खादाडी: ठाणे

Submitted by admin on 27 May, 2009 - 01:04

ठाण्यातल्या खादाडीबद्दलंचं हितगुज

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राम मारुती रोड वर श्री हनुमान नावच एक मिठाई आणि फरसाण शॉप आहे मराठी पद्धतीची मिठाई छान मिळते. टिप टॉप च्या कृत्रिम रंग आणि विविध आकार असलेल्या फँसी मिठाई पेक्षा मला तरी इथले आयटेम्स जास्त आवडतात.
कधी आलात ह्याभागात तर ट्राय करा. इथले कंदी पेढे खूप छान असतात.

मी खाण्याच्या साध्या जागा शोधत आहे.. फार फॅन्सी जेवण नको.. फ्युजन तर मुळीच नको.. आजकाल थाळीतही पूरीऐवजी नानच मिळते..ते खायला जीवावर येतं.. वर छान छान पर्याय सुचवलेत ते ट्राय करेनच

श्री हनुमान मधून नवऱ्याने आणलेला मध्ये खाऊ वेगवेगळया प्रकारचा, छान होता. प्रशांत कॉर्नरमधून पण आणायचा तो, विशेषत: ड्रायफ्रूट कचोरी मस्त असते आणि संत्र बर्फी पण सीझनल मिळते. इथले बरेच आयटेम्स आम्हाला आवडतात, डोंबिवलीत शाखा काढावी त्यांनी. त्यांची ती ढोकळा, कोथिंबीर वडी बरोबर मिळणारी चटणी छान असते.

मामलेदार मिसळ मला आवडते, डोंबिवलीत आहे आता. आम्ही आणतो पार्सल कधीतरी.

अभिरुची हाॅटेल.
ते जळून गेलं बऱ्याच वर्षांपूर्वीच..

चाटसाठी प्रशांतपेक्शा तू जिकडे रहातेस तिकडचा एखादा फेमस ठेला असेल तो बघ. प्रशांंतचा बोलबाला जास्त आहे. घोडबंदर साईडला असशिल तर गौरव छान आहे चाट साठी.
राजमातापेक्शा दुर्गाचा वडापाव मला जास्त आवडतो.

राम मारुती रोड वर श्री हनुमान नावच एक मिठाई आणि फरसाण शॉप आहे मराठी पद्धतीची मिठाई छान मिळते. टिप टॉप च्या कृत्रिम रंग आणि विविध आकार असलेल्या फँसी मिठाई पेक्षा मला तरी इथले आयटेम्स जास्त आवडतात. >>> +111

थाळीसाठी - टीपटॉप, राजधानी, भगत ताराचंद, स्वाद - बी केबिन
चायनिजसाठी - ओरिएंटल स्पाइस, मेनलँड चायना, मेडोजमध्ये चायना बिस्ट्रो
चाटसाठी - गौरव, बिकानेर, प्रशांत, जागोजागी असलेले ठेले, ढोकाळीमध्ये हिनल
मराठी पदार्थ - गोखले उपहार ग्रूह, सुरुची मिसळ, मामलेदार
मराठी मिष्टान्न - हनुमान, गोरस, गोखले
दक्षिण भारतिय - जागोजागी असलेले ठेले/छोटे गाळे जास्त चांगले असतत. रेस्टॉरंट हवे असेल तर तंबी छान आहे. स्वामी ओके आहे.

जयवीर स्वीट्स खोपट रोड : फक्त रविवारी मिळणारे दोन चविष्ट पदार्थ: ढोकळा + पपई चटणी , शुद्ध तुपातली जिलबी .

गजानन, राजमातापेक्षा 'अलिबागचा वडापाव' खा. मस्त चटपटीत आहे एकदम. गजाननच्या गल्लीत शेगाव कचोरीच्या समोर ह्याच नावाचं दुकान आहे. भगवतीच्या कॉर्नरवर.

तिथेच भगवतीच्या गल्लीत प्रशांत ठोसर ह्यांचे राज स्नॅक्स नावाचे दुकान आहे, त्यांच्याकडे सकाळ दुपार संध्याकाळ नाश्ता आणि जेवणाचे विविध मेन्यू असतात. सगळे पदार्थ चविष्ट असतात. आणि रोज खूप विविधता असते. त्यांचे गोड आणि खारे चिरोटे प्रसिद्ध आहेत. तसेच फराळाचे विविध पदार्थही खूप छान आहेत.

चाटसाठी पाचपाखाडीत प्रशांतच्या आजूबाजूला कृष्णा स्वीट्स आणि शतरंज आहे. शतरंजकडे पनीर आणि सोया बार्बेक्यू आयटम पण गरम गरम तयार करून मिळतात.

पुढे खाऊ गल्लीत झामा स्वीट्स झालं आहे. तिथेही चाट आणि कुल्फी फालुदा चांगला आहे. मी चेंबूरच्या झामामध्ये हे पदार्थ खाल्ले होते, पाचपाखाडीत अजून खाल्ले नाहीयेत. त्या दुकानात खाकऱ्याचे हटके फ्लेवर आहेत जसे की मुंबई वडापाव वगैरे.

घंटाळीच्या गल्लीत श्रध्दा वडापावच्या समोर गिरगाव मुंबई की अश्याच काही नावाचं एक छोटं आऊटलेट झालं आहे, तिकडचे साबुदाणा वडा, खिचडी इत्यादी पदार्थ मला खाऊन बघायचे आहेत.

जांभळी नाक्याला प्रीती सँडविच आहे. खूप छान आणि भरपूर व्हरायटी.

त्या गल्लीत आता अजून एक शेगाव कचोरी.दुकान सुरु झालंय - आधीच्या दुकानाच्या पुढे 2/3 दुकानं सोडून. झामा आवडलं नाही. गोखले स्नॅक्स तर छानच आहे. घंटाळी च्या गल्लीत (मेतकूट समोरून जाणारी) चाट चं एक दुकान आहे. छोले टिक्की छान वाटली. थोडी तिखट आहे. पण एकदा बाहेर जाताना पार्सल घेतली होती ती तेव्हा एवढी आवडली नाही. मेतकूट जिथे सुरु झालं तिथे आता पुरणपोळी घर म्हणून सुरु झालाय. वेगवेगळ्या फ्लेवरच्या पुरणपोळ्या (शुगरफ्री देखील) आहेत. त्यांचे मला वाटतं ओपन किचन आहे

भगत ताराचंद अजून चालू आहे का? मध्ये फॅमिली ट्री मध्ये गेलो होतो तेव्हा पाटी पण दिसली नाही >>>

Family Tree जवळचं बंद झालंय. घोडबंदर रोड ला दोस्ती Imperia मध्ये नवीन चालू झालंय..

आज प्रशांत कॅार्नरची पाणीपूरी खाल्ली.. ६० रू किंमत जरा जास्तच वाटली त्यात रगडा नसून मूग आणि फारच गोडही होती.. तिखा दो बोलून बोलून थकले पण तरीही गोडच लागत होती.. मग थोडं पुढे जाऊन बिकानेरवाल्याकडे पापू खाल्ली.. ती मस्त तिखट होती.. खाऊन आत्मा शांत झाला

भेळपुरी , पापु या सारखे पदार्थ ठेला, टपरी, गाडी वर असे खाल्लेले च चांगले वाटतात असा वैयक्तिक अनुभव आहे !!

छान सिकेपी फूड हवं असेल तर लुईसवाडीत ग्रीन रोडच्या एका गल्लीत हेमंत स्नॅक्स आहे. चिकन, मटण, फिश फ्राय पार्सलही देतो आणि बसून जेवायची थाळी सिस्टिमही आहे.
अजून झणझणीत हवं असेल तर त्याच गल्लीच्या सुरुवातीला शेतकरी म्हणून कोल्हापूरी हाॅटेल आहे. चिकन, मटण खर्डा अप्रतिम..
तिथूनच पुढे गेल्यावर काजूवाडीत, पूर्वी दिवसा कार दुरुस्ती आणि संध्याकाळी पाया पाव, खिमा पाव खिलवणारं गॅरेज होतं.
आता खाण्याचा धंदा एवढा चालतो की गॅरेज बंद करुन बबन या ब्रँडनेमखाली फक्त संध्याकाळीच कट्टा टाईप हाॅटेल चालू होतं. आता भेजा, वजडी, डाळमुंडी, गुडदा, कलेजा असे आयटम्सही मिळायला सुरुवात झाली आहे. हे गुरुवारी आणि चतुर्थीला बंद असतं. (फॅमिलीज असतात कधीकधी पण अँबियस फॅमिलीसाठी फारसा चांगला नाही. अर्थात ग्राहक निम्नवर्गातले असले तरी महिला वर्गाला कोणताही त्रास होणार नाही) अजून एक म्हणजे देशी जेवणाची मुलांना सवय नसेल तर हे थोडं जहाल वाटू शकेल.

आज प्रशांत कॅार्नरची पाणीपूरी खाल्ली.. ६० रू किंमत जरा जास्तच वाटली त्यात रगडा नसून मूग आणि फारच गोडही होती.. >>> बापरे केवढी महाग, परत तिखट नाहीच.

मग थोडं पुढे जाऊन बिकानेरवाल्याकडे पापू खाल्ली.. ती मस्त तिखट होती.. खाऊन आत्मा शांत झाला>> खादाडी कशी सुरु आहे? काहीच अपडेट नाहीत Happy

Pages