क्रिकेट - ७

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41

कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ॲप्रोच बदलतोय भारतीय फलंदाजीचा.. एवढे मात्र नक्की..२०-२० ची टीम वाटू लागलीय. शर्मा कोहली राहुल हे एकत्र आल्यावर मात्र पुन्हा ते कशी आपापली भुमिका ठरवतात हे बघणे आता रोचक..

रच्याकने,

१२ तारखेपासून दुसरी टेस्ट बंगलोरला आहे. पिंक बॉल मॅच असल्यानी २ ते ९ टायमिंग आहे. ५०% प्रेक्षक अलाऊड आहेत.
मोस्टली बघायला जाईन.

फिल्डिंगचा प्रॉब्लेम दोन्ही टीम्स चा आहे. भारताच्या फिल्डिंगच्या वेळीसुद्धा ग्राऊंड फिल्डिंग अशीच गचाळ होती(बॉल क्लीन कलेक्ट न होणे वगैरे). - हे टाईप करता करता सिराजने हातातून बॉल जाऊ दिला आणि बाऊंड्री गेली. त्यापेक्षाही मला ह्या सिरीजमधे बिश्नोई, अय्यर (दोघेही) आणि सूर्या ने सोडलेले कॅचेस जास्त काळजी करण्यासारखे वाटले.

काल श्रेयस, संजू आणि जडेजा मस्त खेळले. संजूला आज एक मोठी संधी आहे मॅच-विनिंग इनिंग खेळायची.

शर्माची अनाकलनीय फलंदाजी पाहून असे वाटत होते की त्याला मुद्दाम बाद होऊन मिडल ऑर्डरची तयारी करून घ्यायची होती की काय..

सर, सर, सर, सर!!! हे म्हणजे ‘मोदींच्या मास्टरस्ट्रोक’ सारखं झालं. समजा ते सगळे रॅश शॉट्स बसले असते तर मिडल ऑर्डर टेस्ट करायचा प्लॅन फसला असता ना!

हा हा फेरफटका... मी शर्माचे कौतुक केले नव्हते वर. काहीतरी बिनसल्यासारखे, सनकल्यासारखेच खेळत होता तो. म्हणून उपरोधानेच म्हटलेले. पण तुम्हाला बहुधा मी शर्माचे कौतुक करतोय असे वाटले असावे Happy

लंके विरुद्ध २०-२० मलिका जिंकली सहज.
परंतु गेल्या दोन्ही सामन्यात लंकेने शेवटच्या ५ षटकात अनुक्रमे. ८० आणि ६८ अश्या धावा बनविल्या. ८० धावा तर बुमराह आणि भुवी गोलंदाज असताना केल्या हे चिंताजनक आहे!

*...हे चिंताजनक आहे! * - वे.इंडीजचाही आपण असाच पराभव केला तरीही पोलार्ड त्या संघाबद्दल आशावादी असल्याचं सांगतो; कारण, भारतीय गोलंदाजी विरूद्ध वे.इंडीज फलंदाज स्कोअर करूं शकत होते ! गावसकरनेही शेवटच्या काही षटकात भारतीय गोलंदाज धांवा रोखू शकत नाहींत, याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सलमान बक्त ( माजी पाक कर्णधार ) म्हणतो कीं शेवटच्या षटकांसाठी खराखुरा तेज गोलंदाज नसणं ही विश्वचषक जिंकणयामधली भारतासाठी अडचण बनू शकते.
मला मात्र वाटतं, भारतीय खेळपट्टयांपेक्षा ऑस्ट्रेलियात आपली मध्यमगती गोलंदाजी निश्चितच अधिक भेदक ठरेल व येत्या विश्वचषक स्पर्धेत तरी हा मुद्दा फार चिंताजनक ठरणार नाहीं.

कोहलीचे शतक बघायला मिळो या शुभेच्छा
>> तथास्तु

येत्या विश्वचषक स्पर्धेत तरी हा मुद्दा फार चिंताजनक ठरणार नाहीं.
>> तथास्तु

आपल्या टीमला वर्ल्डकप च्या आधी साऊथ अफ्रिकेविरुद्धच्या ५ अन इंग्लंडविरुद्धच्या ३ टी२० मॅचेस अ‍ॅज अ टीम खेळायची संधी आहे.
निदान तिथे तरी आता प्रयोग नकोत.

वर्ल्डकप साठी माझा २० जणांचा संघः
(खूपच आधी होतंय हे, पण तरीही)

ओपनर्स : रोहित, राहुल, किशन, ऋतुराज
टॉप ऑर्डर बॅटर्स : कोहली, श्रेयस, सूर्या
कीपर : पंत (किशन)
ऑल राऊंडर्स : वेंकटेश, हुडा, दीपक चहार, लॉर्ड शार्दुल, सर
स्पिनर्स : चहल, कुलदीप,
पेसर्स : भुवी, बुमरा, शमी, सिराज, हर्षल

मला मात्र वाटतं, भारतीय खेळपट्टयांपेक्षा ऑस्ट्रेलियात आपली मध्यमगती गोलंदाजी निश्चितच अधिक भेदक ठरेल व येत्या विश्वचषक स्पर्धेत तरी हा मुद्दा फार चिंताजनक ठरणार नाहीं. >> प्रत्यक्ष डाऊन अंडर खेळेपर्यंत ह्या सिरीजमधे फारसे वाचण्यात अर्थ वाटत नाही. खेळाडूं चा कॉन्फिडन्स बिल्ड होणे नि नवख्या खेळाडूंची शक्तीस्थाने नि त्रुटी लक्षात येणे हा सिरीजचा फायदा पण डाऊन अंडर मधल्या बाउन्सी पिचेस वर हे सगळे कसे ट्रांस्लेट होईल हे बघणे इंटरेस्टींग होईल.

निव्वळ ह्या सिरीजपुरते बोलायचे तर श्रेयस एकदम जबरदस्त नि मॅच्युअर खेळला आहे. नुसत्या ह्या सिरीजच्या जोरावर तो संघात हवाच अर्थात तो फक्त कोहलीच्या जागीच येऊ शकतो. संजूने नेहमीप्रमाणे सोन्यासारखी संधी परत वाया घालवली Sad किशन मॅच्युअर वाटला नाही. मागच्या आय पी एल मधलली सगळी गेन फुकट गेल्यासारखे वाटले.

अँकी, सुंदर नि अक्षर राहिले तुझ्या संघात. ऋतुराज खेळेपर्यंत नक्की करू शकत नाही.

अँकी, सुंदर नि अक्षर राहिले तुझ्या संघात>>

अँकीनी यादी बनविनाताना अक्षर सुंदर काढल्याने सुंदर नि अक्षर राहिले. Wink

अँकींच्या यादीत अक्षर ला नक्की घेता येईल.

पेटीएमच्या #$@%&

१०:३० ला तिकिट बुकिंग सुरू असताना सर्व पाचही दिवसांसाठीची 'पी' सेगमेंट तिकिटं (हाय टी अन डिनर + सीट सिलेक्शन असलेली) १०:३१ ला संपली

सुंदर नि अक्षर राहिले तुझ्या संघात.
>>
दोन्ही नावं लिहून खोडली... टोटल २० च्या पुढे जात होती म्हणून...
(कुलदीप नंतरचा कॉमा खोडायचा राहिलाय)

Screenshot_2022-03-02_113850.jpg

हा असा का फॉर्मॅट केलाय? CSK ला सरळसरळ advantage आहे..... A ग्रूपमधल्या टीम्स B ग्रूपपेक्षा कागदावर तरी खुप strong आहेत!!
मुंबईचे अवघड आहे या सीझनला!!

कोणत्या टीम ने किती वेळा IPL ट्रॉफी जिंकली त्यावरून दोन ग्रुप केलेत.
ह्या सिझनला आवघड आहे हे KKR, DC, RR आणि LSG ने म्हटलं पाहिजे MI ने नाही.

सामने मुंबईत आहेत यापेक्षा मोठा अ‍ॅडवांटेज तो काय मुंबई ईंडियन्सना.. रडायला तर ईतर सर्व टीम्सने हवे

A ग्रूपमधल्या टीम्स B ग्रूपपेक्षा कागदावर तरी खुप strong आहेत!! >> माझ्याही डोक्यात तेच आले होते हे पाहिले तेंव्हा . पण आता परत समीकरणे बदललेली असू शकतात ऑक्शनमूळे. मुंबईचे तसेही कट्।ईणच वआटत होते एकून संघ बघून आधीच.

*द ऋषभ पंत शो !*
खरंय. 50 झाल्यावरच्या षटकात पहिल्याच दोन चेंडूंवर पुढे जात अप्रतिम षटकार व तिसर्या चेंडूवर बॅकफूटवर जात गवत कापत जाणारा सणसणीत कव्हर ड्राईव्ह चौकार ! पंत ॲट हीज बेस्ट !!

नव्वदीची भिती होतीच. तेच झाले. हा शतकाचा आकडा डोक्यात आला की मेंदू गडबडतोच.
तो पिरीअड निघून शतक यायला हवे होते. कदाचित अजून आतिषबाजी बघायला मिळाली असती.

बाकी पंतला गिलख्रिस्ट व्हायची काही गरज नाही. तो स्वत:च पंत आहे. लेगला सगळी बाऊंडरी पॅक आहे. सिक्स हुकला की बाद होणार. फॉर्मेट कसोटी आहे. योग्य चेंडूची वाट बघत थांबू शकतो. पण नाही. चॅलेंज घेतल्यासारखे तुटून पडतो. सुरुवातीला वा क्रिटीकल सिच्युएशनला केले की वेडेपणा वाटतो. पण डावाला स्थिरता देऊन मग करतो ते प्रतिस्पर्ध्यांचे मनोधैर्यच खच्ची होते. ईंग्लंड आलेली तेव्हा हेच केलेले.

Pages