साधारण माहिती -
युके मध्ये बरेच भारतीय आहेत त्यामुळे जेवण आपल्यासारखे मिळते. डाळ, तांदूळ, उसळी, भाज्या, वै. सामान मिळते. मसाले - हळद, तिखट मिळते सहज. पण विशिष्ठ ब्रँड मिळत नाही , जसे एवरेस्ट, बेडेकर किंवा बादशाह (इथे मंगल का असाच काही तरी ब्रँड होता). तसे काही हवे तर घेउन जा. इथे बरीच पाकिस्तानी दुकाने असतात त्यामुळे पोहे, रवा पण मिळतो.
सेंसबरी, टेस्को ही रोजच्या खरेदीची दुकाने आहेत. टेस्कोमधूनदेखिल आपले सामन मिळते. लंडनजवळ साउथॉल म्हणुन स्टेशन आहे तिथे तर बरेच भारतीय रहातात.. तिथे देखील मसाले, भाज्या, केशर, वेलची अशी खरेदी करता येते. लंडनजवळ अजुन एक जागा आहे वेम्बली, तिथे देखिल हे सगळे मिळते.
भारतात फोन करण्यासाठी कार्ड मिळतात.. आता नाव विसरले आहे मी.. तिथल्या भारतीय व्यक्तीला विचारल्यास त्यांना माहीत असते. ५ पाऊंड्ची ३ कार्डस घेतली तर स्वस्त मिळतात.
प्रवासखर्च जास्त असतो त्यामुळे ऑफिसच्या जवळ घर बघावं. बेड आणि ब्रेकफास्ट्ची पण सोय असते, स्टुडंट हॉस्तेल्स असतात. नेटवर याची माहिती असते. बाहेर कितीही थंडी असली तरी घरात २० डिग्रीच्यावर हिटींग ठेवु नये, एक तर हिटींग बिल कमी येते आणि घराबाहेरच्या थंडीत अॅडजेस्ट होता येतं. घराबाहेर पडताना तापमान १५ वैगेरे करुन जाव.. म्हणजे घरात आल्यावर थोड्याचवेळात आपलं डिहायड्रेशन होत नाही.
१६ वर्षांखालील मुलांना सिगरेट किंवा दारु विकत घेता येत नाही. त्यामुळे कोणी तशी रिक्वेस्ट केली तर ऐकू नये. बरेचदा पोरे, पोरी मागे लागतात.
इलेक्ट्रॉनिक वस्तू तिथे स्वस्त आहेत कॅमेरा वै. तिथे घ्यावेत. कॉमेट, अर्गोस च्या लिन्क्स इथूनही चेक करुन किम्मत कंपेअर करु शकतो. कूकर आणि हँड मिक्सी इथून न्यावेत हे आटेम्स तिथे २० पाऊंडांना घ्यायला जीवावर येते.
Thanks for reply Aditi.
Thanks for reply Aditi.
My office is in Shinfield Park area.
Also howz the education
Also howz the education system there. My daughter is currently studying in CBSE pattern here.
शिक्षण पद्धती वेगळी आहे. GCSE
शिक्षण पद्धती वेगळी आहे. GCSE आहे यु के मध्ये. गूगल करा. भरपूर माहिती मिळेल.
राजेश, हो लंडन मध्ये जवळ जवळ
राजेश, हो लंडन मध्ये जवळ जवळ सगळं भारतीय किराणा मालाचं सामान मिळतं.
अदितीनं वर लिहिलेल्या उपनगरांत भारतीय वस्तु आरामात मिळतात.
'सोहम' ह्या ब्रँड ची सगळी पिठं मिळतात ( कुळीथ सोडून) . त्यांचं फेस्बुक पेज सुद्धा आहे, तिथं संपर्क साधलात तर तुमच्या जवळपास कुठे उपलब्ध होइल ते कळेल. ऑन्लाइन सुद्धा मिळतं .
मला एप्रिलमध्ये लंडनला शिफ्ट
मला एप्रिलमध्ये लंडनला शिफ्ट व्हायचे आहे. नवऱ्याचे ऑफिस Canary Wharf येथे असणार आहे. त्याच्या आसपास राहण्यासारख्या एरिया ची नावं कोणी सांगु शकेल का? त्याला शक्यतो ऑफिस जवळ रहायचे आहे. आम्हाला एक नऊ वर्षांची मुलगी आहे. तर किती मोठे घर घ्यावे लागेल?
Belfast मध्ये कुणी राहत का
Belfast मध्ये कुणी राहत का आपल्यापैकी?
पियुशा : बेलफास्ट मधे माझा
पियुशा : बेलफास्ट मधे माझा मुलगा राहतो. तेथे मराठी मंडळ पण आहे. शुभेच्छा. काही माहिती पाहिजे असल्यास संपर्कातून मेल करा.
सुरुची, canary wharf मध्येच
सुरुची, canary wharf मध्येच राहू शकता. तिकडे सगळे फ्लॅट्स आहेत, घरे (बंगले/रो हाऊस) कमी आहेत. किती मोठे हे तुमच्या गरजेनुसार. किमान 2बेड फ्लॅट तरी असावा कारण घरे छोटी असतात. शाळा जवळची असेल तिकडे शक्यतो ऍडमिशन द्यावी असा सरकारी नियम आहे. सरकारी शाळा फुकट असतात. शाळेचे रेटिंग चेक करून त्याप्रमाणे एरिया ठरवा.
ंइत्रन्नो.....चल ऊ ़ च
ंइत्रन्नो.....चल ऊ ़ च दिस्चुस्सिओन्स सुरु करुयत...
Mitranno ...UK cho
Mitranno ...UK cho discussions parat suru karuyat..,mi ankya...Maaybolich juna member....sadhya Tile Hill coventry madhye rahatoy
आम्ही सध्या ग्लास्गो स्कॉटलंड
आम्ही सध्या ग्लास्गो स्कॉटलंड येथे राहात आहोत.
मी सध्या लंडन मध्ये आहे
मी सध्या लंडन मध्ये आहे
परत लोकडउन न्युज येत आहेत
मी सध्या लंडनला आलोय. बरीये
सुप्रभात अंग्रेज मंडळी. मी सध्या लंडनला आलोय. बरीये हवा. दररोज सकाळी रिचमंड पार्क अथवा थेम्सची पायपीट चालू असते. मजा येतेय.
नमस्कार मंडळी , मला नोकरी
नमस्कार मंडळी , मला नोकरी निमित्ताने UK ची ऑफर आली आहे तरी तज्ज्ञ लोकांनी खालील बाबतीत मार्गदर्शन करावे ही विनंती
महिन्याकाठी खाण्या - पिण्यासाठी लंडन च्या आस पास किती खर्च येतो ?
घराची भाडी किती असतात - २ bhk
मुलगा १५ वर्षाचा आहे तर त्याला १० वी का ११ वे मध्ये प्रवेश घ्यावा लागेल? कॉलेज ची फी किती असते ?
सेंट्रल लंडन मधेय क्लायंट चे ऑफिस आहे त्यामुळे रोज किंवा आठवडायतून तीन दिवस तरी जाऊन येऊन करावे लागेल.
एवढे सगळं लक्षात घेता किती पगार लागेल?
नमस्कार, मला सल्ला हवा आहे..
नमस्कार, मला सल्ला हवा आहे.. मी IT company मध्ये manager म्हणून काम करते. मला माझ्या कंपनी तर्फे लंडन ला जाण्याची संधी मिळू शकते आहे. माझा प्रश्न असा आहे...मला दोन मुलगे आहेत..छोटा चार वर्षांचा आहे आणि मोठा नऊ.सध्या माझ्याकडे सगळ्या कामांना हेल्प आहे.. जेवणाला सुध्हा मावशी आहेत ज्या माझ्या मुलाला दुपारी सांभाळतात . मला मुले आणि नवर्या सोबत लंडन ला दोन वर्षे जावेसे वाटते आहे. नवरा तिथून wfh करू शकतो किंवा तिकडे जॉब शोधू शकतो.. प्रश्न हा आहे की मी ऑफिस आणि घर दोन्ही manage करू शकते का?की एखादं वर्ष थांबून मुलगा थोडा मोठा झाला की विचार करू?मला वर्किंग मॉम आणि इतरांचेही experience वाचायला आवडतील..
बब्बन,
बब्बन,
यु के मध्ये शाळेचे वर्ष सप्टेंबर ते ऑगस्ट असते. १ सप्टेंबरला ५ वर्षे पूर्ण असली की पहिलीत जाते मुल. मुलाचा जन्म कुठल्या महिन्यात आहे त्यावर तो कुठल्या वर्षात जाईल ते ठरेल. सरकारी शाळा १३वी पर्यंत फुकट असते. ११वी मॅट्रिक, १२वी १३वि ज्युनिअर कॉलेज - सिक्स्थ फॉर्म म्हणतात इकडे. ८०-८५% मुले सरकारी शाळेत जातात. ११वी आणि १३वी ही महत्वाची वर्षे, बोर्डाची परिक्शा असते.
१३ वी नंतर कुठली डिग्री करणार त्याप्रमाणे फी ठरेल.
कुठे रहाणार यावर खर्च अवलंबुन आहे. ओळखितले कुणी असेल तर सविस्तर बोलून खर्चाचा नेमका अंदाज घेता येईल तुम्हाला.
तुरू,
यु के मध्ये घरकामांत कुठलीही मदत मिळणे अवघड आणि महाग आहे. स्वयंपाकाला बाई जवळजवळ अशक्य, रोजची तर नाहीच. त्यामुळे घर सगळ्यांचे आहे, सगळ्यांनी कामे केली पाहिजेत या तत्वावर राहणे शक्य असेल तर सगळे छान मॅनेज होते. मुलाला डेकेअर मध्ये ठेवता येते. शाळा ९ ते ३:३० असते, ६ वाजेपर्यंत शाळेत पैसे देऊन सांभाळतात मुलांना. त्यामुळे मुलांना सांभाळणे हा मोठा इस्श्यु नसतो.
मी गेली १९ वर्षे इकडे आहे. नोकरी, घर, २ मुली सगळे छान मॅनेज झालेले आहे. शारिरिक आणि मानसिक तयारी मात्र पाहिजे सगळे करण्याची.
धन्यवाद अदिती . वाचून हुरूप
धन्यवाद अदिती . वाचून हुरूप आला.. १. तुम्ही रोजच स्वयंपाक आणि बाकी कस manage करता? २.मोठ्या मुलाचा काही issue नाही..लहान मुलाला इंग्रजी फारसे येत नाही..तो शाळेत कसा manage करेल..तिथे mediator असतात का? ३.माझे office 2 King Edward St, London EC1A 1HQ, UK इथे आहे.. राहण्या योग्य ठिकाण सुचवावे.माझ्या मते हे मेन लंडन मध्ये असावे..zone 1?? इथे घर भाडे जास्त असावे.. कुठे राहील तर त्यातल्या त्यात जवळ पडेल??, (किफायतशीर ,चांगल्या शाळा आणि community)
तुरु, प्रयोग म्हणून भारतात १
तुरु, प्रयोग म्हणून भारतात १ महिनाभर सगळे मॅनेज करुन बघा. सगळ्यांचीच तयारी कितपत आहे त्याचा अंदाज येईल.
४ वर्षाच्या मुलाला तुम्हाला बेसिक इंग्रजी शिकवावे लागेल. १ सप्टेंबरला ४ वर्षे पूर्ण असेल तर मुलगा पूर्णवेळ शाळॅत जाईल.
सेंट्रल लंडनमध्ये रहाणे महाग असते. पण परवडत असेल आणि २-४ वर्षेच रहाणार असाल तर तिकडेच जवळपास रहाणे उत्तम.
भारतिय जनता झोन ४ पासून पुढे असेल. लहान मुले, नविन भाग, नविन कल्चर सगळे सेटल होईपर्यंत कुणी ओळखिचे जवळपास असेल अशा ठिकाणी घर बघितले तर मदत होईल.
नमस्कार. यूके मध्ये हापूस
नमस्कार. यूके मध्ये हापूस आंबे मिळतात का? लोकल शॉप मध्ये पाहिले.. फारच डागाळलेले दिसले.. ऑनलाईन कुठले खात्रीशीर आहेत का?
कोणी इथे इडली डोसा च पीठ घरी
कोणी इथे इडली डोसा च पीठ घरी करतं का? आंबत का पीठ?
यु के फार मोठा आहे हो यु के
यु के फार मोठा आहे हो यु के मधल्या कुठल्या देशात आणि कुठल्या गावात आहात तुम्ही?
धन्यवाद अदिती..
धन्यवाद अदिती..
ओह सॉरी... मी Manchester
ओह सॉरी... मी Manchester मध्ये राहते..
कोणी बाजूला आयर्लंड मध्ये आहे
कोणी बाजूला आयर्लंड मध्ये आहे का?
धन्यवाद अदिती
धन्यवाद अदिती
मुलाचा जन्म ऑगस्ट २००६ चा आहे . कुठे राहावे हाच मोठा प्रश्न आहे. सध्या घर भाडे खूप वाढले आहे असं ऐकिवात आहे . आणि ऑफिस ला जावं लागणार म्हणजे जायला यायला पण वेळ आणि पैसा नको जयाला हे पण पाहायचं आहे . सध्यातरी चांगली शाळा बघून तिथे घर पाहण्याचे बघत आहे . घर भाडे , किराणा , ट्रान्सपोर्ट , बाहेरील खाणे कधीतरी आणि फुटकळ खर्च यासाठी महिना काठी किती पैसे लागतात सरासरी ?
१.Work visa वर लाँग टर्म साठी
१.Work visa वर लाँग टर्म साठी गेलेल्यांना NHS चे संरक्षण असते का?
२.daycare चे साधारण किती पैसे होतात? तासा प्रमाणे असतात का
३.माझी कंपनी फार बेसिक pay scale देते आहे.. around ४२k..(which is same to all levels.I found it unfair for higher levels). कुटुंबासोबत गेल्यावर हे परवडू शकेल काय?
४.भारतात राहून लंडन मध्ये स्पॉन्सर जॉब कसाशोधावा?
लंडन येथे महिन्याचा खर्च
लंडन येथे महिन्याचा खर्च £३०००+ सहज होईल... इथे सुद्धा महागाई भरमसाठ वाढत आहे... पैसे वाचवायचे उद्दिष्ट असेल तर सध्याचा काळ कठीण आहे
£४२k मध्ये लंडन येथे decently
£४२k मध्ये लंडन येथे decently राहणे अशक्य आहे
माझ्या नवऱ्याला जो CAE, FEA
माझ्या नवऱ्याला जो CAE, FEA mechanical softwares वर काम करतो त्याला भारतात असताना तिकडे स्पॉन्सर जॉब मिळू शकतो काय? की तिथे गेल्यावर शोधलं तर फायदेशीर पडेल?
साधारण किती in hand आले तर
साधारण किती in hand आले तर परवडू शकेल?
Pages