श्रमाचे लिखाण (वीक एंड लिखाण )

Submitted by निशिकांत on 26 February, 2022 - 09:56

मी महारष्ट्राच्या एका अशा भागातून येतो की जो एके काळी जुन्या हैदरबाद स्टेट मधे म्हणजे संस्थानिक निझामच्या आधिपत्याखाली दीर्घ काळ होता. अर्थातच यामुळे, भाषेत, रिती रिवाजात , बोलण्याच्या शैलीतून उर्दू डोकावत होती. विशेषतः हैदराबादी उर्दूचा लहेजा खासच. या सार्‍या कारणांमुळे आम्हा मराठवाड्यातील लोकांची चांगलीच गोची होत असते. उर्दूच्या प्रभावामुळे आमची भाषा प्रकांड पंडितांना प्रमाण भाषेच्या तुलनेत अशुध्द वाटते,आणि उर्दू भाषेबद्दल तर बोलायलाच नको. फक्त ऐकून आणि प्रभावाने ती थोडीच येणार आहे! शुध्द्/प्रमाण भाषेच्या पुरस्कर्त्याकडून फक्त दोष ऐकणेच आम्हा लोकांच्या नशिबात आहे.
मराठवाड्यांच्या लोकांची एक गंमत नमूद करतो. मी जर मराठवाड्यात घराबाहेर पडलो आणि मला रिक्षा हवी असेल तर रिक्षावाला महाराष्ट्रीयन आहे हे माहीत असूनही मी त्याला "चलेंगे क्या"असेच विचारणार आणि तोही सुरुवात "कंहा जाना है?"अशी उर्दूतच करणार. हे वर्षानुवर्षे अंगवळणी पडलेले आहे. या संस्कारांमुळे बर्‍याच वेळेस माझ्या गझलेत रिवाज, रियाज, लिहाज असे उर्दू बाजाचे शब्द येतात. ते मुद्दाम म्हणून नव्हे तर आम्हाला ते स्व बोली भाषेतलेच वाटतात. ते बोलतांना आणि ऐकताना त्यात गैर असे कांही वाटतच नाही. भाषा मार्तंडांकडून यावर टिकेची झोड उठायची आता जरा कमी झालीय. असे नाही की त्यांनी मला अ‍ॅक्सेप्ट केले आहे. पण थकले असावेत ते.
मला एकेकाळी २००० च्या आसपास बँकेत एक मुसलमान बॉस लाभले. मी सहायक महाप्रबंधक आणि ते उप महाप्रबंधक होते. त्यांचे उर्दू फार अस्खलित होते. ते स्वतः पण एक कवी/शायर होते. नवाबाप्रमाणे रहाणी होती. त्यांनी माझ्या बोलण्यात डोकावणारे उर्दू शब्द नोटीस केले आणि त्या बद्दल विचारले. मी वर विषद केलेली माहिती त्यांना सांगितली. आम्ही जवळ जवळ अडीच वर्षे एकत्र काम केले, ते अधून मधून म्हणायचे की देशपांडे आप उर्दूमे पोएट्री लिखना शुरू करो. आपको जमेगा जरूर. पण मी तेंव्हा लिखाणाबद्दल फारसा गंभीर नव्हतो. यथावकाश ते निवृत्त झाले आणि माझी बदली पण बढती मिळून पटियाला (पंजाब) येथे झाली. एके दिवशी हे सर कांही कामासाठी चंदिगड येथे आले असताना त्यांनी मला फोन केला आणि मै कल आपको मिलने पटियाला आ रहा हूं असे सांगितले. माझ्या आनंदाला पारावरच उरला नाही. दुसरे दिवशी सकाळी अकराच्या सुमारास ते आले. त्यांची व्यवस्था बँकेच्या गेस्टहाऊसमधे केली होती. संध्याकाळी मी त्यांना भेटायला गेल्यावर त्यांनी पहिला प्रश्न केला तो हा की "आपने उर्दू पोएट्री लिखना शुरू किया क्या नही?" माझे नकारार्थी उत्तर ऐकून त्यांनी त्यांची बॅग उघडली आणि एक भलेमोठे जाडजूड पुस्तक काढून माझ्या हातात ठेवले, ती इंग्लिश-उर्दू डिक्शनरी होती जिचे नाव " इंतखाब-ओ-लुघात"असे होते. हे सुलतान नाथानी यंनी लिहिलेले होते. शायरीत येणार्‍या दहा हजार शब्दांचा यात समावेश आहे. हा माझ्यासाठी एक खजिनाच आहे. हे पुस्तक देवून ते म्हणाले की आता उर्दू कविता आठ दिवसात मला आलीच पाहिजे वाचण्यासाठी.
इतक्या प्रेमाने जाचक फर्मान देणारी आपली माणसे कुठे भेटतात हल्ली? दुसरे दिवशी ते गेले आणि मी एक उर्दू कविता लिहिण्याच्या कामाला लागलो. पहिली कविता; तीही उर्दुतून! खूप मेहनत घेतली. जुनी उर्दू कल्चरच्या फिल्म्स त्याची गाणी जसे की मुगल-ए-आजम, ताज महल, अनारकली यांच्या गाण्यांच्या लीरिक्सचा आभ्यास, शब्द निवड चालू होतीच आठ दहा दिवसापासून. शेवटी मजकुराचा आकृतीबंधही तयार झाला. असंख्य वेळ लुघात चाळत होतो. इतक्या अथक प्रयत्नानंतर कविता कशी बशी तयार झाली. पुन्हा दोन तीन दिवस हात फिरवणे, दुरुस्त्या केल्या आणि ती साहेबांना पाठवली. एका आठवड्यात त्यांचा फोन आला आणि त्यांनी कौतुकाची थाप दिली. किती समाधान असते नाही कुणी आपल्याने प्रशंसा केली की! सर्व श्रमांचं सार्थक झाल्यागत वाटलं हे मात्र निश्चित!
तीच कविता ( पहिली वहिली उर्दू) पेश करतोय आपणासमोर. माझ्यासाठी ही रचना अनमोल आहे.

मैने देखा जहर नही

याद तुम्हारी आयी ना हो
ऐसा कोई प्रहर नही
तनहाई से भी जहरीला
मैने देखा जहर नही

संग आपके मखमल जैसा
जीवन मानो सपना था
चाँद सितारों की बस्ती थी
बसंत भी तो अपना था
तुम जाने के बाद गाँव मे
मुडकर आयी सहर नही
तनहाई से भी जहरीला
मैने देखा जहर नही

भूल गया हूं अतीत सारा
खुदसे मै रूबरू नही
तेरेबिन दुखियारे मन को
चैन नही जुस्तजू नही
चप्पा चप्पा तुम्हे न ढूंडा
ऐसा कोई शहर नही
तनहाई से भी जहरीला
मैने देखा जहर नही

टूट गये रिश्ते शबनम से
सबा न हो महसूस कंही
दिये बुझे है इस बस्ती मे
तूफाँ है, फानूस नही
मंज़िल कैसे खोजेंगे हम?
कुछभी आता नजर नही
तनहाई से भी जहरीला
मैने देखा जहर नही

शाम पुरानी कहाँ गयी वो?
सूनी अब है बज़्म यहाँ
तबियत महफिल की है बदली
कौन सुनेगा नज़्म यहाँ
कागज़ पे मै बयाँ करू क्या?
लिखता मै अब बहर नही
तनहाई से भी जहरीला
मैने देखा जहर नही

खुश्क इलाका बेरहमोंका
असवन की है सिर्फ नमी
बोझ बनी है एक जिंदगी
साँसों की भी यहाँ कमी
डूब मरू कैसे या रब ?
आसपास मे नहर नही
तनहाई से भी जहरीला
मैने देखा जहर नही

रचना मे आये उर्दू शब्दों के अर्थः-- १) सहर-- Morning. २) रूबरू-- face to face, in front of ३)जुस्तजू--search ४) सबा-- morning easterly breeze ५)फानूस--glass shade for candle ६)बज़्म--maifil ७) नज़्म--A form of poetry ८) बहर-- meter of poetry ९) बेरहम--cruel १०) या रब  Oh God !

विषयानुरूप कविता उर्दूत आहे. ज्या समूहावर मराठीव्यतिरिक्त लिखाण चालतच नाही त्यांनी हे डिलिट करून टाकावे.

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users