मुलांनी जेंव्हा पहिल्यांदा दिवाळीचा किल्ला बनवला तेंव्हा चमचाभर मोहोरी आणि चमचाभर हळीव मी त्यांना मसाल्याच्या डब्ब्यातुन काढुन दिले. दिवाळी झाली. त्यानंतरही किल्ला होताच. त्यावर हिरवं जंगल दाटले होतं. मग त्या वाफ्यात काहीतरी लावायचं म्हणुन नाखुषीने किल्ला पण काढुन टाकला.
फेब्रुवारीत थंडी कमी व्ह्यायला लागली तसं किल्ल्याच्या मातीतून उगवलेली हिरवी, कोवळी मोहरी उंचच उंच वाढु लागली आणि त्यावर रानफुलांसारखी सुंदर पिवळी फुले पण डोलु लागली. वसंताचे आगमन झालेले मागच्या अंगणातल्या फुलांनी जाहीर करुन टाकले. त्यानंतर मग फुलायला लागली इथली रंगीत फुले.
कुठे एखादं झाड सजलय, रंगलयं
पिवळ्या जांभळ्या फुलांनी कुठे माळरान भरुन गेलय
नेहमीचा रस्ता पण आज नवी रंगओळख देतो
नेहमीचा सायंकाळोख नवी गंधओळख जपतो
तोपर्यंत लिंबु आणि संत्र पण शांत शांत होते. पुर्वी लग्न झाल्यानंतर कसे आई-बाप गोड बातमीची वाट (मनातल्या मनात) पहात बसायचे पण वरवर ती हुरहूर दाखवायचे नाहीत तसे आम्ही ज्याच्या त्याच्या दारातली लिंब फुलताना पहात रोज घरच्या झाडांची कोवळी पालवी न्याहाळायचो.
मग एक दिवस अचानकच गुलाबीसर कळ्या दिसु लागल्या आणि आमच्याकडेही यंदा लिंबुबाईंनी मनावर घेतलं म्हणुन डोळ्याच्या कडा ओलावल्या. त्यानंतर लिंबु आणि नारंगीच्या कौतुक सोहळ्यात बाकीच्यांचे जरा कमीच कौतुक झालं.
लिंबाची फुले फुलली आणि बागेत नुसता घमघमाट सुटला. दारं उघडली तर वाटायचं वसंतराव यंदा मुक्कामाला आपल्याकडेच उतरलेत. रात्री चांदण्यांसारखी चमचमणारी फुले दिवसा मधमाश्या, आणि hummingbirds च्या गोतावळ्यात दिसायची.
आसमंतात भरूण राहिलेला सुगंध ,तो वसंताचा गंध!
शब्दात न मावणारा ,बाहु पसरुन मिठीत घेणारा!
असं वाटत जणु रंगून जाईल हात, पुढे केला तर
किंवा हा गंध वस्त्रासारखा पांघरताही येईल अंगावर
ईतका सच्चा की डोळे उघडले तरी विरून जात नाही
रस्ता संपला तरीही हा गंध संपुन जात नाही.
सुगंधाच्या कुपीतला वसंताचा आसमंतात भरुन राहीलेला गंध आणि पक्षांची लगबग यात चैत्र आला.
आता नवपरिणितेचे सौंदर्य कमी होऊन लिंबाच्या फांद्या जडावल्या होत्या. प्रत्येक नविन पानापाशी एकेक बाळसेदार फळ दिसु लागले.
मधे कधीतरी मोहोरीची पिवळी फुले पण सुकुनच गेली.
त्याखालच्या प्रत्येक कमानदार देठावर हिरव्या शेंगा लगडल्या होत्या. हिरव्या पानांतून शेंगा आधी दिसल्याच नाहीत. अडाणीपणातुन फुलांच्या घोसामध्येच बिया शोधण्याचे उद्योग करुन झाले होते. शेंगा हळुहळु भरल्या आणि मोहोरीच्या सृजनाचा सोहळा पण पाहता आला.
चमचाभर मोहोरीतून ओंजळभरुन शेंगा आल्या.
निसर्गाचे सुंदर रुप सगुण होऊन असं डोळ्यांसमोर उलगडत गेले ते नुसतंच सौंदर्य नव्हते. जणू ती होती हरि ची उत्पत्ती आणि हराची लय. आणि असे सुंदर काही घडून गेले आपल्या डोळ्यांसमोर म्हणुन साक्षीत्वाचे भाग्य लाभलेल्या माणसाने फक्त हात जोडून खुल्या आभाळाखाली लोटांगण घालावे एवढचं उरलं मागे. आणि भरलेली ओंजळ.
अहाहा! सुंदर फोटो आणि वर्णन
अहाहा! सुंदर फोटो आणि वर्णन
सुंदर..! फोटोग्राफ्सही अगदी
सुंदर..! फोटोग्राफ्सही अगदी मन भरण्यासारखे आहेत..!
सुंदर!
सुंदर!
सुंदर!
सुंदर!
खूप छान वाटलं वाचून. फार
खूप छान वाटलं वाचून. फार सहजपणे मोठा जादुई नियम सांगितलात !
गोष्टी कधीतरी घडून जातात हातून अवचितपणे. पुढे अचानक मोठं मूर्त स्वरूप घेऊन येतात आयुष्यात अचानक, आणि समाधान देत रहातात .
त्या क्षणाचे कायम ऋणी रहायला हवे !
प्रतिक्रियांसाठी सर्वांचे
प्रतिक्रियांसाठी सर्वांचे मनापासून धन्यवाद.
सुंदर!
सुंदर!
सुंदर!
सुंदर!
सुंदर फोटो आणि वर्णन !
सुंदर फोटो आणि वर्णन !
छान लिहीलय आणी फोटोही सुंदर.
छान लिहीलय आणी फोटोही सुंदर.
सुंदर लेख आणि डोळ्यांचे पारणे
सुंदर लेख आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे सुखद प्रकाशचित्रण!
धन्यवाद!
धन्यवाद!
रस्ता संपला तरीही हा गंध
रस्ता संपला तरीही हा गंध संपुन जात नाही. >> किती अलवार लिहिलंय...
शेवटचा पॅरा तर फारच मस्त... पहिला फोटू छान आहे !
सुंदर फोटो आणि लेखन
सुंदर फोटो आणि लेखन
केवळ सुंदर शब्दसंपत्ती....
केवळ सुंदर शब्दसंपत्ती....
सुंदर...
सुंदर...
तुमच्या सर्वांच्या
तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रिया फार उमेद देणाऱ्या आहेत! मनापासून धन्यवाद.