Submitted by वत्सला on 13 March, 2022 - 21:22
माझे वडील जानेवारी महिन्यात गेले.
गेली बारा वर्षे ते bladder bag वापरत होते.
त्यातल्या काही bags शिल्लक आहेत. त्या कुठे देता येतील? आम्ही ज्या डीलरकडून बॅग्स घ्यायचो त्याला याबद्दल विचारलं पण तो म्हणाला की अशा प्रकारच्या केसेस खूप कमी असतात त्यामुळे त्या कुठल्या संस्थेत देता येतील हे त्याला माहित नाही. त्या बॅग्स त्याच्याकडे येणाऱ्या गिऱ्हाईकांपैकी कोणाला हव्या असल्यास आम्ही त्या तुझ्याकडे पोहोचवतो आणि तू त्या त्यांना दे असंही आम्ही त्याला सुचवलं. पण त्यालाही त्याने नकार दिला.
तुमच्यापैकी कोणाला एखादी संस्था - जिथे त्या bags योग्य व्यक्तीला मिळू शकेल - माहीत असल्यास कृपया कळवा.
या बॅग्जस बऱ्यापैकी महाग आहेत आणि वडील खूप काळजीपूर्वक त्या वापरायचे. त्यामुळे त्या टाकवत नाहीत. एखाद्या गरजू व्यक्तीला देता आल्या तर बरे होईल असे आम्हाला वाटते.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बॅग न वापरलेल्या सील्ड
बॅग न वापरलेल्या सील्ड पॅकिन्ग मध्ये आहेत का? नाहीतर कोणी घेणार नाही कारण ती बायोमेडिकल वेस्ट आहे. त्यातून इन्फेक्षनची भीती आहे. वृद्धाश्रमात विचारून बघा.
जवळच्या म्युनिसीपालटी वार्ड मध्ये विचारून बघा त्यांचे काय डिस्पोजल चे नियम आहेत ते. अश्या बॅग पेशंटवर वापरल्या व चुकून इन्फेक्षन झाले तर हॉस्पिटल वर केस होउ शकते.
फेकून द्या
फेकून द्या
अर्थातच अमा. या बॅग्स कशा
अर्थातच अमा. या बॅग्स कशा पद्धतीने वापरतात याचा अनुभव तुम्हांला नसल्याने हा प्रश्न विचारला असावा.
अनेक ठिकाणी विचारून इथे मदत मागितली आहे. कोणाला नेमकी संस्था/ दवाखाना वगैरे माहीत असल्यास कृपया कळवा. तिथे पाठवण्याची व्यवस्था करू.
फेकून द्या---- ओह ओके...
फेकून द्या---- ओह ओके...
या बॅग्स कशा पद्धतीने वापरतात
या बॅग्स कशा पद्धतीने वापरतात याचा अनुभव तुम्हांला नसल्याने हा प्रश्न विचारला असावा.>> मला आहे ना अनुभव. माझे वडील पण बॅग वापरत होते त्यांची एक किडनी काढलेली होती. व शेवटचे साहा महिने बेड रिडन होते. कॅथेटर लावला होता. वय ७९ होते तेव्हा.
बॅग सील्ड आहेत का ? ते कन्फर्म करा की कोणता ब्रँड आहे?
सील्ड पाकिटे चॅरिटी हॉस्पिटल मध्ये घेतील किंवा जैन मंदिरात घेतात औषधे सप्लाइज.
बॅग्ज सिल्ड असतील तर कळवा. सई
बॅग्ज सिल्ड असतील तर कळवा. सई कडोलीकर ने (दक्षीची बहिण) मला ज्या NGO शी ओळख करून दिली आहे, त्या ग्रुपमध्ये चौकशी करते. तो ग्रुप मुख्यतः अंध विद्यार्थ्यांना लेखनिक मिळवुन देण्याचं काम करत असला तरी बाकी छोट्या मोठ्या मदतीसाठी धडपड करत असतो.
वत्सला, सहवेदना!
वत्सला, सहवेदना!
कोणत्या शहरात आहेत बॅग्ज? ब्लॅडर बॅग्ज म्हणजे कॅथेटर ना?
बॅग्स कशा पद्धतीने वापरतात
बॅग्स कशा पद्धतीने वापरतात याचा अनुभव तुम्हांला नसल्याने हा प्रश्न विचारला असावा.>> मला आहे ना अनुभव. माझे वडील पण बॅग वापरत होते त्यांची एक किडनी काढलेली होती. व शेवटचे साहा महिने बेड रिडन होते. >>>>>> दोन्ही वेगळे प्रकार आहेत. तुमच्या प्रश्नाचे उत्तर वर दिले आहे. धन्यवाद!
भरत, धन्यवाद. ठाणे.
मीरा, धन्यवाद. Bags सुव्यवस्थित आणि सील्ड आहेत.
पण वर blackcat (ते डॉक्टर आहेत) नी टाकून देण्याचा सल्ला दिला आहे त्यामुळे नक्की काय करावे याचा गोंधळ झाला आहे.
एकदा मी दक्षिणा/सईला विचारते.
भरत, धन्यवाद. ठाणे.
कथेटर नव्हते .
bladder काढल्याने urine शरीराच्या बाहेर एका प्लास्टिक bag चिकटवून त्या मध्ये गोळा होते आणि ती बॅग भरत आली की टॉयलेट मध्ये रिकामी करावी लागते. बॅग लिक न झाल्यास आठ दिवस व्यवस्थित टिकते.
या bags बऱ्यापैकी महाग असतात आणि वडील खूप काळजीपूर्वक वापरत असत. एखाद्या वेळी काही कारणाने बॅग लवकर बदलावी लागली तर त्यांना खूप वाईट वाटायचं. त्यामुळे त्या बॅग्स त्यांच्या पश्चात अशाच टाकुन द्यायच जीवावर येत आहे.
वत्सला, तुमची कळकळ पोहोचली.
वत्सला, तुमची कळकळ पोहोचली. तुमच्या वडीलांचे डॉक्टर काही सुचवू शकतील. सीलबंद बॅग असतील तर इतरांना उपयोग होईल.
वत्सला मी चौकशी करून सांगते..
वत्सला मी चौकशी करून सांगते..
वत्सला.तुमच्या कुटुंबाला
वत्सला.तुमच्या कुटुंबाला सहवेदना.
बाकी सर्वांनी उपयुक्त सल्ले दिले आहेतच.
मला वाटते या बॅग वर एक्सपायरी
मला वाटते या बॅग वर एक्सपायरी डेट असते.
सील कितीही व्यवस्थित असले तरी कुठलेही सील हे १००% लिक प्रूफ नसते आणि जेवढे लिकप्रूफ आहे तेवढेच कितीही काळ राहू शकत नाही. त्यामुळे वरून सील व्यवस्थित दिसत असले तरी काही काळाने ते स्टराईल रहात नाही. या करता ती एक्सपायरी डेट असते. जर एक्सपायरी डेटला अजून काही महिने असतील तर टाकून देण्याची गरज नसावी.
वर लोकांनी सुचवले त्या व्यतिरिक्त घरी नर्स पुरवणारी संस्था यांनाही विचारून बघु शकता, ते घेतील का बॅग्ज.
सगळ्यांना धन्यवाद.
सगळ्यांना धन्यवाद.
मानव, बघते expiry date कधी आहे ते.
अलीकडेच मागवल्या होत्या आणि 15 दिवसात बाबा गेले.
वत्सला, अ बिग हग!
वत्सला, अ बिग हग!
वत्सला, वाईट वाटलं
वत्सला, वाईट वाटलं वडिलांबद्दल वाचून. ज्या डॉक्टरांकडे त्यांची ट्रीटमेंट होत होती त्यांच्याकडे येणाऱ्या याच आजाराच्या इतर रुग्णांपैकी कुणाला देता येईल का हे विचारता येईल. अर्थात हे तुम्हाला सुचलंच असेल आधी.
अनेक ठिकाणी विचारून इथे मदत
अनेक ठिकाणी विचारून इथे मदत मागितली आहे. कोणाला नेमकी संस्था/ दवाखाना वगैरे माहीत असल्यास कृपया कळवा. == >
तुमचे बाबा ज्या Dr - urologist /... कडे उपचार घेत होते , त्या hospital/clinic ला Bladder bags लागनारे पेशंट येतेच आसनार ( मी treatment घेताना अनेकांना पहिले bags सह आहे .) hospital/clinic ला connected medical मध्ये त्या असतीलच , जर त्यांना विचरून कोणी needy पेशंट ला देता येतात का ते बघ्ता येईल ( ते किती करतील... हा प्रश्न आहेच) .... किडणी संबधीत आजार खर्चीक असतात....
बहुतेक वर सर्वांनी सुचवले आहे....
संपर्कातून एका एनजीओ चे
संपर्कातून एका एनजीओ चे डिटेल्स पाठवलेत. मेल्स चेक कर प्लीज
ज्यांची bladder काढल्याने अशी
ज्यांची bladder काढल्याने अशी बॅग वापरणाऱ्या लोकांचा एखादा गृप फेसबुक वर वैगेरे मिळाला तर तिथे अश्या गरजुंचा पत्ता मिळू शकेल .
चांगली सूचना ममो.
चांगली सूचना ममो.
तसा ग्रुप नसल्यास वृद्धांचे पालकत्व असा ग्रुप आहे, तिथे विचारता येइल.
ज्यांची bladder काढल्याने अशी
ज्यांची bladder काढल्याने अशी बॅग वापरणाऱ्या लोकांचा एखादा गृप फेसबुक वर वैगेरे मिळाला तर तिथे अश्या गरजुंचा पत्ता मिळू शकेल .>> कॅन्सर सर्वायवर्स ऑफ इंडिया हा एक गृप आहे. अॅड्मिन अमित मिश्रा आहेत दुसरे बहुतेक मेहुल शाह आहेत. ब्लॅडर कॅन्सर पेशंट तिथे असतात.
धन्यवाद सगळ्यांना.
धन्यवाद सगळ्यांना.
सगळ्या सुचना चांगल्या आहेत. फेसबुक ग्रुप चा विचार केला नव्हता. डॉ ना पण सांगितले आहे.
नानबा, तुला उत्तर दिले आहे.
वत्सला, तुझ्या वडिलांना
वत्सला, तुझ्या वडिलांना श्रद्धांजली! तुम्हा कुटुंबियांना हे दुःख सोसण्याची ताकद मिळो.
बॅग्ज चं काय केले हे नंतर इथे नोंदवून ठेव हं. वरती सगळ्यांनी चांगले सल्ले दिले आहेत. तुम्हाला लवकर मार्ग सापडेल आणि वस्तू योग्य हाती पडल्याचे समाधान मिळेल.
ऑर्किड, धन्यवाद.
ऑर्किड, धन्यवाद.
हो नक्की सांगीन इथे.
मोठ्या हॉस्पिटलात मटेरियल
मोठ्या हॉस्पिटलात मटेरियल कुठून आले , कधी आले , कधी वापरले याचे रेकॉर्ड असते, ते असे रिटर्न मटेरियल कधीही घेत नाहीत.
बाकी ठिकाणीही लोक डिस्पोसेंबल मटेरियल रिटर्न घेऊन पुन्हा वापरणे टाळतात ( पेशंटने बाटली उघडून फक्त एक गोळी खाल्ली , तर उरलेली बाटली आम्हीही परत घेत नाही , टाकून द्या म्हणून सांगतो. नुसते सील फोडले असले तरी नाही म्हणून सांगतो.)
एखादे चॅरिटीवाले किंवा तुमच्या ओळखीतले दुसरे रुग्ण असतील तर तेच घेतील
किंवा काही मेडिकलवाले आपणच विकलेली वस्तू 50 % ने वगैरे परत घेतात , त्याला विचारून बघा
हो blackcat, बरोबर आहे तुमचं.
हो blackcat, बरोबर आहे तुमचं.
मला वाटतं की दहा - वीस bags
मला वाटतं की दहा - वीस bags चं एक पाकीट असेल आणि त्या जरी प्रत्येक वेगळ्या सील्ड असल्या तरी मुख्य सील तोडले की घेत नसावेत. असं काहीतरी दिसतंय. एखादा फोटो टाकल इथे तर लगेच समजेल कुणालाही.
विकणाराही उत्सुकता दाखवत नाही म्हणजे त्यास कल्पना आहे.
वत्सलाजी
वत्सलाजी
भावपूर्ण श्रध्दांजलि
वत्सला, बाबांना आदरांजली _/\_
वत्सला, बाबांना आदरांजली _/\_ इतक्या दु:खाच्या काळातही इतरांच्या मदतीचा विचार करणे इन्स्पिरेशनल आहे.
>>वत्सला, बाबांना आदरांजली _/
>>वत्सला, बाबांना आदरांजली _/\_ इतक्या दु:खाच्या काळातही इतरांच्या मदतीचा विचार करणे इन्स्पिरेशनल आहे.>>+१
Pages