द फेम गेमः वेब सीरीज परीक्षण रिस्क घेतलीच तिने!!

Submitted by अश्विनीमामी on 27 February, 2022 - 07:06

माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा मी तो कौतुकाने थेटरात जाउन बघि तला होता व वैतागून ती काहीच रिस्क घेत नाही हा परीक्ष् णाचा धागा काढला होता. रूप व हसण्यावर पूर्ण चित्रपट निभावून नेलेला अ‍ॅक्टिन्ग कधी करणार बाई असा वैता ग तेव्हा आलेला होता.

द फेम गेम ही माधुरी मुख्य कलाकार असलेली वेब सीरीज काल परवात भारतातील नेटफ्लिक्स वर रिलीज झाली आहे. ती काल व आज बसून बिंज वॉ च करून संप विली व एक प्रकार चा आनंदाचा धक्का बसला. तिने रिस्क घेतली आहे व ती यशस्वी झालेली आहे. त्या अजरामर सुहास्याच्या मागची लोखं डी व्यक्तिरेखा तिने यशस्वी पणे वेब सीरीजच्या माध्यमातून पुढे आणली आहे. सैफ ने सेक्रेड गेम्स मधून वेब सीरीज माध्यमात चांगले ट्रांझि शन केले तसेच माधुरीने ह्या मालिकेतून वेब सीरीज मध्ये यशस्वी पदार्पण केले आहे. वे टु गो मॅम दुसरा सीझन लवकर आणा.

आठ भागांची मालिका उत्कंठा वर्धक थ्रिलर आहे त्यात अनेक भाग आहेत त्यामुळे स्पॉयलर देत नाही. पण कथा वस्तू नीट बांधलेली वाटली. मुंबईत एका सोशल क्लास मध्ये जग णारे आईबाप मुले ह्यांचे संबंध इतराशी इंटरअ‍ॅक्षन अगदी योग्य व सहज पकडली आहे. त्यांच्या नात्यातील
असंख्य गाठी निरगाठी उकलत कथा पुढे जाते.

चित्रपटाच्या ग्लॅमरस जादु ई दुनीये मागचे काही घाणेर डे सत्य प्रकाशात आणले जाते. मीना कुमारी, मधुबाला श्रीदेवी, नीतुसिंग ह्या पठडीतल्या नायिकांनी अनामिका आनंद चे वास्तव भोगले आहे. सुंदर मुलगी म्हण जे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी तिला तिचे जीवन ते काय तिचे नि र्णय स्वातंत्र्य खच्चीच केले पाहिजे तिला नाचवले पाहिजे व आलेले पैसे बळकावले पाहिजेत ह्या मानसिकतेचे विदारक चित्रण ह्या मालिकेत होते.
अनामिका चे अडकले पण तिची सुटण्याची धडपड, एक प्रकारचा रूथलेस स्वभाव कथेला पुढे नेतो.

माधुरी चे कपडे अप्रतिम लेव्हलचेच आहेत व तिने खरे तर आईचाच रोल केला आहे. ( साधार ण वय झालेल्या हिरॉइन्स नी आई चे रोल्स घ्यावेत अशी अपेक्षा असते तसाच हा आहे पण ही आई सध्याची आहे.) सपोर्टींग मध्ये तिची आई नवरा मुले ह्यांचे रोल्स आहेत. तिचा मेकप मॅन, तो पोस्टर रंगवणा रा मॅन मनीश खन्ना तिचा प्रेमिक व सुपर स्टार ह्यांचे रोल्स ही कलाकारांनी योग्य केले आहेत. परंतु सीरीज पूर्ण पणे
माधुरीच्याच खांद्यावर आहे व जबाबदारी तिने पेलली आहे. ( ते नाजूक खांदे!!) चेहरा वयस्कर दिसतो अगदी ट्रीट करून सुद्धा पण आ तले सोने अनुभवाने प्रकाशमान झाले आहे अशी ती अनामिका आनंद आहे. वय्स्कर तिशी चाळीशी पन्नाशी साठीतल्या स्त्रियांच्या सुद्धा कथा अस्तात व त्या सांगण्या सारख्या असतात हे आता प्रेक्षकांच्या व कंटेंट बनवणार्‍यांच्या लक्षात येउ लागले आहे. हे ही नसे थोडके.

कथेतील पात्रांचा मराठी पणा अधून मधून येतो तो छान वाटतो. आई एकदा मुलग्यासाठी साबुदाणा खिचडी बनवून घेउन येते. तो सीन छान आहे. तसेच आई मुलग्याचा एक संवेदनशील वैयक्तिक बाबीवर आधारीत सीन पण चांगला घेतला आहे.

गुन्ह्याचा तपास कर् णारी पोलीस ऑफिसर पण कामाच्या ठिकाणी डिस्क्रिमिनेशन चा सामना करत आहे. ही समलिंगी संबंधात आहे.
साधारण फ्रेंड्स मधील रॉस च्या बायकोचा बाज ह्या दोन आया मुलाच्या कस्ट डी साठी भांडायचे ठरवतात. एकूणच मुलांसाठी काही करायला तयार असलेली आई हा कथेचा कणा आहे. व शेवटी एक ट्विस्ट आहे तो मुळातूनच बघा.

आर्ट डिरेक्षन बॅक ग्राउंड संगीत अगदी नयन सुखद कर्ण सुखद आहे. एकंदरीत एक विषारी व्हेलवेट चॉकोलेट आपल्याला सुंदर सिरॅमिक प्लेट मध्ये आणून दिल्यासारखे आहे. पण आत काही असे घटक आहेत जे नक्कीच घशात अडकतील. विषबाधा होईल असे आहेत.
पण आपली माधुरी त्यावर मात करते व पुढे जाते. ( सौंड्स फॅमिलिअर!१) शेवटा ला एका सीन मध्ये परिस्थितीशी सामना कसा करायचा ह्याचया गहन विचा रात बुडलेली शिळाबधिर झालेली आई. ती आहे ह्या सुरक्षित भावनेने शान्त निवांत आईच्या मांडीवर झोपून गेलेली
ग्रोन अप बाळे शेजारी हनुमानासारखी बसलेली मावशी. ह्या फ्रेमला तर आमच्या कडे राम पंचायतना चा फोटो बघितल्या सारखी उत्स्फूर्त दाद मिळाली.

सीरीज मधली घरे, फार्म हाउसेस बंगले फार सुरेख डिझाइन व शूट केले आहेत.

माधुरीचा प्रेमीक म्हणोन खानांपैकी एखादा किंवा संजूबाबा शोभून दिसला असता पण वेब सेरीज चे तेवढे बजेट कुठले असायला तरीही ही हाय बजेट सीरीअल आहे. संजुबाबा वयस्कर दिसतो. मानव कौल ने चांगले काम केले आहे पण तिच्या पुढे साधाच दिसतो.
संजय कपूर मध्यम वयीन नको श्या झालेल्या नवर्‍याच्या रोल मध्ये टाइप कास्ट होउन जाईल असे वाट्ते.

एकदा नक्की बघा. युट्युब लिंक कृपया इथे प्रतिसादात देउ नये. नेटफ्लिक्स वर्गणी भरून बघावे. धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग या तुटक्या शब्दांवर उपाय काय? कारण बरंच काही वाचायचं राहून जातं त्यामुळे. >>> हम्म. तांत्रिक अडचण आहे हे मी सांगितले. उपाय कदाचित वेमा / अ‍ॅडमिन सांगू शकतील.

हाउटुपीलनिअन्सविथ्नोज असे एक अ‍ॅप आहे प्ले स्टोअर वर. व्याख्या विक्ख्हि वुख्हू.

त्रास होत असेल तर वाचू नका ताई. सूचनेबद्दल धन्यवाद. परत लिहिताना काळजी घेइन.

नाही, अमा, नाकाने कांदे सोलण्याचा किंवा कुणाला टोमणे मारण्याचा उद्देश नाही माझा.

माझा प्रश्न जेन्युइन होता. शंका खरीखुरी आहे. ही तांत्रिक चूक असेल तर कशी दूर करावी, याचा उपाय कुणीतरी सांगावा अशी प्रामाणिक इच्छा आहे. म्हणजे ज्यांना असा तुटक मजकूर दिसतोय त्या सर्वांनाच त्याचा फायदा होईल.

त्रास होत असेल तर वाचू नये हा यावरचा 'उपाय' नाही.

नाकाने कांदे सोलण्याचा >> म्हणजे काय ? प्रॅक्टिकली हे अशक्य आहे. मायबोलीवर अशी स्पर्धा ठेवली तर मजा येईल.

बादवे- मला कळलेच नाही कि शब्द तुटक होते.. ते कमेंट वाचल्या नंतर परत मुद्दामून जाऊन शोधले तर सापडले...
ग्रेट ऑब्सर्व्हशन ललिता...

नाकाने कांदे सोलण्याचा >> म्हणजे काय ? प्रॅक्टिकली हे अशक्य आहे. मायबोलीवर अशी स्पर्धा ठेवली तर मजा येईल. >>अनुचमोदन. त्याबरोबर नथीतून तीर मारणे, वड्याचे तेल वांग्यावर काढणे, तु क टाकणे इ, इ, खेळांचाही स्पर्धेत समावेश केला पाहीजे. ऑलिंपिकच भरवा.

ललिता, प्रतिसाद आवडला!
मलाही मोबाईल कीबोर्ड वरून फारच विचित्र अनुभव येतो आणि इथे त्यावरून काही लोकांनी मला टारगेट पण केले आहे अनेकदा. पण प्रोब्लेम कुणाकडून झालाय ह्याने पण लोकांच्या प्रतिक्रिया, त्याचा त्रास होणे अनेकदा बदलते. Lol

(ललिता - तुला नाही हे. तुझा प्रतिसाद प्रामाणिक आहे हे कळतेय)

मी सुरू केली होती ही जालमालिका. पण थोड्या वेळाने लक्षात आलं की संवाद समजत नाहीत. मला फॅनखाली बसायची सवय आहे. त्यात एरव्हीही आवाज थोडा कट होत असतो. या मालिकेसाठी फॅन बंद करून बसलं तरी संवाद नीट ऐकू येत नाहीत असे मला एकट्यालाच वाटते का म्हणून बायकोला पण विचारलं. ती टीव्हीवर बघत होती. तिचाही तोच अनुभव होता. बॅकग्राऊंड स्कोअर जास्त लाऊड आहे. त्यात संवाद ऐकू येत नाहीत. कदाचित आमचे दोघांचेही म्हणणे चुकीचे असू शकेल.
पण मग ती बंद करून रुद्र पहायला सुरूवात केली. दोन भागानंतर ती कंटाळवाणी झाली.

पाहायला सुरवात केली आहे. ४ एपिसोडस झाले. छान ग्रीप घेतली आहे. वीकेंडपर्यंत होईल संपूर्ण पाहून. मकरंद देशपांडेच्या कॅरॅक्टरबद्दल अंदाज आला आहे. पाहूया अंदाज खरा ठरतो का ?
माधुरीच्या मुलीचा रोल करणारी ऍक्टरेस कुठे तरी खूप पहिल्यासारखी वाटतेय. कुठल्या जाहिरातीत होती का ?

पाहिली व शेवटी कळले की हाताला विशेष काहीच लागले नाही. दुसरा सिझन आला नाही तरी चालेल.
माधुरीच्या कुर्त्या सुंदर. ती असले रोल आधीही इतके चांगलेच करायची त्यामुळे यात नवीन माधुरी भेटली नाही याचे वाईट वाटले. सुंदर तर ती आहेच व आवाजही छान आहे तिचा.
पुत्राचे काम आवडले. कौलला फार संधी नाही मिळाली. पण दोघे शोभत नाहीत एकमेकांना. नो केमिश्ट्री.
फॅशनच्या नावाखाली वा पुढारलेपण दाखवण्यापायी काही दृष्ये घातलीत ती घालायची गरज नव्हती.

पाहून संपवली. माधुरीला नेहमी कचकडं रोलमध्ये बघितलं आहे . यावेळी तिला जरा चॅलेंजिग रोल मिळाला आणि तिने बऱ्यापैकी काम केलंय. तिची आणि मनीष खन्नाची केमिस्ट्री चांगली दाखवली आहे पण मानव कौलचा रोल अजून जरा खुलवायला हवा होता.
संजय कपूरच काम ठीकठाक . सुहासिनी मुळ्ये दुष्टपणा व्यवस्थित दाखवतात.
सगळ्यात बावळट पात्र माधुरीच्या मुलीचं वाटलं. स्वतः मध्ये होणार ट्रान्सफॉर्मेशन तिला पकडताच आलेलं नाही व्यवस्थित.
तेच ते भाव सगळीकडे .
बाकी करण जोहरिय गे सीन ची गरज नव्हती. तीच गोष्ट महिला ऑफिसरच्या अनावश्यक आक्रमकतेची.. सटलतेने दाखवता आलं असत पण जोहरित्व असल्याने ...

तर बऱ्यापैकी सस्पेंस थ्रिलर आहे ही मालिका. थोडी स्लो असली तरी कंटाळा नक्कीच येत नाही. जोडीला सेट्स , कपडे नेत्रसुखद आहेत. बिंजिंग तर नक्कीच करू शकता

बघून झाल्या झाल्या काही लिहायचं नाही असं ठरवलं होतं. आता एक आठवडा झाल्यावर लिहीतो.

माधुरी आवडतेच. ती आवडलीच! कामं सगळ्यांनी छान केली आहेत. तरी शेवटी खूप लूज एण्ड्स राहून गेल्यासारखं वाटलं. बर्याच कॅरेक्टर्स चा ग्राफ अर्धवट राहिला. उदा. तो फॅन, ती घरात असलेली दुसरी बाई, ई.

दुसरा सीझन!! वाट बघा.

तो मकरंद काय अभिनय करतो केसांचे झगरेच काम करते त्याचे. चेहरा कधी बघितलेलाच नाही.

मकरंदची पैलतीर सिरियल कोणी बघितली असेल तर कसला होता तो, मला फार आवडलेला. ज्युनियर कॉलेजला होते तेव्हा मी, अभिनय आणि दिसणे दोन्हीवर मी फिदा होते तेव्हा (मीच काय माझ्या मैत्रिणीपण फिदा होत्या) , दूरदर्शनवर होती, तेरा भागांची. किशोरी शहाणे होती त्यात पण ती त्याची नायिका नव्हती. दाजी भाटवडेकर होते. तो सेम मकरंद मला नंतर कधी दिसला नाही.

तो अभिनय चांगला करतो मात्र, नंतर दामिनी अजून कुठे कुठे बघितला. निरागसपणा हरवला, जो मी बघितलेला.

मी आज बघायला सुरुवात करणारे.
संवाद कळत नाहीत/नीट ऐकु येत नाहीत असं शांमानी लिहिलंय तर मला किती झेपेल ते बघावं लागेल.
मला एरवीही काही बघताना वॉल्युम मोठा लागतो.

अमा, अश्विनीमावशी Lol

मी बघितली ही सीरिज पूर्ण. आवडली. माधुरी दीक्षितची मी अगदी फॅन नसले, तरी ती आवडते! यात तिचं काम छानच झालं आहे. अभिनेत्रीपेक्षा आईचंच काम आहे तिचं.

सगळ्यांनीच कामं चांगली केली आहेत. पडद्यामागचं कुरूप सत्य दाखवलंय. शेवट मात्र अजिबात झेपला नाही! माधुरीच्या मुलीचं पात्र सुसंगत नाही वाटत. माधुरीच्या मुलाचं काम करणारा जो मुलगा आहे, त्याची स्टाईल रणवीर सिंगसारखी वाटली का कुणाला?

मी बघितली ही सिरीज . माधुरी दीक्षित चे काम आवडले . सगळ्यांनीच कामे चांगली केली आहेत . कुर्ती तर फारच छान आहेत . मलाही तिच्या मुलीचे पात्र पटले नाही . आईचा डाव आईवर उलटवणे झेपले नाही . ही सिरीज बघितल्यावर माझ्या मुलीची प्रतिक्रिया होती ," असे प्रमोशन बघितल्यासारखे वाटतेय "

आवडली सिरीज. फक्त शेवट अगदीच बळंच आहे. माधुरीचं पात्र एकदम कॅल्क्युलेटिंग आणि ग्रे शेड आहे हे जास्त छान झालं असतं. तिला शेवटी खरीखुरी व्हिक्टीम दाखवून मजा घालवली

शेवटी तिचा गेमा तिच्यावर उलटला हे सूचित करुन (हे असं एक्सप्लिसिटली न दाखवता) सोडून दिली असती तर चांगलं वाटलं असतं.

काल ही सिरीज संपवली. चांगलं काम केलय सगळ्यांनी. माधुरीचं काम चांगलंय पण खूप उत्कृष्ट नाही. तिच्याकडून अजून चांगलं काम करवून घेता येईल असे वाटते. तेवढे potential नक्कीच आहे तिच्यात.
अविचे काम सर्वात जास्त आवडले.
कथेतले लूज एंड्स सीझन 2 च्या सोयीसाठी ठेवले असावेत. मानव कौलचं काम चांगलं आहे पण इतक्या दबक्या आवाजात बोलतो की मी शेवटी सबटायटल्स वाचायला सुरुवात केली. आवाज मोठा करून देखील त्याचा आवाजच येत नव्हता.
Madhuri is back in the game with this series for sure!

पाहिली. आवडली. अशी काही सिरियल आहे हे माहितच नव्हते त्यामुळे एकामागोमाग एक भाग दिसत गेले ते पाहात गेले. मुलाचे पात्र पहिल्यान्दा विचित्र वाटले, अमिर बिघडलेला पोर्गा.. पण नन्तर त्याची वेदना समजत गेली.

मुलगी आईच्या सावलीतुन कधीही बाहेर येणार नाही हे जाणुन आहे व त्याचा तिला खुप त्रास होतोय. मुलाची वेदना जितक्या ठळकपणे मांडली गेली तितकी मुलगी ठळकपणे मांडली गेली नाही.

शेवट ओढुन ताणुन केलाय असे वाटले. मुलीने आईचा सल्ला तन्तोतन्त अंमलात आणला कारण आईच आपल्या मार्गात धोन्ड आहे हे ती जाणुन आहे.

सिजन २ पाहायची तशी उत्सुकता नाहीय पण मिळला पाहायला तर पाहिन Happy

माधुरी अधुन मधुन खुप सुन्दर दिसलीय.. तिचा कपडेपट तर आहाहा…. त्यासाठी परत एकदा पाहायला माझी हरकत नाही. तिने तोंडावरचा मेकपचा थर थोडा कमी केला तर अजुन सुन्दर दिसेल हेमावैम.

मालिका आवडली. माधुरी आवडली. पण काही गोष्टींची गरज खरंच होती का असं वाटून गेलं. उदा: पोलिसबाई समलैंगिक दाखवणं, तो तृतीयपंथीयांचा सगळाच सीक्वेन्स वगैरे. शिवाय तिच्या मुलीचं काहीही आगापिछा नसलेल्या मुलाला अचानक जवळ करणंही पटलं नाही. ते ही इतक्या अल्पावधीत. रादर मुलीचं पात्र जरा गंडलेलंच वाटलं.

rmd ह्या गोष्टी वेबसिरिज मध्ये compulsory यायलाच हव्यात असं करतात हल्ली. वीट येतो, तोचतोचपणा वाटतो.

Pages