पुदिनाचटणी-बटाटा परोठा

Submitted by अश्विनीमामी on 13 March, 2022 - 07:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पुदिना चटणी आपली नेहमीचीच भेळेसाठीची: एक वाटी पुदिना पाने फ्रेश, एक वाटी कोथिंबीर निवडून, हिरव्या मिरच्या तिखटवाल्या डार्क कलरच्या तीन, लसूण पाकळ्या सोलून चार, मीठ चवीनुसार, जिरे एक छोटा चमचा.

एक मध्यम आकाराचा बटाटा.

परोठ्या साठी मैदा किंवा गव्हाची कणीक.

तीळ , कलुंजी, जिरे, ओवा मिक्ष्स एक चमचा.

मिक्स चीज पाकीट बिग बास्केट वर मिळते ते ऐच्छिक आहे.

तेल/ तूप परोठा भाजायला.

क्रमवार पाककृती: 

पुदिन्याची चटणी अगदी अंगाबरोबर पाणी घालून वाटून घ्यावी. मिक्सर किंवा पाटा - वरवंटा काहीही वापरले तरी चालेल. फार फार पातळ चटणी करू नका.

बटाटा साले काढून किसून घ्या.

आता परातीत दोन वाट्या कणीक किंवा मैदा घ्या त्यात चटणी घाला व किसलेला बटाटा घाला. एकदा पाण्यातून काढून घातला तरी चालेल. मी तसाच घातलेला.

हे सर्व मिसळून मळून घ्या. जास्तीचे पाणी लागले तरच घाला . मळून झाले की तेलाचा हात लावुन परत एकदा मळा आता आपला परोठा डो तयार झाला.

आता तवा गरम करून मध्यम आचेवर आधी तेल घालून आपण रोजच्या घडीच्या पोळ्या करतो तसे पराठे लाटून भाजून घ्या.
IMG_20220313_124525__01.jpg

अमूल बटर व केचप बरोबर सर्व्ह करा.

वाढणी/प्रमाण: 
एवढ्या प्रमाणात सहा होतात.
अधिक टिपा: 

परोठे लाटताना तीळ , ओवा, कलुंजी, जिरे ह्यांचे मिश्रण मध्ये पसरावे. छान लागते.

बिग बास्केट वर एक चीज तुकड्यांचे मिश्रण मिळते. ते परोठ्याची घडी घालताना एक चमचा मध्ये घालून आणिक चविष्ट बनवता येइल. पण हे चीज गरम झाल्यावर वितळते त्यामुळे ते परोठ्यातून बाहेर येउ शकते भाजताना. हातावर येउ शकते. तेव्हा काळजी घ्या. मुलांसाठी बेबी पराठे बनव्ता येतील. व मिरची प्रमाण कमी ठेवावे चटणीत.

बरोबर एक कापलेल्या फळांचा वाडगा, ग्लासात नारळाचे गार पाणी/ ताक दिले म्हणजे छान ब्रेफा किंवा लाइट लंच होईल.

घरी लोणचे असल्यास सोने पे सुहागा. मी इतके मीठ खात नाही त्यामुळे घरी नसते लोणचे. मूळ परोठा लाइट चवीचाच आहे.

माहितीचा स्रोत: 
स्वतःचे प्रयोग. चटणी उरली होती.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलांना लंचबॉक्ससाठी ठिक राहील का चीज न घालता?>> राहील ना. पण त्यापेक्षा शाळेतून दमून घरी आल्यावर काही तरी पोटभरीचे व एनर्जी वाले लागते तेव्हा चार गरम लाटुन दिले तर बरे पडेल. गरम खायच्या वस्तू मी फारच गरम खाते. म्हणजे दोन पराठेतर लाटायचे तर पहिला लाटून प्लेट मध्ये तो दुसरा तव्यावर तो होईस्तो पहिला अर्धा संपतो सुद्धा.

चीजने हात भाजेल असे वाटले तर; व मुलांचे ओठ व जीभ सुद्धा भाजू शकते . फू फू करून खा असे सांगितले पाहिजे. पण पिझा सारख्या स्ट्रिन्ग्ज निघताfunction at() { [native code] } त ते मुलांना मजेशीर वाटेल. व खातील. नाहीतर चीज क्युब बाजूला द्यायचे. एक एक.

गाजर / बीट चा कीस पण घालता येइल पण मी काही ते केलेले नाही. मूळची पुदिना टेस्ट जाईल मग. बरोबर क्यारट केकचा एखादा तुकडा वेगळा द्यावा गोड पण होते. माझी ऑरेंज- कॅरट केक रेसीपी आहे एक.

छान

मी मालदीव नामक बेटावर रहात असताना माझे स्टफ प्राठाचे प्रयोग फसल्यावर असेच करत होतो
पण बटाटे शिजवून घेत होतो
आता असे बघेन

मी मालदीव नामक बेटावर रहात असताना माझे स्टफ प्राठाचे प्रयोग फसल्यावर असेच करत होतो>> मालदीवला जाउन पराठे? ते तर हनिमून डेस्टिनेशन आहे. तिथे मॅगी सुद्धा चालेल.

सत्तरच्या दशकात पराठे प्रथम आले ,म्हणजे ममव पुण्यात, तेव्हा आया परोठेच म्हणत व असेच करत . स्टफ करायची पद्धत पंजाबी / उत्तर भारतीय आहे. मी लहान असताना मेदु वडे/ उडीद वडे, पिझ्हा, स्कॉच एक्ग्ज , व्हेज पुलाव हे पदार्थ आईने पहिल्यांचाच ट्राय केले. एक प्रोग्रेसिव्ह काकू असे परोठे करत असत त्यांच्या घरी.

ओके
मी नुसत्या चपातीत चीज स्लाईस लाटून देत असते..हे पण ट्राय करेन.

मस्त रेसिपी. जेव्हा आपण उकडलेल्या बटाट्यात मसाले वगैरे घालून त्यातच कणीक घालून भिजवतो तेव्हा ते पराठे लगेच लाटून करावे लागतात नाहीतर नंतर उंडा सैल पडत जाऊन लाटायला कटकट होते असा अनुभव आहे.

छान पाकृ
तुमचे नवे सदस्य नाम आवडले

वाह अमावशी.. तोंपासू प्रकरण...!! हे भन्नाट पराठे कसे करायचे हे वाचून उद्याच करून खावेसे वाटू लागले आहे. परंतु हे पराठे भाजल्यावर पुदिन्याच्या हिरवाकंच रंग का दिसत नाही..? समजा पुदिना चटणीत रंग बदलू नये म्हणून लिंबू पिळले किंवा थोडी पालकाची फ्रेश पाने घातली तर कदाचित हिरवाकंच रंग येऊ शकेल... असो, एवढं तोंपासू प्रकरण पुढ्यात आल्यावर रंग बघे पर्यंत पोटात गेलेलं असायचं Proud

छान पाकृ.
स्टफिंग नसल्याने मी करून बघण्याची हिंमत करू शकतो.
सायोंची टिप लक्षात ठेवावी लागेल.

मानव, चमचाभर तेलाच्या फोडणीत किसलेले बटाटे आणि मग त्यावर पुदिना चटणी घालून परतून मग त्यात कणीक भिजवली तर पाणी सुटणार नाही.

हा असा आलु पराठा माहित नव्हता. आमच्याकडे मुळा, कॅबेज/कॅरट, आलु, पनीर हे सगळे पराठे स्टफड असतात. फक्त मेथी आणि पालक पिठात मळुन अमांच्या कृतीने होतात.
आता या कृतीने सोपे आणि झटपट पराठे करून पहायला हवेत. चवीला तर नक्कीच यमी असणार आहेत. जर पाणी सुटून लाटायला अवघड झाले नाहीत, तर स्टफड पराठे सोडुन कायमस्वरूपी ही कृती वापरण्यात येईल.

(अमा, तुम्ही नाव का बदललं. मामीच छान होतात की. अचानक मावशी का झाला?)

वा! सुरेख दिसताहेत. मूळ चटणी- बटाटा काँबोच सुरेख असतं तर हे पराठेही मस्त लागतील.
मी यात मध्ये तीळ, कलुंजी, जिरे, ओवा मिक्ष्स एक चमचा + चाट मसाला घालीन अधीकच्या चवीकरता.

कुठल्याही हिरव्या पाल्याचा रंग गरमी मुळे काळपट होतोच.
म्हणूनच फक्त चटणी करून ती हिरवीगार राहायला हवी असेल तर वाटताना पाण्याऐवजी बर्फाचे तुकडेच वापरावेत.
आणि नंतरही सर्व करेपर्यंत चट्णी फ्रिजात ठेवावी. हिरवा रंग टिकतो.

Thank you dear