Submitted by ध्येयवेडा on 7 May, 2022 - 01:07
"आता प्रत्येकाने आपल्या डाव्या हाताने बटूच्या पायावरून एक एक पळी अर्घ्य सोडावे. उजव्या हातात ते जमा करून तीर्थ समजून प्राशन करावे"
एक एक जण आला,
कोणी ओलं बोट ओठांना लावलं,
कोणी केवळ हात तोंडाजवळ नेला,
कोणी ओला हात केसांवरून फिरवला.
अगदी शेवटी ती आली आणि तिनं अर्घ्य दिलं. बटूच्या पायावरून ओघळणारा शेवटचा थेंब जमा झाल्यानंतर, उजव्या हातात जमा झालेलं तीर्थ तिनं मनोभावे प्राशन केलं..
ती परतताना बटूचा हात आशीर्वाद देण्यासाठी वर आलेला मी बघितला.
- भूषण
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
काहीच कळलं नाही.
काहीच कळलं नाही. म्हणजे मूंजीत बटुची पूजा वगैरे माहितीय. पण नक्की काय दर्शवायाचे कळले नाही(रुपक का?)
कळलं नाही.
कळलं नाही.
मनोभावे रिच्युअल्स केल्यात
मनोभावे रिच्युअल्स केल्यात तरच आशीर्वाद मिळेल. नाही तर नुसते देखाव्यासाठी कृती करण्यात अर्थ नाही. असे सुचवायचे आहे लेखकाला.
असा अर्थ मी लावला.
प्राची +७८६
प्राची +७८६
म्हणूनच मी सुद्धा कोणाकडे सत्यनारायणाच्या पूजेला गेलो तरी पाया वगैरे पडायच्या फण्द्यात पडत नाही. डायरेक्ट प्रसादावर ताव मारतो अर्थात त्या घरच्या कोणी म्हटले या पाया पडा तर उगाच सीन क्रिएट न करता पडतो पाया. मंदीरातही तेच. सोबत म्हणून गाभाऱ्यात जातो. मंदीर आवडले तर फोटोही काढतो. ते स्टेटसलाही टाकतो. पण पाया पडलेल्या नसतात. कारण हेच. विश्वासच नाही तर का दिखावा करा
जेव्हा नवनवीन नवीन नास्तिक झालेलो तेव्हाही रस्त्यात कुठे मंदीर दिसले की सवयीने पाया पडल्या जायच्या. वरच्या कथेतील श्रद्धाळू लोकंही बहुधा तेच करत होती. सवयीने पाया पडत होती.
आपल्या सर्वांचे
आपल्या सर्वांचे प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
@प्राची/ ऋन्मेश.. आपण योग्य अर्थ काढला आहे.
छान . प्राची यांचा प्रतिसाद
छान . प्राची यांचा प्रतिसाद वाचल्यावर कळलं खरं. माबुदो.
पण प्रत्यक्षात हल्ली असं घडलं तर पहिल्या एक दोघांच्या कृतीनन्तर गुरुजींनी लगेच सांगितलं असतं बटू ला हात वर करायचा प्रत्येक वेळी म्हणून.
फालतू प्रथा.. आपल्याशिवाय
फालतू प्रथा.. आपल्याशिवाय इतरांना कमी लेखण्याचे घाणेरडे संस्कार रुजविण्याचे एक विशिष्ट समाजाचे प्रयत्न
नृसिंहसरस्वती महाराजांबद्दल
.
नृसिंहसरस्वती महाराजांबद्दल
नृसिंहसरस्वती महाराजांबद्दल (ते मला वाटतं मुंज होइपर्यंत बोलत नसत) आहे का ही कथा? तशी असेल तर आवडली.
.
सामान्य मुंज होणार्या बटुंबद्दल असेल तर त्या बटुंनी आशीर्वाद देण्याऐवजी स्वतः ची स्वतः चड्डीच्या नाडीची निरगाठ सोडायला पहीले शिकावे.
नक्की काय असते हे बटू?
नक्की काय असते हे बटू?
मला वाटलेले देवाची मुर्ती..
नक्की काय असते हे बटू? >>
नक्की काय असते हे बटू? >> ज्याची मौंज असते, तो मुलगा.
प्राची यांचे इंटरप्रिटेशन मला
प्राची यांचे इंटरप्रिटेशन मला सुद्धा पटले.
पण असले रिच्युअल मनोभावे का करावेत हा व्हॅलीड प्रश्न आहे. आणि त्याचे पाय धुतलेले पाणी पिणारी पहिली व्यक्ती बघून खुश होऊन आशीर्वाद देणारा egomaniac बटू डोळ्यासमोर आला आणि हसू आलं.
वर्णिता , मला वाटतं कथा
वर्णिता , मला वाटतं कथा बटूबद्दल नसून त्याला नमस्कार करणार्यांबद्दल आहे. अर्घ्य देणार्यांपैकी एकानेच ते प्राशन केले.
सांगितलं होतं तसं प्रत्यक्ष
सांगितलं होतं तसं प्रत्यक्ष घडतांना बघून बटूला आपल्या भूमकेची आठवण झाली असावी..
पायावरचं पाणी प्राशन?? ईईईई..
पायावरचं पाणी प्राशन?? ईईईई..
आणि साताठ वर्षाच्या शेंबड्या पोराकडून आशिर्वाद?? काहीतरी वाह्यात प्रथा. यातनं पोराचा इगो वाढेल नायतर काय!
याउलट आशीर्वाद द्यायची तुझी काहीही लायकी नाही, मोठ्यांकडून नमस्कार करून घ्यायचा नाही, कितीही मोठा झालास तरी सर्व माणसांना समान इज्जत असते, उच्चनीच करणे चुक आहे वगैरे संस्कार करण्याची गरज आहे.
मला ती त्या बटुची आई वाटली...
मला ती त्या बटुची आई वाटली.....
ओह बटू म्हणजे मुंज मुलगा का.
ओह बटू म्हणजे मुंज मुलगा का. आमच्यात मुंज होत नसल्याने कल्पना नव्हती. मला मुर्तीच वाटले. पण मग प्रथा फारशी रुचली नाही. अर्थात ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग. या केसमध्ये न पाळणारेही आपल्याजागी योग्यच. त्यांची देवावर श्रद्धा असावी पण ही प्रथा त्यांना रुचत नसावी.
मला आठवतेय लहानपणी कुठल्याश्या सणाच्या दिवशी आई चाळीतल्या लहान मुलांना गोळा करून जेवण द्यायची. जाताना त्या सर्वांच्या वाकून पाया पडायची. आणि मलाही पडायला लावायची. मी त्या पोरांपेक्षा मोठा घोडा होतो. पण मस्त झोपून साष्टांग नमस्कार घालायचो. मामा आपल्या पाया पडतोय हे पाहून ती पोरंही खिदळायची आणि मलाही मजा यायची. अर्थात ते पायाचे पाणी वगैरे प्रकार नसल्याने नुसते कोणाच्याही पाया पडायला कुठला अहंकार आड यायचा प्रश्न नव्हता.
मला ती त्या बटुची आई वाटली...
मला ती त्या बटुची आई वाटली.....
>>>
हे छान ईण्टरप्रीटेशन आहे. आई हे करू शकतेच. आणि योगायोगाने आज मदर्स डे सुद्धा आहे