![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2022/02/26/alankar3.jpeg)
आज २७ फेब्रुवारी २०२२. सर्वांना मराठी भाषा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. यंदाच्या आपल्या ५ दिवसांच्या भाषोत्सवातला आजचा तिसरा दिवस. आपला अलंकारांचा खेळ असाच चालू ठेऊया.
दागिने किंवा अलंकार हे व्यक्तींच्या सौंदर्यात भर टाकतात. त्याचप्रमाणे मराठी भाषेच्या सौंदर्यात भर टाकणारे भाषेचे अलंकारदेखिल आहेत. आपल्यापैकी काहींनी ते शाळेत शिकलेही असतील. मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आपण त्या अलंकारांचे काही खेळ खेळू, म्हणजे ते अलंकार काय आहेत हे कळायला सोपे जाईल आणि जरा मजाही येईल. तसे भाषेचे अलंकार अनेक आहेत, परंतु तूर्तास आपण काही निवडक अलंकार खेळासाठी घेऊ या. २५ फेब्रुवारी ते १ मार्च या काळात रोज एकेका अलंकाराचा खेळ खेळला जाईल.
तर मायबोलीकरांनो आजचा अलंकार आहे 'यमक'
-------------------------------------------------
थोडक्यात माहिती
कवितेच्या चरणात ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक हा शब्दालंकार होतो.
उदाहरणार्थ :
१. जाणावा तो ज्ञानी
पूर्ण समाधानी
निःसंदेह मनी
सर्वकाळ
२. पहिला पाऊस पडला
सुगंध सर्वत्र दरवळला
-------------------------------------------------
चला तर मग, आजचा खेळ सुरू करू
यमक घेऊन कविता लिहिणे हा अनेक माबोकर्यांच्या डाव्या हातचा मळ. अनेकविध विषयांवर येथे काव्यनिर्मिती होते, हे आपल्या सर्वांना माहीत आहेच. पण आज मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आपण काव्यात एखादा मराठी महिना (चैत्र, वैषाख, ज्येष्ठ, ... वगैरे), सणवार, ऋतू (वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, ... इत्यादींपैकी) गुंफुयात.
नियम-
१. एका वेळी कोणताही एक मराठी महिना घेऊन त्यातील सण-वार, ऋतू, अजून एखादे वैशिष्ट्य चारोळी स्वरूपात मांडायचे आहे आणि त्याबरोबरीने यमक ही साधायचे आहे.
२. पुढील सदस्य झब्बू देताना तो महिना लगेच घेऊ शकत नाही.
उदा - श्रावण महिन्यातील वर्णन करणारी चारोळी असेल तर पुढचा झब्बू श्रावण महिना नसावा.
३. मराठी महिन्याचा उल्लेख केला तरी/ नाही तरी चालेल.
उदा - गणपती बाप्पा/मोदक चा उल्लेख असेल तर महिन्याचे नाव लक्षात येईलच. ऋतूंच्या नावावरून महिना लक्षात येईलच असे नाही. तिथे महिना सांगावा लागेल.
चला चला करा सुरुवात |
अलंकाराचा हा खेळ येऊ द्या रंगात ||
चैत्रातले चैत्रांगण,
चैत्रातले चैत्रांगण,
झोपाळ्यावर झुलते चैत्रगौर.
लवकर आणा पन्हे, आंबेडा़ळ
भुक लागली फार.
(बालपणी खरंच आंबेडाळ आणि पन्हयावर डोळा ठेऊन आईबरोबर इथे आणि आतेबरोबर कोकणात चैत्रगौर हळदीकुंकवाला जायचो, सजावट पण मोहवायची पण मुख्य उद्देश खाणं) .
वसंतातल्या मभादिनी आणा मराठी
माघात नको अल्लू नको राम, आणा मराठी नायक
पकपक्पक म्हणायला मात्र हवी सलमा हायक
सी ताई जोरदार एकदम.
सी ताई जोरदार एकदम.
कोंबडी पळाली तरी काय, खाऊ आपण
कोंबडी पळाली तरी काय, खाऊ आपण टीक्का पनीर
दिवाळसणाला उखाणा घेत , दीपिकाला म्हणाला रणवीर
बाजीराव म्हणून रणवीर मराठी
बाजीराव म्हणून रणवीर मराठी काय
चैत्रापासून झिंगाट लई गाजलंच हाय...
आषाढ तळला मी आणि सुटलाय
आषाढ तळला मी आणि सुटलाय घमघमाट
लक्ष्या चालेल का ताई, आठवतोय थरथराट
येस्स्स... लक्ष्या बेष्ट. आता
मोहिनी... जमलंय बरं यमक![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मोहीनी
मोहीनी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वर्षा ऋतु घेऊन येतो
वर्षा ऋतु घेऊन येतो
मेंदी, चटणी, पोपटी, हिरव्या, शेवाळी रंगांची बहार मखमली
डोले त्या तालावर मोर
आणि फुले पाने वेली.
मास हा अधिक असे असु द्या ही
मास हा अधिक असे असु द्या ही जाण
दोन गोड शब्दांचे जावयाला द्या वाण.
मस्तच मानव.
मस्तच मानव.
अलवार वाजे अलगुज,
अलवार वाजे अलगुज,
निनादती पैजणे आणि टिपऱ्या खास.
अश्विनात असा रंगला,
तालासुरांचा नादमय रास.
वाह !! अंजुताई
वाह !! अंजुताई
वाह अंजू काय सुरेख लिहीलेस.
वाह अंजू काय सुरेख लिहीलेस.
धन्यवाद.
धन्यवाद.
पौर्णिमेला अलगूज वाजे, राधेचा
पौर्णिमेला अलगूज वाजे, राधेचा उसवला श्वास
दिस उगवला आता, नव्या अलंकाराचा ध्यास
मुगाची खिचडी , बाजरीची भाकरी
मुगाची खिचडी , बाजरीची भाकरी , वांग्याच्या भाजीचा घेतला घास
हेमंत ऋतूतल्या धुंधुरमासाचा मेनू असतो खास
प्रतिसाद वाचताना आली धमाल
प्रतिसाद वाचताना आली धमाल
यमक अलंकार खासच सजला काल
आता नवीन धाग्यात लावा नवी युक्ती
पुढचा अलंकार दिला आहे 'अतिशयोक्ती'
https://www.maayboli.com/node/81190
अरे मस्त. संयोजक झिंदाबाद.
अरे मस्त. संयोजक झिंदाबाद.
अंजू, गोड कविता रचल्यात!
अंजू, गोड कविता रचल्यात!
मस्तच सगळे यमक्या बहाद्दर!
मस्तच सगळे यमक्या बहाद्दर! मजा आली वाचताना
अन्जू छान झाल्यात रचना सगळ्या
अन्जू छान झाल्यात रचना सगळ्या
हेमंत पण झाला मस्त..... सगळे ६ ऋतू पूर्ण
इतक्या कौतुकाबद्दल सर्वांना
इतक्या कौतुकाबद्दल सर्वांना धन्यवाद . यमक जरा सोपा अलंकार, एरवी माझी फार झेप नाही.
सर्वांनी छान लिहीलं, रंगतदार आणि काव्यमय. काही जणांच्या कॉमिक टचनेही रंगला हा उपक्रम.
प्रतिसाद वाचताना आली धमाल
यमक अलंकार खासच सजला काल
आता नवीन धाग्यात लावा नवी युक्ती
पुढचा अलंकार दिला आहे 'अतिशयोक्ती' >>> आहाहा एकदम, भारीच.
Pages