लावतोय रिक्षावालाsss...
संध्याकाळची वेळ ५.२५ पीएम
तशी आमची गार्डनला जायची वेळ पाचचीच. थोडेसे ऊजेडात खेळावे. ब्रेक घेत सुर्यास्त बघावा. मग थोडे अंधारात बागडावे. हे आमच्या गार्डनशैलीला साजेसे. पण आज ऊशीर झालेला. सोबत दोन नाही तर एकच मुलगा होता. त्यामुळे विचार केला आज एखादे छोटेसेच पण वेगळे गार्डन शोधावे.
ओला बूक केली असती तर बरे झाले असते. रिक्षावाला आधी पत्ता माहीत आहे म्हणालेला आणि आता फिरवत होता. सोबत माझा गूगलमॅपही फिरत होता. ब्रिजच्या खालून जायचे की वरून जायचे हा विचार करत आम्ही दोघेही रिक्षा साईडला घेऊन पाच मिनिटे थांबलो आणि कंटाळून पोरगा माझ्या मांडीवर डोके टेकवून झोपला.
रिक्षावाला खाली ऊतरून कोणाला तरी पत्ता विचारून आला आणि जे रिक्षा हाणली ते गार्डनच्या प्रवेशद्वारापाशीच येऊन थांबला. ते पाहून लक्षात आले की पंधरा मिनिटांपूर्वी याच रस्त्याने आपण गेलो होतो. पण आता चरफडण्याशिवाय ईलाज नव्हता. ओला कॅबचे सव्वाशे रुपये दाखवत होते आणि रिक्षाचे मीटर १७० रुपये पडले होते.
वाईट गोष्टी जेव्हा माझ्याशी घडतात तेव्हा त्या तीनचार एकदमच घडतात हा नेहमीचा अनुभव. गूगलवर शोधलेले नवीन गार्डन सुशोभिकरणासाठी महिनाभर बंद होते. सोबत खांद्यावर झोपलेले पोर होते. वैतागून फाटकावर एक लाथ मारली तसा आतला चौकीदार बाहेर आला. त्याला बघून 'मी नाही त्या गावचा' म्हणत खिश्यातला मोबाईल काढून कानाला लावायला गेलो आणि आईच्या गाssवात..!!
फोन खिश्यातून गायब होता !
मागे पळत जाऊन रस्ता चेक केला जिथे रिक्षा सोडली होती. येणार्या जाणार्यांची झडती घ्यायचाही विचार मनात आला. पण खांद्यावर झोपलेल्या पोराला पाहून आठवले की त्याला मांडीवरून खांद्यावर घेताना फोन बाजूलाच रिक्षाच्या सीटवर ठेवलेला. तो बहुधा तिथेच राहिला.
पुन्हा मागे फिरून गेटपाशी आलो. आता त्या बंद गेटवर लाथ नाही तर हात मारला. आतून पुन्हा वॉचमन बाहेर आला. त्याचाच फोन घेतला आणि माझ्या नंबरला रिंग देऊ लागलो. तीन रिंग वाया गेल्या, मग बायकोच्या नंबरला फोन लावला. सुदैवाने तो पाठ होता. यात माझी कसलीही हुशारी नसून आमच्या दोघांचा नंबर फक्त एका अंकाने वेगळा होता. तिने फोन उचलला तसे तिला सतत माझ्या नंबरवर फोन करत राहायला सांगून मी घरी परतायला ऊलट रिक्षा पकडली.
बसल्याबसल्या रिक्षावाल्याला माझ्या फोन गहाळ प्रकरणाची थोडक्यात माहिती देत त्याच्या फोनवरून माझ्या फोनला रिंग देऊ लागलो. आणि आईच्या गाssवात..!!
चक्क दुसर्याच रिंगला फोन ऊचलला गेला. समोरून त्या रिक्षावाल्याचा आवाज ऐकू आला आणि तो आनंदाचा धक्का अचानक सहन न झाल्याने मी रिक्षातच कलंडलो. खांद्यावरच्या मुलासह...
फोन गेला. फोनमधील सिम गेले. शेकडो पर्सनल फोटो आणि विडिओ गेले. डॉक्युमेंटस गेले. पासवर्ड गेले. आता सारे अकाऊंट बंद करत बसा. पोलिस स्टेशनला तक्रार करा. हजारो खर्चून नवीन फोन घ्या. तो चालू होईस्तोवर वर्क फ्रॉम होम थांबणार. फोनसोबत जो डेटा गेलाय तो रिकव्हर होईपर्यंत आयुष्य थांबणार... ईतके विचार एकाच वेळी येत डोकं जे भंजाळून उठलेले ते अचानक ब्रेक मारल्यासारखे शांत झाले. धक्का तर बसणारच होता.
पण छे, असा हरवलेला फोन ईतक्या सहजपणे कधी मिळतो का? आयुष्यात ईतक्या सहजपणे एखादा प्रश्न सुटत असेल तर समजावे हा नक्कीच त्या प्रश्नाचा दी एण्ड नाहीये. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त !!!
तो रिक्षावाला आता एपीएमसी मार्केटला होता. म्हणजे माझ्या घरापासून तसा जवळच होता. त्याला मी माझ्या घरचा पत्ता देऊन तिथे यायला सांगितले. गार्डनला जाताना त्याची रिक्षा मी बिल्डींगच्या दारातूनच पकडली असल्याने घरचा पत्ता वेगळा सांगावा लागला नाही.
मी घरी पोहोचलो. खांद्यावरच्या पोराला बेडवर झोपवले आणि बायकोच्या फोनवरून माझ्या नंबरवर पुन्हा फोन केला. तो रिक्षावाला आता वाशीला पोहोचला होता. म्हणजे आधी जिथे होता तिथून माझ्या घराच्या भिन्न दिशेला गेला होता. चूक माझीच होती. त्याला जे भाडे मिळाले ते घेऊन तो गेला. मुद्दाम माझा फोन परत करायला म्हणून तो कश्याला आपली वाट वाकडी करणार होता. ती देखील फुकटात.
मग मी माझी चूक सुधारली. त्याला म्हटले, दादा मीटर टाका आणि कुठलाही पॅसेंजर न घेता थेट माझ्या दारी या. तुमचे जे काही मीटरनुसार पैसे होतील ते मी चुकते करेन. साधारण साठ-सत्तर झाले असते, आपण शंभर देऊया म्हटले.
आता यातही एक गोची होती. त्याच्याकडे स्वतःचा फोन नव्हता. मोबाईल नसलेला रिक्षावाला मी प्रथमच बघत होतो. पण त्यामुळे केवळ मीच त्याला कॉल करू शकत होतो, पण तो मला कॉल करू शकत नव्हता. आमचे कनेक्शन वन वे होते. ते टू वे करायला त्याने मला माझ्या फोनचा पासवर्ड विचारला. आणि मी पटकन मुर्खासारखे ईंग्रजी आद्याक्षर "सी" सांगून मोकळा झालो. मग चूक लक्षात आली. त्यानंतर मात्र तो "सी" बनवायला त्या नऊ ठिपक्यातले नेमके कुठले ठिपके जोडायचे हे सांगितले नाही. तरीही एखाद्याने ठरवल्यास वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करून ते शोधणे आता अवघड नव्हते. थोडक्यात मीच स्वत: एक "सी" ठरलो होतो.
साधारण वीस मिनिटात तो वाशी स्टेशनहून माझ्या घरी पोहोचणार होता. तोपर्यंत माझा नाक्यावर भजीपाव हादडून त्यावर चहा ढोसून झाला. पुन्हा त्याला कॉल केला. अंदाज, आता फारतर तो मागच्या वा त्यामागच्या सिग्नलला असेल. पण तो अजूनही वाशीच्याच एका सिग्नलला होता. कारण तो ट्राफिकमध्ये अडकला होता. असे तो म्हणत होता. पण हे कारण पटणारे नव्हते. माझा तो नेहमीचा येण्याजाण्याचा रस्ता होता. ट्राफिकची ईतकी कूर्मगती कधी अनुभवली नव्हती. कदाचित तो येताना पुन्हा भाडी घेत येत असावा असे वाटले.
असो, पण म्हणजे अजून वीस पंचवीस मिनिटे त्याला फोन करायला नको. ईतका वेळ बिल्डींगखाली ताटकळत ऊभे राहण्याऐवजी फारशी भूक नसतानाही मी पुन्हा नाक्यावर जाऊन पाणीपुरी चरून आलो. ती पाणीपुरी खाताना डोक्यात घोंघावणारे सारे विचार ईथे मांडणे निव्वळ अशक्यच. कारण फोन त्या रिक्षावाल्याकडे आहे हे समजून आता तासभर तरी उलटला होता. तरीही अजून तो माझ्या हातात आला नव्हता. त्यातल्या त्यात सुरक्षित हातात आहे हेच समाधान होते.
पण तासाभरानेही फोन हाती येणार नव्हताच. कारण आता जेव्हा मी त्याला फोन केला, तेव्हा मिळालेला धक्का आणखी पुढच्या लेव्हलचा होता. तो रिक्षावाला आता नेरूळला पोहोचला होता.
एव्हाना माझी सटकू लागली होती. पण तरीही मोठ्या धैर्याने मी संयम बाळगून होतो. कारण राक्षसाचा जीव ज्या पोपटात असतो तो पोपट त्या रिक्षाचालकाच्या मुठीत होता. त्यामुळे मला त्याच्याशी मिठू मिठू बोलणे भागच होते.
"दादा असे काय करता, मी म्हणालेलो ना तुम्हाला. तुम्ही मीटर टाका आणि माझ्याकडे या. मी पैसे देतो ना तुम्हाला तुमच्या भाड्याचे.."
"अहो साहेब, नेरूळचे भाडे मिळाले. दिडशे रुपयाचे. सोडणार कसे. मी येतो ना तुमच्याकडे. तुम्ही घाबरू नका. तुमचा फोन सुरक्षित आहे माझ्याकडे" ... फोन कट!
एक तर त्याला सहा ते सात वेळा फोन लावल्यावर कधीतरी तो फोन उचलायचा. आणि फोन उचलल्यावर असे धक्के द्यायचा. आता ईथून नेरूळला गेलाय. ते भाडे सोडलेय की अजून सोबत आहे, तिथून तरी पुढे सरळ माझ्याकडे येणार की पुन्हा रस्त्यात मिळेल तसे भाडे घेत येणार. कश्याची काहीच कल्पना नव्हती. किमान अर्धा तास तरी तो आता येत नाही हे समजले. आणि मनात भलसलते विचार येऊ लागले.
काय करत असेल तो? खरेच नेरूळला गेला असेल? की आतापर्यंत मला टोलवाटोलवीची उत्तरे देऊन वेळ काढतोय? आणि या वेळेत मी जे त्याला माझा पासवर्ड सांगून बसलोय तो "सी" शोधतोय? मन चिंती ते वैरी न चिंती..... पण ईथे बहुधा माझा वैरी देखील हेच चिंतीत होता!
माझ्या हातात बायकोचा मोबाईल होता. त्यावर एक नोटीफिकेशन पॉप अप झाले. माय गेट सिक्युरिटी अॅप. कोण आले आहे हे चेक करून मी नेहमीप्रमाणे अॅप्रूव्ह करणार तोच ते नोटीफिकेशन गायब झाले. माझ्या आणि बायकोच्या दोघांच्या मोबाईलवर एकाचवेळी हे नोटीफिकेशन येते. त्यानंतर फास्टेस्ट फिंगर फर्स्ट. याचाच अर्थ मी ईथून काही करायच्या आधीच ते माझ्या फोनवरून अॅप्रूव्ह केले गेले होते. आणि हे तेव्हाच शक्य होते जेव्हा माझा फोन...... आईच्या गावाssत!!
म्हणजे माझा फोन अनलॉक झाला होता. खुल गया था बदकिस्मती का ताला, मै सचमुच का सी बन गया था साला..
माझा फोन एका परक्या व्यक्तीच्या हातात होता. विवस्त्र झाला होता. आता तो त्याची काय विटंबणा करू शकतो वा करणार या कल्पनेनेच अंगावर काटा आला होता.
मी लगेच त्या रिक्षावाल्याला फोन केला,
"सरsss.... येताय ना."
नेरूळवरून सरळ या. मीटरही नका टाकू. दिडशे रुपये भाडे होते ना तुमचे. मी दोनशे रुपये देतो. फोन तातडीने हवा आहे. ऑफिसचा महत्वाचा कॉल येणार आहे. प्लीज या आता लवकर....
याआधीही मी त्याच्याशी सौजन्यानेच बोलत होतो. पण आता अगदी हवालदिल होत याचना करत होतो. त्याचे मात्र एकच पालुपद सुरू होते. घाबरू नका साहेब, तुमचा फोन सुरक्षित हातात आहे.
वीस मिनिटात आलोच बघा म्हणत त्याने फोन कट केला. मोजून पंधरा मिनिटे मी कळ सोसली. आणि पुन्हा फोन लावला..... आईss आईss आईच्या गावाssssssत!!
फोन स्विचड् ऑफ !
खेल खतम, पैसा हजम .... भेंss#चोद .. कचकचीत आणि अस्सल शिवी. तोंडावर कसलाही सायलेन्सर न लावता. फ्रस्ट्रेशन लेव्हल हाय हायपर हाय्येस्ट!
ती शिवी त्या अज्ञात रिक्षावाल्याला होती ज्याचा चेहराही माझ्या लक्षात नव्हता की माझ्या पांडू नशीबाला होती ठाऊक नाही. पण घुसली थेट माझ्याच काळजात होती. उभ्याउभ्याच मी कोसळलो होतो. एका यकिंश्चित रिक्षाचालकाने आपल्याला बघता बघता गंडवले हा वार जिव्हारी लागला होता. कोणत्या तोंडाने घरी परतायचे हे न समजल्याने पाच मिनिटे मी तिथेच एका खांबाचा आधार घेत उभा होतो. माणूसकीवरचा विश्वास उठला होता. रिक्षाचालक म्हणजे चोर जमात हा निष्कर्श काढला होता. माझ्या मनातल्या खळबळीची पर्वा न करत टिर्र टिर्र आवाज करत समोर येऊन थांबलेल्या रिक्षावाल्यातही मला आता तोच भामटा दिसत होता. आणि त्यानेदेखील चोरासारखेच ईकडे तिकडे बघत खिश्यातून एक काळानिळा चकचकीत मोबाईल काढला जो सेम अगदी..... आईच्या गावाssssत!!
- तुमचा अभिषेक
मैत्रेयी, रुपाली धन्यवाद
मैत्रेयी, रुपाली धन्यवाद
फोन हरवला की कसे आयुष्य बेमतलब होऊन जाते
>>>>
हो, मागे एकदा गडचिरोलीहून परतताना ट्रेनमधून पर्स चोरीला गेलेली त्यात माझे दोन आणि बायकोचा एक मिळून आमचे तिन्ही मोबाईल एकत्रच चोरीला गेलेले
फक्त दोनच आयडी कशाला. सर
फक्त दोनच आयडी कशाला. सर बाकीचेही अवतार उतरवा ना मैदानात. मजा येईल.
>>>>
दोन नाही तर चार आलेत या धाग्यावर. अभ्यास कमी पडतोय
मोबाईल हरवल्याने स्क्रीन टाइम
मोबाईल हरवल्याने स्क्रीन टाइम कमी होऊन डोळा बरा झाला असणार
>>>>>
गेले सहा दिवस आराम करायला सुट्टी टाकलेली. त्यात हे कांड घडले. तर म्हटले चला वेळ आहे तर एक धागाही काढूया. परत उद्यापासून पुन्हा जॉईन व्हायचे आहे ऑफिसला...
मूळ आयडीने लिहीताना बरेच
मूळ आयडीने लिहीताना बरेच गांभीर्य जाणवते. थापा नसतात. प्रॅक्टीकल असते लिखाण.
ड्युआयडीने जरा धमाल करता येते त्यामुळे त्यात रमावे वाटत असणार. पण जे विषारी आयडी बनवलेत त्यामुळे काही म्हणा मन खट्टू होते. जमल्यास ते अॅडमिन कडून डिलीट करून घ्या.
शान्त माणूस धन्यवाद
शान्त माणूस धन्यवाद
काही लोकांना तर तुम्हीही माझेच आयडी वाटतात पण मी त्यांना समजवायला जात नाही. कारण लोकांच्या वाटण्याचे आपण काही करू शकत नाही. त्यांचे समज त्यांना लखलाभ. तुम्ही विषारी आयडी डिलीट करून घ्या म्हणत आहात, मी तर मागे आशुचॅंप यांना म्हटलेही की असा एखादा वाह्यात आयडी माझाच आहे हे सिद्ध करून दाखवा मी मायबोलीच सोडून जाईल. ती वेळ तर नाही आली. त्यांनीच माझ्या धाग्यावर यायचे सोडून दिले
असो, आपल्या हातात नसलेल्या गोष्टींनी व्यथित होणे हा माझा पिंड नाही. कदाचित त्यामुळेच मोबाईल गहाळ झाला असतानाही मी मजेत पाणीपुरी खाऊ शकत होतो. किंबहुना खाता खाता आता मोबाईल हरवायचे अनुभव असा धागा मायबोलीवर काढू शकतो असाही विचार करत होतो. पण मग पुढे जाऊन माझाच अनुभव असा खतरा झाल्याने स्वतंत्र किस्साच लिहून काढला
Filmy हा आयडी तुमचा आहे. या
Filmy हा आयडी तुमचा आहे. या आयडीने तुम्ही बेजबाबदार प्रतिसाद देता. असा माझा होरा आहे. मार्मिक हा सुद्धा तुमचाच आहे. एक्स मॅन हा विषारी आयडी माझ्याविरोधात विषारी प्रतिसादासाठी वापरला होता. सिद्ध करण्याची गरज मला वाटत नाही.
सिद्ध करण्याची गरज मला वाटत
सिद्ध करण्याची गरज मला वाटत नाही
>>>
पर्रफेक्ट स्टॅंड आहे. जी गोष्ट नाहीच आहे ती सिद्ध करण्यात तुम्ही आपले आयुष्य वेचावे अशी माझीही ईच्छा नाही.
तुम्हाला असे अंदाज बांधण्यात आनंद मिळत असेल तर माझी काही हरकत नाही. पण तरी मला वाटते की तुम्ही ईतके विविध विषयावर छान माहितीपुर्ण लिहीता. कश्याला यात वेळ खर्च करता. कधीतरी मलाच गिल्टी वाटते.
हरवलेला फोन रिक्षावालाही परत करू शकतो.....
पण हरवलेली वेळ प्रत्यक्ष यमराज सुद्धा परत करू शकत नाही
असो
हे मा शे पो
तुम्ही सिद्ध करा असे आवाहन
तुम्ही सिद्ध करा असे आवाहन दिले म्हणून तसे सांगितले. माझे आडाखे आहेत. मी काय तुम्हाला मायबोली सोडून जा असे आवाहन केलेले नाही. कि केलेय ? हे कोर्ट नाही इतके छान माहिती आहे आणि लिखाणातले साम्य, टायमिंग यावरू कोणते आयडी तुमचे हे अंदाज मी बाळगू शकतो. मी आपले नावे न घेता ते डिलीट करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली होती. तुम्ही नावे घ्यायला भाग पाडले. नाईलाज आहे. माझी अजिबातच इच्छा नव्हती. गंमत म्हणून तुम्ही ड्युआयडी वापरता यात काही गैर नाही असे लिहीले आहे. समजले नसेल तर प्रतिसाद पुन्हा वाचा. वरच आहे. खूप लांब जायची आवश्यकता नाही. पूर्ण वाचा. मी फक्त विषारी आयडी डिलीट करा इतकेच म्हटले होते. एक्स मॅन ने मला दिलेली उत्तरे पाहता तो तुमचा आयडी आहे हे कुणीही शेंबडं मूल सुद्धा सांगू शकेल. ज्या ड्युआयडींनी तुम्ही सकारात्मक लिखाण केले आहे त्याबद्दल कुणाची तक्रार आहे ?
वेगळा धागा काढा शांत माणूस
वेगळा धागा काढा शांत माणूस
मी वर हेमाशेपो लिहिले आहे
हेमाशेपो नंतर पुन्हा कमेण्ट ?
हेमाशेपो नंतर पुन्हा कमेण्ट ?
वेगळा धागा काढायचा कि नाही हे मी पाहीन. तुम्ही उगीच आव्हान दिल्याने उत्तर दिले.
मला वेगळ्या धाग्याची गरज नाही.
हे मा शे पो म्हणजे या विषयावर
हे मा शे पो म्हणजे या विषयावर या धाग्यावर माझी लास्ट कॉमेंट. आता ईथे अवांतर नको. पण हा विषय स्वतंत्र धाग्यावर नेऊया. मला आवडेल
तिथे तुमच्या मुद्द्यांना उत्तरे द्यायला मजा येईल...
जसे की...
एक्स मॅन ने मला दिलेली उत्तरे पाहता तो तुमचा आयडी आहे हे कुणीही शेंबडं मूल सुद्धा सांगू शकेल
>>>>
थोडक्यात, शेंबडे मूल सुद्धा असा आयडी काढू शकतो जे माझ्यासारखे वाटेल
आता जर तुम्ही खरेच माझे हितचिंतक असाल तर दोघे मिळून त्या शेंबड्या मुलाचा शोध घेऊया जो माझ्यावर बिल फाडून तुम्हाला विषारी बोलतोय
वाट पाहतोय स्वतंत्र धाग्याची........ ३ वाजेपर्यंत !
वाटच बघा. मी कशाला आदेश पाळीन
वाटच बघा. मी कशाला आदेश पाळीन असे वाटतेय ?
यावर पुढची हेमाशेपो येऊ द्या. सकाळी सात पर्यंत.
आता जर तुम्ही खरेच माझे
आता जर तुम्ही खरेच माझे हितचिंतक असाल >> मी कुठे म्हटलेय असे ? तुम्ही तुमचा शत्रू समजायला मोकळे आहात.
र दोघे मिळून त्या शेंबड्या मुलाचा शोध घेऊया >>> मला या अवांतर कमेण्टचा अर्थ समजला नाही. पुन्हा एकदा सांगा.
एक्स मॅन हा तुमचा आयडी आहे यात मला शंका नाही हे मी सांगतोय. हे मला कोर्टात प्रूव्ह करायची गरज नाही. अॅडमिनने जर सांगितले कि एक्स मॅन तुमचा आयडी नव्हता तर मी ते बिनशर्त मागे घेईन. इतकेच काय मनात सुद्दा शंका राहणार नाही. अॅडमिनच्या जवळच्या एखाद्या आयडीने, ज्याला अॅक्सेस आहे, सांगितले तरी चालेल.
जर यांनी फिल्मी हा आयडी तुमचा नाही असे सांगितले तर ती शंका पण मनातून काढून टाकेन. तो कुणाचा आहे हे मला सांगावे हा काही माझा आग्रह नाही.
हे मा शे पो च्या पुढच्या पोस्टची वाट बघतोय.
सकाळी सातपर्यंत !
अर्चना सरकार हा तर तुमचा आयडी
अर्चना सरकार हा तर तुमचा आयडी आहे कि नाही ? मला त्या आयडीबद्दल तक्रार नाही. लिहा कि छान छान. येऊ द्या. या आयडीने कधी कुणाला दुखावलेले नाही.
दोन वाजले
दोन वाजले
एक तास शिल्लक
मी दोन कप कॉफी टाकतो
स्वतःच्या स्वतःशी गप्पा जोरात
स्वतःच्या स्वतःशी गप्पा जोरात चालू आहेत... एक लॅपटॉप आणि एक सापडलेला मोबाईल का? एक चूक केली होती पण एडिट केलीत पटकन... ऋन्मेष इज कूल... ऋन्मेष शांत माणूस आहे...
घ्या शांत माणूस.. च्रप्स
घ्या शांत माणूस.. च्रप्स यांनी पकडले आपल्याला.. एडीट केलेल्या पोस्टीही पाहिल्या त्यांनी पटकन..
टाका आता आधार कार्डचा फोटो. आणि आणा त्यावर ॲडमिनची स्वाक्षरी. सिद्ध करा तुम्ही मी नाही आहात. नाहीतर डिलीट करून घ्या तुमचा आयडी
चला शुभरात्री...
तीन वाजून गेले. पण धागा काढायचा चान्स गेला. भांड फुटले आता. कधी ना कधी हे होणारच होते
अॅडमिनने जर सांगितले कि एक्स
अॅडमिनने जर सांगितले कि एक्स मॅन तुमचा आयडी नव्हता तर मी ते बिनशर्त मागे घेईन. इतकेच काय मनात सुद्दा शंका राहणार नाही. अॅडमिनच्या जवळच्या एखाद्या आयडीने, ज्याला अॅक्सेस आहे, सांगितले तरी चालेल.
>>> असे नसते शांत माणूस... ऍडमिन कसे ओळखतील तोच आयडी आहे का... आयपी ऍड्रेस किंवा लोकेशन वरून नाही कळत... विपीन वापरे लोक...
रात्री काम , घरात बसून काम
रात्री काम , घरात बसून काम
कसली नोकरी करतात ?
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/12029?page=2
च्रप्स, तुमच्या गाववाल्याचा धागा आहे. यावर सकाळची लिंक आहे जी आता चालत नाही. त्यात अजय गल्लेवाले यांची मुलाखत होती. त्यात अजय यांनी त्यांना सगळ्यांचे सगळे ड्युआयडी कसे माहिती असतात हे सांगितले होते. आणखीही एक चंमतग पुण्याटल्या गटग मधे सांगितली आहे.
जाऊदे मी जास्त काही लिहत नाही
जाऊदे मी जास्त काही लिहत नाही... त्यांचा इन्टेन्ट चांगलाच आहे... त्यामुळे ड्यू आयडी कमी होणार असतील तर बेस्टच आहे...
त्यामुळे ड्यू आयडी कमी होणार
त्यामुळे ड्यू आयडी कमी होणार असतील तर बेस्टच आहे.. >>> असे मी म्हटलेले नाही. कि म्हटलेय ? नाही ना ? तुम्हाला म्हणायचे तर म्हणा तसे. पण त्याचा इथे संबंध दिसत नाही. ड्युआयडी नसावेत असे काही मायबोलीचे धोरण नाही. तुम्ही तसे आखले असेल तर माहिती नाही.
थांबा ............!!
थांबा ............!!
मी आता कन्फुज झालोय. आपले नेमके कोणकोणते आयडी आहेत ? आणि ते आपल्यातल्याच काहींना कसे माहिती नाहीत ?
या विषयावर एक धागा येऊ शकतो. पण आपल्यातल्या नेमक्या कोणत्या आयडीने तो काढायचा हे ठरलेच नाही.
गारंबीचा शारूक, तुम्ही
गारंबीचा शारूक, तुम्ही कन्फ्युज होऊ नका. मी ते शांत माणूस यांना सांगत होतो.
तुम्ही धागे काढले तर माझा लोड कमी होईल. स्क्रीन टाईम कमी केला आहे ना !
शांत माणूस- विपीन असेल तर
शांत माणूस- विपीन असेल तर कोणाचा ड्यू आयडी कोण हे कोणालाही कळणे अवघड आहे.. बाकी तुमचे चालू द्या...
सर आज सुट्टीच घ्या. हा
सर आज सुट्टीच घ्या. हा मुद्दा क्लीयर होणे जास्त महत्वाचे आहे. ऑफिसला काय नेहमीचेच आहे.
म्हणून मी बोलत होतो वेगळा
म्हणून मी बोलत होतो वेगळा धागा काढा..
शांत माणूस यांचा आवडता विषय आहे हा..
मला वाटते एक काम करा शांत माणूस,
तुम्हीच ॲडमिनच्या वा कोणाच्याही मदतीने वर माझ्या नावावर खपवत असलेल्या तीन आयडी पैकी कुठलाही आयडी माझाच आहे हे सिद्ध करा.
त्या केस मध्येही मी मायबोली सोडून जाईन...
आणि नसेल सिद्ध करता येत असेल तर च्रप्स जे म्हणत आहेत ते बरोबर आहे हे मान्य करा.. हाय काय नाय काय
पण जमल्यास स्वतंत्र धागा काढा....
ईथली चर्चा थांबवा.. बोअर झालेय राव
सर आज सुट्टीच घ्या
सर आज सुट्टीच घ्या
>>>
घेतलीय
शांत माणूस यांचा आवडता विषय
शांत माणूस यांचा आवडता विषय आहे हा.. >>> हे सिद्ध करा. नाहीतर मायबोली सोडून जा किंवा नका जाऊ.
मी कधीच असे म्हटलेले नाही. ते जे आधीचे शांत माणूस होते तो वेगळा आयडी आहे. तो आणि मी एकच आहे हे सिद्ध करा. त्यांच्या नावाचे माझ्या नावावर खपवू नका.
मी शांमाकामामा आहे.
पण जमल्यास स्वतंत्र धागा काढा.... >>> काय धागा काढा, धागा काढाम धागा काढा, धागा काढा लावलंय ? तुम्हाला जुलाब होतात दुसर्याला होत नाहीत त्याने बळेच कुंथायचे का ? काहीही काय ?
ईथली चर्चा थांबवा.. बोअर झालेय राव >>> तो तुमचा प्रश्न आहे.
मी इतकेच म्हटले आहे कि फिल्मी, मार्मिक आणि एक्स मॅन हे तुमचे आयडी आहेत असा माझा विश्वास आहे. त्यावर धागा काढायचा नाही. मला सिद्धही करायचे नाही. तुम्हीच हेमाशेपो म्हणून थांबायला तयार नाहीत. त्या हेमाशेपो ला अर्थ नाही हे त्या वेळीही माहीत होते तसेच हे आयडी तुमचे नाहीत असे कितीही म्हटले तरी त्याला अर्थ नाही हे माहिती आहे. अयोध्येत रामाचा जन्म झाला ही कित्येक कोटी लोकांची श्रद्धा आहे. ते काय सिद्ध करायचे असते का ? तसेच अभिषेक लल्लांचा ऋन्मेष हा सेकंड इन कमांड आयडी आहे. आणि भन्नाट भास्कर हा अॅडज्युटंट आयडी आहे हे ओपन सीक्रेट आहे. अर्चना सरकार सुद्धा कधी लपलेला नाही. हा आयडी कमांडर इन चीफ म्हणजे अभिषेक ना रिपोर्ट करतो कि टूआयसी ला रिपोर्ट करतो कि अॅडज्युटंटला रिपोर्ट करतो हे काय माहिती नाही. तसेच इतरही ड्युआयडी असणार. म्हणजे क्वार्टर मास्टर, मेडीकल ऑफीसर, एसएम, जेसीओज, सेंट्रीज, कमांडोज इत्यादी.
पैकी ब्लॅक रॉबीन हा तुमचा कमांडो आहे असा आरोप आशुचँप यांचा आहे. माझा नाही. मी एक्स मॅन हा तुमचा कमांडो आयडी आहे असे माझ्या मनाशी म्हणालो. तसेच फिल्मी हा आयडी एक उडाणाटप्पू आणि लोकांना दुरूत्तरे करण्यासाठी आहे असे मी मनाशी म्हणालो.
एव्हढं मनावर घेऊ नका हो.
हेच आपलं नेहमीचंच!
हेच आपलं नेहमीचंच!
Pages