Submitted by रंगासेठ on 25 February, 2016 - 02:45
नमस्कार
वेगळ्या धाग्यावर पुणे शहरातील डॉक्टर्सची अत्यंत उपयुक्त माहिती मिळतेय, पण पिं.चिं. / पिंपळे सौदागर/ वाकड/निगडी/ आकुर्डी येथील डॉक्टर्सची माहिती मिळत नाहीये.
या धाग्यावर आपण पिंपरी / चिंचवड / पिंपळे सौदागर / पिंपळे निलख/ वाकड / निगडी / आकुर्डी / चिखली / मोशी मधील चांगल्या डॉक्टरांबद्दल जितके माहितीवर्धक लिहिता येईल तेवढी माहिती लिहूया. त्यांचा फोन क्रमांक, पत्ता, कशासाठी प्रसिद्ध, त्यांच्या कामाच्या वेळा, आलेला अनुभव इत्यादी.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रिटेनर लावले नाहीत तर
रिटेनर लावले नाहीत तर घेतलेल्या ट्रीटमेंटचा उपयोग होत नाही हे मात्र नक्की. तुमचे डॉक्टर सांगतीलच, पण स्वानुभव. अर्थात मला एकाच दातासाठी, माझी हौस म्हणून, फार गरज नसताना अक्कलखाती खर्च केला मी. म्हणजे रिटेन्शन क्लिप्स लावल्या, पण नंतर कंटाळा केला आणि मग तो दात पुन्हा पुढे आला. फार जाणवत नाही म्हणून मीपण नाद सोडला. वर्षभर सगळं सांभाळत होते, अजून ६ महिने करायला हवं होतं.
पिंची / पुणे मध्ये चांगला
पिंची / पुणे मध्ये चांगला Pulmonologist सुचवू शकता का.
सासूबाईंना लंग कॅन्सर मुळे छातीमध्ये पाणी झाले आहे. Pleurodesis मुळे छातीत प्रचंड दुखत आहे. (मागील एक वर्षापासून anaplastic thyroid cancer होता) जो बराच कंट्रोल मध्ये आला पण छातीत metastatis मुळे आता हा त्रास चालू झाला आहे.
डॉक्टर लक्ष्मीकांत येंगे.
डॉक्टर लक्ष्मीकांत येंगे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे असतात. माझ्या आईवडीलांच्या बाबतीत खूप चांगले अनुभव आहेत.
थोडा वेगळा विषय आहे, वाकड
थोडा वेगळा विषय आहे, वाकड परिसरात home visit साठी डॉक्टर आहेत का . माझ्या सासुबाई ना basically शेवटचे काही तास आहेत, सो घरी येऊन death certificate देणारा डॉक्टर पाहिजे.
तसेच अंतिम क्रियकर्मासाठी गुरुजी reference milel ka
i am new to pune hence kahi details nahi aahet. gathering as i go and just preparing for that time
टिनटिन विपु मध्ये गुरुजी नंबर
टिनटिन विपु मध्ये गुरुजी नंबर दिलाय. डॉक्टर नंबर साठी बघत आहे.
मला मोशीत शिफ्ट व्हायचे होते
मला मोशीत शिफ्ट व्हायचे होते पण तिथे मेडिकल आधार कमी आहे. चांगले मेडिकल शॉप/ पेट शॉप / वेट/ चांगले स्पेशालिटी हॉस्पिटल आढळ ले नाही इमरजन्सीत पुण्यासच धाव घ्यावी लागेल. म्हणून जरा तळ्यत मळ्यात होते आहे.
टिन टिन प्रेयर्स विथ यु.
दुर्दैवाने सासूबाईंना काल
दुर्दैवाने सासूबाईंना काल संध्याकाळी देवज्ञा झाली. Anaplastic thyroid Cancer सारख्या आजारात दीड वर्षे काढली हेच सुदैव. १८ chemo over ६ months घेऊन पण तब्येत बऱ्यापैकी चांगली होती. @लंपन गुरुजी चांगले होते. धन्यवाद.
थोडा crematorium पासचा गोंधळ झाला ( दीनानाथ ला admit होत्या आणि विधी वाकडला केले) बाकी doctors चा बऱ्या/वाईट अनुभव सविस्तर लिहेन
ओह,भावपूर्ण श्रद्धांजली!
ओह,भावपूर्ण श्रद्धांजली!
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
पुण्यात विश्वासातील त्वचेचे
पुण्यात विश्वासातील त्वचेचे डॉक्टर (dermatologist) आणि होमिओपॅथिक डॉक्टर सुचवा.
डॉ रश्मी गुंजलवार, पिंपळे
डॉ रश्मी गुंजलवार, पिंपळे सौदागर व्हायटालाईफ ला असतात.स्वतःचे क्लिनिक पण तिथेच आहे.
नंबर इंटरनेटवर मिळेल
धन्यवाद anu!
धन्यवाद anu!
कर्करोगाचे पेशंट कुटुंबात
कर्करोगाचे पेशंट कुटुंबात बरेच होते पण सासूबाईंचा अनुभव खूप जवळून बघितला. मी येथे डॉक्टरची नावे देत आहे. पण हा माझा वैयक्तिक अनुभव आहे.
Sept 2020 सासूबाईंना बंगलोर ला असताना थायरॉईड चा त्रास सुरू झाला. तेथील डॉक्टर ने अल्ट्राsound करून थायरॉईडच्या गोळ्या चालू केल्या.
DEC 2020 त्या आमच्या कडे पुण्याला आल्या. थायरॉईड चांगलाच मोठा होता आणि कडक झाला होता. डोकेदुखी सोडून दुसरा कुठलाही त्रास नव्हता. चेल्लाराम हॉस्पिटल मधील टॉप endocronologist बोलला की हे superficial आहे आणि पाहिजे तरच ऑपरेशन करा. आम्ही तरीही ऑपरेशन करायचे ठरवले.
Jan 2021 dr रोहित शूल ह्यांचा under चेल्लारामला ऑपरेशन करायचे ठरवले. FNAC टेस्ट (AG लॅब लॉ कॉलेज रोड) negative आली. डॉक्टरना विचारले अजुन टेस्ट करू का काही पण त्यांनी नकार दिला.
Feb 2021 ऑपरेशन सुरू झाल्यावर अर्ध्या तासात डॉक्टर बाहेर आले आणि हे काही तरी वेगळे आहे म्हणाले. ऑपरेशन थिएटमध्ये बायकोला बोलावून 3/6 महिने आहेत असे बोलले. finally बायोप्सी करून ऑपरेशन अबोंडोन केले.
दुर्दैवाने जागतिक कर्करोग दिवशी रिपोर्ट आला आणि anaplastic thyroid cancer कन्फर्म झाला.
प्रथम आम्ही रुबी येथे गजानन कानिटकर यांना भेटलो. त्यांनी लगेच ऑपरेशन करा सांगितला , कॉस्ट सांगितली आणि 2 दिवसात admit करा असे सांगितले. आम्ही पुन्हा पुन्हा विचारले की काही एक्स्ट्रा टेस्ट करू का पण त्यांनी नकार दिला.
सेकंड ओपिनिन साठी jupiter ला गेलो असता, तेथील पोखरकर डॉक्टर नी सांगितले की त्यांचा कॅन्सर पसरला असणार म्हणून HRCT करा. त्यांचा अंदाज खरा ठरला. आम्ही हे डॉ. कानिटकर यांना सांगताच आमच्यावरच दाफरले. आम्ही तरी त्यांना पुन्हा पुन्हा विचारले होते की काही टेस्ट करू का. असो
Jupiter च्या डॉक्टरनी डॉ. अनिल d'cruz यांचा रेफरन्स दिला.
मार्च 2021 देवमाणूस ! ह्याच्या खेरीज डॉ. अनिल d'cruz ज्यांच्यासाठी दुसरा शब्द नाही. नेरुळच्या अपोलो हॉस्पिटल मध्ये असतात. पूर्वी परेल टाटा चे डीन होते. ते topmost head and neck oncosurgeon आहेत. त्यांनी केस नीट समजावून सांगितली आणि पुढील मार्ग सांगितला. शेवटपर्यंत आम्ही यांच्या संपर्कात होतो आणि त्यांनी कायम तत्पर reply केले.
त्यानंतर आम्ही रुबी येथील डॉ. बासू यांच्या कडे आलो. त्यांनी केसची severity बघून त्याच दिवशी मास्क बनवला आणि पुढील 5 दिवस high intensity radiation दिले. ह्या मुळे tumor chi aggressive वाढ थांबली आणि तो बऱ्यापैकी नेक्रोटिक झाला. आता हे डॉक्टर कोकिलाबेन येथे आहेत बहुदा.
APR 2021 पुढे डॉ. तुषार पाटील ह्याच्या under jupiter येथे chemo चालू केले. त्यांनी चागले मार्गदर्शन केले आणि चेमो चे साईड इफेक्ट कसे हाताळावे ह्याचे चांगले मार्गदर्शन केले. chemo आणि पेट स्कॅन साठी jupiter चांगले वाटले. diagnostic not so sure
Aug 2021. आतापर्यंत किमोचे परिणाम दिसू लागले होते. केस जाणे, HB कमी होणे, वजन कमी होणे, etc. डॉ तुषार पाटील यांच्या सल्ल्या वरून वाघोली येथील integrated Cancer centre येथे गेलो. तेथील आयुर्वेदाचार्य डॉ सरदेशमुख knowledgeable वाटले. त्यांनी सरळ सांगितले की chemo ह्यांचा इलाज आहे आणि आमची औषधे साईड इफेक्ट कमी करतील. ह्या औषांधांचा खूप फायदा झाला आणि त्या 13 ते 18 चेमो घेऊ शकल्या.
SEPT 2021 आमच्या साठी सर्वात चांगला महिना. पेट स्कॅन चा रिपोर्ट NED आला डॉक्टर सुद्धा चकित झाले. थायरॉईड कमी होऊन तीन सेंटीमीटर पर्यंत आला होता. डॉक्टरांनी सांगितले काळजी घेऊन राहा. Levitinib नावाच्या गोळ्या चालू केल्या.
JAN 2022 अंदाजाप्रमाणे छातीचा कॅन्सर पसरला होता आणि छाती मध्ये पाणी झाले. cabozanitinib च्या गोळ्या चालू केल्या पण त्याचा उपयोग झाला नाही. पुढील चार महिने ड्रेन बॉक्स लावून ठेवला होता. शेवटच्या एका महिन्यात पेन रिलेटेड, सोडियम कमी असल्यामुळे hallucinations असे बरेच त्रास झाले. ओरिजिनल थायरॉइडचा कॅन्सर गेला होता पण metastastis मुळे घात झाला.
MAY 2022. मल्टिपल ऑर्गण failure मुळे निधन.
मी हेच सांगेन आजारात सेकंड/third ओपिनियन नक्की घ्या. कुठली टेस्ट करावीशी वाटत असेल तर नक्की करून घ्या, भले खर्च झाला तरी चालेल. Better safe than sorry. आणि कुठेतरी medicine ला पण मर्यादा आहेत हे मान्य करावे. ( बायको आणि bro in law बराच वेळ denial मध्ये होते). रेडिएशन साठी डॉक्टर बासू आणि हेड अंड नेक कॅन्सर साठी डॉक्टर अनिल D'Cruz बेस्ट आहेत.
आता सध्याच्या परिस्थितीमध्ये बायकोची काळजी वाटते. ती आईशी खूपच attached होती त्यामुळे थोडे tension आहे. तिला routine चालू करायला सांगणार आहे, ऑफिसला जायला encourage करणार आहे. विचार आहे कुठे तरी फिरायला जाऊ थोडे दिवस. बघुया.
बापरे टिनटिन
बापरे टिनटिन
तुम्हा सर्वांना बिग हग आणि सदभावना
सासूबाईंच्या आत्म्याला शांती लाभो.खूप सहन केलं त्यांनी आणि तुम्ही सर्वांनी पण.
पेट स्कॅन चा रिपोर्ट NED आला
पेट स्कॅन चा रिपोर्ट NED आला डॉक्टर सुद्धा चकित झाले. थायरॉईड कमी>> मेटास्टा टि क म्हणजे लंग्ज मध्ये पसरला होता का? तो पेट स्केन मध्ये दिसायला हवा होता. माझ्यात रफे आइं ना श्रद्धांजली. मावशी आहे.
@ अश्विनीमावशी -
@ अश्विनीमावशी - डॉक्टरमतानुसार कॅन्सर होता पण तो dormant झाला होता म्हणून ned आला. पुढे कीमो घेणे शक्य नसल्यामुळे ३ महिन्यात त्याने डोके उचलले.
पेट स्कॅनची एकयुर्सी 70 ते 95
पेट स्कॅनची एकयुर्सी 70 ते 95 % आहे
Just did my sono today.
Just did my sono today. Waiting for result. It is very tough on the caregivers. NED is a very major milestone for a patient.
टिनटिन, सगळा अनुभव वाचून वाईट
टिनटिन, सगळा अनुभव वाचून वाईट वाटले, खूप मानसिक थकवा देणारा प्रवास आहे हा.. भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
अमा, खूप खूप खूप मनापासून सकारात्मक ऊर्जा तुम्हाला माझ्याकडून. एकदम ओके रिपोर्ट येणार बघा.
अमा, एकदम मोठं ऑल द बेस्ट
अमा, एकदम मोठं ऑल द बेस्ट.सगळं व्यवस्थित येउदे.
टिनटिन : अशा मोठ्या आजारपणात
टिनटिन : अशा मोठ्या आजारपणात आशा निराशेचा खेळ सुरु असतो तो नातेवाईकांसाठी फार त्रासदायक ठरतो. तुम्हाला आणि सौ ना आतातरी थोडे स्वास्थ्य मिळावे अशी शुभेच्छा. तुमच्या सासुबाईंना श्रद्धाजंली.
थोड्या माहितीसाठी तुम्हाला विपु केली आहे.
लंपनना ममा!
लंपनना मम!
पिंपरी चिंचवड / पुणे मध्ये
पिंपरी चिंचवड / पुणे मध्ये death certificate साठी प्रोसेस काय आहे ? इकडे वाकड गावठाण मध्ये क्रिमेशन पास दिला होता मात्र तेथील माणसाने तो अजुन सबमिट केला नाही आहे. आम्ही तो घेऊन कुठे सबमिट करू शकतो का .
Pages