लाल परी

Submitted by सामो on 8 April, 2022 - 12:38

बोलावलं म्हणुन येणार्‍यातली नव्हतसच तू. उत्सुकतेने वाट खूप पाहीली पण मनस्वीपणे, तुला यायचे तेव्हाच आलीस. "जा" म्हणुन वैतागून ना गेलीस ना "नको जाऊ" म्हणाले तर थांबशील.

आपल्या नात्यात, बरच काही दिलस पण तितकच वसूलही केलस. माझे स्वतःचे अमुल्य रक्ताचे नाते दिलेस. एकाच वेळी, सुंदर आणि भयावह अरण्याची सफर घडवून आणलीस, असे अरण्य जिथे स्वेच्छेने नाही गेले मी, मी ढकलले गेले. उन्मादाच्या शिखरांबरोबर, अवसादाच्या खाई आणि अविवेकाची भेसूर झाडेही दिसली. अस्तित्वाची लढाई लढवलीस परंतु माझ्यातूनच, अजुन एका अस्तित्वाचा पोपटी, लसलसता, अंकुरही फुलवलास.

आज जाऊ जाऊ पहातेस तर काय निरोप देऊ तुला? आणि समजा मी म्हटलं की कमतरता भासेल तर थांबणार आहेस थोडीच? तसाही फार अभिमान धरु नकोस कारण कमतरता भासणे दूरच, जीवाच्या (लक्ष्मण) शिवाच्या (रामाच्या) मध्ये सतत पडदा बनुन असणारी माया (सीता) ती तूच. झिरझिरीत तो पडदा आज विरेलसे वाटते. तुझ्या उलथापालथीत सतत व्यग्र आणि व्यस्त राहीलेली माझी उर्जा परत मिळते आहे तेव्हा "थांब" म्हणणारच नाहीये मी. जसजशी तू काढता पाय घेतेयस, तसतशी मला अधिक अशारीरी प्रेरणांची उत्तुंग शिखरे साद घालतायत.

तेव्हा जा राणी जा च!

- लाल परी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भावना छान मांडल्या आहेत... बऱ्याच स्त्रियांना लाल परी नकोशी वाटते पण कदाचित ती जाताना तिची कमतरता भासत असावी का? खूप कॉम्प्लिकेटेड आहे हे सगळेच...

छानच, मुळ कविता पण सुरेख आहे.
मला माझी एक ट्रेन मधली मैत्रीण आठवली, ती दर वेळी हे गाणं म्हणायची " ये लाल रंग कब मुझे छोडेगा" Happy

@अवल बदलला गं ग्रुप.
अस्मिता, धनुडी, मामी, प्राचि, आर्या, च्रप्स, - सर्वांचे खूप आभार.

खूप वर्षांपूर्वी ल्युसिलची कविता वाचली होती. तेव्हा आवडली होती पण आता कळते आहे.

हाहा. फारच छान लिहिलंय.
धनुडी Happy . माझ्याही डोक्यात येतं कधीकधी हे गाणं.

वरून अजून शाळेत काय काय नावं द्यायच्या पोरी, कधी पेपर आलाय, तरी कधी बर्थडे आहे आज माझा. एक तर हुशार, बॉयफ्रेंड म्हणायची Lol

Lol भाग्यश्री ,मावशी आली पण म्हणायचे. माझ्या एका बहिणीच्या वर्गात " महाबळेश्वरला गेली" असं म्हणायचे. तिथे ट्रिपबिपला गेले असताना चालू झाली असेल. काय एकेक नावं खरंच.

>>>>>>>पूर्वी बसने प्रवास करणार्‍याने चार चाकी गाडी घेतल्यावर बसला उद्देशून लिहीलेले पत्र.
हाहाहा

दीपक पवार, भाग्यश्री, शर्मिला धन्यवाद.

बसने प्रवास करणार्‍याने चार चाकी गाडी घेतल्यावर बसला उद्देशून लिहीलेले पत्र. >> Happy मलाही आधी एस.टीबद्दल काही असेल असे वाटले.

पूर्वी बसने प्रवास करणार्‍याने चार चाकी गाडी घेतल्यावर बसला उद्देशून लिहीलेले पत्र. >> एसटी कर्मचार्‍यांच्या संपानंतर हे शीर्षक वाचून माझ्याही डोक्यात हेच आलं होतं.

जागू, देवकी, वर्णिता, मनीम्याऊ - धन्यवाद, आभारी आहे.
हर्पा, सी - होय चपखल बसते आहे. वेल!!!..... comme ci comme ça

या महीन्यात पन्नास पुर्ण होइल. म्हणजे अर्धशतक पूर्ण.

आणि बहुतांश २/३ किंवा जास्तच आयुष्य सरलं असेल. नेत्रदीपक असे काही ना घडले ना काही उल्लेखनीय दुर्दैवी. सुखवस्तू आणिसुरक्षित च काळ गेला. क्वचित प्रसंगी सांचलेपण व एकसुरीपणजाणवले. काही पेल्यातली वादळे आली. पण शमलीही. नवऱ्याने बावनकशी साथ दिली. मुलीने कधीच त्रास दिला नाही. माझ्या मर्यादित बुध्दी व कुवती बरहुकूम आयुष्य व्यतित केले. बाकी ईश्वरी कृपेची चणचण भासली हे ही खरं. १/३ आयुष्य निद्रेत जाते. परंतु २/३ तर आपल्या हातात असते. त्यातही तक्रारींची जपमाळ ओढण्यात वेळेचा बराच अपव्यय झाला. लहानपणी दिसला ज्योतिषी किंवा हस्तसामुद्रिक जाणणारा की दाखव हात - असे. कारण नवीन जन्माची ती सुरुवात होती. आता त्या जन्माचे भरजरी वस्त्राची घडी पूर्णपण उघडून समोर आहे. आता ना उत्सुकता आहे ना असोशी. हां विषाद मात्र आहे. विषाद या गोष्टीचा की बराच बराच वेळ व्यर्थ वाया गेलेला आहे, दवडलेला आहे.

भोग पिपासा रत जिन लोगा, रोग शोक दारुण सहते,
नश्वर जगत तथापि मूढ़ा, सतत पाप के पथ गहते.
भज गोविन्दम, भज गोविन्दम, गोविन्दम भज मूढ़ मते!

पन्नाशीत, साठीत अनेक जण/जणी नवउद्योजिका बनतात, अफाट यश मिळवतात. कोणी परत शिकू लागते तर कोणी कलेची उपासना सुरु करतात. मी माझ्या प्रकृतीला साजेसे काहीतरी सुरु करीन. एखादेच अनवट स्तोत्र नियमित पठण करीन किंवा मग एखादे नवीन डायेट किंवा रेजिम सुरु करेन. अजुनही उत्साह खूप आहे. काही गोष्टींना फाटा देइन - नकारात्मक विचार, स्वतःच्या अपयशांचा धोशा, इतरांबद्दलच्या फेअर- अनफेअर तक्रारी यांना डच्चू देइन. स्वतःमध्ये सुधारणा घडविण्याच्या अट्टाहासाला मुख्य मुरड घातली पाहीजे.

अनुगच्छतु प्रवाहं - हे जरी साध्य झालं तरी किती बरे होइल. एकंदर आंबट-गोड अश्या अनुभवांच्या या द्राक्षांना वाया न घालवता त्यांची वाईन बनवायचा प्रयत्न करायचा.

सामो, Happy
छान आढावा अर्धशतकाचा. जे ठरवलं आहेस, प्रवाहात ठरवत जाशील ते सगळं मनासारखं होऊदेत. शुभेच्छा !

Pages