ह्यांना इंग्लिश मध्ये काय म्हणतात

Submitted by फलक से जुदा on 21 April, 2022 - 11:04

1. लेप लावणे

उदा. हाताला मुक्का मार लागल्याने औषधी लेप लावला.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

हातापायाला मुंग्या येणे >> पिन्स अँड नीडल्स म्हणतात. < फूट, रिस्ट > वेंट टू स्लीप म्हणतात

औषधी लेप >> बाम किंवा साल्व्ह (salve) - अप्लाइड सम बाम / साल्व्ह वापरता येईल

डोळे मिचकावणे
म्हणजे लहान मुला शी बोलताना, एखादा जोक मारताना आपण दुसर्‍याकडे पाहून डोळे मिचकावतो की "गंमत गं/रे" अशा अर्थी.

ब्लिंक नसावे!

Winked

Paraesthesia

छान प्रतिसाद

Salve सर्वात जवळ जाणारा शब्द वाटला, मेधा धन्स

डोळा मारणे : मस्त किस्सा Lol

<<<https://youtu.be/_8Gx6AFMJ9U
स्प्रेडींग धिस विल मेक द होल वर्ल्ड ब्लाइंड<<<
हाहा.. या व्हिडीओवरून माबोवर झालेली घमासान चर्चा आठवली. Biggrin

{औषधी} वस्तुचा लेप - poultice

हातापायाला मुंग्या येणे>>>>>Tingling numbeness बरोबर.

बोबडे बोल ला काय म्हणतात? >>lisping ??
lisping - सिक्सटीन म्हणता न येणे, सिक्स्तीन/ सिक्थिन उच्चार करणे.

बोबडे बोल - prattle.

डोळा मारणे make eyes at,make a pass at,

शिंक अडकणे choke on the sneeze.

छान धागा आहे, ईंग्रजीत बरेच शब्द अडकत राहतात.
गूगलवर सुद्धा काही शब्द सापडत नाही. तिथे मायबोली कामाला येईल Happy

बोबडे बोल - लहान बाळांचं असेल तर बेबी टॉक,
जेंव्हा मुलं नुसतेच आवाज काढतात ते बॅबलिंग
स्पीच इम्पेडिमेंट असेल तर लिस्पिंग ( र, स, थ म्हणता येत नाही असे )

प्रॅटल हे अशुद्ध उच्चारापेक्षा असंबद्द बडबडी साठी वापरलं जातं

प्रॅटल हे अशुद्ध उच्चारापेक्षा असंबद्द बडबडी साठी वापरलं जातं
>>>>राईट. मला सुद्धा असंच वाटलेलं. पण गुगल मध्ये prattle baby talk असं स्पेसिफिक सर्च केलं तर तसाही वापरतात असं दिसलं.

ओह.

लॅदर हे नाम फेस ( मराठी फेस) अशा अर्थाने वापरतात.
लॅदर क्रियापद हे चोपडणे - अंमळ सढळ हाताने लावणे अशा अर्थाने वापरले जाते.
उदा - लॅदर ऑन सन स्क्रीन

औषधी लेप स्पष्ट विचारलंय ना.
रंगाचा लेप - apply coat of paint.
मलम फासणे - apply / smear ointment
भाजलेल्या जखमेवर - salve
रंगाचा टवका उडालाय तिथे जरासा रंग लावणे dab, touch up some paint.
कारवी किंवा इतर काठ्या विणून झोपडीची भिंत करून चिखलाने लिंपणे -wattle and daub

मुंग्या tingling
सुन्नपणा numbness

जनरली दोन्ही मिळून असल्याने दोन्ही जोड शब्द असल्यासारखे वापरतात , पण अर्थ भिन्न आहेत

पोट वाटी

त्याला बहुतेक नळ फुगणे किंवा वाट सरकणे म्हणतात
मेणबत्ती ग्लास इ इ काहीतरी करतात

रंगीत तालिम - ड्रेस रिहर्सल
तुमच्या शब्दापूर्वी रिहर्सल लावून अनेक शब्द बनतात. इंडिपेंडस डे परेड रिहर्सल.
आणखी काही स्पेसिफिक शब्द आहे का?

आज मला दोन शब्द गूगल translate मध्ये शोधायची इच्छा झाली.
१) कलंक (/लांछन/डाग)
- stigma, spot
२)करंटा
-karanta. हे विशेषनाम आहे असे गूगलबाबाला वाटले.

करंटा शोधल्यावर गूगल बाबाने मला खालील उत्तरे दिली

Luckless, poor, unfortunate, ill-starred, wrenched

ह्याचे मराठी शब्द (रिव्हर्स सर्च)

करंट्या कपाळाचा-हाडाचा
दैवहीन
अत्‍यंत दुदैवी, कमनशिबी
भाग्‍यहीन
फुटक्‍या नशीबाचा.

Pages