मराठी भाषा दिवस २०२२ - खेळ: भाषेचे अलंकार - २६ फेब्रुवारी - आजचे अलंकार 'उपमा, उत्प्रेक्षा, व्यतिरेक'

Submitted by संयोजक-मभादि on 25 February, 2022 - 19:40

दागिने किंवा अलंकार हे व्यक्तींच्या सौंदर्यात भर टाकतात. त्याचप्रमाणे मराठी भाषेच्या सौंदर्यात भर टाकणारे भाषेचे अलंकारदेखिल आहेत. आपल्यापैकी काहींनी ते शाळेत शिकलेही असतील. मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आपण त्या अलंकारांचे काही खेळ खेळू, म्हणजे ते अलंकार काय आहेत हे कळायला सोपे जाईल आणि जरा मजाही येईल. तसे भाषेचे अलंकार अनेक आहेत, परंतु तूर्तास आपण काही निवडक अलंकार खेळासाठी घेऊ या. २५ फेब्रुवारी ते १ मार्च या काळात रोज एकेका अलंकाराचा खेळ खेळला जाईल.

तर आजचे अलंकार आहेत 'उपमा, उत्प्रेक्षा आणि व्यतिरेक'.

थांबा थांबा. अचानक आलेल्या तीन अलंकारांनी भांबावून जाऊ नका. आपण आधी ते काय आहेत ते बघू आणि मग हे तीन एकत्र का घेतलेत तेही बघू.

उपमा, उत्प्रेक्षा आणि व्यतिरेक - काय आहेत हे?
हे कळण्यासाठी आधी आपल्याला 'उपमान' आणि 'उपमेय' काय आहेत ते बघावे लागेल. फार काही अवघड नाही. दोन घटकांतील साम्य/साधर्म्य दाखवताना हे घटक विचारात घेतले जातात.

उपमेय - मुळात ज्या घटकाचे वर्णन केले आहे, ते म्हणजे उपमेय
उपमान - ज्या घटकाशी साम्य दर्शवायचे, तो घटक म्हणजे उपमान

हे तीनही अलंकार उपमान आणि उपमेय ह्यांच्या परस्परसंबंधांवर अवलंबले आहेत.

उपमा
उपमान हे उपमेयासारखेच असल्याचे वर्णन जिथे येते, त्या अलंकाराला उपमा असे म्हणतात. ओळखण्याची सोपी खूण म्हणजे ह्यात 'सम, समान, -सारखे, -वाणी, -गत, जसे, तसे, -प्रमाण, -सदृश, -परी, -तुल्य' यांप्रमाणे एखादा साधर्म्यसूचक शब्द असतो.

उदाहरणार्थ - आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे

उत्प्रेक्षा
उपमेय हे उपमानच आहे अशी जिथे कल्पना केलेली असते, त्या अलंकाराला उत्प्रेक्षा असे म्हणतात. ओळखण्याची सोपी खूण म्हणजे ह्यात 'जणू, जणूकाही, जणूकाय, की, गमे, वाटे, भासे, म्हणजे' यांप्रमाणे एखादा साधर्म्यसूचक शब्द असतो.

उदाहरणार्थ - ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू

व्यतिरेक
उपमेय हे उपमानापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे असे वर्णन जिथे येते, त्या अलंकाराला व्यतिरेक असे म्हणतात.

उदाहरणार्थ - अमृताहुनी गोड नाम तुझे देवा

आता आजचा खेळ काय आहे?
हा खेळ म्हणजे गाण्यांचा झब्बू आहे. अशी मराठी गाणी शोधा ज्यांमध्ये उपमा, उत्प्रेक्षा, किंवा व्यतिरेक वापरला गेला आहे. बघूया आपल्याला किती गाणी सापडतात ते. आजचा दिवस ह्या तीन अलंकारांनी सजवूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्थशून्य भासे मध्ये उत्प्रेक्षा अलंकार कसा ते कळलं नाही.

उत्प्रेक्षा अलंकाराचं उदाहरण - ही नव्हे चांदणी, ही तर मीरा गाते

अर्र हे मला हिंदीत आलं:
उपमा - चौदहवी का चांद हो
उत्प्रेक्षा - चांद जैसे मुखडे पे बिंदीया सितारा... ( बिंदीया सितारा ही उपमा आहे, पण चांद जैसे मुखडे पे उत्प्रेक्षा आहे.)
व्यतिरेक - तुमसे बढकर दुनिया में ना देखा कोई और...
(आता मराठीत काही येईना!! टोटल फेल... )

उपमा
काकडीचा बांधा तुझा, मिरचीचा तोरा
मुळ्यावानी कडू तरी, रंग गोरा गोरा
तुझा मिरचीचा तोरा, तुझा रंग गोरा गोरा
लीम्बावानी कांती तुझी, बीटावानी ओठ
टंब्याटाचे गाल तुझे, भेन्डीवानी बोटं
काळजात मंडई तू मांडशील काय
रानी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय
ढिपाडी ढिपांग ढिचीपाडी ढिपांग

गेली सांगून ज्ञानेश्वरी रं माणसा परीस मेंढरं बरी - व्यतिरेक.
हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी - उत्प्रेक्षा

उत्प्रेक्षा: मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त
वरच्या चीट शीट प्रमाणे हा उपमा आहे का? सीमारेषा कशी ओळखायची?

उपमा का उत्प्रेक्षा ? : लहानपण देगा देवा , मुंगी साखरेचा रवा

उपमा: तू वैल राधा, तू पैल संध्या
तू वैल राधा, तू पैल संध्या
चाफेकळी प्रेमाची

तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी
तू बहराच्या बाहूंची
तू तेव्हा तशी...

उपमा
हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी
उत्प्रेक्षा
दिसशी तू नवतरुणी काश्मिरी

व्यतिरेक( ?) : फडं सांभाळ तुऱ्याला गं आला
तुझ्या ऊसाला लागंल कोल्हा

(अमितचं बघून हे फार चावट वाटतेयं )

तुझी चाल तुरुतुरु उडती केस भुरुभुरु
डाव्या डोळ्यावर बट ढळली
जशी मावळत्या उन्हात, केवड्याच्या बनात
नागिण सळसळली

उपमा!!

उपमा
ऋतू हिरवा, ऋतू बरवा
ऋतू हिरवा, ऋतू बरवा
पाचूचा वनी रूजवा
पाचूचा वनी रूजवा, हिरवा

उत्प्रेक्षा
नभी उमटे इंद्रधनू
नभी उमटे इंद्रधनू
मदनाचे चाप जणू
नभी उमटे इंद्रधनू

मी लिहिलेलं "ही नव्हे चांदणी ही तर मीरा गाते " . यात अपन्हुती अलंकार आहे.

साधर्म्यसूचक शब्द असलेला उत्प्रेक्षा अलंकाराचा गाण्यांतला उपयोग आठवत नाही Sad

पण उपमेय हे जणू उपमानच आहे या निकषात बसणारी अनेक गाणी आहेत. इथेही आली आहेत.
श्वास तुझा मालकंस, स्पर्श तुझा पारिजात यातही "जणू" अध्याहृत आहे. त्यामुळे मला हा उत्प्रेक्षा अलंकार वाटतो.

उत्प्रेक्षा:

सांज ये गोकुळी, सावळी सावळी

पर्वतांची दिसे दूर रांग
पर्वतांची दिसे दूर रांग
काजळाची जणू दाट रेघ
काजळाची जणू दाट रेघ

होई डोहातले चांदणे सावळे
होई डोहातले चांदणे सावळे
भोवती सावळया चाहूली

सांज ये गोकुळी, सावळी सावळी

माऊली सांज, अंधार पान्हा
विश्व सारे जणू होय कान्हा
माऊली सांज, अंधार पान्हा
विश्व सारे जणू होय कान्हा

मंद वाऱ्यावरी वाहते बासरी
मंद वाऱ्यावरी वाहते बासरी
अमृताच्या जणू ओंजळी

उत्प्रेक्षा :
सीतेच्या वनवासातील
सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
भय इथले संपत नाही

उपमा:
स्तोत्रात इंद्रिये अवघी
स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे?
हे सरता संपत नाही
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे
भय इथले संपत नाही

उत्प्रेक्षा (?) नाही पुण्ण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी
जिणे गंगौघाचे पाणी
उपमा:
आम्हां नाही नामरूप
आम्ही आकाश स्वरूप
जसा निळानिळा धूप

Pages