माझे मराठीचे मास्तर ! माझ्या मराठीच्या बाई..!!
मराठी भाषेचा गोडवा आपल्या प्रत्येकाच्या मनात आहेच कारण, आपली मायबोली मराठी आहेच गोड.. वाचायला, लिहायला, ऐकायला आणि बोलायला..!!
महाराष्ट्राच्या भूमीत आपल्या संतानी, कवी, लेखकांनी त्यांच्या ओव्यात, श्लोकात, कवितेत, लेखनात भरभरून मराठीची थोरवी गायली आहे. मायबोली मराठीचे गुण कितीही गायले, वर्णिले तरी त्यासाठी शब्द तोकडेच् पडणार आहेत.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित माझे मराठीचे मास्तर / माझ्या मराठीच्या बाई उपक्रमाद्वारे मायबोलीने आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मभादि संयोजकाचे मनःपूर्वक आभार..!!
खरं सांगायचं तर , माझ्या मनात माझी मायबोली असलेल्या मराठी भाषेच्या वाचनाची आणि लेखनाची आवड निर्माण व्हायला मराठी शाळेचं योगदान जास्त आहे असं मला वाटते.
स्थळ : गावात सुरु असलेला गणेशोत्सव .!!
'पुढचं पारितोषिक आहे... कु, रूपाली हिस, इयत्ता तिसरी...!!'
निवेदकाने माझ्या नावाचा उच्चार करताच आठ वर्षाची असलेली मी धावत - पळत व्यासपीठावर गेले. बक्षिस समारंभात उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मी बक्षिस स्वीकारले. माझ्या बालमनात खूप उत्सुकता होती की, बक्षिस म्हणून काय मिळाले असावे बरं मला...!
__आणि मग बक्षिस म्हणून मिळालेली ती वस्तू मोठ्या आतुरतेने, उत्सुकतेने मी घरी जाऊन उघडून पाहिली. ती बक्षिस म्हणून मिळालेली वस्तू म्हणजे पुस्तकरूपी भेट होती , जी माझ्यासाठी अनमोल ठरली कारण, तिने मला पुढील आयुष्यात वाचनाची अखंड गोडी लावली.
कोवळ्या , उमलत्या मनी... .
जाहली उत्सुकता ती मोठी...
पाहुनी पुस्तकरूपी ती भेट...
लागे गोडी वाचनाची, मज आयुष्याच्या गाठी...!
सकाळी उठल्या - उठल्या घराच्या पायरीवर बसून 'हात तुटलेला घोडेस्वार' असं नाव असलेल्या , युद्धात हात गमावलेल्या एका घोडेस्वाराचे मनोगत असलेले ते कथेचे पुस्तक मी अधाशीपणे एका बैठकीत वाचून काढलं. मला आठवतंय्, इथूनच माझ्या मराठी कथा वाचनाच्या आवडीचा श्रीगणेशा झाला होता.
मला वाचनाची आवड लावणारे , गावच्या गणेशोत्सवात बक्षिस म्हणून मिळालेले कथेचे ते पुस्तक मी बरीच वर्षे माझ्यापाशी जपून ठेवले होते.
पुढे आजोळी गेले की, मुंबईवरुन घरी सुट्टीत येणारा मामा चांदोबा, लोकप्रभा, मार्मिक, चित्रलेखा , दिवाळी अंक असा वाचनाचा खजिना घेऊन येई. जसा अलिबाबा, गुहेत लपवलेल्या खजिन्यावर धाड घालीत असे, तसं मग मी अलीबाबा सारखं ह्या सगळ्या वाचनाच्या पुस्तकांच्या खजिन्यावर धाड घाली आणि वाचनाचा मनमुराद आनंद लुटून घेई.
मराठी वाचन आणि लेखनाची आवड माझ्या मनात निर्माण करण्यात माझे चुलत आजोबा ( वडीलांचे काका) ह्यांचा ही मोठा सहभाग आहे. माझे आजोबा उत्तम वक्ते होते. मराठी भाषेवर त्यांचे उत्तम प्रभुत्व होते. त्यांच्या तोंडून लहानपणी गोष्टी ऐकताना खूप छान वाटायचं .
मला शाळेत असताना वकृत्व स्पर्धेत मराठीतून भाषण लिहून देणं असो की शाळेतल्या स्नेहसंमलेनात सादर करण्यासाठी एकांकीका लिहून देणं असो.. त्यांनी मला नेहमीचं प्रोत्साहन दिलं. मराठी भाषेची गोडी लावली.
" ए दिपडे, मला का देत नाही गं झुला..??" चौथीतली मी माझी वर्गमैत्रिण असलेल्या दिपाला विचारत होते.
" नाही देणार जा... काय करायचं ते करं..!" लहानग्या दिपाने मला उर्मट उत्तर दिले.
" का देणार नाहीस..?? तुझ्या बापाचा आहे का हा झुला..??" मी जास्तच उर्मट होत तिला प्रत्त्युतर दिले.
झालं..!! माझ्या बाबांना असं बोलतेसं का .??. थांब, गुरुजींना आता तुझं नाव सांगते असं म्हणत ती माझं नाव मुख्याध्यापकांना सांगायला धावत-पळत त्यांच्याकडे गेली.
मला गुरुजींचे बोलावणे आले. मी धडधडत्या ऊराने गुरुजींकडे गेले. मला आता गुरुजींच्या ओरड्यासोबत छडीचा मार खायला मिळणार ह्या भीतीने माझी गाळण उडाली होती.
" रुपाली, कधीच कुणाचा बाप काढू नये... आपल्या तोंडातली भाषा हि सभ्य, संस्कारी असायला पाहीजे, हे कायम लक्षात ठेव..! " गुरुजींनी मला मोठ्या प्रेमाने समजाविले. मला माझी चूक उमगली.
बालपणीचा तो प्रसंग आठवला की, आजही ओठावर हसू येते , पण गुरुजींनी त्या प्रसंगानंतर आपली भाषा कशी असावी ही दिलेली शिकवण आजही पक्की लक्षात आहे.
राऊत गुरुजी आज हयात नाहीत, पण त्यांच्या तोंडून शुद्ध, स्पष्ट उच्चार असलेली, भाषेचे संस्कार शिकवणारी मराठी भाषा ऐकताना कानांना खूप गोड वाटायचे.
चौथीला असताना स्कॉलरशीपच्या परीक्षेला असताना जे पुस्तक अभ्यासाला होते, त्यात मराठी म्हणी, वाक्यप्रचार भरभरून होते. त्यांचे वाचन करताना आणि त्यांचा अर्थ, त्यातली गंमत समजून घेताना खूप मज्जा वाटे.
माध्यमिक शाळेत तर मराठी भाषेची बीजेच मनात रोवली गेली. शाळेतलं सगळं वातावरण मराठमोळं होतं. शाळेत शिकणारी परभाषिक मुलं-मुली सुद्धा आमच्या सारखंचं मन लावून जणू त्यांची मातृभाषा मराठी असल्यागत शिकत. घरी त्यांची कुठलीही बोलीभाषा असली तरी ते मराठीवर आमच्या एवढंच प्रेम करीत असत.
कनिष्ठ महाविद्यालयात गेल्यावर मराठी, इंग्रजी माध्यमातून शिकलेले सर्वभाषिक विद्यार्थी होते. ते हिंदीतून संवाद साधत असत. हिंदी जरी राष्ट्रभाषा असली, व्यवहारात तिचे कितीही महत्व असले तरी , आम्ही मात्र त्यांच्याशी मराठीतूनच संवाद साधायचो. महाराष्ट्रात राहता ना , मग तुम्हांला यायला पाहिजे मराठी.. असं आम्ही त्यांना ठणकावून सांगायचो.
सखेद आश्चर्य तेव्हा वाटायचे, जेव्हा मराठी घरातली इंग्रजी माध्यमात शिकलेली मुलं आमच्याशी हिंदीतून संवाद साधू पाहायची आणि विलक्षण आश्चर्याचा धक्का तेव्हा बसे, जेव्हा इंग्रजी माध्यमातून शिकलेला चॅटर्जी आडनाव असलेला बंगाली वर्गमित्र आम्हां मराठी मित्रमैत्रिणींच्या मातृभाषेला आदरभाव दर्शवित आमच्याशी नेहमीच मराठी बोलू पाहे. आपुलकीने मराठी शिकू पाहे.
बारावीला असताना श्री. संखे सर हे मराठी शिकवत असत. मला आठवते की, आपली मायबोली असणाऱ्या मराठी भाषेची जोपासना व्हावी, तिचे संवर्धन व्हावे , विद्यार्थ्यांना मराठी लेखन- वाचनाची गोडी लागावी म्हणून संखे सर महाविद्यालयातर्फे निघणाऱ्या वार्षिक मराठी अंकात विद्यार्थ्यांनी लेखन करावे म्हणून जातीने लक्ष घालीत असत. विद्यार्थांना प्रोत्साहन देत. माझे मराठी भाषेवरचे प्रेम त्यांना ठाऊक होते. त्यांनी नेहमीच मला प्रोत्साहन दिले. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनाने बारावीच्या बोर्डाच्या परिक्षेत तत्कालिन ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून विज्ञान, वाणिज्य आणि कला ह्या तिन्ही शाखेतून मराठी विषयात पहिला येण्याचा मान मला मिळवून दिला. त्यासाठी मी त्यांची नेहमीच ऋणी राहिल.
पुढे नोकरी करत असताना उर्दू शाळेत शिकलेले एक मुस्लिम सहकारी एवढं अस्खलित मराठी लिहित आणि बोलत असत की, सगळेच आश्चर्याने तोंडात बोटे घालीत. तुझ्यापेक्षा हि मला छान मराठी येतं असं सांगणाऱ्या त्या सहकाऱ्याचा मला राग कधीच आला नाही ,उलट माझ्या मायबोली मराठी भाषेबद्दल त्यांना वाटणारा आदरभाव पाहून माझ्या नजरेत त्यांच्याबद्दल वाटणारा आदर आणखी दुणावला. कार्यालयीन अर्ज मराठीत लिहताना तर काही मराठी शब्द मी त्यांच्याकडून शिकले.
काही वर्षापूर्वी तर मला वृत्तपत्रात आलेले मराठी भाषेतले सुविचार वहीत लिहून ठेवायचा, त्यातल्या लेखांची कात्रणे कापून ठेवायचा जणू छंद लागला होता. आजही जपून ठेवलेला माझ्या मराठी भाषेतला तो खजिना मला नेहमीच वाचन , लेखनासाठी स्फूर्ती देतो.
मराठी भाषेवर असलेलं प्रेम हे माझ्या रक्तातचं आहे.. आणि ते तसं असणं स्वाभाविकसुद्धा आहे. मायबोली मराठीचे कितीही कौतुक केले तरी शब्द अपुरेच पडणार आहेत ह्याची मला खात्री आहे. शेवटी एवढेच म्हणेन की,
चारी दिशा भुईवरल्या..
आभाळाची निळाई असे खोल - खोल...
अवघ्या जगी उमटती...
माझ्या मायबोली मराठीचे बोल...!!
धन्यवाद...!
रूपाली विशे - पाटील
______________ XXX______________
चांगलं लिहिलंस .
चांगलं लिहिलंस .
मायबोली मराठीवरचे प्रेम व
मायबोली मराठीवरचे प्रेम व भावना, शब्दरुपाने छान व्यक्त झालेल्या आहेत.
फार छान ओघवतं लिहीलं आहेस.
फार छान ओघवतं लिहीलं आहेस.
फार सुरेख.
फार सुरेख.
अलीबाबा सारखं ह्या सगळ्या
अलीबाबा सारखं ह्या सगळ्या वाचनाच्या पुस्तकांच्या खजिन्यावर धाड घाली आणि वाचनाचा मनमुराद आनंद लुटून घेई.>>मस्तच.
प्रामाणिकपणे लिहिले आहे.
छान
छान
छान लिहिले आहेस रुपाली.
छान लिहिले आहेस रुपाली.
वा वा,मस्तच.
वा वा,मस्तच.
जाई, सामो, सिमंतिनी, अन्जू,
जाई, सामो, सिमंतिनी, अन्जू, मोहिनी, प्राचिन, अमितव, सुनिधी... धन्यवाद..!!
नेहीप्रमाणेच छान लिखाण
नेहीप्रमाणेच छान लिखाण
छान लिहिलंय
छान लिहिलंय
धन्यवाद लावण्या..!!
धन्यवाद लावण्या..!!
धन्यवाद हर्पेनजी..!!
परत परत बरेचदा ऐकले.
सॉरी गलत गली.
छान लिहिले आहे. नेहमीप्रमाणे.
छान लिहिले आहे. नेहमीप्रमाणे. मराठीची आवड आणि ज्ञान लिखाणात झळकतेच
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
ऋन्मेष .. धन्यवाद....!
ऋन्मेष .. धन्यवाद....!
दिपक .. धन्यवाद..!
मस्त लिहीलयं. आवडले.
मस्त लिहीलयं. आवडले.
छान.
छान.
रश्मीजी, शर्मिलाजी.. धन्यवाद
रश्मीजी, शर्मिलाजी.. धन्यवाद !!
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
छान आढावा.
छान आढावा.
एकंदरीत तुमच्याकडं मराठी साठी पोषक वातावरण होतं त्याचा तुम्ही योग्य लाभ घेतला. बारावीत प्रथम आला...
मला ८-९ वीत असताना कथाविहार नावाचं पुस्तक होतं त्यात प्रसिद्ध मराठी लेखकांच्या कथा असतं. त्या भारावून टाकतं.
वर्णिता.- धन्यवाद..!!
वर्णिता.- धन्यवाद..!!
दत्तात्रेय साळुंखे - धन्यवाद..!!
एकंदरीत तुमच्याकडं मराठी साठी पोषक वातावरण होतं त्याचा तुम्ही योग्य लाभ घेतला>>> हो, मराठी साठी पोषक असंच वातावरण होतं.
मला ८-९ वीत असताना कथाविहार नावाचं पुस्तक होतं त्यात प्रसिद्ध मराठी लेखकांच्या कथा असतं. त्या भारावून टाकतं.>> खूप छान आठवणी ..!!
आम्हांला मराठी विषयाच्या कुमारभारती ह्या पुस्तकात धडे असायचे नामांकित लेखकांचे ..!!
राऊत सरांचा किस्सा आवडला.
राऊत सरांचा किस्सा आवडला. छान लिहीले आहे.
मभादि निमित्त अचानक इतका ऐवज मिळाला आहे कि काय वाचू नि काय नको असे झालेय.
राऊत सरांचा किस्सा आवडला.
राऊत सरांचा किस्सा आवडला. छान लिहीले आहे.
मभादि निमित्त अचानक इतका ऐवज मिळाला आहे कि काय वाचू नि काय नको असे झालेय.
छान लिहिलंस.
छान लिहिलंस.
रानभुली.. देवकी.. धन्यवाद..!!
रानभुली.. देवकी.. धन्यवाद..!!