Submitted by चुन्नाड on 13 May, 2022 - 06:53
कधी अचानक मनात येते
एक पोकळी गूढ विलक्षण
काही केल्या करमत नाही
विचारमग्न प्रहरांचे क्षण
आठवणींच्या लाटा खुनशी
खरवडती मम चित्तकिनारे
बोलूनही सांगता न येते
बंद मनाची उघडी दारे
व्यक्त होऊ, बांध फोडू, पण
राहिला मागे जुना गावही
मनावरील खपली काढून
अकस्मात जागे जुना घावही
ⓒ चुन्नाड
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे कविता.
छान आहे कविता.
धन्यवाद @मामी !
धन्यवाद @मामी !
क्या बात मित्रा...खूपच मस्त!
क्या बात मित्रा...खूपच मस्त! "बंद मनाची उघडी दारे" आणि "जुना गाव आणि जुना घाव" हे दोन वाक्यांश अप्रतिम!!!
जबरी
जबरी
छान आहे कविता.
छान आहे कविता.
सुरेख!
सुरेख!
छान आहे कविता.
छान आहे कविता.
मस्त आहे, अवचित जागे जुना घाव
मस्त आहे, अवचित जागे जुना घाव ही असंही होऊ शकेल
खूप छान