विज्ञान जगतातील बातम्या आणि घडामोडी

Submitted by मामी on 13 April, 2022 - 02:00

जगातील आणि भारतातील विज्ञान जगतात घडणार्‍या घडामोडी, संशोधन, प्रयोग, शोध आणि इतर बातम्या या संबंधित नोंदी आणि चर्चा करण्यासाठी हा धागा आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारत सरकारने नुकतेच अंटार्क्टिका, आर्क्टिक विधेयक मांडले. हे नक्की का आणि कशासाठी आणि याची गरज काय, याचा दूरगामी परिणाम काय इ. मुद्द्यांचा छान उहापोह डॉ. चैतन्य गिरी यांच्या या मुलाखतीत ऐकायला मिळेल.

मोदी सरकारने मांडलेले अंटार्क्टिका,आर्क्टिक विधेयक काय? त्याचे परिणाम काय होणार? : https://www.youtube.com/watch?v=82KE_xsyd3c

संशोधन जगतात 'अरेच्चा, अजून ह्यावर कुणी साधा पेपर कसा नाही पब्लिश केला' असं वाटण्याचे काही भाग्यवान क्षण आजकालच्या संशोधकांस अगदी विरळाच. त्याला समांतर अनुभव 'अजून हा धागा कसा काय नव्हता काढला गेला' असं वाटून आला Wink

हो. खरंच. मलाही असंच झालं. मी विज्ञान गृपमधले धागे दोनदा डोळ्याखालून घातले हा धागा काढण्यापूर्वी.

माझ्या https://www.maayboli.com/node/65358?page=2 या धाग्यातील प्रतिसाद इथे पुन्हा डकवतो :
.................
मधुमेही रुग्णांसाठी रक्तातील ग्लुकोजची तपासणी वारंवार करावी लागते. त्यासाठी बोटाला सुई टोचण्याचा अप्रिय उद्योग करावा लागतो. यापासून सुटका करण्यासाठी विविध प्रकाचे तंत्रज्ञान दिवसेंदिवस विकसित होत आहे.

नुकतेच एका कॅनेडियन उद्योगाने एक नवे उपकरण बनवले आहे ज्यात रुग्णाच्या बोटाला सुई टोचण्याचा प्रकार नाही. रुग्णाने फक्त उपकरणाच्या भागावर एक मिनिट बोट ठेवायचे आहे. या उपकरणात ईसीजी तंत्रज्ञानाचा वापर करून त्याला नवप्रज्ञेची जोड दिलेली आहे.

या उपकरणाचे प्रारूप नुकतेच एका परिषदेत सादर झाले. यथावकाश ते औषध प्रशासनाच्या मान्यतेसाठी दाखल होईल.
https://www.businessinsider.com/device-measures-blood-glucose-by-touch-c...

क्वांटम फिजिक्स, डबल स्लिट एक्सपरिमेंट आणि कॉन्शसनेस.

डबल स्लिट एक्स्परिमेंट हा एक अजब प्रयोग आहे ज्यातून अतर्क्य निष्कर्ष निघतात. युट्युबवर हा प्रयोग सोप्या शब्दांत समजावून सांगणारे अनेक व्हिडिओज आहेत.

आतापर्यंत माहित असलेल्या भौतिकशास्त्राला चकवा देणार्‍या या निष्कर्षाचा आणि कॉन्शसनेसचा काही संबंध आहे का? या खालील व्हिडिओत हा विचार छान मांडला आहे.

Did we just find the UAP-consciousness link? : https://www.youtube.com/watch?v=uuPuoKqWgLE

मला या शीर्षकातील UAP चा फुलफॉर्म माहित नाही. कोणास माहित असेल तर सांगा.

ह्या अति गहन विषयाला तुम्ही हात घातला आहे.
[The two-slit experiment] contains the only mystery. We cannot make the mystery go away by “explaining” how it works … In telling you how it works we will have told you about the basic peculiarities of all quantum mechanics.
—Richard Feynman

मस्त धागा. बरेच दिवस मनात होतं असा धागा काढावा. बेस्ट!
टू स्लिट वाला व्हिडिओ फारच बीटिंग अराऊंड द बुश करत होता त्यामुळे सोडून दिला.
नुसती लिंक न देता थोडक्यात माहिती देता आली तर आणखी आवडेल.

अमितव
टू स्लिट वाला व्हिडिओ फारच बीटिंग अराऊंड द बुश करत होता >>> मला पण तसच वाटल. हल्ली काय आहे न कोणीही उठतो आणि कशाचाही QM/QP शी संबंध लावून देतो. पहा deepak chopra and quantum physics.!!!

डुप्लिकेट पोस्ट. डिलीट केली

ह्या अति गहन विषयाला तुम्ही हात घातला आहे. >> मी कसली हात घालते हो. इंटरेस्टिंग आहे मात्र विषय. ०.०१% पेक्षाही कमी कळलंय. या विषयावर एक वेगळाच धागा काढून कोणी लिहिलं तर उत्तम होईल.

मस्त धागा.
मधुमेहाचे ते मशीन म्हणजे वरदान ठरेल. नाहीतर ती टोचाटोची नको म्हणून किती लोक मधुमेहाकडे दुर्लक्ष करतात व त्याचे वाईट परिणाम होतात.

त्यावरून आठवलं. सुई-विरहित इंजेक्शन हा तसा काही वर्ष संशोधनात असलेला प्रकार. सुई न वापरता स्वनातीत (मराठीत बोलायचं तर सुपरसॉनिक) वेगाची औषधाची बारीक धार (पाण्याची धार असते तशी धार, तलवारीची धार नव्हे) रुग्णाच्या त्वचेवरून आत घुसवायची असा एक प्रकार आहे. ह्यावर अजूनही संशोधन चालूच आहे. नेचरमध्ये २०२० साली आलेला एक लेखः https://www.nature.com/articles/s41598-020-61924-0

ज्या वाचकांना डबल स्लीट experiment बद्दल उत्सुकता आहे त्यांनी अवश्य वाचावे असे पुस्तक
through the two doors at once
लेखक ANIL ANANTHASWAMY

@केशवकूल
ओके. धन्यवाद. या विषयावर तुमचा अभ्यास दिसतोय. जर एक लेख लिहिलात तर आम्हालाही हा विषय समजेल.

काही शोध हे फक्त .नियंत्रित वातावरणात,नियंत्रित प्रमाणात केलेले असतात.
निघालेले निष्कर्ष भले प्रसिद्ध होत असतील पण पूर्ण सिद्ध होण्यास खूप प्रयोग करणे बाकी असते.
Quantam physics पण तसेच आहे.
खूप अवघड विषय आहे.
प्रस्थापित भौतिक शास्त्राचे नियम तिथे लागू होत नाहीत.
वेगळाच विषय आहे तो

Human genome आता पूर्णपणे २ आठवड्यांपूर्वी sequence करण्यात आला

आता हेच उदाहरण घ्या
Genome sequence म्हणजे काय.
सोप उदाहरण.
कोणत्या ही भाषेची बाराखडी असते अक्षरे ज्या सीरिज मध्ये असतात ते.(, मूळात ती लावलेली सीरिज योग्य आहे की अयोग्य हेच माहीत नसेल तर)
पण ते शब्द वापरून काय अर्थ निघेल हे तेव्हाच माहीत पडते जेव्हा त्या भाषेचे व्याकरण तुम्हाला माहित असते.
त्या भाषेचे नियम माहीत असतात.
नाहीतर फक्त अक्षरं ना काही किंमत नसते.
अल्प विराम,पूर्ण विराम, काना, मात्रा सर्व माहीत हवं.

पण ही बातमी वाचून अनेक लोकांचा असा गैर समज होतो की genome sequence तर शोधून काढले आता.
कॅन्सर,मधुमेह वर इलाज मिळणार च . आता माणसाच्या सर्व रोगावर औषध निर्माण होईल

शास्त्रज्ञांनी multiple genome-wide association studies (GWAS) असा अभ्यास करून
कित्येक रोगांचा आणि genomeचा संबंध प्रस्थापित करून त्यावर उपचार शोधून काढले आहेत. तसेच
क़्वांटम फिजिक्स हे सर्वात अक्युरेट शास्त्र आहे. आजच्या युगातील कॉम्पुटर, मोबाईल ,telecom, आणि CT SCAN, PET/CT स्कॅन ह्यांच्या मुळाशी क़्वांटम फिजिक्स आहे.
कृपा करून शास्त्रज्ञांना कमी लेखू नका.
सर्व रोग नाहीत पण ज्या रोगांच्या मुळाशी जिनोम आहेत त्या रोगांवर उपचार शोधले जातीलच.

https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=https://www.acs.o...

हा लेख खरच उत्तम उत्तम आहे.विज्ञान विषयी लेख कसे वाचावेत आणि त्याचा अर्थ कसा काढावा ह्या विषयी योग्य मत व्यक्त केले आहे.
कधी शोध वेगळाच असतो आणि अर्थ वेगळाच काढला जातो.

तुम्हाला चिरंजीवी व्हावे असे नाही वाटत? तुम्हाला काहीही वाटो पण बहुसंख्य लोकांना चिरकाल जगण्याची इच्छा असणार ह्यात काही नवल नाही. शास्त्रज्ञ हे साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत.
अर्थात शरीर काही अमरपट्टा घेऊन आलेले नाही, (शास्त्रज्ञ आयुर्मर्यादा वाढवण्याचा प्रयत्न करत आहेतच).अमर होण्याचा दुसरा मार्ग आहे- माइंड अपलोडिंग!
माइंड अपलोडिंग म्हणजे मेंदूत असणाऱ्या आठवणी, कमावलेले ज्ञान, भावना, राग, लोभ, द्वेष, मत्सर, कोमल भावना, थोडक्यात माणसाचे व्यक्तिमत्व हे कृत्रिमरीत्या जतन करणे. 'क्लाउड' वर संग्रहित करणे. शास्त्रज्ञांची ह्या दिशेने वाटचाल चालू आहे. अश्या प्लॅटफॉर्म वर
माणसाचे व्यक्तिमत्व अनंत काळापर्यंत राहील. असा अपलोड केलेला मेंदू आपल्या नातेवाईकांशी गप्पा टप्पा करू शकेल, सणासुदीला किंवा शुभ मंगल कार्यक्रमात भाग घेऊ शकेल इत्यादी पण अर्थात शरीर विरहित!

“माईंड अपलोडिंग” भन्नाट कल्पना आहे पण यशस्वी झाले तर वाईट, विध्वंसक विचारांचे अपलोडिंग होऊ नये म्हणजे झाले.

माहिती transfer करता येईल पण भावना पण त्या बरोबर ट्रान्स्फर होतील का?
म्हणजे माझी माय बोली वर प्रतिसाद देण्याची एक विशिष्ट पद्धत आहे ती माझी सवय पण transfer होईल का

>>>म्हणजे माझी माय बोली वर प्रतिसाद देण्याची एक विशिष्ट पद्धत आहे ती माझी सवय पण transfer होईल का
सुदैवाने नाही!!!
Wink जस्ट किडिंग

https://www.livescience.com › ...
The Human Brain's Memory Could Store the Entire Internet | Live Science

मानवी मेंदू चे काम फक्त एका मंद बल्ब साठी जितकी वीज लागेल तेवढ्याच ऊर्जेवर chalate.
पण कॉम्प्युटर त्या शक्ती चा बनवायचा झाला तर 1 gigawat पॉवर लागेल.
म्हणजे nuclear plant ची सर्व वीज एकच कॉम्प्युटर ल लागेल.

Cotard delusion
हा एक अत्यंत दुर्मिळ मनोविकार आहे. ह्याने पछाडलेल्या व्यक्तिची अशी भावना होते कि आपण जिवंत नाहीहोत. त्यांना कितीही समजाऊन सांगितले तरी त्यांचा विश्वास बसत नाही की आपण जिवंत आहोत. जगात आतापर्यंत अशा २०० केसेस पाहण्यात आल्या आहेत.
जास्त माहितीसाठी पहा
https://www.webmd.com/schizophrenia/cotards-syndrome#:~:text=People%20wi...'s%20syndrome%20(also,about%20200%20kn

Pages