आज २७ फेब्रुवारी २०२२. सर्वांना मराठी भाषा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. यंदाच्या आपल्या ५ दिवसांच्या भाषोत्सवातला आजचा तिसरा दिवस. आपला अलंकारांचा खेळ असाच चालू ठेऊया.
दागिने किंवा अलंकार हे व्यक्तींच्या सौंदर्यात भर टाकतात. त्याचप्रमाणे मराठी भाषेच्या सौंदर्यात भर टाकणारे भाषेचे अलंकारदेखिल आहेत. आपल्यापैकी काहींनी ते शाळेत शिकलेही असतील. मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आपण त्या अलंकारांचे काही खेळ खेळू, म्हणजे ते अलंकार काय आहेत हे कळायला सोपे जाईल आणि जरा मजाही येईल. तसे भाषेचे अलंकार अनेक आहेत, परंतु तूर्तास आपण काही निवडक अलंकार खेळासाठी घेऊ या. २५ फेब्रुवारी ते १ मार्च या काळात रोज एकेका अलंकाराचा खेळ खेळला जाईल.
तर मायबोलीकरांनो आजचा अलंकार आहे 'यमक'
-------------------------------------------------
थोडक्यात माहिती
कवितेच्या चरणात ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक हा शब्दालंकार होतो.
उदाहरणार्थ :
१. जाणावा तो ज्ञानी
पूर्ण समाधानी
निःसंदेह मनी
सर्वकाळ
२. पहिला पाऊस पडला
सुगंध सर्वत्र दरवळला
-------------------------------------------------
चला तर मग, आजचा खेळ सुरू करू
यमक घेऊन कविता लिहिणे हा अनेक माबोकर्यांच्या डाव्या हातचा मळ. अनेकविध विषयांवर येथे काव्यनिर्मिती होते, हे आपल्या सर्वांना माहीत आहेच. पण आज मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आपण काव्यात एखादा मराठी महिना (चैत्र, वैषाख, ज्येष्ठ, ... वगैरे), सणवार, ऋतू (वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, ... इत्यादींपैकी) गुंफुयात.
नियम-
१. एका वेळी कोणताही एक मराठी महिना घेऊन त्यातील सण-वार, ऋतू, अजून एखादे वैशिष्ट्य चारोळी स्वरूपात मांडायचे आहे आणि त्याबरोबरीने यमक ही साधायचे आहे.
२. पुढील सदस्य झब्बू देताना तो महिना लगेच घेऊ शकत नाही.
उदा - श्रावण महिन्यातील वर्णन करणारी चारोळी असेल तर पुढचा झब्बू श्रावण महिना नसावा.
३. मराठी महिन्याचा उल्लेख केला तरी/ नाही तरी चालेल.
उदा - गणपती बाप्पा/मोदक चा उल्लेख असेल तर महिन्याचे नाव लक्षात येईलच. ऋतूंच्या नावावरून महिना लक्षात येईलच असे नाही. तिथे महिना सांगावा लागेल.
चला चला करा सुरुवात |
अलंकाराचा हा खेळ येऊ द्या रंगात ||
चैत्राच्या महिन्यात येतो
चैत्राच्या महिन्यात येतो गुढीपाडवा
मभादिच्या खेळांचा वाटतोय गोडवा
वैशाखात असतं ऊन
वैशाखात असतं ऊन
खेळात येतेय मजा संपवू नका सून!
चैत्राच्या पालवीने
चैत्राच्या पालवीने
झाडेवेली सजली
ऋतुराजा येता
सृष्टीराणी नटली
वसंत येतो तेव्हा महिना असतो
वसंत येतो ऋतू तेव्हा महिना असतो माघ
संयोजक मंडळ मभादिचे कामाला वाघ
हस्त लागला सरींवर सरी
हस्त लागला सरींवर सरी
ऐलमापैलमा खेळतात पोरी
ओळखा खिरापत धरा फेरा
हादग्या-भोंडल्याचा गोडवा न्यारा
भाद्रपदातल्या गणेशोत्सवाची
भाद्रपदातल्या गणेशोत्सवाची आतुरतेने सगळे बघतात वाट
मभादि संयोजकांनी उपक्रमांचा उडवलाय थाट !!!
श्रावणातली अष्टमी पहायला
.
अश्विन आला कर्तिक आला
अश्विन आला कर्तिक आला
आली गुलाबी थंडी
फराळ, फटाके, दिवा ळी अंक
अंगात उबदार बंडी
कृत्तिकाबाईंचा उखाणा
कृत्तिकाबाईंचा उखाणा
यांच्या संशयी स्वभावाने केली माझ्या संसाराची होळी
फाल्गुनरावांचं नाव घेते लाटत पुरणाची पोळी
लव यू लव यू, मन मोहरीचे शेत,
कृति सनोनचा उखाणा -
लव यू लव यू, मन मोहरीचे शेत, जमीनदार तू
यमकात कसे बसवू सारे सण-वार ऋतू...
सी गं सी,
सी गं सी,
यमकात बसवलेसच की ग सारे सण-वार ऋतू
करुन सवरुन नामानिराळी राहतेस बरी तू
काय करू बाई यमक सुचतच नाही
काय करू बाई यमक सुचतच नाही
आषाढ येउन गेला, पाऊस पडतच नाही
पाऊस आला नि ढग वाजला धम धम
पाऊस आला नि ढग वाजला धम धम
कार्तिक मात्र गायला बम डिगी बम बम...
बम डिगी बम बम कार्तिक दिवाळी
बम डिगी बम बम कार्तिक दिवाळी आली रे आली
फटाके फोडु चला, अभंगस्नानाची करु तयारी
--------------------
अर्र झब्बू द्यायच्या नादात पुनः तोच महीना घेतला गेला.
एक डाव माफ करा.
गंगू म्हणाली रहिमलालाला भाई
गंगू म्हणाली रहिम लालाला "भाई"
कार्तिकपायी पोरींना झब्बूची घाई....
हाहाहा
हाहाहा
मला म्हातारीला. 'पोरी' म्हणलीस, तुझं देव भलं करो
कोजागर्ती सणासुदीला केशर घातलेलं बदामदूध मिळो
कृति चुकलं माझं ... ती शर्वरी
कृति चुकलं माझं ... ती शर्वरी आहे. हा कृतिचा उखाणा -
वरूण म्हणाला कृतिला "मनमा इमोसन जागे"
पौषाचं यमक विचारलं तर काढू वेगळे धागे
वाळ्याने निवली
वाळ्याने निवली
ग्रीष्माची काहिली
बहाव्याच्या झुंबरांनी
नजरबंदी केली
वा छानच! सहसा ग्रीष्म ऋतूवर
वा छानच! सहसा ग्रीष्म ऋतूवर कविता कमी बघायला मिळतात. तसेच शिशिर आणि हेमंत पण काव्यात थोडे दुर्लक्षिलेलेच दिसतात. तरीही आतापर्यंत आलेले सगळेच प्रतिसाद छान आहेत. आणखीन येऊ द्या.
शिशिरातली पानगळ
शिशिरातली पानगळ,
रंगीबेरंगी सड्याच्या रांगोळीने,
धरती सजवते.
नवीन पालवीसाठी,
जुने त्यागते.
ग्रीष्माच्या काहीलीमुळे भुईने
ग्रीष्माच्या काहीलीमुळे भुईने फोडला टाहो,
आभाळ ऐकून द्रवले, वळीव आला आला हो
मृग आला मृग आला , हत्ती होते
मृग आला मृग आला , हत्ती होते वाहन
पाऊस काही पडला नाही, रूसला का गजानन
वरुणाची कृपा पाऊस पडला धो धो
वरुणाची कृपा पाऊस पडला धो धो,
शेतकर्याने पेरणीकरता कंबर कसली हो
<पेरणीच करतात ना पावसाळ्यात? वेगवेगळ्या पिकांचे वेळापत्रक माहीत नाही>
फाल्गुन महीन्यात पळसाला फुले
फाल्गुन महीन्यात पळसाला फुले आली लाल
होळीचा सण आला फेका गुलाल
गुलाबी थंडी पांघरतो हेमंत
गुलाबी थंडी पांघरतो हेमंत
आल्हाददायक गारव्याचा,
आस्वाद घेतो आसमंत.
मस्त अन्जू. पानगळीचाही मस्त
मस्त अन्जू. पानगळीचाही मस्त होता.
धन्यवाद. सर्वच छान लिहितायेत
धन्यवाद. सर्वच छान लिहितायेत.
वरती संयोजकानी शिशिर, हेमंत दुर्लक्षिले दिसतायेत लिहिलं म्हणून त्यावर पहिला प्रयत्न केला.
शिशीर-हेमंत-ग्रीष्म-वर्षा
शिशीर-हेमंत-ग्रीष्म-वर्षा-वसंत आणि शेवटचा ऋतु कोणता?
एस्कोबारने मागवला कोलंबियातून
एस्कोबारने मागवला कोलंबियातून सोन्याचा कमोड
मार्गशीर्षाच्या यमकापायी बघा झाला सर्वांचा बिमोड
शरद ग सामो.
शरद ग सामो.
Pages