नमस्कार मंडळी!
आपल्या कवी आणि साहित्यिकांच्या दिमाखदार कृतींनी बहरलेल्या मायबोली मराठीच्या मायेपोटी आपण कवीवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी मराठी भाषा दिन साजरा करतो. ह्या वर्षी ह्या सोहळ्यासाठी नव्या दमाने पुन्हा सज्ज होऊया! आपल्या मायबोलीचा हा उत्सव यंदा २५ फेब्रुवारी ते १ मार्च ह्या काळात विविध उपक्रमांसह उत्साहाने साजरा करूया! ( लेख आणि अभिवाचनासाठी मुदत २ मार्चपर्यंत वाढवली आहे).
मराठी मनाच्या गाभार्यात ज्यांच्या गाण्याचा सुगंध सदैव दरवळत असतो, अश्या पंडित भीमसेन जोशी, शांताबाई शेळके, वसंत बापट ह्यांची जन्मशताब्दी ह्या वर्षी आहे किंवा नुकतीच संपली आहे. त्याचबरोबर आपणा सर्वांच्या आवडत्या गानकोकिळा लता मंगेशकर ह्यांनाही श्रद्धांजली वाहण्याची इच्छा आहे. हे सर्व पूर्वघोषित आणि ऐनवेळेच्या उपक्रमांमधून योजण्याचा संयोजक मंडळाचा मानस आहे. शब्द आणि त्यांचे अर्थ ह्यांच्या भावसाधनेतूनच ह्या कलाकारांची कला आपणापर्यंत पोहोचते. ह्या शब्दरूपी आणि अर्थरूपी अलंकारांचाही उत्सव आपल्या उपक्रमांमधून साजरा होणार आहे. आपल्याला हे सर्व शब्दांचे धन लहानपणी कुणीतरी मुक्तहस्ते देऊ केलेले असते. त्यांच्यामुळेच आपण थोडेतरी मिरवू शकतो. अश्या ह्या शिक्षकांचे किंवा व्यक्तींचे आपण ऋणी असतो. अश्या व्यक्तींच्या आठवणींना लेखातून उतरवण्याची मजाही आपण मराठी भाषा दिनाच्या उपक्रमात ह्या वर्षी घेणार आहोत. इतिहासाचा हा धांडोळा घेत असताना मराठीच्या भावी पिढीलाही आपण विसरून चालणार नाही. त्या बच्चेकंपनीसाठी आपण अक्षरे आणि चित्रकला ह्यांचा अनोखा मेळ घेऊन आलो आहोत.
मराठी भाषा दिन २०२२च्या पूर्वघोषित उपक्रमांबाबत अधिक जाणून घेण्यासाठी पुढील दुव्यांवर टिचकी मारा.
(१) मराठी भाषा दिवस २०२२ - उपक्रम - सरस्वतीची चिरंजीव मुले
https://www.maayboli.com/node/81118
(२) मराठी भाषा दिवस २०२२ - उपक्रम - माझे मराठीचे मास्तर / माझ्या मराठीच्या बाई
https://www.maayboli.com/node/81119
(३) मराठी भाषा दिवस २०२२ - बालचित्रकारांसाठी उपक्रम - अक्षरचित्रे
https://www.maayboli.com/node/81120
(४) मराठी भाषा दिवस २०२२ - उपक्रम - अभिवाचन/साहित्यवाचन
https://www.maayboli.com/node/81146
ह्याशिवाय आधी म्हटल्याप्रमाणे ऐनवेळचे उपक्रम आणि खेळ आम्ही त्या त्या दिवशी घेऊन येणारच आहोत. त्यांचे दुवे खालीलप्रमाणे:
(५) मराठी भाषा दिवस २०२२ - खेळ: भाषेचे अलंकार
२५ फेब्रुवारी - आजचा अलंकार 'अनुप्रास' - https://www.maayboli.com/node/81163
२६ फेब्रुवारी - आजचे अलंकार 'उपमा, उत्प्रेक्षा, व्यतिरेक' - https://www.maayboli.com/node/81173
२७ फेब्रुवारी - आजचा अलंकार 'यमक' - https://www.maayboli.com/node/81181
२८ फेब्रुवारी - आजचा अलंकार 'अतिशयोक्ती' - https://www.maayboli.com/node/81190
१ मार्च - आजचा अलंकार 'श्लेष' - https://www.maayboli.com/node/81199
(६) मराठी भाषा दिवस २०२२ - उपक्रम - शब्दांचा झब्बू
https://www.maayboli.com/node/81164
(७) मराठी भाषा दिवस २०२२ - उपक्रम - लता मंगेशकरांच्या गाण्यांच्या भेंड्या
https://www.maayboli.com/node/81168
तर मंडळी! उचला आपापले लेखण्या-कुंचले, आणि होऊ द्या मायमराठीचा जल्लोष!
ता. क. : विशेष सूचना
सोहळ्यादरम्यान आलेल्या सूचनेनुसार २७ फेब्रुवारी हा 'मराठी भाषा दिवस' नसून 'मराठी भाषा गौरव दिन' असल्याचे लक्षात आले. ते लक्षात आणून दिल्याबद्दल चीकू यांचे आभार. तूर्तास हा सोहळा समाप्तीच्या जवळ येऊन ठेपल्याने सर्वच धाग्यांचे आणि ग्रुपचे नामकरण बदलणे किचकट आहे. तरीही ही अनवधानाने राहून गेलेली चूक मान्य करून एक प्रातिनिधिक बदल म्हणून मूळ घोषणेचे शीर्षक बदलून त्यात 'मराठी भाषा गौरव दिवस' हे शब्द वापरत आहोत.
मायबोलीवर आणि अन्यत्रही अनेक ठिकाणी गेली अनेक वर्षे २७ फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा केला गेला. परंतु खाली दिलेले संदर्भ चीकू यांच्या मतास पुष्टी देतात. त्यामुळे पुढील वर्षापासून हा दिवस मायबोलीवर 'मराठी भाषा गौरव दिन' या नावाने साजरा व्हावा अशी विनंतीवजा सूचना आम्ही करत आहोत.
संदर्भ -
https://maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/...
https://www.esakal.com/citizen-journalism/sadanad-kadam-writes-about-mar...
अरे वा! शिवजयंतीच्या
अरे वा! शिवजयंतीच्या मुहूर्तावर मराठी भाषा दिवसाची घोषणा आली! छान आहेत सगळे उपक्रम!
वावेला मम. शुभेच्छा.
वावेला मम. शुभेच्छा.
अरे वा, घोषणा आली! उपक्रम
अरे वा, घोषणा आली! उपक्रम बघते.
एक सुचना, जरा तारीख घालून केव्हापासून केव्हापर्यंट मराठी भाषा दिवस साजरा करणार आहात ते शीर्षकात लिहावे.
शुभेच्छा !
शुभेच्छा !
मस्त उपक्रम आहेत यावेळी.
शुभेच्छा ! उपक्रम आवडले.
शुभेच्छा ! उपक्रम आवडले.
शुभेच्छा, उपक्रम छान आहेत !
शुभेच्छा, उपक्रम छान आहेत !
शुभेच्छा ! उपक्रम आवडले.
शुभेच्छा ! उपक्रम आवडले.
शुभेच्छा छान आहे उपक्रम
शुभेच्छा
छान आहे उपक्रम
कल्पक आहेत उपक्रम.
कल्पक आहेत उपक्रम.
छान आहेत उपक्रम!
छान आहेत उपक्रम!
उपक्रम टीम धन्यवाद. शीर्षकात
संयोजक-मभादि, धन्यवाद. शीर्षकात तारखा घातल्यामुळे आता चटकन कल्पना येत आहे.
मामी, तारखांची सूचना एकदम
मामी, तारखांची सूचना एकदम बरोबर होती.
कार्यक्रमास शुभेच्छा.
शुभेच्छा ! उपक्रम आवडले.
शुभेच्छा ! उपक्रम आवडले.
छान उपक्रम आहेत यंदाचे! भाग
छान उपक्रम आहेत यंदाचे! भाग घेण्याचा प्रयत्न करेन. शुभेच्छा!
शुभेच्छा ! उपक्रमही जान आहेत.
शुभेच्छा ! उपक्रमही छान आहेत.
छान आहेत उपक्रम. मस्त होणार
छान आहेत उपक्रम. मस्त होणार मभादि.
सगळ्या उपक्रमांचे धागेही वर
सगळ्या उपक्रमांचे धागेही वर काही महत्त्वाचे मध्ये दिसले तर बरं होईल
मभादिचे सर्व धागे सार्वजनिक
मभादिचे सर्व धागे सार्वजनिक करा कृपया. गृपचे सभासद झाल्यावरच दिसत आहेत.
मामी, ह्या ग्रुपातले सर्व
मामी, ह्या ग्रुपातले सर्व धागे सार्वजनिकच आहेत व लॉगिन न करताही दिसत आहेत.
मी आधी गृपसभासद नव्हते तर मला
मी आधी गृपसभासद नव्हते तर मला दिसत नव्हते धागे. काय की! सॉरी.
हा मायबोलीचा अधिकृत उपक्रम
हा मायबोलीचा अधिकृत उपक्रम आहे तर सगळ्यांना या गृपात डिफॉल्ट टाकता येईल का? कुणाला नको असेल तर ऑप्ट आऊट करण्याची सोय असू दे, पण ग्रुपात येणे विनासायास असावे. एकाही क्लिकची जरुरी असू नये.
हा मायबोलीचा अधिकृत उपक्रम
हा मायबोलीचा अधिकृत उपक्रम आहे तर सगळ्यांना या गृपात डिफॉल्ट टाकता येईल का? >>>> +१
दरवर्षी गणेशोत्सवाला आणि मभादिला हा प्रॉब्लेम येतो. हे ग्रुप काढले की सगळ्यांना ह्यात घालूनच टाकावं.
उपक्रमांचे सर्व धागे काढताना
उपक्रमांचे सर्व धागे काढताना सर्व वाचकांना दिसतील अश्या सोयीनेच ते सार्वजनिक केले आहेत. तरीही ते सर्वांना दिसत नसावेत असं वरच्या प्रतिसादांवरून दिसतं आहे. ही समस्या वेमा यांच्यापर्यंत कळवली आहे. बघूया ते काय म्हणत आहेत ते.
"मायबोलीवर नवीन" यात "काही
"मायबोलीवर नवीन" यात "काही महत्त्वाचे" खाली हा धागा दिसतो. तिथेच उपक्रमाचे धागेही दिसले तर बरं होईल.
"मायबोलीवर नवीन" यात "काही
"मायबोलीवर नवीन" यात "काही महत्त्वाचे" खाली हा धागा दिसतो. तिथेच उपक्रमाचे धागेही दिसले तर बरं होईल. >>
सगळे धागे वर दिले तर ती खूपच मोठी यादी होईल. म्हणून आपण घोषणा धागा वर ठेवला आहे.
त्याचबरोबर आता मुख्य मेनू मध्ये "मराठी भाषा दिवस २०२२" हा दुवा दिला आहे. तिथे हे सारे धागे एकत्रित पाहता येतील.
(१) मराठी भाषा दिवस २०२२ -
(१) मराठी भाषा दिवस २०२२ - उपक्रम - सरस्वतीची चिरंजीव मुले
हे वाचून मनात उमटलेले लिहावे कि नको अशी उलटसुलटता चालू आहे. २००८ पासून मायबोलीवर निरनिराळ्या लोकांनी जागतिक मराठी भाषा दिन का असावा याबद्दल लिहीले आहे. मराठी दिन अशी सरकारी मान्यता २०१३ ला मिळाली. त्या आधी हा दिवस साजरा करण्यामागे भूमिका तयार करताना मराठी जनांनी एकत्र यावे ही पण भूमिका आहे.
तर मग सरस्वतीची मुले असा उल्लेख करून ब्राह्मणी सांस्कृतिक आक्रमण का ? लेखक तर सर्वांचे असतात ना ? इथे सरस्वतीची मुले याला काउंटर म्हणून सावित्रीची मुले असेही नको. सावित्रीचा वारसा सांगता येईल असे साहीत्यिक आठवावेत तर झटकन आठवत नाहीत.
ज्या तीन साहीत्यिकांबद्दल लिहायचे आहे त्यांची जन्मशताब्दी आहे हे म्हणणे योग्य आहे. संयोजकांच्या या उद्दिष्टाबद्दल काहीच आक्षेप नाही. त्यात हे अमूक का नाहीत हा ही प्रश्न नाही इथे.
उपक्रम राबवताना सर्वसमावेशकता अपेक्षित असावी असे समजले तर चालेल का ? तसे नसेल तर स्पष्ट केलेले बरे. पुढच्या वेळेपासून कुणाला असे प्रश्न पडू नयेत यासाठी हे आवश्यक आहे.
आनंदात रसभंग करणारा प्रतिसाद वाटला असेल तर उडवला तरी चालेल.
@ सुकरात
@ सुकरात
धन्यवाद .... सरस्वती फक्त ब्राम्हणांची असं शालेय जीवनात मला गुरुजनांनी कधीच सांगितलं नाही. आम्हाला सरस्वती विद्येची देवता हेच शिकवलं गेलं.
तुमच्यामुळे नवीन माहिती मिळाली.
मला पण माहित करून घ्यायला
मला पण माहित करून घ्यायला आवडेल. सरस्वती ब्राह्मणी कशी काय ?
बरं आणि लेखक सर्वांचे असं एकीकडे म्हणताय तर मग ते तरी कसे? तेही जातीप्रमाणे डिव्हाइड नाही का होत?
सरस्वतीची मुले किंवा
सरस्वतीची मुले किंवा सरस्वतीचा स्पर्श किंवा साक्षात सरस्वती इ हे वाक्प्रचार आहेत असे मला वाटते (माझे चुकतही असेल.). तिथे जात-धर्म असे अपेक्षित नसते तर त्या त्या भाषेचे वळण असते. जसं "सलमानने दबंग ४ चा श्रीगणेशा केला" वाचताना वावगे वाटत नाही तसेच इथेही वावगे वाटले नाही.
ते ट्रोल आहेत. अक्षरावरुन ओळख
ते ट्रोल आहेत. अक्षरावरुन ओळख पटत्येय की!
Pages