एक (मालिकेतील) परंपरा जपणारी मुलगी, यशस्वी आणि परंपरांचा सन्मान करणारी उद्योजिका आणि तिचा यशस्वी पण खडूस मुलगा यांची ही कहाणी आहे असं वाटते.
नायिका कोकणातली आहे. तिची आई स्वर्गवासी झालेली आहे. वडीलांची आर्थिक स्थिती कमजोर आहे. त्यांच्या घरावर कर्ज असल्याने ती मुंबईत नोकरी करायला आलेली आहे व उद्योजिकेचा जो काही उद्योग आहे त्यात ती काम करते. सिरिअल अधून मधून बघत असल्याने नक्की कसला उद्योग आहे ते कळले नाही. नायकही त्याच उद्योगात असतो आणि त्याची आई प्रॅक्टिकल निर्णय घेत नसल्यामुळे त्याचे आईशी अधुन मधुन खटके उडत असतात. साधी रहाणी असल्यामुळे आपल्या नायिकेवर उच्च विचारसरणीची जबाबदारी आलेली आहे. शिवाय तिची आर्थिक स्थिती सामान्य असल्याने मालिकावाल्यांच्या नियमाप्रमाणे ती स्वभावाने चांगली असणार. नायक खडुस असल्यामुळे त्याला माणसात आणण्यासाठी तिला पुढे खूप स्कोप मिळेलच.
बाकी एकत्र कुटुंब, कुटील कारस्थाने करणारी नातेवाईक मंडळी, मॉडर्न दिसणारी आणि त्यामुळे खलप्रवृत्तीची ठरेल अशी सून, तिचे कान भरणारी आई, बायकोपुढे काही न बोलणारा नवरा वगैरे स्टिरिओ टाईप्स ठासून भरलेले आहेत.
निवेदिता जोशी (उद्योजिका) सोडल्यास इतर कलाकारांना मी ओळखत नाही. 'अजुनही बरसात आहे' मधील मनू इथे एका साईड रोल मधे आहे.
तर चला घेऊ रसास्वाद 'भाग्य दिले तू मला' या मालिकेचा...
बच्चा आणि तिची सासू डोक्यात
बच्चा आणि तिची सासू डोक्यात जातात. >>>> बच्चा जवळून (क्लोज अप) भयंकर दिसते HD मुळे तर चेहऱ्यावरील मेकअपची पुट उठून दिसते। त्यामानाने काकू आणि वैदही खरंच सुंदर। फक्त काकू मोठाले डोळे करून भीरबीरते ना तेव्हा मला तर हसू येते (येडछाप वाटते )
मला आवडते हि मालिका... कलर्स
मला आवडते हि मालिका... कलर्स मराठी वर आता २ च बर्या वाटतात स्वामींची मालिका अन हि मालिका.
पण आता रोज पाहताना हे बरे वाटतात.. पण अति आगाऊपणे बोलते ती Happy
Submitted by भावना गोवेकर on 4 June, 2022 - 02:37 >>>>> सेम पिंच
स्वामी मध्ये सुंदराबाई, माझी
स्वामी मध्ये सुंदराबाई, माझी भाची आहे.
राजच्या काकूंचा मेकअपपण विचित्र वाटतो मला अजनबी.
सिरियल टिपिकल आहे आणि टिपिकल
सिरियल टिपिकल आहे आणि टिपिकल मार्गावरून जाणार हे जरी खर असल तरी मला राज आणि काकूमधली नोकझोक आवडते.
प्रेमात पडेपर्यंत जरा मजा नंतर मग काय त्या मैत्रिणीला व्हँम्प करतीलच,सोबतीला ती बच्चा ,बच्चाची आई ,सासू आहेतच.
खरंतर करायला नको तिला व्हॅम्प
खरंतर करायला नको पण तिला व्हॅम्प पण करतीलच, बरसातमधे तेच केलेलं. सध्यातरी ती बिचारी किती सहन करते, यांच्याकडची सगळी माणसं तिच्याकडेच मुक्काम ठोकून बसतात, नशीब गेली लवकर. ही तिच्याकडेच रहाते.
दोन दिवस बघितलं नाहीये.
राज प्रॅक्टिकल आहे काऊ आणि
राज प्रॅक्टिकल आहे काऊ आणि माऊ (निजो) अति ..अति .... अतीच संस्कृती आणि ह्याव नि त्याव डोक्यात जातात। निजो इतकी मोठी बिझिनेस वुमन आहे आधीच्या बिझिनेसचा (अग बाई सासूबाई) आणि एका (नालायक मुलाचा - बबड्याचा ) अनुभव असून हिला काहीच धडा नाही मिळाला। दोघी त्या राजच्या डोक्याचा भुगा करतात।
कावेरीला बरोबर दाखवण्यासाठी
कावेरीला बरोबर दाखवण्यासाठी बिचाऱ्या राजला सारखे चुकीचे दाखवतात. पण तरीही राज कावेरी केमिस्ट्री चांगली आहे.अशी साडी मधली हिरोईन(लग्नाआधी) बघायला जरा वेगळे वाटते. पण तन्वी मुंडले गोड आहे. आणि राजचे काकू छानच !
त्यामुळे सिरीज बघावीशी वाटते.
यांच्याकडची सगळी माणसं तिच्याकडेच मुक्काम ठोकून बसतात, नशीब गेली लवकर. >> अंजू .. कशी काय गेली ती आजी परत? मला बघता नाही आले. मी युटूबवरच बघते. त्यामुळे काही काही मिस होते.
यांच्याकडची सगळी माणसं
यांच्याकडची सगळी माणसं तिच्याकडेच मुक्काम ठोकून बसतात, नशीब गेली लवकर. >> अंजू .. कशी काय गेली ती आजी परत? मला बघता नाही आले. मी युटूबवरच बघते. त्यामुळे काही काही मिस होते.
नवीन Submitted by आ_रती on 6 June, 2022 - 02:06 >>>>>>
आजी महा महा डांबिस आहे तिने सगळा बनाव केला होता गावच्या घरातून भावाने (ठरवून) हाकलून दिले व घर वापरून खराब केले म्हणून डागडुगीसाठी ५ लाख दे नाहीतर पोलिसात देईन वैग्रे मग येतात तोंड उचलून मुंबईत (काकू बोलावून घेते ) बापाला तर सेल्फ रिस्पेक्ट नाही आणि सावत्र आईला तर कणाच नाही फक्त नगाला नग उभे करतात तसे तोंड हलवत उभी असायची नवर्याच्या बाजूला। कावेरी ऑफिसातून कर्ज मागते। राज नाही म्हणतो (६ महिने सुद्धा झाले नाही व प्रोबेशन मध्ये लोन देत नाही ) पण इन्सानियत के नाते स्वतःच्या अकाउंट मधून ५० हजार देतो। ते पैसे त्या महा इब्लिस म्हातारीला काकू देते आणि भाऊ आपल्याला घरी राहायला देणार आहे फक्त महिन्याला घरभाडे घेईल असे म्हणून टुणूक टुणूक उड्या मारत निघून जातात। कावेरी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे तिला लगेच नको कापूया असे सजेशन म्हातारीचा भाऊ तीला देतो।
पण कावेरीला आधीच कसले तरी
पण कावेरीला आधीच कसले तरी कर्ज आहे ना जे फेडता यावे म्हणून ती मुंबईत नोकरी करते. हे कर्जाचे डोंगर ती कशी फेडणार. नंतर तिचे राजशी लग्न होईल तो भाग वेगळा.
आरती, अजनबी यांनी सविस्तर
आरती, अजनबी यांनी सविस्तर लिहीलंय. मलाही इतकं सांगता आलं नसतं कारण मी मधे मधे बघितलं आहे, मलाही इतके डीटेल्स आज कळले.
धन्यवाद अजनबी.
पण कावेरीला आधीच कसले तरी
पण कावेरीला आधीच कसले तरी कर्ज आहे ना जे फेडता यावे म्हणून ती मुंबईत नोकरी करते. >>>>>कर्ज नाही , तिला तिच्या आईचे घर सोडवायचे आहे। हे घर राजने रिसोर्टसाठी विकत घेतले आहे त्याने त्याची स्वतःची construction company मित्रासोबत पार्टनरशिप मध्ये सुरु केली आहे . पण ते घर काकूंचे आहे हे त्याला अजून तरी माहित नाही
धन्यवाद अजनबी. कावेरीची आई
धन्यवाद अजनबी. कावेरीची आई निजोची बालमैत्रीण असावी असेही मला वाटते आहे. कावेरीच्या आईचा मृत्यू कसा होतो. काहीतरी ट्रॅजेडी असते का.
अजनबी धन्यवाद ! आजी चांगलीच
अजनबी धन्यवाद ! आजी चांगलीच डॅम्बीस आहे तर. मला तर काऊचा बापही बावळटच वाटतो आणि सारखा तिला ऑफिसमध्ये काय फोन करत असतो. एकदा रिंग देऊन तिने उचलला नाही म्हन्जे कामात असणार ना, वाट पाहावी तर हा आपला सारखा परत परत फोन लावतो. ऑफिस मध्ये सारखा घेता येतो का पर्सनल फोन . काऊ तर बिनधास्त राजला (बॉसच्या मुलाला)ओरडत असते. तिला रत्नमालाने अभयदान दिले आहे. त्यामुळे बहुदा इतकी खेकसत असते.
कर्ज नाही , तिला तिच्या आईचे घर सोडवायचे आहे। >>> २५००० पगारावर कशी काय सोडवणार कोण जाणे पण ठीके...मेहनत तरी करत आहे
मला तर काऊचा बापही बावळटच
मला तर काऊचा बापही बावळटच वाटतो >>> हाहाहा. तो सगळीकडेच बावळट आहे. रेशिमगाठमधेही.
ती कावेरीची सावत्र आई वाटते
ती कावेरीची सावत्र आई वाटते रोजगारावर आणली आहे फक्त नंदीबैलासारखी मान हलवायला उभी असते। मुंबईला ते तिघे जेव्हा येतात। आणि आजी तो काही गावठीपणा दाखवते त्यात ती एकदा घरात चूल पेटवते व चांगलाच धूर होतो घरात। तिचे वडील लगेच कावेरीला फोन लावतात आणि तेव्हा कावेरी त्या घारूतळीचा प्रोजेक्ट बघत असते ते तसेच मधेच टाकून ती घरी आग (????) विझवायला जाते घरात पुरता चिखल करून ठेवतात आणि हि मूर्ख तो साफ करत बसते बर मग त्या सा आ ने तरी हिला बोलायचे ना तू कशाला आलीस मी साफ करते तर राहिली मान हलवत आणि हि काकू सगळी लादी पुसून पुन्हा संध्याकाळी कुठेतरी जाते। यात मला त्या सा आ चा खूप राग आला होता आपल्या म्हाताऱ्या आईला मुंबईच्या फ्लॅट मध्ये चूल पेटवायला देते आणि वरून ती विझवायला किंवा झालेला चिखल साफ करायला मदत काहीच करत नाही बाबा आणि लेक दोघे राहतात साफ करत।
काकूला एकदम अकाली प्रौढत्व
काकूला एकदम अकाली प्रौढत्व दाखवू नका म्हणजे झाल.आज त्या राजला धडे देत आहज,उद्या त्या सानिकाला मग सगळ्या ऑफिसला .
आणि निजोला हिला कुठे ठेऊ आणि कुठे नाही अस होईल
आणि ती निजो स्वत:च्या मुलाला सुधारायला जात आहे पण सानिकाचा कावेबाजपणा राजला कळतो आणि या माठ बाईला कळत नाही.
ती व्हॅम्प झालेलीच्या साड्या
ती व्हॅम्प झालेलीच्या साड्या मस्तच असतात. स्टाइलीश ऑर्गेन्झा.
ती व्हॅम्प झालेलीच्या साड्या
ती व्हॅम्प झालेलीच्या साड्या मस्तच असतात>>> पण ती दिसत मात्र नाहि खास... इतका मेकअप करुनहि.
कधी कधी कथानक आपण डोकं बाजुला ठेवुन नुसत पहाव असं असत.. मैत्रिणीच्या घरी राज..सांभाळते आहे त्याला हि काकु अन ती मस्त रजई मध्ये झोपली आहे.
अन ती मस्त रजई मध्ये झोपली
अन ती मस्त रजई मध्ये झोपली आहे. >>>>>>तिला चढली ती गेली झोपून। हा राहिला काकूबरोबर बाता ठोकत आणि मग गेला झोपून तिच्या हातावर।
मला काकू ड्रेसमध्ये आवडते,
मला काकू ड्रेसमध्ये आवडते, जास्त ग्रेसफुल दिसते.
ह्या सिरियलमध्ये दारू,
ह्या सिरियलमध्ये दारू, स्मोकिंग सारखं सारखं का दाखवतात. तो राज हेच करताना बरेचदा दिसतो. कधी कधी वैदेहीपण हेच करते.
जवळजवळ रोज एक सीन हवाच का याचा. हा राज जेवतो की नाही हा प्रश्न पडतो मला.
जसं संस्कृती अतिरेक नको, तसा ह्याचाही नको.
अंजु किती वेळा संपादित कराल
अंजु किती वेळा संपादित कराल नवीन प्रतिसाद टाका, असंही हा धागा हजारीपण गाठू शकणार नाही.
हाहाहा.
हाहाहा.
ह्या सिरियलमध्ये दारू,
ह्या सिरियलमध्ये दारू, स्मोकिंग सारखं सारखं का दाखवतात. तो राज हेच करताना बरेचदा दिसतो. कधी कधी वैदेहीपण हेच करते. > हो ना. जर वडील गेल्यावर आईने व्यवसाय उभा केलाय तर लहान्पणापासून सन्स्कारी आई चाच सहवास जास्त ना राज बाळाला. तरी असा कसा हा . आणि मधे नि जो घर सोडून गेली ती फक्त कावेरी भेटावी म्हणून बहुतेक. नाहीतर का गेली आणि का परत आली याला काही उत्तर आणि महत्व नाही. त्यचा नंतर उल्लेख पण नाही .
कावेरी - राज ची भांडण आवडत
कावेरी - राज ची भांडण आवडत आहेत लोकांना म्हणुन हे दोघं एकत्रच येतील हे जास्तीत जास्त बघतात..
चालेल हा धागा नक्की हजार नाहि तर शेकड्याने मेसेज येतील
कलर्स हिंदी वरची कुणी स्वरण
कलर्स हिंदी वरची कुणी स्वरण घर पाहता का? खुप छान सिरियल आहे मला आवडली
कलर्स हिंदी वरची कुणी स्वरण
कलर्स हिंदी वरची कुणी स्वरण घर पाहता का? खुप छान सिरियल आहे मला आवडली
नवीन Submitted by भावना गोवेकर on 10 June, 2022 - 06:44 >>>> तो महान ओढणी पंख्यात अडकून गळा आवळला जातो हा सिन ज्या सिरीयल मध्ये आहे तीच का ती ?
https://www.timesnowhindi.com/entertainment/television/article/clip-of-s...
संस्कारी आईला त्याच्यावर
जर वडील गेल्यावर आईने व्यवसाय उभा केलाय तर लहान्पणापासून सन्स्कारी आई चाच सहवास जास्त ना राज बाळाला. तरी असा कसा हा . >>>
संस्कारी आईला त्याच्यावर संस्कार करण्यापेक्षा आजूबाजूला असंस्कारी नातेवाईक घरात आणून ठेवण्यात इंटरेस्ट होता बहुतेक आणि मुलाकडे लक्ष देण्यापेक्षा त्यांच्याशी relation सांभाळणे आणि बिझनेस मोठा करणे हयात इंटरेस्ट असावा.
त्यांचा मुलगा आदित्य फक्त चांगला आहे, त्याने काकीला सरळ जाऊन आई बायकोचे इरादे सांगावेत.
ती सानीया एकच प्रकारचा अभिनय करते, पार डोक्यात जाते, खरंतर दिसायला छान आहे पण एकंदरीत गंडलीय अभिनयात. नि जो ने घरी एवढं सुनावले तरी राजच्या केबिनमध्ये, राजच्या खुर्चीत जाऊन बसते.
तो आदित्य मला आधी सक्षम
तो आदित्य मला आधी सक्षम कुलकर्णी वाटला. हा थोडा जास्त गोरा आहे त्याच्यापेक्षा.
हिरवीणीने केलेल्या स्वयंपाकात
हिरवीणीने केलेल्या स्वयंपाकात मीठ किंवा तिखट घालून, तो बिघडवून तिला हीरोच्या नजरेतून उतरवण्याच्या प्लॉटमधून आपले लेखक कधी बाहेर येणार?
Pages