तुमची ही लिंक वाचण्यापुर्वीच मी काल ठाण्यातील घंटाळी कॉर्नरला असलेलया 'मेतकुट' या उपहारगृहात जाऊन आलो.
अश्विनी के, यांनी लिहील्याप्रमाणे जागा खुप लहान आहे, माणशी प्रमाण पाहता एकावेळेस २० माणसेच बसु शकतात. पदार्थांचे मेन्युकार्ड जास्त भरगच्च नाही, मोजकेच आणि फक्त पारंपारिक मराठी पदार्थांचा भरणा आहे. त्यात कोकणी, वर्हाडी, खानदेशी आणि पश्विम महाराष्ट्रातील पदार्थ दर्शविलेले आहेत. दर जरा जास्तच वाटले, कारण यातील काही पदार्थ दादरच्या आस्वादमध्ये याहीपेक्षा कमी दरात आहेत. मी एकटाच असल्यामुळे माझ्याकडे जास्त पर्याय नव्हते, शेवटी मी झुणका भाकरीवर शिक्कामोर्तब करण्याचे ठरवलं. पण इथे झुणका भाकरी असा पर्याय नाही, म्हणजे तुम्हाला झुणका वेगळा घ्यावा लागतो आणि भाकरी वेगळी. झुणका १२०/- रूपये आणि एक भाकरी २०/- रूपये, तरी मी झुणका भाकरीच घेण्याचे ठरवलं. झुणका १२०/- रूपये का आहे हे माझ्या पुढ्यात झुणका आल्यावर कळले, कारण तो दोन/तीन माणसांना पुरेल एवढा होता. मी ज्वारीची भाकरी मागविली होती तिला भाकरी म्हणण्यापेक्षा ज्वारीची चपाती म्हटले तरी चालेल एवढी पातळ होती.
माझ्या घरी माझी आई किंवा पत्नी बनवते त्याच चवीचा झुणका होता. झुणक्यासोबत मिर्चीचा ठेचा, चटणी किंवा कांदा देण्याचे सौजन्य वेटरने दाखविले नाही मी आठवण करून दिल्यानंतर त्याने फक्त कांदा(बारीक चिरलेला) एक वाटी आणुन दिला. दोन ज्वारीच्या चपात्या आणि थोडा झुणका खाऊन आणि एक ग्लास मठ्ठा पिऊन मी निघण्याचे ठरविले. निघताना उरलेला झुणका पार्सल घेतला. बाहेर आल्यावर मनातल्या मनात स्वत:ला दोन शिव्या हासडल्या कारण झुणका भाकरीपेक्षा नागपुरी वडेभात किंवा तुप मेतकुट भात मी मागवले पाहिजे होते असे मला वाटले.
सकाळी ८ ते १२ यावेळेत फक्त न्याहारीचेच पदार्थ मिळतात आणि दुपारी १२ ते ३ यावेळेत फक्त जेवणाचेच पदार्थ मिळतात. ३ ते ५ उपहारगृह बंद असते, सायंकाळची वेळ आठवत नाही. थाळी आहे पण दर आहे रूपये २२५/- मात्र, अजुन आठवणारे दरपत्रकातील पदार्थ डाळिंबी उसळ रूपये १५५/-, काळ्या वाटाण्याचा रस्सा रूपये १३५/-, परतलेली भेंडी रूपये ९०/-, वाग्याचे भरीत रूपये १२०/-. पदार्थांचे प्रमाण मात्र जास्त असण्याची शक्यता आहे.
यापेक्षा कितीतरी पटीने चविष्ठ झुणका भाकरी मी स्वतः दादरच्या तांबे आरोग्य भुवन आणि शिवखेडापुरला खालेल्ली आहे आणि ती ही याच्या पेक्षा वाजवी दरात आणि ज्वारीच्या भाकरी सोबत जिला आपण भाकरीच म्हणु शकतो. इतर पदार्थांची चव घेतली नसल्यामुळे त्यावर भाष्य करणे उचित होणार नाही. अजुन कोणाचे ह्या उपहारगृहाबाबतीत अनुभव असतील त्यांनी जरूर कळवावे.
Submitted by नरेश माने on 22 January, 2015 - 01:21
थाळी आहे पण दर आहे रूपये २२५/- मात्र, अजुन आठवणारे दरपत्रकातील पदार्थ डाळिंबी उसळ रूपये १५५/-, काळ्या वाटाण्याचा रस्सा रूपये १३५/-, परतलेली भेंडी रूपये ९०/-, वाग्याचे भरीत रूपये १२०/-. पदार्थांचे प्रमाण मात्र जास्त असण्याची शक्यता आहे. >>> अबब!!!
Submitted by अश्विनी के on 22 January, 2015 - 01:24
TJSB Thane main branch (St. John school जवळ) शेजारी एक अयंगार बेकरी आहे. तिथला रवा केक खुप छान असतो. माझी आई जोशी वाडा एरियात राहते. जेव्हा कोणी माझ्या माहेरचं ठाण्याहून पुण्याला येतात तेव्हा न चुकता पाव किलो केक घेऊन येतात. जरूर try करा.
हा धागा वाचला आणि college चे दिवस आठवले
एका मैत्रीणीच्या घरी दुपारी कोणी नसायचे मग बर्याचदा आम्हि मामलेदार ची मिसळ व कोल्ड्ड्रिंक्स घेउन जायचे तिच्याकडे.
वंदना टाॅकीज समोरच्या एस.टी. बस स्थानकाशेजारी "कोकणी हौस" म्हणून रेस्टॉरंट सुरु झालंय..
अतिशय छान चवीचे कोकणी आणि गोवन पारंपारिक पदार्थ आणि काही Innovative Modification केलेले पण आहेत..
येऊरला माॅर्निंग वाॅक करणारे शक्यतो पाटोणेपाडा या शेवटच्या बस स्टॉप पर्यंत चालत जातात. बस मधे चढणारे उतरणारे प्रवासीही असतातंच...
इथे ही एक स्थानिक माणसाची चहा, वडा, भजीची टपरी आहे..
दमून आल्यामुळे चव छान लागते..
नुरीबाबा दर्ग्याच्या आवारात (नुरीबाबा गल्लीमधे, मखमली तलावाजवळ) राशीद नुरी म्हणून केअरटेकर कुटुंब रहाते.. अतिशय उत्तम मुघलाई पदार्थ बनवतात.. बिर्याणी ही छानच असते...
हल्लीच त्यांनी नुरीबाबा कंपाउंड बाहेर केटरिंगचे दुकानही टाकले आहे..
चालणार असेल तर राबोडी मधेही एक दोन छान बिर्याणी वाले आहेत.
सगळेच जण स्वच्छ आहेत असं नाही. बर्याच जणांच्या चवीतही फरक असतो. कोण तेलकट, तेजतर्रार पदार्थ बनवतो, कुणी थोडे माईल्ड बनवतो. आणि प्रत्येकाची गिर्हाईकंही त्याप्रमाणे वेगवेगळी असतात.
त्यामुळे स्वच्छता पाळणारा आणि आपल्या चवीचा कॅटरर निवडलेला बरा..
ठाण्यातल्या घरपोच डबा सेवांबद्दल वेगळा बाफ नसल्यामुळे इथे विचारते.
साधारण ऋतुपार्क एरियाच्या आसपास अशी सेवा पुरवणारं कुणी माहिती आहे का? स्वच्छ, कमी तेल-मसाले असलेलं रुचकर अन्न, सकाळचा ब्रेकफास्ट, संध्याकाळचे ताजे स्नॅक्स असं सगळंच पुरवत असतील तर फार बरं.
माहिती असेल तर कृपया कळवा.>> हेच मला कासारवडवली मधे हवे आहे...
कुणाला माहिती असल्यास मला कळवा
पाटणेपाडा इथे ही एक स्थानिक माणसाची चहा, वडा, भजीची टपरी आहे.. निरु.
तीन वर्षांपूर्वी मी इथे बसने उतरून संजय गांधी उद्यानात भटकायला*१ जाणार होतो. शेवटचा चहा घेतला. ( अजून दोनचार तास चहा मिळणार नव्हता आणि बिबळ्याने गाठलंच तर?)
#१ . आता बंद केलय.
महिनाभर गरज पडणार आहे म्हणून धागा वर काढतेय..
लोकहो, ठाण्यातल्या छान छान टपऱया सुचवा.. थाळी पद्धतीचं जेवण मिळेल अशी हॅाटेलं सुचवा.. चायनिज चे ठेले सुचवा.. चाट कॅार्नर्स सुचवा.
मी जुलै २०२१ ला ठाण्यात आलो. तेव्हापासुन खालिल हॉटेल ट्राय केली आहेत. तसा ठाण्यात नविनच आहे
मेतकूट - मानपाडा दोस्ती जवळ - मला आवडले पण बामणी आहे. भाकरी खाऊ नका. चपाती सारखी असते
राजमाता वडापाव - मस्त चटनी एकदम बेस्ट
भगत ताराचंद - ठीक ह्याला पंजाबी का म्हणतात?
Jamei's Pizzaria, Pizza Express - विवियाना - मस्त आहे पण महाग आहे
Copper Chimney विवियाना - मस्त आहे पण महाग आहे
काला चष्मा - पाच पाखाडी - मस्त पण लाऊड म्युझीक
Indian waters विवियाना - बकवास
मित्रो - मस्त बार हुक्का पण आहे
प्रशांत कॉर्नर - चाट, मिठाया घराजवळ फक्त हेच आहे
अरोमाज कॅफे - हिरानंदानी walk - मस्त आहे
टिप टॉप थाळी - ओके
मामलेदार मिसळ - ठीक. over hyped
काठ आणि थाट - ठीक. over hyped मेतकुट वाल्यांच non veg version
अजुन ट्राय करायचे आहेत - Fish Curry House, Mahesh Lunch home, हिरानंदानी walk मधील पहिल्या मजल्यावरची हॉटेलं, पाच पाखाडी मधली हॉटेलं
Sunilt, तुमची ही लिंक
Sunilt,

थाळी आहे पण दर आहे रूपये
थाळी आहे पण दर आहे रूपये २२५/- मात्र, अजुन आठवणारे दरपत्रकातील पदार्थ डाळिंबी उसळ रूपये १५५/-, काळ्या वाटाण्याचा रस्सा रूपये १३५/-, परतलेली भेंडी रूपये ९०/-, वाग्याचे भरीत रूपये १२०/-. पदार्थांचे प्रमाण मात्र जास्त असण्याची शक्यता आहे. >>> अबब!!!
केश्वी +१ मग घरी जेवलेले काय
केश्वी +१ मग घरी जेवलेले काय वाइट. ९० रु. ला भेंडीची भाजी? १२० रु ला पिठले? डॉलर मध्ये विकतात का?
हे रेट्स आमच्या पार्ल्यातल्या
जवळ-जवळ वर्षभर ह्या इथे
जवळ-जवळ वर्षभर ह्या इथे काहीही पोस्ट नाही? ठाणेकर उपोषण करताहेत की काय?
चेणा क्रिक च्या जस्ट अलीकडे
चेणा क्रिक च्या जस्ट अलीकडे हाॅटेल सुरेखा आहे. कोळी पद्धतीचे अप्रतिम नाॅनव्हेज फूड मिळते.
पूर्वी कडाप्पा टेबल्स होती. आता अपग्रेड केले आहे...
(No subject)
आशिका, मस्तच
आशिका, मस्तच
TJSB Thane main branch (St.
TJSB Thane main branch (St. John school जवळ) शेजारी एक अयंगार बेकरी आहे. तिथला रवा केक खुप छान असतो. माझी आई जोशी वाडा एरियात राहते. जेव्हा कोणी माझ्या माहेरचं ठाण्याहून पुण्याला येतात तेव्हा न चुकता पाव किलो केक घेऊन येतात. जरूर try करा.
हा धागा वाचला आणि college चे
हा धागा वाचला आणि college चे दिवस आठवले
एका मैत्रीणीच्या घरी दुपारी कोणी नसायचे मग बर्याचदा आम्हि मामलेदार ची मिसळ व कोल्ड्ड्रिंक्स घेउन जायचे तिच्याकडे.
मग गप्पा रंगायच्या खुप मस्ती करायचो आम्हि.
बेंगलोर अयंगार का? त्यांच्या
बेंगलोर अयंगार का? त्यांच्या बर्याच शाखा आहेत.
वंदना टाॅकीज समोरच्या एस.टी.
वंदना टाॅकीज समोरच्या एस.टी. बस स्थानकाशेजारी "कोकणी हौस" म्हणून रेस्टॉरंट सुरु झालंय..
अतिशय छान चवीचे कोकणी आणि गोवन पारंपारिक पदार्थ आणि काही Innovative Modification केलेले पण आहेत..
येऊरला माॅर्निंग वाॅक करणारे
येऊरला माॅर्निंग वाॅक करणारे शक्यतो पाटोणेपाडा या शेवटच्या बस स्टॉप पर्यंत चालत जातात. बस मधे चढणारे उतरणारे प्रवासीही असतातंच...
इथे ही एक स्थानिक माणसाची चहा, वडा, भजीची टपरी आहे..
दमून आल्यामुळे चव छान लागते..
आणि सोबत तळलेल्या मिरच्या...
सॉलिड मस्त. आत्ता खावं असं
सॉलिड मस्त. आत्ता खावं असं वाटतेय.
चांगली बिर्याणी कुठे मिळते.
चांगली बिर्याणी कुठे मिळते.
नुरीबाबा दर्ग्याच्या आवारात
नुरीबाबा दर्ग्याच्या आवारात (नुरीबाबा गल्लीमधे, मखमली तलावाजवळ) राशीद नुरी म्हणून केअरटेकर कुटुंब रहाते.. अतिशय उत्तम मुघलाई पदार्थ बनवतात.. बिर्याणी ही छानच असते...
हल्लीच त्यांनी नुरीबाबा कंपाउंड बाहेर केटरिंगचे दुकानही टाकले आहे..
चालणार असेल तर राबोडी मधेही एक दोन छान बिर्याणी वाले आहेत.
चालणार असेल तर राबोडी मधेही>>
चालणार असेल तर राबोडी मधेही>>> चालणार असेल तर म्हणजे अस्वच्छता असते का?
सगळेच जण स्वच्छ आहेत असं नाही
सगळेच जण स्वच्छ आहेत असं नाही. बर्याच जणांच्या चवीतही फरक असतो. कोण तेलकट, तेजतर्रार पदार्थ बनवतो, कुणी थोडे माईल्ड बनवतो. आणि प्रत्येकाची गिर्हाईकंही त्याप्रमाणे वेगवेगळी असतात.
त्यामुळे स्वच्छता पाळणारा आणि आपल्या चवीचा कॅटरर निवडलेला बरा..
ओके धन्यवाद, जमलंच तर बघतो या
ओके धन्यवाद, जमलंच तर बघतो या रविवारी.
चांगली बिर्याणी कुठे मिळते.
चांगली बिर्याणी कुठे मिळते. >>>
१. कापुरबावडीला आशापुरा मंदिराजवळ A1 बिर्याणी सेंटर. बिर्याणीची चव अप्रतिम आहे. लहानशी टपरी आहे. अगदीच टापटीप नसली तरी गलिच्छ पण नाहीये.
२. BBC (खोपटच्या ST workshop जवळ)
मला आजवर अशा टपर्यांमध्ये
मला आजवर अशा टपर्यांमध्ये जाऊन बिर्याणी घेण्याचा धीरच नाही झालेला
(कधीकधी दृष्टीआड सृष्टी बरी वाटते
)
चांगली बिर्याणी कुठे मिळते. >
चांगली बिर्याणी कुठे मिळते. >>>
१) ठाणे पुर्व , काशीआई मन्दिरा जवळ..
२) रेमण्ड कम्पनी जवळ, वर्तक नगर.
ठाण्यातल्या घरपोच डबा
ठाण्यातल्या घरपोच डबा सेवांबद्दल वेगळा बाफ नसल्यामुळे इथे विचारते.
साधारण ऋतुपार्क एरियाच्या आसपास अशी सेवा पुरवणारं कुणी माहिती आहे का? स्वच्छ, कमी तेल-मसाले असलेलं रुचकर अन्न, सकाळचा ब्रेकफास्ट, संध्याकाळचे ताजे स्नॅक्स असं सगळंच पुरवत असतील तर फार बरं.
माहिती असेल तर कृपया कळवा.>> हेच मला कासारवडवली मधे हवे आहे...
कुणाला माहिती असल्यास मला कळवा
पाटणेपाडा इथे ही एक स्थानिक
पाटणेपाडा इथे ही एक स्थानिक माणसाची चहा, वडा, भजीची टपरी आहे.. निरु.
तीन वर्षांपूर्वी मी इथे बसने उतरून संजय गांधी उद्यानात भटकायला*१ जाणार होतो. शेवटचा चहा घेतला. ( अजून दोनचार तास चहा मिळणार नव्हता आणि बिबळ्याने गाठलंच तर?)
#१ . आता बंद केलय.
कल्याण खादाडीhttps://www
कल्याण खादाडी
https://www.youtube.com/watch?v=IO53pCIwznc&feature=youtu.be
महिनाभर गरज पडणार आहे म्हणून
महिनाभर गरज पडणार आहे म्हणून धागा वर काढतेय..
लोकहो, ठाण्यातल्या छान छान टपऱया सुचवा.. थाळी पद्धतीचं जेवण मिळेल अशी हॅाटेलं सुचवा.. चायनिज चे ठेले सुचवा.. चाट कॅार्नर्स सुचवा.
मी जुलै २०२१ ला ठाण्यात आलो.
मी जुलै २०२१ ला ठाण्यात आलो. तेव्हापासुन खालिल हॉटेल ट्राय केली आहेत. तसा ठाण्यात नविनच आहे

मेतकूट - मानपाडा दोस्ती जवळ - मला आवडले पण बामणी आहे. भाकरी खाऊ नका. चपाती सारखी असते
राजमाता वडापाव - मस्त चटनी एकदम बेस्ट
भगत ताराचंद - ठीक ह्याला पंजाबी का म्हणतात?
Jamei's Pizzaria, Pizza Express - विवियाना - मस्त आहे पण महाग आहे
Copper Chimney विवियाना - मस्त आहे पण महाग आहे
काला चष्मा - पाच पाखाडी - मस्त पण लाऊड म्युझीक
Indian waters विवियाना - बकवास
मित्रो - मस्त बार हुक्का पण आहे
प्रशांत कॉर्नर - चाट, मिठाया घराजवळ फक्त हेच आहे
अरोमाज कॅफे - हिरानंदानी walk - मस्त आहे
टिप टॉप थाळी - ओके
मामलेदार मिसळ - ठीक. over hyped
काठ आणि थाट - ठीक. over hyped मेतकुट वाल्यांच non veg version
अजुन ट्राय करायचे आहेत - Fish Curry House, Mahesh Lunch home, हिरानंदानी walk मधील पहिल्या मजल्यावरची हॉटेलं, पाच पाखाडी मधली हॉटेलं
मामलेदार पेक्षा सुरुची मिसळ
मामलेदार पेक्षा सुरुची मिसळ ट्राय करून बघा..
सुरुची मिसळ, गोखले रोड. अरोमा
सुरुची मिसळ, गोखले रोड. अरोमा viviana मध्ये देखील आहे. मेतकूट पूर्वीची मजा राहिली नाही (pre-lockdown)
सुरूची मिसळ कधी ऐकली नाहीए..
सुरूची मिसळ कधी ऐकली नाहीए.. हे नक्की ट्राय करेन.
राजमाता वडापाव - मस्त चटनी एकदम बेस्ट >> सहमत.. इथला वडापाव येताजाता खाते मी.. गजाननचा पण मस्त आहे
भगत ताराचंद - ठीक ह्याला पंजाबी का म्हणतात? >> सिंधी पद्धतीचं जेवण मिळतं.. मला इथली थाळी आवडते.. भगत ताराचंदच्या बाजूलाच फॅमिली ट्री आहे.. व्हेज खायला मी इथेच जाते
Pages