (अगदी घारतोंडेसकट) छान कपडे घातलेले असले तरीही गळ्यात कंपनीचे आय-कार्ड घालून वावरत आहेत मात्र यशच्या गळ्यात आय-कार्ड नाही. आणि तरीही नेहाला ते खटकत नाही!!!
लास्ट point मस्तच, माझ्याही
लास्ट point मस्तच, माझ्याही लक्षात नाही आलं की यशच्या गळ्यात आय कार्ड नाही हे तिला खटकत कसं नाही, छान observation.
मी बघितला नाहीये एपिसोड अजून.
आज ह्याचा एक रँडम एपिसोड
आज ह्याचा एक रँडम एपिसोड पाहिला. ती शेफाली चौधरींच्या राजवाड्यात हिंडत असते आणि एका खोलीत येते. तिथे खोलीत २ खुर्च्या, १ ग्रामोफोन, भिंतीवर रफीचं पोस्टर, यशचे फोटोज्. ही बाई म्हणते "ओह गॉड! हीच समीर सरांची बेडरूम असणार. आमचं लग्न झालं की आम्ही इथेच ह्या रूममध्ये झोपू". तात्पर्य, तिथे एकही बेडसदृश वस्तु नाही.
मी: I want what she is smoking!
आणि जाता-जाता: शेफाली, मिथिला (काकु नं २) किती बोरिंग कॅरॅक्टर्स आहेत! ह्यांना नोकर्या कशा मिळाल्या, लग्न कसं झालं वगैरे गहन प्रष्न आहेत. परांजपे, बंडुकाका पण बोरपणात मागे नाहीत.
काल बहुतेक सगळे एपिसोड दाखवले
काल बहुतेक सगळे एपिसोड दाखवले या आठवड्याचे दुपारी आणि रात्री. खंडाळा वसईच्या आजूबाजूला असल्यासारखे हे लोक तिकडे जाऊन येतात. कसे जातात आणि कसे येतात ते कधी दाखवत नाहीत. परी सोडून बाकीचे सगळे बोर करतात.
मी खूप दिवस बघितली नाहीये,
मी खूप दिवस बघितली नाहीये, काही फरक पडत नाही म्हणा. परांजपेचं भुत उतरलं का नेहावरुन.
राखी
राखी
आज यातील क्लिपही पाहिली. या सिरीज मधले ऑफिस म्हणजे सूट घालून टेबलावर लॅपटॉप उघडून काहीतरी "कामासारखे" बोलणारा बॉस. आधी सुबोध भावे होता आता श्रेयस. आधी गायत्री दातार होती आता प्राबे. तिचे डेस्क्/टेबलही तुपारेमधून रिपर्पज केल्यासारखे वाटते. तिकडे चकल्या का काय होत्या, इथे सांडग्याची भाजी. ती करताना विविध साइज चे डबे काउंटर वर काढून ठेवले आहेत.
सिरीज कमालीच्या संथगतीने चालते. डिजिटल असेल, नाहीतर रिळे दोन्ही बाजूंनी कणकेसारखी दाबून हे सगळे कथानक १५ मिनीटांत आवरा सांगायला पाहिजे. साधे रूटिन संवादही महा-सावकाश बोलतात. बुद्धिबळाच्या चालीसुद्धा यापेक्षा पटापट खेळतात लोक.
श्रेयस म्हणजे यश का? त्याच्या दोन मिटिंग्ज लंडन मधे व एक फ्रँकफुर्ट मधे आहे. "वेदर" मुळे तो जाउ शकत नाही असे कोणतरी शिवानी फोनवर त्याच्या असिस्टंटला सांगते. तर तो म्हणे याला वेदर रोखू शकत नाही. हा लंडनला जातो म्हणे आणि वेदर मुळे फ्लाइट्स जात नाहीत हे त्याला माहीत नाही. आणि तिलाच तिकिटे काढायला सांगितली असतील ना? तिलाच पुन्हा पहिली मिटिंग लंडन मधे, दुसरीही लंडन मधे वगैरे उजळणी कशाला सांगताय. पुन्हा तारखा वगैरे क्षुल्लक गोष्टींत कोणाला इंटरेस्ट नाही. तुपारे तर आख्खे लग्न तारखेचा पत्ता न लागू देता ठरले होते. इथे तर फक्त प्रवास आहे. हा सगळे हवाई प्रवास "स्टॅण्डबाय" म्हणून करत असावा. म्हणजे विमानतळावर जाउन बसायचे. ज्या फ्लाइट मधे सीट असेल त्याने जायचे.
पुढची गंमत म्हणजे याला "वेदर चांगले असल्याचा मेल आला आहे". असल्या मेल्स सीईओज ना कोण पाठवते आणि वेदर असे घाउकरीत्या चांगले किंवा वाइट कसे असते, आणि त्याने अमुक फ्लाइट जाईल का नाही हे एअर सेफ्टी वाले ठरवतात की असे रॅण्डम प्रवासी? बहुधा या सिरीज मधल्या मिटिंग्ज छान होतात, प्रेझेण्टेशन्स सुंदर होतात, तसे वेदरही "चांगले" असते.
फा
फा
मी शंभर रुपयात दिवस हा थोडा भाग बघितला. जिथून जे चोरता येईल ते चोरले आहे. ती शेफाली किती अति करते सगळीकडे. प्राबे खोट्या पापण्या लावते. मोजो बरे आहेत त्यातल्या त्यात. ती परी किचन कलाकार मध्ये होती. तिला बटाटा बिटचे पॅटिस सांगितले होते बहुतेक. एव्हडीशी मुलगी काय बनवणार. तेही नाही बघितले मी. अति आगाऊ मुलांचे तेवढेच आगाऊ आईवडील.
प्राबे कुठलीही रिअॅक्शन
प्राबे कुठलीही रिअॅक्शन देताना ओठाचा चंबू करून गोलगोल डोळे मोठ्ठे करून पहाते तेव्हा ती महासोशीक, गरीब, सतीसावित्री, सदाचारी, प्रेमळ वगैरे वगैरे न वाटता "मठ्ठ" दिसते. तिचा तो लुक पाहून मला कायम पुलंची "गोदी गुळवणी" आठवते.
ती चहाबिहा पिताना त्या अवजड पापण्या टप्पकन् कपात पडतील असं वाटतं.
श्रे.त मात्र आभाळमायात दिसायचा तितकाच छान दिसतो अजूनी. काय छान मेंटेन केलंय त्यानं स्वतःला.
सर्वांना +१
सर्वांना +१
मी randomly ही शिरेल ५-७ मिनिटं बघते, तेवढीच पुरे असतात म्हणा. यश हा जगातील १० सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी असल्याच्या धक्क्यातून बाहेर पडले की पुढे बघेन . परी गोड असली तरी तिचं बौद्धिक वय किमान १५ असावं असं वाटतं, शेफालीचं तेवढं नसावं...
यश हा जगातील १० सर्वाधिक
यश हा जगातील १० सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी असल्याच्या धक्क्यातून बाहेर पडले की पुढे बघेन . > अय्या , खरच का. का ही ही! धक्काच अहे मग
परी गोड असली तरी तिचं बौद्धिक
परी गोड असली तरी तिचं बौद्धिक वय किमान १५ असावं असं वाटतं, शेफालीचं तेवढं नसावं...
नवीन Submitted by rr38 on 6 February, 2022 - 22:36
स ह म त.
गोदी गुळवणी आता ती समोर आली
गोदी गुळवणी आता ती समोर आली की गोदी गुळवणीच आठवते
तो जगातील १० श्रीमंत व्यक्ती पैकी असतो? ३५००० कोटी टर्नओव्हर वगैरे जुने झाले बहुतेक.
आज एकदम एक "पार्सल" आलं आहे ऑफिस मधे. इतक्या श्रीमंत व्यक्तीला आलेली पार्सल्स थेट बॉस कडे येउन उघडली जातात हे मस्त आहे. त्यात सिल्व्हर फॉइल मधे एक पोळी आहे. आणि त्याबरोबर फोन मधून बॉसला मेसेजेस जात आहेत. काहीतरी रोमॅण्टिक प्रकार दिसतोय. तिकडे गोदी गुळवणी तिच्या डेस्कवरून काहीतरी चेक करत आहे.
तो यशच्या ऑफिस मधे पडीक असलेला कोण आहे?
एक टकला माणूस बॉस आहे जो
एक टकला माणूस बॉस आहे जो सारखा टक्कल पुसत असतो (यक). दुसरा समीर म्हणजे संकर्षण कऱ्हाडे जो यशचा मित्र असतो आणि आधी यश असल्याचे नाटक करतो.
आमच्याकडे आता परत सर्व मराठी
आमच्याकडे आता परत सर्व मराठी चॅनेल्स आणि काही हिंदी चॅनेल्स घेतली आहेत पण टीव्हीवर सिरीयल्स बघायचं लक्षात येत नाही. फ्री channels होती तेव्हा टीव्ही वरच hotstar च्या दोन सिरियल्स वेळेआधी बघायचे बाकी डेस्कटॉप वर शॉटस youtube वर. एक तारखेपासून नवीन plan नवऱ्याने घेतला कारण नेट आणि ही कॉम्बो ऑफर मिळाली आधी दोन्ही मिळून पैसे जास्त जात होते फ्री चॅनेल्स असूनही.
सोमवारी सात तारखेपासून काही सिरियल्स अर्धवट का होईना बघितल्या, त्यात हीसुद्धा बघितली म्हणून वर नमनाला घडाभर पाणी का तेल घातलं (ओतले) . ही अर्धवट बघितली कारण दुसरीकडे कलर्स मराठीवर त्याचवेळी तुझ्यात जीव गुंतला होती, म्हणून दोन्ही ठिकाणी उड्या मारत होते.
इथे सांडग्याची भाजी. >>> हाहाहा. तिला ही एकच भाजी येते बहुतेक.
परी गोड असली तरी तिचं बौद्धिक वय किमान १५ असावं असं वाटतं, शेफालीचं तेवढं नसावं...>>> भारी कमेंट, हाहाहा.
तो यशच्या ऑफिस मधे पडीक असलेला कोण आहे? >>> तो मित्र कम पी ए वगैरे आहे.
मनोज कुमार आणि आशा पारेख
मनोज कुमार आणि आशा पारेख यांचा खुप्प जुना सिनेमा एकदा पाहिला होता दूर्दर्शन वर. त्यात हा श्रीमंत उद्योग्पती आहे हे हिला माहीत नसते, तो ही लपवतो. पण इतक्या वर्शांनन्तर , इंटरनेट च्या जमान्यात ही असली लपवाछपवी खपवतात म्हणजे धन्य. आपला जगातल्या श्रीमंत व्यक्तींपैकी असलेला बॉस वेबसाईट्/बातम्या यातून आधी कोणाला माहितच नसतो
गझनी मध्ये पण होतं . अनेक
गझनी मध्ये पण होतं . अनेक सीन कॉपी केल्यासारखे वाटले
>>आज एकदम एक "पार्सल" आलं आहे
>>आज एकदम एक "पार्सल" आलं आहे ऑफिस मधे. इतक्या श्रीमंत व्यक्तीला आलेली पार्सल्स थेट बॉस कडे येउन उघडली जातात हे मस्त आहे. त्यात सिल्व्हर फॉइल मधे एक पोळी आहे.
लोल!
जर एक planned event असं जाहिर करणार आहे की यश हाच खरा बॉस आहे तर ह्यांनी त्या ऑफिसमधील सगळ्यांना मीटिंग घेऊन आधी सांगायला हवं होतं. आयत्यावेळी हा आपला रस्त्यातून पळत सुटलाय प्राबेला गाठायला. आणि तरी ती बघतेच टिव्हीवर
मग ही अगदी काहितरी फार मोठं झाल्यासारखा मोठ्ठा ईश्यु करते. मागे पण कधीतरी तिला हसवायचे प्रयत्न कसले बोअर केविलवाणे होते. तो फुलांचा बुके दारात आडकून तुटतो, हत्ती-मुंगी जोक, भोपळा आणि शेफाली, काहिहि!! लेखक अगदीच बावळट आहे.
परीच्या वयोगटासाठी आहे हो ही
परीच्या वयोगटासाठी आहे हो ही शिरेल
त्या बेहेरेबाई आवडायच्या मला,
त्या बेहेरेबाई आवडायच्या मला, यात कसल्या बोअर होतायेत. त्या दोन बटा बाजूने, ड्रेसेस सगळं गबाळे ध्यान वाटतंय. त्यापेक्षा घरात टी शर्ट आणि पॅरारल टाईप घालते कधी कधी ते बरं असतं.
कधीतरी मागे ऑफिसमध्ये परीसाठी पाळणाघर सुरु केलेलं, त्यात परी एकच दिवस होती, आता ते दिसत नाही. ती काका काकूंकडेच असते. सोसायटीतले पण एकेक नग आहेत.
तो श्रेयस एकटाच इंप्रेसिव्ह आहे. बाकी सगळे धन्यवाद आहेत. परी आवडते मला पण ठमाबाई आहे.
जगन्नाथ चौधरीन्ना नेहा मॅरीड
जगन्नाथ चौधरीन्ना नेहा मॅरीड आहे हे माहितच नाही म्हणे. यश आजोबान्शी इतक्या वेळा नेहाबद्दल बोलतो, मग ही एवढी मोठी गोष्ट का लपवेल तो?
आतापर्यत नेहा ' यश माझा मित्र नाही, तो वाईट माणूस आहे' म्हणत खम्बीर असल्याचा आव आणत होती. यशवर मुद्दामहून जवळीक साधत असल्याचा आरोप करत होती. पण यशचा एक्सिडेण्ट झाल्यावर अचानक हिला प्रेमाची जाणीव झाली. काण्ट डायजेस्ट इट. आतापर्यन्त मला यशच तिच्या मागे लागलाय, त्याच एकतर्फी प्रेम आहे असच वाटत होत.
मग ही अगदी काहितरी फार मोठं झाल्यासारखा मोठ्ठा ईश्यु करते. >>>>>>> अगदी अगदी. त्यापेक्षा जानू बरी होती. श्रीबाळ अकाउण्टट नसून बॉस आहे कळल्यावर सुद्दा निर्विकार होती. काहीच ईश्यु नाही.
परी आवडते मला पण ठमाबाई आहे. >>>>>>>> हल्ली परी मोठया माणसान्सारखी बोलते ते आवडत नाही.
ती खरंच गोदी गुळवणी आहे
ती खरंच गोदी गुळवणी आहे
कसली संथ आहे सिरीज. तुपारे
कसली संथ आहे सिरीज. तुपारे पेक्षाही. पाच पाच मिनीटे काहीही होत नाही. अर्धा वेळ त्या ऑफिसच्या बाहेर फुटपाथवर काहीतरी अगम्य बोलत उभे असतात. गोदीच्या चेहर्यावर एपिसोडभर एकच भाव असतो.
काल तो शिपाई बाजीगर मधल्या जॉनी लीव्हर सारखे काहीतरी करत होता. नीट कळाले नाही.
मग ही अगदी काहितरी फार मोठं
मग ही अगदी काहितरी फार मोठं झाल्यासारखा मोठ्ठा ईश्यु करते. >> त्याशिवाय ती एकदम साधी आहे. पैशासाठी यश सोबत मैत्री/ प्रेम करत नाहीये. तिचं खरंखुर्र प्रेम आहे यश वर हे सिद्ध होणार नाही ना..
ते परीने केलेल्या पोळीच पार्सल प्राबे नेच पाठवलेलं असतं. 100 रू. दिवस वाल्या एपिसोड मध्ये. यशने विकत आणलेला वडापाव आणि फुकट आणलेला वडापावचा चुरा सगळे मिळून खातात आणि यश उपाशीच राहतो म्हणून.
मी हीच एक सिरियल regular बघते. मोजो, संकर्षण आणि श्रेयससाठी. बाकी आनंदच आहे.
परी आवडते मला पण ठमाबाई आहे.
परी आवडते मला पण ठमाबाई आहे. >>>>>>>> हल्ली परी मोठया माणसान्सारखी बोलते ते आवडत नाही. >>> सेम. आधी फार गोड वाटायची आता थोडी आगाऊ वाटते.
मोजो, संकर्षण आणि श्रेयससाठी >>> येस
शीम्मी भारी आहे. तिचा अभिनय
शीम्मी भारी आहे. तिचा अभिनय पण आवडतो.
प्राबची गरीबी फॅब-गरीबी दिसते. शिम्मीची श्रीमंती मिशो-श्रिमंती वाटते.
निर्मात्यांनी आपल्या बजेटनुसार कथेतील श्रीमंती दाखवावी. नाहीतर ती केविलवाणी वाटते. तशीच प्राबची गरीबी पण गरीब नाही वाटत.
ह्यांना एकदा गरीब तरी नीट दाखवा किंवा श्रीमंत तरी.
मोजो, संकर्षण आणि श्रेयससाठी
मोजो, संकर्षण आणि श्रेयससाठी >>> अगदी अगदी. मी पण. पण श्रेयसला रोमॅण्टिक, हसतमुख मूड मध्ये कमीच दाखवतात. सदानकदा त्याच्या चेहर्यावर बारा वाजल्याचे भाव असतात ते जरा कमी करायला हवे.
शीम्मी भारी आहे. तिचा अभिनय पण आवडतो. >>>>>>>>> पण ती चावून चावून बोलते. मला ती ईथल्यापेक्षा 'आई कुठे ........." मध्ये आवडली होती. इथे तिला साडयाही भयाण दिल्या आहेत.
>>श्रीमंती
>>श्रीमंती
ते टॅकी व्हेल्वेटचे सोफे, सॅटीनचे शर्ट , घरात गोल्फकार्ट, स्वतःच्या घराला पॅलेस म्हणणे वगैरे अनेक विनोदी प्रकार आहेत
Pages