Submitted by अजिंक्यराव पाटील on 29 March, 2022 - 08:48
ओळखलंत का सर मला आयडी बदलून आलं कोणी?
मायबोलीवर चालते माझ्या आयडींचीच वाणी.
कधी टाकतो लिंक स्वतःची कधी करतो लाल,
शाहरुख जिथे तिथे आणि वाचणार्यांचे हाल..
चांगले चांगले लिहिण्यासाठी आयडी ठेवलाय राखून,
इतर अनेक अवतार आहेत पाहण्यासाठी वाकून.
धागे हायजॅक करणे असे हाच माझा धंदा,
राग अनावर झाल्यावर खरा आयडी परागंदा..
येतो मग मी रूप घेऊन इतर खोटे खोटे
ज्यांनी केली निंदा त्यांना शिव्यांचे मग सोटे.
धागे वर काढण्यासाठी ठेवलेत काही आयडी,
ज्यांच्या योगे प्रतिसादांची चढत राहते माडी..
विकृत थोडा आहे मी पण साळसूद माझे भाव,
मायबोलीच्या शहाण्यांनो ओळखा माझे नाव?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान
छान
ऋ सरांचे नाव नाकतोड्या पडलेय
ऋ सरांचे नाव नाकतोड्या पडलेय उगीच. सरांचा उदार स्वभाव असल्याने कुणीही त्यांच्या नावाने ड्युआयडी खपवतं. खर< तर त्यांचा एकही ड्युआयडी नाही. आता माझे बघा ना. मी ही त्यांचा ड्युआयडी नाही. आम्ही सगळे खरे आणि स्वतंत्र स्टार्स आहोत.
जबरदस्त जोशपूर्ण कविता आहे.
जबरदस्त जोशपूर्ण कविता आहे. कुणावर आहे काही कळायला मार्ग नाही. पण ज्याच्यावर आहे त्याला सटासट सुविचार माला मिळाल्या असतील हे नक्की. जिथे तिथे शाहरूख, धागे हायजॅक हे क्ल्युज आहेत म्हणा. पण अपराधी ओळखणे भयंकर अवघड दिसतेय. सीआयडीला पाचारण केले पाहीजे.
:रेस्ट इन पीसेस:
एक नंबर झाली आहे कविता.
एक नंबर झाली आहे कविता.
पार स्टेडीयमच्या बाहेर आणि इथे रमेशमामा पण येणार नाहीत.
कवितेची दुसरी बाजु समजुन
कवितेची दुसरी बाजु समजुन घेण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित कवींना दुसरं काही सांगायचे असेल.
चांगले चांगले लिहिण्यासाठी
चांगले चांगले लिहिण्यासाठी आयडी ठेवलाय राखून
>>>>
याच्यासाठी मनापासून धन्यवाद
खतरनाक लिहलं आहे पाटीलबुवा
खतरनाक लिहलं आहे पाटीलबुवा
एकेक मतला, शेर कडवे सणसणीत
एकदमच भन्नाट
विकृत शब्द स्वस्त झालेला आहे.
विकृत शब्द स्वस्त झालेला आहे.
नार्सिसिझम, अटेन्श सिकींग, स्वतःबद्दलची लोफ्टी म्हणजे मोठीमोठी मते हे सर्व आजार आहेत, विकृती नाहीत असे मला वाटते. कारण ते बरे होउ शकतात. बाकी काहीकाही काळ्या गोष्टींना विकृती समजता यावे.
ऊठसूठ कोणाला विकॄत म्हणू नये - असे माझे मत आहे.
सामो +1
सामो +1
विकृत खूपच टोकाचा शब्द आहे...
कविता भारी आहे.... इतके सगळे
कविता भारी आहे.... इतके सगळे आय डी कसे काय मॅनेज होतात हा प्रश्ण पडतो नेहेमीच... असो... ज्याची त्याची हौस....
"विकृत" च्या ऐवजी "विचित्र" शब्द चालुन जाइल काय ?
विकृत" च्या ऐवजी "विचित्र"
विकृत" च्या ऐवजी "विचित्र" शब्द चालुन जाइल काय>>>>+1
विकृति-ती—स्त्री. १ दुखणें;
विकृति-ती—स्त्री. १ दुखणें; आजार. २ बिघाड; विकार. ३ राग. ४ शंका; संशय. -पया २४६. ५ भाव; वृत्ति; मनाची खळबळ; मानसिक स्थिरतेचा विघात करणारी खवळलेली वृत्ति, मनोविकार.
>>≥येतो मग मी रूप घेऊन इतर
>>≥येतो मग मी रूप घेऊन इतर खोटे खोटे
ज्यांनी केली निंदा त्यांना शिव्यांचे मग सोटे.>>>
ही विकृतीच....
टीका करणं, सुचना करणं हे लिखाण सुधारण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीची दुसरी बाजू समजण्यासाठी आवश्यक. पण त्यासाठी शिवीगाळ करणं योग्य नाही .
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना
तुम्ही दारू कशी पिता?
तुम्ही दारू कशी पिता? धाग्यावरील चर्चा वाचून परत या कवितेची आठवण झाली...