1 वाटी 3 ते 4 तास भिजवून वाटलेली हरभरा डाळ
1 वाटी 1 तास भिजवलेला हुरडा (ज्वारीचा)
2 टे स्पून हि. मिरची आणि आल्याची पेस्ट
2 टे स्पून काश्मिरी लाल तिखट
2 टी स्पून धणे + जीरे पूड
1 मोठा कांदा बारीक चिरलेला
1 लिंबाचा रस
1 टी स्पून हळद
थोडा खाण्याचा सोडा
बाईंडिंग साठी बेसन पीठ
1 टे स्पून पिठीसाखर
चवीनुसार मीठ
आणि तेल
भिजवलेल्या हुरड्यातला अर्धी वाटी हुरडा मिक्सरला बारीक करा आणि तो वाटलेल्या हरभरा डाळीत मिक्स करा. राहिलेला अर्धा वाटी हुरडा (अखंड) पण ह्याच मिश्रणात टाका. ह्या मिश्रणात तेल सोडून वरील सर्व जिन्नस टाका आणि सरबरीत मिश्रण तयार करा. आता कढईत तेल तापत ठेवा, तेल तापले की त्यात वरील मिश्रणाच्या भजी करून तळून काढा. टोमॅटो केचप बरोबर मस्त लागतात.
मिश्रण सैल होते म्हणून बेसन पीठ घालावे लागेल नाहीतर भजी तेलात पसरतील.गुजराती पदार्थ आहे म्हणून लिंबू आणि पिठीसाखर वगळू नये.सध्या अजून थोडेच दिवस हुरडा मिळेल म्हणून हा पदार्थ करायचा असल्यास लवकर करावा लागेल.
छान
छान
वा!
वा!
ह्याचे अप्पेपण होतील
ह्याचे अप्पेपण होतील
Mast.
Mast.
1 भजे
अनेक भजी
तोंपासू डिश!
तोंपासू डिश!
छान दिसताहेत वडे
छान दिसताहेत वडे
जरा जास्त कडकडीत झाले होते
जरा जास्त कडकडीत झाले होते एकदा केले तर. नंतर पुन्हा केले नाहीत. डाळवडेसुद्धा डाळ भरड वाटली तर चांगले होत नाहीत.
मस्त दिसताहेत वडे! एकदम लगेच
मस्त दिसताहेत वडे! एकदम लगेच खावेसे वाटताएत.
धन्यवाद लंपन!
धन्यवाद लंपन!
सही दिसताएत. पण हुरडा मिळेल
सही दिसताएत. पण हुरडा मिळेल का आमच्या इथे बघावं लागेल. आणि भजीचं पिठ नेहमी सारखं भिजवायचं ( तिखट, मीठ, ओवा कडकडीत तेलाचं मोहन) कि नुसतंच बेसनात पाणी घालायचं?
ओह, मी परत वाचलं ते" भजी करून तळायचं" ह्या वाक्याने माझा गोंधळ झाला. छोटे छोटे वडे तळायचे ना?
धनुडी, मुंबईत हुरडा विचारलंस
धनुडी, मुंबईत हुरडा विचारलंस तर नाही मिळणार, पण पोक विचार लगेच मिळेल. घाटकोपर, बोरिवली, मलाड, मुलुंड, पार्ला इ. गुज्जू एरियात हिरवे दाणे असतात ते पोकचेच.
भारी दिसताहेत वडे.
भारी दिसताहेत वडे.
हो काय? ( मला इथे गोरेगावात
हो काय? ( मला इथे गोरेगावात माहिती नाही आणि तुला तिथे बसून माहिती? शोनहो ( मला) ) पोंक हे पहिल्यांदाच नाव ऐकले.
लोक्स खूप खूप धन्यवाद _/\_
लोक्स खूप खूप धन्यवाद _/\_ ब्लॅककॅट ट्राय करायला हवेत आप्पे. देवकी, आय माय स्वारी बदल केलाय. अनेकवचन घाईघाईत चुकीचे लिहिले. हीरा, ह डाळ बारीक वाटली, पाणी जास्तच झाले तर बेसन थोडे जास्त लागेल बाईंडिंग साठी, कडक नाही झाली भजी अजिबात. धनुडी, मी पण हे नाव पहिल्यांदा ऐकलं बेसन फक्त बाईंडिंग साठी आहे, ओवा , मोहन काही घालायचं नाहीये, हुरडा आणि ह डाळ मिळून येण्यासाठी बेसन , फारतर 4-5 चमचे लागेल.
मस्त दिसत आहेत.
मस्त दिसत आहेत.
भारीच दिसतायेत.
भारीच दिसतायेत.
एक नंबर
एक नंबर
मस्त दिसत आहेत वडे !
मस्त दिसत आहेत वडे ! नवीन प्रकार आहे.
मुंबईत पोंक अनेक ठिकाणी मिळतं
मुंबईत पोंक अनेक ठिकाणी मिळतं पण दाणे लुसलुशीत असतीलच असं नाही. आणलेला माल त्या दिवशी विकला नाही गेला तर दुसऱ्या दिवशी दाणे कडक टणटणीत होतात. मुंबईतल्यांसाठी मी सुचवेन की सगळाच हुरडा भरडून घ्यावा.
मस्त दिसतायत वडे!
मस्त दिसतायत वडे!
वेगळाच पदार्थ आहे, कधी ऐकला
वेगळाच पदार्थ आहे, कधी ऐकला नव्हता. आतापर्यंत हुरडा आणुन लोखंडी अतिगरम तव्यावर स्मोकी टेस्ट येईपर्यंत भाजुन, तसा खाल्ला आहे.
1 टे स्पून साखर अति जास्त झाली. तुम्हाला टी स्पून म्हणायचं असेल. हो ना?
वा! मस्त. पोंक हा शब्द
वा! मस्त. पोंक हा शब्द पहिल्यांदा ऐकला.
झकास रेसेपी.
झकास रेसेपी.
आधी बडोद्याला आणि इतक्यात मुंबई-सिल्वासा रोड ट्रिपच्या वेळी एका पारशी बावाकडे खाल्ला होता पोंक वडा. विथ लीली मर्चानु अथाणू.
घरी करायला पाहिजेतच आता - मायनस द साखर !
मस्त दिसत आहेत..
मस्त दिसत आहेत..
अरे वा ! छानच की. बायकोची मदत
अरे वा ! छानच की. बायकोची मदत घेऊन शिकतो आधी. नंतर यात काही व्हॅल्यू अॅडीशन जमतेय का ते पाहून कळवतो.
(यातली भांडी बनवून घेतली आहेत कि कुणालाही मिळू शकतील ? एका ताईंना युनिक भांडी बनवून हवी आहेत म्हणून चांचौ )
भारी! बघायला हवं.
भारी! करून बघायला हवं.
परत एकदा धन्यवाद लोक्स_/\_
परत एकदा धन्यवाद लोक्स_/\_ मीरा, एक टे स्पूनच आहे ह डाळ आणि हुरडा बारीक करून घेत आहोत त्यामुळे नाही होत गोड, पीठ वापरले असते तर गोड झाले असते. अनिंद्य, आपण नाही टाकत साखर पण हा असा साखर अन लिंबू टाकुन केल्याने छान लागला. शामा, ती खरेदी रविवार पेठेतली आहे तिथे मिळतात अशा कप्पेवाल्या डिश.
मायनस द साखर >>> यासाठी
मायनस द साखर >>> यासाठी प्रचंड अनुमोदन, हाहाहा.
भारी ! तोंपासू
भारी ! तोंपासू