(हिंमत असेल तर), डोळ्यांत वाच माझ्या..

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

काल
आपल्या फस्टम् फस्ट रात्री
हे बटबटीत गोळे तुझ्या डोळ्यांचे
रोखून बघताना माझ्याकडे........
नको म्हंटलं तरी जातंच ना लक्ष
त्यांच्याकडे...!
दिसलंच मला त्यांच्यात प्रतिबिंब
तुझ्या मनातल्या भावांचं, धाकी पाडणार्‍या जरबेचं.
पटापटा मान वळवून ती नजर
टाळण्याचा मी केलेला तो आटोकाट प्रयत्न
कोणी असं करत नाही!
पण इतक्या रागावून अर्पित केलेली ती एक्सरे व्हिजन
मला पाहवलीच नाही बघ.
आणि मग निरखू लागलो मी
भिंतीवरची किडा पकडणारी पाल, गुणगुणणारे डास.
तुझ्या आयशॅडो थापलेल्या नेत्रांचे निखारे
वर खोट्या पापण्या डकवलेले..
बचाबच आयलायनर लावून वटारलेले!
मी हळूच चोरून बघतो तर काय..
ती नजर.. अजूनही रोखलेली माझ्यावर
त्यात होते इशारे..
अविश्वासाचे, नावडतेपणाचे, जवळ आलास तर याद राख सांगणारे
प्रत्येक कटाक्ष माझ्या बेरकीपणाला
ओळखून असणारा..

दचकून दूर सरकून,
त्या नजरेतला भाव समजून घेत
विचार केला...
ढाराढूर झोप नंतरही काढता येईल
आधी ह्या जुल्मी डोळ्यांची भाषा समजली पाहिजे!

आता अनेक बर्ष उलटली तरी
कित्तेकदा ती नजर रोखल्या जाते
आणि हबकतोच मी.
फस्टम् फस्ट रात्रीची भिती
अजुनही उरात भरून आहे
मी महाबेरकी असलो तरी सहनशील निपजलो असा
माझ्या माहेरी लौकीक आहे.

दचकून दूर सरकून,
त्या नजरेतला भाव समजून घेत
विचार केला...
ढाराढूर झोप नंतरही काढता येईल
आधी ह्या जुल्मी डोळ्यांची भाषा समजली पाहिजे! >>>>

काय जबरदस्त हिम्मत आहे . Lol

मी महाबेरकी असलो तरी सहनशील निपजलो असे आमचे तिर्थरूप आता असते तर मलाही नक्की म्हणले असते बघा. मला बोम्बीची आठवण झाली आता. पण खरे तर नन्तर सारे व्यवस्थित पार पडले. बोम्बी तशी हुशार आहे म्हणून. नाहीतर मी गडबडलोच होतो. आयुष्यभर पन व्यवस्थितच पार पडले म्हणावे. बोम्बी तशी फार धोरणी. कुठे शिकवावे, पुढाकार घ्यावा हे तिला बरोबर कळते.
असूदे. सन्स्कृतात पन्डित होऊन घडघडा मन्त्र म्हणने निराळे अन सन्सारातले व्यवहारज्ञान वेगळे हे तसे मि मान्य केलेच आहे. तुमची कविता आवडली. बोम्बीलाही दाखवणार आहे आता. Happy पण तिचा गैरसमज तर नाही ना होणार? Sad

दीकुदा, प्रकाशअण्णा, मेधाक्का, शँकीड्यूड, वैद्यबुवाअप्पा, नासात्या, सिंड्रावती, मिनोतीआंटी, अम्मोमामी, कल्पुताई, सासताई, अग्वाज्जी, श्रीकाका, भटजीबुवा, भागाबाई, अनिलभाई, सुनिधीमावशी ... धन्यवाद!!! धन्यवाद!!!! धन्यवाद!!!!!

श्रीकाका, 'अशी हिंम्मत थोतांड आहे की नाही' ह्यावर बाफ उघडू का?

भागाबाई, असे प्रश्न विचारून तुम्ही माझ्या वृत्तीवर संशय घेताय! मी अ‍ॅडमिनकडे तक्रार का करू नये? (पण कवितेला 'सह्हीच' म्हणालात म्हणून सोडून दिलं!)

कृपया इतके जबरट प्रतिसाद देऊन मला चाव्या भरू नका! असं प्रोत्साहन मिळून मी कविता(!) पाडून इमोसनल अत्याचार करायला सुरवात केली की 'मनोरंजन नको, पण कविता आवर' म्हणाल! Proud

श्रीकाका, 'अशी हिंम्मत थोतांड आहे की नाही' ह्यावर बाफ उघडू का? >>> नहीहीईईईईईईईईईईई !!!!
ऐसा इमोसनल अत्याचार हमपर ना करियो Proud

Pages